Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘PMRDA’ची कार्यवाही आता वेगात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेच्या घोषणेपाठोपाठ आता त्याची कार्यवाहीदेखील तितक्याच 'सुपरफास्ट' पद्धतीने सुरू झाली आहे. विकसनशुल्काच्या माध्यमातून प्राधिकरणाला निधीचे बळ देण्यात येत असून, येत्या आठवड्यामध्ये त्याचे कार्यालय सुरू केले जाणार आहे.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात मोठे विकासप्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली आहे. या प्राधिकरणाचे कामकाज तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सरकारच्या मालकीच्या मालमत्ता 'पीएमआरडीए'च्या ताब्यात घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. तसेच ते प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. या मालमत्तांची विक्री करून किंवा त्या गहाण ठेवून त्याद्वारे विकासप्रकल्पांसाठी निधी उभारण्याची 'पीएमआरडीए'ची योजना आहे.

महापालिका आणि अन्य नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीबाहेर प्रादेशिक योजनेच्या हद्दीतील (आरपी) बांधकाम परवानगीपोटी विकसन शुल्काची (डेव्हलपमेंट चार्जेस) तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच आरपीच्या हद्दीतील बांधकाम परवानगी देण्यापोटी विकसनशुल्क आकारण्यात येणार आहे. रेडी रेकनरच्या दोन टक्के रक्कम विकसनशुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे. सध्या महापालिकांकडून बांधकाम परवानगीपोटी असे शुल्क आकारण्यात येते. दरम्यान, ग्रामपंचायत किंवा अन्य नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीतील शुल्क 'पीएमआरडीए'ला मिळणार नाही.

पंधरा दिवसांत पहिली बैठक

प्रारंभी 'पीएमआरडीए'कडे नगररचना विभागातील काही कर्मचारी काम पाहणार आहेत. येत्या काही दिवसांतच 'पीएमआरडीए'चे कार्यालय सुरू होणार असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसांत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाज मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश बापट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभयसिंह ‘MPSC’त पहिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१४ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अभयसिंह मोहिते याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. भोसरीच्या विशाल साकोरे याने मागासवर्गीय उमेदवारांमधून, तर वनश्री लाभशेटवार हिने महिला वर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी होण्यात यश मिळविले आहे. आयोगाने रविवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील 'गट अ' आणि 'गट ब'च्या अधिकारी पदांसाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या माध्यमातून आयोगाने एकूण ४३८ यशस्वी उमेदवारांची निवड केली आहे. त्यामध्ये 'गट अ'च्या १२५, तर 'गट ब'च्या ३१३ उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची आयोगाने राज्य सरकारकडे नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

राज्यात ३५ जिल्हाकेंद्रावर त्यासाठीची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १ लाख ७६ हजार २२४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यातून ६ हजार ३९५ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. मुख्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या १ हजार ३६७ उमेदवारांना आयोगाने मुलाखतीसाठी बोलविले होते. त्या आधारे आयोगाने हा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालाच्या माध्यमातून १३८ महिला आणि ११ अपंग उमेदवारांचीही अधिकारीपदासाठी शिफारस केल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

इंजिनीअर-डॉक्टरांची 'एमपीएससी'मध्येही बाजी

यंदाच्या निकालामधून एकूण १३६ इंजिनीअर आणि ८४ डॉक्टर उमेदवारांनी अधिकारी होण्यात यश मिळविले आहे. पारंपरिक विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचे या परीक्षांमधील वर्चस्व सातत्याने अधोरेखित केले जात असताना, यंदाच्या या निकालाने इंजिनीअर- डॉक्टर या परीक्षांमध्ये आघाडीवरच असल्याचे स्पष्ट केले आहे. उच्चशिक्षित उमेदवारांचे प्रमाणही यंदा लक्षणीय असून, एकूण उमेदवारांपैकी ८४ उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक असल्याचे आयोगाने रविवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत अजितदादांना धक्का

$
0
0

सहकारी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसची कारखान्यावरील बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. बालेकिल्ल्यातील सहकारात पवारांना धक्का देऊन अजित पवारांची सहकारातील सत्ता हद्दपार केली. शेतकरी पॅनलने आपला झेंडा माळेगाववर रोवला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सभासद असलेला आणि पवारांचा घरचा कारखाना म्हणून माळेगावची ओळख आहे. अजित पवार यांची एकाधिकारशाही, त्याच त्या चेहऱ्यांना झुकते माप, तरुणाईकडे पाठ, ऊस दरवाढीच्या आंदोलनाने तापलेले वातावरण, कारखाने खासगीकरणाच्या विरोधातील संतप्त प्रतिक्रिया अशा वातावरणाचा फटका पवारांना निवडणुकीच्या दरम्यान बसला.

शरद पवारांचे जुने सहकारी व खंदे समर्थक अशी ओळख असणारे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांनी पवार विरोधकांची बांधणी करून पवारांना चारीमुंड्या चीत केले आहे. बालेकिल्ल्यातील सहकार क्षेत्रात झालेला हा दारूण पराभव पवारांना स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले होते. तरीही, मतदारांनी त्यांना अस्मान दाखविले.

राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी केवळ ६ जागावर समाधान मानावे लागले आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलने तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

'या विजयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता माळेगावमधील सहकार वाचला आहे. कारखान्यात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू,' अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार रंजनकुमार तावरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन घेताय? सावधान…

$
0
0

खरेदी-विक्री व्यवहारांबात पुरंदर-दौंडच्या प्रांताधिकाऱ्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सासवड

शेतजमिनीचे अनधिकृतपणे तुकडे पाडून एक ते दहा गुंठ्यांचे प्लॉट विक्रीस काढल्याच्या जाहिराती रोज प्रसिद्ध होत आहेत, अशा फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पुरंदर-दौंड चे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी जमीन खरेदी करताना सावधगिरी बाळगायला हवी. प्लॉटचे अधिकृत खरेदीखत झाले आहे का? त्याची रजिस्टर नोंद सातबारा उताऱ्यावर झाली आहे का, याची खातरजमा करावी असेही या वेळी सांगण्यात आले.

'मोठ्या भूखंडाचे गुंठेवारी करून तुकडे पाडण्यात येतात. त्यानंतर ते विक्रीसाठी उपलब्ध करण्याच येतात. मात्र, हे भूखंड रजिस्टर खरेदीखत न करता नोटरीकडून केले जातात. याची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर केली जात नाही. त्यामुळे अशा नोटरी दस्तांचे हस्तांतरण कायदेशीर होत नाही,' असा खुलासा उपविभागीय अधिकारी शिंगटे यांनी केला. सध्या पुरंदर तालुक्यात गुंठेवारीचे पेव फुटले आहे. सामान्य गुंतवणूकदार अशा बिल्डरच्या जाळ्यात अडकतात. ही शुद्ध फसवणूक आहे. असे भूखंड हस्तांतरण बेकायदा ठरवून ते सरकार जमा केले जातात याची नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

* प्लॉट खरेदी करताना लक्षात ठेवा

>> भूखंडाचा नकाशा आणि चारही बाजूंच्या हद्दी सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केल्या आहेत का?
>> अकृषिक परवानगी आहे का?
>> प्लॉटचे अधिकृत खरेदीखत झाले आहे का?
>> त्याची रजिस्टर नोंद सातबारा उताऱ्यावर झाली आहे

अनधिकृत गुंठेवारीवर कारवाई

अनधिकृत गुंठेवारी आणि विक्री, टेकड्या आणि डोंगर फोड याचे सचित्र वृतांकन करून 'मटा'ने महसूल विभागाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अशा भूखंडाचे सर्वेक्षण करण्यात आले. अशा भूखंडाची पाहणी व पंचनामे करून संबंधित लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादांना धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसची कारखान्यावरील बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. बालेकिल्ल्यातील सहकारात पवारांना धक्का देऊन अजित पवारांची सहकारातील सत्ता हद्दपार केली. शेतकरी पॅनलने आपला झेंडा माळेगाववर रोवला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सभासद असलेला आणि पवारांचा घरचा कारखाना म्हणून माळेगावची ओळख आहे. अजित पवार यांची एकाधिकारशाही, त्याच त्या चेहऱ्यांना झुकते माप, तरुणाईकडे पाठ, ऊस दरवाढीच्या आंदोलनाने तापलेले वातावरण, कारखाने खासगीकरणाच्या विरोधातील संतप्त प्रतिक्रिया अशा वातावरणाचा फटका पवारांना निवडणुकीच्या दरम्यान बसला.

शरद पवारांचे जुने सहकारी व खंदे समर्थक अशी ओळख असणारे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांनी पवार विरोधकांची बांधणी करून पवारांना चारीमुंड्या चीत केले आहे. बालेकिल्ल्यातील सहकार क्षेत्रात झालेला हा दारूण पराभव पवारांना स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले होते. तरीही, मतदारांनी त्यांना अस्मान दाखविले. राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी केवळ ६ जागावर समाधान मानावे लागले आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलने तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

सहकार पॅनलमधील विजयी उमेदवार

रंजनकुमार तावरे, राजेंद्र बुरूंगुले, प्रताप जगताप, शशिकांत पोकळे, चंद्रराव तावरे, सुरेश खलाटे, तानाजी पोद्कुले, रामदास आटोळे, अविनाश देवकाते, जनार्दन झाबरे, प्रमोद गावडे, उज्ज्वला कोकरे, चितांमणी नवले, जवाहर इगुले, विलास देवकाते.

या विजयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता माळेगावमधील सहकार वाचला आहे. कारखान्यात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू.

- रंजनकुमार तावरे, विजयी उमेदवार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार वाचवण्यासाठी सामान्य शेतकरी जागा झाला आहे. त्यामुळे ही लढाई खासगीकरण विरुद्ध सहकार अशी झाली आहे.

- चंद्रराव तावरे, विजयी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर सेवा : सर्वाधिक तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सर्वाधिक तक्रारी गॅस सिलिंडरच्या सेवेबाबत आल्या आहेत. त्याबरोबरच वेगवेगळे दाखले, स्वस्त धान्य दुकानदार आणि वेगवेगळ्या फायलींची सद्यस्थिती याबाबत आलेल्या तक्रारींचे प्रमाणही मोठे असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनातील कामकाजाबाबतच्या वेगवेगळ्या तक्रारी स्वीकारण्यासाठी हेल्पलाइन आणि ऑनलाइन तक्रारी स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन तांत्रिक बिघाडामळे गेले सहा महिने बंद होती. जानेवारीमध्ये ती पूर्ववत सुरू झाली. त्यावर ४९ तक्रारी आल्या असून त्यापैकी सर्वाधिक, म्हणजे ३७ तक्रारी या गॅसपुरवठ्याच्या सेवेबाबत आहेत. त्यामध्ये गॅस सिलिंडर वेळेत मिळत नाही, डीबीटीएल योजनेमध्ये बँक खात्यात अनुदान जमा झाले नाही, गॅस एजन्सीतील कर्मचारी उद्धटपणा करतात, घरपोच सिलिंडर मिळत नाही, नव्या सिलिंडरसाठी शेगडीची सक्ती करण्यात येते, अशा तक्रारींचा त्यामध्ये समावेश आहे. या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविण्यात येतात आणि आठ दिवसांमध्ये तक्रारदारास फोन किंवा इमेलद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येते. या तक्रारींचे निवारण झाले की नाही, याचा आढावा जिल्हाधिकारी दरमहा घेतात. त्यामुळे या हे्ल्पलाइनवर आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ऑनलाइन तक्रारीचीही सोय...

