Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भुयारी मार्गाचे काम होणार वेळेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

सय्यद नगर - ससाणेनगर रेल्वे फाटक येथे कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गाचे काम वेळेवर पूर्ण व्हावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या कामासाठी ज्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या आहेत, त्या जमीनमालकांना योग्य मोबदला दिला जाईल, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

सय्यदनगर-ससाणेनगर रेल्वे फाटकातील भुयारी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. भूमिपूजनाच्या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक वैशाली बनकर, फारूख इनामदार, विजया वाडकर, विजया कापरे ,चेतन तुपे, रंजना पवार, चंचला कोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना महापौर धनकवडे म्हणाले, 'या भुयारी मार्गाच्या कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. या भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक त्या पर्यायी रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या कामासाठी वाहतूक वळविणे सोपे जाईल. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.'

श्रेयासाठी चढाओढ

या भुयारी मार्गाच्या श्रेयासाठी पत्रक छापून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चढाओढ दिसून आली. काँग्रेस आणि राष्ट्रावादीकडून भुयारी मार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पत्रकेही छापण्यात आली होती. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी हा भुयारी मार्ग नियोजनात नाहीच, असे फ्लेक्स लावले असून, या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

असा असेल भुयारी मार्ग लांबी : ५५ मीटर उंची : ५.५० मीटर पादचारी मार्गाची रुंदी : ३.५ मी. पादचारी मार्गाची उंची : २.५ मी. अपेक्षित खर्च : ३८ कोटी ४८ लाख चालू आर्थिक वर्षातील तरतूद : ५ कोटी ७६ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणी प्रकरणी चाैघांवर ‘मोक्का’

$
0
0

राजगुरुनगर : खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुंड श्याम दाभाडे आणि त्याच्या तीन साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती खेड उपविभागीय पोलिस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी चौघा गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. चाकण पोलिस ठाण्यात संबंधितांवर खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये श्याम दाभाडे आणि त्याचे तीन साथीदार सचिन अशोक दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे) नितीन शिवाजी वाडेकर आणि सचिन पानमंद (ता. खेड) हे चौघेजण बेकायदा कंत्राटाद्वारे कंपनीच्या मालाच्या गाड्या खाली करणाऱ्या माथाडी कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून महिन्याच्या पगाराची निम्मी रक्कम दमदाटीने उकळत असत. हा प्रकार गेली काही वर्षापासून राजरोसपणे चालू होता. अखेर कामगारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण पोलिस ठाण्यात वरील चौघा आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीरा देवघर, भाटघर धरणांच्या पाण्यात घट

$
0
0

भोर : भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणाच्या पाण्यात घट झाली आहे. नीरा देवघर धरणात सध्या १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ७५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने वीजनिर्मिती बंद झाली आहे. गेल्या साडेपाच महिन्यात ८४ टक्के पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने ४७ टक्के पाणीसाठा कमी आहे. पूर्व भागातील मागणीनुसार शेतीली पाणी आवर्तने सोडल्यामुळे हा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. भाटघर धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असून, २ हजार ५३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बंद असलेल्या वीजनिर्मितीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. सध्याचा पाणीसाठी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. वीर धरणांत ४२ टक्के पाणीसाठा आहे.

उन्हाळ्याचे अडीच महिने अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे दोन्ही धरणांच्या दुर्गम भागांत टँकरद्वारे पाणी पुरवावे, अशी मागणी होऊ लागली आहे. भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी, वीर धरणातील पाणी ३१ मे पर्यत पूर्व भागातील बारामती, इंदापूर, खंडाळा, माळशिरस तालुक्यातील शेतीसाठी, तसेच काही भागांत पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या काळांत भोर, वेल्हे तालुक्यातील नागरिकांसाठी पुरेसा पाणीसाठा धरणात असावा, अशी पश्चिम भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.

धरण सध्याचा पाणीसाठा वीजनिर्मिती

नीरा देवघर १६ टक्के बंद

भाटघर धरण ५६ टक्के सुरू

वीर धरण ४२ टक्के - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजगड’मध्ये पॅनलच नाही

$
0
0

भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला पॅनेल तयार करण्यात अपयश आले आहे. चिन्ह वाटप करतेवेळी निवडणूक कार्यालयांत किमान हजर राहण्याची तसदीही कार्यकर्त्यांनी घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस १०, राष्ट्रवादी ६, युती व अपक्ष ९ अशी लढत होणार आहे. काँग्रेसने नसरापूर येथे प्रचाराचा शुभारंभ केला. त्या वेळी राजगडचे संस्थापक अनंतराव थोपटे यांनी विरोधकांना एकूण पाच जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्यामध्ये उमेदवाराच्या नावाबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे ही निवडणूक लादण्यासाठी विरोधकच कारण आहेत. तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अनंतराव थोपटे यांनी केले आहे. या वेळी आमदार संग्राम थोपटे, कृष्णा शिनगारे, शैलेश सोनवणे, दिलीप लोहोकरे यांच्यासह तीनही तालक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. युतीने निगडे-धांगवडी येथे प्रचाराचा शुभारंभ केला. राष्ट्रवादीचा प्रचार अद्यापही सुरू झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याला चौकीतच धक्काबुक्की