जिल्हा प्रशासनाच्या संबंधित सेवांविषयी १८०० २३३ ३३७० या क्रमांकावर किंवा www.collectorpunehelpline.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. या वेबसाइटवर तक्रार अर्जांचे नमुने, अर्जांची सद्यस्थिती यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. याबरोबरच प्रत्यक्ष आणि टपालाद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यावर संबंधित नागरिकास एसएमएस व इमेल द्वारे कळविण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पोलिस ‘चष्मेबहाद्दर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भर उन्हात रस्त्याच्या मधोमध उभे राहून शहराचे वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलिस खरे तर चष्मेबहाद्दूरच आहेत ! चाळिशीनंतरचा अनेकांना चष्मा असूनही त्याचा वापर केला जात नसल्याचे आढळले. मोतिबिंदू तसेच वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, चुरचुरण्यासारखे १४५ वाहतूक पोलिसांमध्ये डोळ्याचे विकार असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) वतीने पुणे पोलिस दलातील वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी वाहतूक पोलिसांच्या डोळे तपासणीसाठी पुढाकार घेतला. सुमारे वीस दिवसांच्या तपासणीतील निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. शहरातील अकराशेपैकी सहाशेच पोलिसांनी डोळ्यांची तपासणी करून निगा राखत असल्याचे दाखवून दिले.

'रस्त्यावर उभे राहून वाहतूक पोलिसांना वाहनांचे नियमन करावे लागते. त्या वेळी वाहनांच्या प्रदूषणामुळे डोळ्यांचे विकार होत असल्याचे आपले निरीक्षण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या डोळे तपासणीचे आयोजन करण्यात आले. अकराशेपैकी सहाशे पोलिसांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दहा टक्के पोलिसांना चाळिशीनंतरचा चष्मा आहे. त्यातील बहुतांशजण चष्मा असूनही त्याचा वापर करीत नाही. अनेकांना नंबर लागला असला, तरी त्यांनी चष्मा घेतलेला नाही. तसेच १८ जणांना मोतिबिंदू झाल्याचे निदान झाले आहे. योग्य वेळी निदान झाले आहे. वेळ आल्यानंतरच त्यांच्या मोतिबिंदूचे ऑपरेशन करावे लागेल,' अशी माहिती 'एनआयओ'चे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

'उन्हापासून डोळ्यांच्या सरंक्षणासाठी टोपी असणे आवश्यक आहे. मात्र त्याचा वापर होत नाही. बहुतांश वाहतूक पोलिस डोळ्यांवर गॉगल लावत असल्याने उन्हासह प्रदूषणापासून डोळ्यांची निगा राखली जाते आहे. इतर पोलिसांकडून डोळ्यांची निगा राखली जात नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे डोळे कोरडे होणे, डोळे चूरचूरणे, डोळ्यांची आग होणे यासारखा तक्रारी पुढे आल्या आहेत. डोळे लाल होणे अथवा चुरचुरणे कमी होण्यासाठी डोळ्यात टाकण्यासाठीचे औषधे देण्यात आली आहेत,' असेही डॉ. केळकर यांनी सांगितले. पोलिसांच्या डोळे तपासणीसाठी डॉ. केळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जाई केळकर, डॉ. ऐश्वर्या मुळे, डॉ. संदीप अंजणकर, डॉ. मानस देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘PMRDA’ची कार्यवाही आता वेगात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेच्या घोषणेपाठोपाठ आता त्याची कार्यवाहीदेखील तितक्याच 'सुपरफास्ट' पद्धतीने सुरू झाली आहे. विकसनशुल्काच्या माध्यमातून प्राधिकरणाला निधीचे बळ देण्यात येत असून, येत्या आठवड्यामध्ये त्याचे कार्यालय सुरू केले जाणार आहे.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात मोठे विकासप्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली आहे. या प्राधिकरणाचे कामकाज तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सरकारच्या मालकीच्या मालमत्ता 'पीएमआरडीए'च्या ताब्यात घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. तसेच ते प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. या मालमत्तांची विक्री करून किंवा त्या गहाण ठेवून त्याद्वारे विकासप्रकल्पांसाठी निधी उभारण्याची 'पीएमआरडीए'ची योजना आहे.

महापालिका आणि अन्य नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीबाहेर प्रादेशिक योजनेच्या हद्दीतील (आरपी) बांधकाम परवानगीपोटी विकसन शुल्काची (डेव्हलपमेंट चार्जेस) तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच आरपीच्या हद्दीतील बांधकाम परवानगी देण्यापोटी विकसनशुल्क आकारण्यात येणार आहे. रेडी रेकनरच्या दोन टक्के रक्कम विकसनशुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे. सध्या महापालिकांकडून बांधकाम परवानगीपोटी असे शुल्क आकारण्यात येते. दरम्यान, ग्रामपंचायत किंवा अन्य नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीतील शुल्क 'पीएमआरडीए'ला मिळणार नाही.

पंधरा दिवसांत पहिली बैठक

प्रारंभी 'पीएमआरडीए'कडे नगररचना विभागातील काही कर्मचारी काम पाहणार आहेत. येत्या काही दिवसांतच 'पीएमआरडीए'चे कार्यालय सुरू होणार असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसांत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाज मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश बापट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभयसिंह ‘MPSC’त पहिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१४ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अभयसिंह मोहिते याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. भोसरीच्या विशाल साकोरे याने मागासवर्गीय उमेदवारांमधून, तर वनश्री लाभशेटवार हिने महिला वर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी होण्यात यश मिळविले आहे. आयोगाने रविवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील 'गट अ' आणि 'गट ब'च्या अधिकारी पदांसाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या माध्यमातून आयोगाने एकूण ४३८ यशस्वी उमेदवारांची निवड केली आहे. त्यामध्ये 'गट अ'च्या १२५, तर 'गट ब'च्या ३१३ उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची आयोगाने राज्य सरकारकडे नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

राज्यात ३५ जिल्हाकेंद्रावर त्यासाठीची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १ लाख ७६ हजार २२४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यातून ६ हजार ३९५ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. मुख्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या १ हजार ३६७ उमेदवारांना आयोगाने मुलाखतीसाठी बोलविले होते. त्या आधारे आयोगाने हा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालाच्या माध्यमातून १३८ महिला आणि ११ अपंग उमेदवारांचीही अधिकारीपदासाठी शिफारस केल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

इंजिनीअर-डॉक्टरांची 'एमपीएससी'मध्येही बाजी

यंदाच्या निकालामधून एकूण १३६ इंजिनीअर आणि ८४ डॉक्टर उमेदवारांनी अधिकारी होण्यात यश मिळविले आहे. पारंपरिक विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचे या परीक्षांमधील वर्चस्व सातत्याने अधोरेखित केले जात असताना, यंदाच्या या निकालाने इंजिनीअर- डॉक्टर या परीक्षांमध्ये आघाडीवरच असल्याचे स्पष्ट केले आहे. उच्चशिक्षित उमेदवारांचे प्रमाणही यंदा लक्षणीय असून, एकूण उमेदवारांपैकी ८४ उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक असल्याचे आयोगाने रविवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत अजितदादांना धक्का

$
0
0

सहकारी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसची कारखान्यावरील बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. बालेकिल्ल्यातील सहकारात पवारांना धक्का देऊन अजित पवारांची सहकारातील सत्ता हद्दपार केली. शेतकरी पॅनलने आपला झेंडा माळेगाववर रोवला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सभासद असलेला आणि पवारांचा घरचा कारखाना म्हणून माळेगावची ओळख आहे. अजित पवार यांची एकाधिकारशाही, त्याच त्या चेहऱ्यांना झुकते माप, तरुणाईकडे पाठ, ऊस दरवाढीच्या आंदोलनाने तापलेले वातावरण, कारखाने खासगीकरणाच्या विरोधातील संतप्त प्रतिक्रिया अशा वातावरणाचा फटका पवारांना निवडणुकीच्या दरम्यान बसला.

शरद पवारांचे जुने सहकारी व खंदे समर्थक अशी ओळख असणारे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांनी पवार विरोधकांची बांधणी करून पवारांना चारीमुंड्या चीत केले आहे. बालेकिल्ल्यातील सहकार क्षेत्रात झालेला हा दारूण पराभव पवारांना स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले होते. तरीही, मतदारांनी त्यांना अस्मान दाखविले.

राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी केवळ ६ जागावर समाधान मानावे लागले आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलने तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

'या विजयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता माळेगावमधील सहकार वाचला आहे. कारखान्यात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू,' अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार रंजनकुमार तावरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांना चुकवून पळणाऱ्या तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वाहतूक पोलिसांना चुकवून पळण्याच्या प्रयत्नात निखिल शाम आडागळे (वय २२, खुळेवाडी, लोहगाव) या दुचाकीस्वार तरुणाचा सोमवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. खराडी बायपास पोलिस चौकीजवळ घडलेल्या या प्रकारानंतर मृत तरुणाच्या नातेवाइकांनी चौकीवर दगडफेक करत मोडतोड केली.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बनसोडेच्या दुचाकीवर मागे बसून निखिल वाघोलीहून लोहगावच्या दिशेने निघाला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमाराला हे दोघेही खराडी बायपास चौकीजवळ सिग्नलला थांबले होते. त्या वेळी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडी बाजूला घेऊन दंडाची पावती करण्याचा आग्रह धरला. गाडी बाजूला घेतानाच विनोदने वाहतूक पोलिसांना चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी मागे बसलेल्या निखिलला पकडण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत गाडीवरून पडलेल्या निखिलच्या अंगावरून मागून येणाऱ्या खासगी बसचे चाक गेल्याने तो मृत्युमुखी पडला. अपघातानंतर बसचालक फरारी झाला.

घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाचा मृतदेह पोलिस चौकीसमोर आणून, त्यावर पोते झाकून ठेवले होते. ही माहिती समजल्यानंतर मृताचे नातेवाईक जमावासह खराडी पोलिस चौकीवर आले. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेकीत चौकीचे मोठे नुकसान झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा कर मागे घ्या; अन्यथा आंदोलन

$
0
0

'पतित पावन'चा महावितरणला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेबिट-क्रेडिट कार्डाद्वारे ऑनलाइन भरण्यात येणाऱ्या वीजबिलांवरील सेवा कर तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी आंदोलन पुकारण्याचा इशारा 'पतित पावन संघटने'ने सोमवारी दिला.

डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे भरण्यात येणाऱ्या वीजबिलांवर सेवा कर आकारण्याची मर्यादा दोन हजार रुपयांवरून पाचशे रुपयांवर आणण्यात आली आहे. त्याचा फटका ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लाखो ग्राहकांना बसणार आहे. या विषयी 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या संदर्भात पतित पावन संघटनेचे सरचिटणीस मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर आणि उपाध्यक्ष गोकुळ शेलार यांनी महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांना निवेदन सादर केले आहे.

सध्याच्या काळात कम्प्युटरच्या वापराचा प्रचार व प्रसार करण्याकडे महावितरणचा कल असणे, हीच काळाची गरज आहे. असे असताना त्यावर सेवा कर आकारून जनतेला पुन्हा तासनतास रांगेत तिष्ठत उभे राहण्यास महावितरण भाग पाडत आहे. त्यामुळे काळाच्या मागे नेणारा हा निर्णय रद्द करावा, अन्यथा संघटना या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा 'पतित पावन'ने दिला आहे. दरम्यान, विविध स्तरांतील वीजग्राहकांनीही महावितरणच्या या धोरणास विरोध केला आहे. असा सेवा कर लागू करणे ही चीड आणणारी गोष्ट असून, प्रगतीची चक्रे उलट फिरवण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया मांजरीरोड येथील आर. के. नेवसे यांनी व्यक्त केली आहे.

नोकरदार वर्गास रांगेत उभे राहून बिले भरणे शक्य नसल्याने ऑनलाइन पेमेंट दिवसेंदिवस लोकप्रिय व गरजेचे होत आहे. त्याद्वारे महावितरणचेही काम हलके होत आहे. त्यामुळेच अशा पेमेंटसाठी सेवा कर लावणे अनाकलनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हा सेवा कर मागे घेऊन उलटपक्षी त्यावर सवलत द्यावी आणि आम्हीही काळाबरोबर चालतो, हे महावितरणने दाखवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अशा प्रकारे भरण्यात येणारी बिले थेट महावितरणच्या खात्यात विनासायास जमा होत असल्याने पाचशे रुपयांपेक्षा अधिक बिलांवर सेवा कर लावणे अयोग्य आहे, असे ग्राहक मेहबूब निसार शेख यांनी म्हटले आहे. हा निर्णय ग्राहकांच्या हिताचा नाही, त्यामुळे सरकारला खरेच 'ई क्रांती' आणायची असेल, तर तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मनोहर साळुंखे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूककरापोटी १५७ कोटींचा भरणा

$
0
0

एकट्या रेसकोर्सकडून १८ कोटी महसूल गोळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'रेसकोर्स'वर होणाऱ्या घोड्यांच्या रेसच्या माध्यमातून यंदा उच्चांकी १८ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला असून, डीटीएच सेवा, चित्रपटगृहे व केबलद्वारे १३९ कोटी मिळून १५७ कोटी रुपयांचा करमणूक कर सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला आहे.

करमणूक करापोटी १३८ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उदिष्ट पूर्ण करून १५७ कोटी रुपये गोळा करण्यात करमणूक कर विभागाला यश आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी मार्च २०१५ अखेर ४८० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास ५९२ कोटी ६४ लाखांचा महसूल जमा करण्यात आला आहे.

महसूल जमा करण्यात करमणूक कर विभागाने आघाडी घेतली असून, पाठोपाठ वाळू लिलाव आणि खनिकर्म विभागाने रॉयल्टीच्या माध्यमातून ७३ कोटी रुपये वसूल केले आहेत. रोजगार हमी योजना उपकर, शिक्षण कर, अकृषिक आकारणी, पोटहिस्सा, फाळणी फी, अनधिकृत बिनशेत सारा यामधून ३६५ कोटी ७१ लाखांचा महसूल जमा झाला आहे. विधानसभा निवडणूक, माळीण दुर्घटना, बेकायदा बांधकामांची तपासणी, सातबारा संगणकीकरण अशी कामे करतानाच महसूल कर्मचाऱ्यांनी विक्रमी कर संकलनासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच यंदा ५९२ कोटी रुपयांचा आकडा गाठण्यात यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील नाट्य संस्थेला लुटले

$
0
0

बार्शीजवळील उपळे दुमाला गावातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील सीमांत या संस्थेचा नाट्यप्रयोग झाल्यानंतर त्यांच्याकडील चाळीस हजारांची रक्कम लुटल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळील उपळे दुमाला गावात घडला. या संदर्भात संस्थेचे संचालक आणि रंगकर्मी अविनाश देशमुख यांनी उपळे दुमाला या गावच्या सरपंच राणीताई बुरबुटे यांचे पती मनोजकुमाक बुरबुटे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

सीमांत्य या संस्थेचा 'रायगडाला जेव्हा जाग येते' हा नाट्यप्रयोग गावात करण्याचे ठरले. २ एप्रिलला हा प्रयोग ठरवण्यात आला होता. त्यानुसार बुरबुटे यांच्या वतीने आबासाहेब लांडगे यांनी देशमुख यांना दहा हजार आगाऊ दिले. तर, उरलेले चाळीस हजार प्रयोग झाल्यानंतर देण्याचे ठरले. नाट्यप्रयोगापूर्वी बुरबुटे यांनी चाळीस हजार देशमुख यांना देऊन फोटोही काढून घेण्यात आले. मात्र, प्रयोग संपल्यानंतर बुरबुटे काही माणसांना घेऊन रंगपटात आले. अर्वाच्य भाषेत कलावंतांना मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच, दिलेले चाळीस हजार रुपये काढून घेऊन ते पसार झाले. या प्रकारानंतर देशमुख यांनी भेदरलेल्या सर्व कलावंतांसह संस्थेची बस घेऊन पुणे गाठले. त्यानंतर त्यांनी बार्शी उपअधीक्षक सर्जेराव ठोंबरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली.

देशमुख यांनी या प्रकाराविषयी 'मटा'ला माहिती दिली. 'आजपर्यंत या नाटकाचे आम्ही २५००पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. मात्र, हा प्रकार धक्कादायक आहे. कोणत्याही ठिकाणी प्रयोग करताना रंगकर्मींनी सावध राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारानंतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. बाहेर प्रयोग करायचे की नाही, असा निर्णय घ्यावा लागेल. पोलिसांनी तातडीने या प्रकरणी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांनी साजरे केले संमेलन

$
0
0

* संमेलन काळातील पुस्तक विक्री लाखांच्या घरात
* संमेलनकाळात पुण्यात जोरदार पुस्तक विक्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय संमेलनाला न जाताही साहित्यप्रेमींनी पुस्तक खरेदीचा आनंद लुटला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुण्यातील काही पुस्तक विक्रेत्यांनी विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे या संमेलन काळात पुण्यातील पुस्तकांच्या विक्रीची उलाढाल लाखांच्या घरात झाली.

नुकतेच ३ ते ५ एप्रिल दरम्यान साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात झाले. घुमान येथे साहित्य संमेलनाला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने बऱ्याच पुस्तक प्रकाशक व विक्रेत्यांनी ग्रंथ प्रदर्शनात सहभाग घेतला नाही. उलट, पुण्यातील साहित्यप्रेमींसाठी सवलती जाहीर केल्या होत्या. वृत्तपत्रांतील आणि टीव्ही वाहिन्यांवरील बातम्यांनी साहित्य संमेलनाची चांगली वातावरण निर्मिती केली होती. त्याचाच फायदा पुस्तक विक्रीसाठी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळेच या तीन दिवसांत सात लाखांच्या घरात पुस्तक विक्री झाली.

बाजीराव रोडवरील आचार्य अत्रे सभागृहात सुरू असलेल्या शुभम साहित्य पुस्तक प्रदर्शनाचे कुणाल ओंबसे म्हणाले, 'संमेलन काळात प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद होता. सवलतीच्या दरात पुस्तक विक्री करण्यात आली. दर वर्षी आम्ही संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनात सहभागी होतो. मात्र, घुमानला न जाताही चांगली विक्री झाली.' साहित्य परिषदेच्या सभागृहात असलेल्या शब्दांगण या पुस्तक प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. 'साहित्य संमेलनाचे चांगले वातावरण तयार झाले होते. त्यामुळे एरवीच्या पुस्तक विक्रीपेक्षा या तीन दिवसांतील विक्री वाढली होती,' असे लक्ष्मण राठिवडेकर यांनी सांगितले.
......

संमेलन काळात पुस्तक विक्रीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. एखाद्या संमेलनाइतकीच विक्री या काळात झाली. काही साहित्यिकांच्या पुस्तकांचे संचच वाचकांनी घेतले. त्यामुळे पुण्यातच वाचकांनी संमेलन साजरे केले.
- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम आराखडे ‘पीएमआरडीए’कडे

$
0
0

एक एप्रिलपासूनच अंमलबजावणी सुरू; सरकारी जमिनींचेही हस्तांतरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेची अधिसूचना एक एप्रिल रोजी जारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधिकरणाच्या क्षेत्रातील बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे काम थांबविले आहे. नवीन बांधकाम आराखडे व सुधारित आराखडे मंजुरीच्या येणाऱ्या फाइल आता थेट 'पीएमआरडीए'कडे पाठविल्या जाणार आहेत.

'पीएमआरडीए'ची हद्द निश्चित करताना पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरूर, मुळशी आणि खेड तालुक्याचा काही भाग मिळून पुणे महानगर विकास क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या सुमारे २ हजार ९४५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सरकारी गायरान जमिनी, भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी, सरकारी इमारती यांचे हस्तांतरण 'पीएमआरडीए'कडे करण्यात येणार आहे; तसेच या क्षेत्रात दीडशे ते दोनशे गृहनिर्माण प्रकल्पांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधील 'अॅमिनिटी स्पेस'ची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात आहे. ही जागाही 'पीएमआरडीए'ला दिली जाणार आहे.

'पीएमआरडीए' संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची सोमवारी अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत बांधकाम परवानगी, सरकारी जमीन व अॅमिनिटी स्पेसच्या जागांविषयी चर्चा झाली. महानगर क्षेत्रात येणारी सरकारी जमीन, सरकारी कार्यालये, भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा याची माहिती संकलित करण्याची सूचना देण्यात आली; तसेच 'अॅमिनिटी स्पेस'च्या जागांची यादी 'पीएमआरडीए'ला तत्काळ हस्तांतरीत करण्याबाबतही चर्चा झाली. महानगर क्षेत्रातील बांधकाम आराखडे नगर रचना विभागाकडून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतात. हे बांधकाम आराखडे 'पीएमआरडीए'कडे मंजुरीसाठी जाणार आहेत. तूर्त नगर रचना विभागाकडून 'पीएमआरडीए'ला त्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे.

एक एप्रिलपासून नवीन बांधकाम आराखडे व सुधारित आराखड्याच्या मंजुरीसाठी आलेल्या फाइल 'पीएमआरडीए'कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महानगर क्षेत्रातील फाइल आता जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जाणार नाहीत. मात्र, या जमिनींना बिगरशेती (एनए) परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जाणार आहे.

नकाशाबाबत उत्सुकता

पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच शहरालगतच्या सात तालुक्यांचा काही भाग मिळून महानगर विकास क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या हद्दी निश्चित करणारे नकाशे 'पीएमआरडीए'ची अधिसूचना जारी करताना तयार करण्यात आले आहेत. हे नकाशे दोन्ही महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत माहितीसाठी लावण्यात येणार आहे. मात्र, हे नकाशे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. 'पीएमआरडीए'ची हद्द नेमकी कोठून कशी आहे हे नकाशाद्वारेच स्पष्ट होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा टक्के खाद्यपदार्थ कमी दर्जाचे !

$
0
0

पुणे विभागात मिठाई, दूध, पनीरमध्ये आढळली असुरक्षितता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सेफ्टी फूड सिटी'कडे वाटचाल करणाऱ्या पुणे विभागात बारा टक्के खाद्यपदार्थ हे कमी दर्जाचे आढळले आहेत; तर दीड टक्के खाद्यपदार्थ खाण्यास असुरक्षित असल्याचे दिसून आले. यावरून ८५ टक्के खाद्यपदार्थ हे 'सेफ्टी फूड' असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खाद्यान्नांमध्ये कमी दर्जा अथवा असुरक्षितता आढळल्याने एफडीएने मॉल तसेच काही मोठ्या खासगी दूध डेअरी, हॉटेलवर देखील दंडात्मक कारवाई केली. तसेच, संबंधित दोषींवर खटले दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली.

जागतिक आरोग्य दिन आज (मंगळवारी) साजरा होत असून पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एक एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा यानिमित्ताने घेतला. एफडीएच्या अहवालातून अन्न सुरक्षेसंदर्भातील माहिती पुढे आली आहे.

'पुणे विभागात संपूर्ण वर्षभरात पाचही जिल्ह्यातून २ हजार १५० विविध खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ३६५ पदार्थ हे कमी दर्जाचे आढळले. दूध, पनीर, खवा, मिठाईसारखे पदार्थ दहा ते बारा टक्के खाद्यपदार्थ हे खाण्यासाठी कमी दर्जाचे आढळून आले आहेत. कायद्यातील निकषांनुसार घटकांचे प्रमाण कमी जास्त होते. तसेच, २८ नमुने हे असुरक्षित आढळले. त्यापैकी १५ नमुने दुधाचे असून त्यात साखर आढळली. तीन नमुने खाद्यतेलाचे होते. एकूण नमुन्यांच्या अवघा दीड टक्का खाद्यपदार्थ खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, उर्वरित ८५ टक्के खाद्यान्न हे 'सेफ्टी फूड' म्हणायला हरकत नाही,' अशी माहिती 'एफडीए'चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

खाद्यतेल, खवा, दूध, मैदा, वनस्पती, तूप, मिठाई, मसाले, चांदीचे वर्ख, बेसन यासारखे ४०४ खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पुण्यातून घेण्यात आले होते. त्या वेळी दूधात खाद्यतेलाचे मिश्रण, उस्मानाबादेतून आलेल्या खव्याचा साठा तसेच पुण्याच्या काही भागांतून आलेली चहा पावडरही कमी दर्जाची असल्याने जप्त केली. तसेच, पुण्याच्या मार्केट यार्डात कुत्रिम पद्धतीने आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर झाल्याने कारवाई करण्यात आली. त्याशिवाय कर्नाटकातील कमी दर्जाचे पनीर पुण्यात जप्त करण्यात आले. या शिवाय पुणे विभागातील साताऱ्यातील दुधात साखर, कोल्हापुरात दुधात खाद्यतेल, सांगली आणि सोलापूरमधील डाळिंबांना कृत्रिम रंग देऊन विक्री केल्याचे आढळून आले, असेही केकरे यांनी सांगितले.

७६ लाखांचा दंड वसूल

अन्न सुरक्षा कायद्यान्वये केलेल्या कारवाईंतर्गत २१५० नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी कमी दर्जा अथवा असुरक्षित आढळलेल्या खाद्यान्न विक्रेत्यांकडून सुमारे ७६ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची कामगिरी पुणे विभागाच्या एफडीएने केली. तसेच, १३ कोटी ६५ लाख ९ हजार २९१ रुपयांचे खाद्यपदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आले. ११ कोटी ६८ लाख ८५ हजार ४५६ रुपयांचा गुटख्याचा साठाही जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ‘अन्न सुरक्षे’चा धडा

$
0
0

लाखभर विक्रेत्यांना 'एफडीए'चे भेसळमुक्त खाद्यान्नाचे प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील प्रत्येक गल्लोगल्लीतील वडापाव, पाणीपुरी ते चायनीजच्या हातगाडीपर्यंत आणि छोट्या हॉटेलपासून स्टार हॉटेलमधील वेटर, आचाऱ्यांपर्यंत लाखभर विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. नागरिकांना भेसळमुक्त खाद्यान्न देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने आज, मंगळवारी जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने 'अन्न सुरक्षा' अशी संकल्पनेवर जनजागृती मोहीम राबविण्यावर वर्षभर भर देण्यात येणार आहे. त्या संदर्भात एफडीए विभागाकडून देखील अशाच संकल्पनेच्या आधारीत मोहीम सुरु आहे.

'अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे. त्या करिता एफडीएने शहरात हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांपर्यंत अन्न सुरक्षेचा (सेफ्टी फूड) मंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात हॉटेल मॅनेजमेंट संस्थांशी बैठका झाल्या आहेत. दोन महिन्यात शहरातील लाखभर विक्रेत्यांना सुरक्षित अन्नाविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय अन्न सुरक्षेची जनजागृती केली जाणार आहे. वडापाव, पाणीपुरी, अंडा भुर्जी पाव, चायनीज यासारख्या हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांचे विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे पहिल्या टप्प्यात धडे दिले जाणार आहेत,' अशी माहिती 'एफडीए'च्या अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी 'मटा'ला दिली.

शहरातील कोथरूड, कर्वेनगर, सारसबाग, सिंहगड रोड, कात्रज, पाषाण, औंध, नगररोड, येरवडा, सहकारनगर, शिवाजीनगर आदी भागात सात ते आठ हजार हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. शहरातील काही हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमधून या विक्रेत्यांना एकाचवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हातगाडीवर पदार्थ तयार करताना विक्रेत्याने अॅप्रॉन वापरणे, हॅण्ड ग्लोव्हज वापरणे, हेडकॅप वापरणे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्याशिवाय खाद्यपदार्थांचे कच्चे साहित्य खरेदीपासून ते तयार करणे आणि ग्राहकांसमोर देण्यापर्यंत कशी आणि कोणती काळजी घ्यावी याचेही प्रशिक्षण आम्ही हातगाडी विक्रेत्यांना देणार आहोत, असेही केकरे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यानंतर किचनरुममधील आचारी, तसेच मॅनेजर, हॉटेल मालकांना देखील टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

७ ते ८ हजार
हातगाडी खाद्यपदार्थ विक्रेते

दोन हजार
शहरातील छोटी- मोठी हॉटेल

८० हजार
हॉटेलमधील वेटरची संख्या

२० हजार
आचारी अन्य कर्मचारी तसेच मालक


'वर्ल्ड सेफ फूड डे'साठी हालचाली

अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न मिळण्याचा अधिकार आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या संकल्पनेनुसार 'सेफ फूड' ही संकल्पना राबविण्यासाठी एफडीएकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते 'वर्ल्ड सेफ फूड डे' हा दिवस जाहीर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर बुधवारी करदाता दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय अबकारी कर, सेवा शुल्क आणि सीमा शुल्क या खात्यांबाबतीत तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर बुधवार हा 'करदाता दिन' म्हणून सुरू करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत करदाते हे भेटीची वेळ न ठरविता अधिकाऱ्यांना भेटू शकणार आहेत.

करदात्यांचे केंद्रीय अबकारी कर, सेवा शुल्क आणि सीमा शुल्क या विभागांमध्ये वैयक्तिक काम किंवा तक्रार असल्यास कोणाकडे जायचे, असा प्रश्न करदात्यांसमोर उभा राहतो. करदात्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी दर बुधवार हा 'करदाता दिन' म्हणून ठरविण्यात आला असल्याचे केंद्रीय अबकारी कर विभागाकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने हे वर्ष 'करदात्यांची सेवा वर्षे' म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार करदात्यांना चांगली सेवा मिळण्यासाठी दर बुधवारी 'करदाता दिन' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

प्रचलित पद्धतीनुसार करदात्यांना कोणत्याही विभाग प्रमुखांना भेटायचे असल्यास भेटीची वेळ ठरवून घ्यावी लागत होती. त्यामुळे ठराविक करदाते अधिकाऱ्यांना भेटू शकत होते. तसेच भेटीची वेळ मिळविण्यासाठी करदात्यांना कसरत करावी लागत होती. कामाच्या या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 'करदाता दिन' सुरू करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची ‘स्थायी’बैठक रद्द झाल्याने नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीवर हव्या त्या व्यक्तीच्या नेमणुकीसाठी समितीची बैठक रद्द करण्याचा पुण्यातील सदस्यांचा प्रयत्न पुण्याबाहेरील सदस्यांनी सोमवारी हाणून पाडला. बैठक अचानक रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुण्याबाहेरील सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला.

विद्यापीठाच्या स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक सोमवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार समितीच्या सदस्यांना यापूर्वीच संदेश पाठविण्यात आले होते. या बैठकीसाठी समितीचे पुण्याबाहेरील सात- आठ सदस्य सोमवारी विद्यापीठाच्या आवारात आले होते. मात्र, या सर्व सदस्यांना दुपारी १२ च्या सुमाराला स्थायी समितीची होणारी बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. बैठक रद्द होण्याची सूचना अचानक आल्याने, समितीच्या सदस्यांनी त्या विषयी जाहीर नाराजी व्यक्त करत, उपस्थित सदस्यांच्या साथीनेच बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाल्याची माहिती बैठकीसाठी उपस्थित सदस्यांनी दिली.

'हा प्रकार आक्षेपार्हच आहे. त्या विषयी आम्ही कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्याकडे तक्रार केली आहे. समितीमध्ये रिक्त झालेल्या जागेवर हवा तो उमेदवार बसविण्यासाठी समितीच्या इतर सदस्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पुण्याबाहेरील सदस्यांना गृहित धरून असे प्रकार करणे या पुढे खपवून घेतले जाणार नाही,' अशी प्रतिक्रिया समितीचे सदस्य आणि प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र विखे- पाटील यांनी नोंदविली. या विषयी कुलगुरू डॉ. गाडे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images