$
0
0

पिंपरी : महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिस चौकीत बोलवल्याचा राग येऊन एका व्यक्तीने चौकीतच पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याची घटना रुपीनगर पोलिस चौकीत शनिवारी (४ एप्रिल) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. अमित गायकवाड असे धक्काबुक्की झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी राजाराम शंकर पाटील (५४,रा. विकास सोसायटी, रुपीनगर, तळवडे) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांची नियुक्ती रुपीनगर चौकीत आहे. शनिवारी रात्री एका महिलेने पाटील यांच्याविरोधात तक्रार केली. या तक्रारीवरून गायकवाड यांच्यासमवेत काम करणारे पोलिस हवालदार माळी यांनी आरोपी पाटील यांना चौकीत बोलावून घेतले. पाटील चौकीत येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सहायक निरीक्षक रूपाली बोबडे या प्रकरणी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न

$
0
0

पिंपरी : रिक्षाचालकांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले पाहिजे यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी दिले. पिंपरी येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न एकता रिक्षा स्टँडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेवक अरुण टाक, प्रमोद ताम्हणकर, माधव मुळे, महेश कांबळे, पूनम पाखरे आदी उपस्थित होते.

एकता रिक्षा स्टँड वतीने हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, अन्नदान अनाथ मुलांना कपडे वाटप, रिक्षाचालकांचा मेळावा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी बाबा कांबळे यांनी आपल्या भाषणात रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. बाबा कांबळे यांनी केलेल्या मागण्यांना उत्तर देताना आमदार अॅड. चाबूकस्वार यांनी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आणि रिक्षा चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नगरसेवक अरुण टाक यांनी सीएनजी किट अनुदान देण्यासाठी मनपा आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांमध्ये नवा-जुना असा कोणताही भेद नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'भारतमातेचे वैभव विश्ववंदनीय झाले पाहिजे, हे भाजपचे धोरण आहे. गुणवान व नीतिवान कार्यकर्ता ही भाजपची ओळख आहे. नवा-जुना असा वाद नाही. कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालादेखील भारतीय जनता पक्षात न्याय मिळतो,' असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी रविवारी पिंपरी येथे केले; मात्र खासदारांसह आमदारांकडून असे सांगितले जात असले तरीही हा वाद उफाळल्याचे पाहायला मिळत आहे.

पिंपरी खराळवाडी येथे भाजप कार्यालयात रविवारी मनसे पिंपरी विधानसभा अध्यक्ष संदीप ढेरंगे व महिला आघाडी शहर उपाध्यक्षा अनिता सोनावणे यांच्यासह ५० प्रमुख कायर्कर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, भाजपा नेते सारंग कामतेकर, प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी

अध्यक्षा शैला मोळक, सरचिटणीस अमोल थोरात, विलास मडिगेरी, शहर कार्याध्यक्ष माऊली थोरात, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, राजू दुर्गे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके आदींसह प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा खासदार साबळे, आमदार जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. या वेळी साबळे म्हणाले, 'काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कोट्यवधी जनतेने स्वीकारल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपददेखील मिळाले नाही. कोणाच्या तरी मुंडक्यावर पाय देऊन मोठे होण्याची काँग्रेसची परंपरा आहे. ती भाजपमध्ये नाही. माणुसकीला डाग लागेल व विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कार्य भाजप कार्यकर्ता करत नाही.'

'भाजपची सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात असून, जगातील सर्वांत मोठा पक्ष होण्यासाठी सभासद नोंदणी करावी. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा महापौर करण्यासाठी सर्वांनी पक्षकार्य करावे,' असे आवाहन साबळे यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैला मोळक यांनी व आभारप्रदर्शन माऊली थोरात यांनी केले.

पक्षात धुसफूस?

शहरात वेगवेगळ्या पक्षांतून अनेक आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे कुठे तरी अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जाते. असा कोणताच प्रकार नसून, विरोधक अत्तापासूनच घाबरल्याने लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक ग्रंथालयांना चणचण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समाजाच्या तळागाळात वाचन चळवळ पोहोचवण्याचे काम करणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांची आर्थिक चणचण कायम आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतेक ग्रंथालयांना अनुदानाचा एकच हप्ता मिळाला असल्याने ग्रंथालयांना व्यावहारिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारचे ग्रंथालय चळवळीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रंथालयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. २०१२ मध्ये या अनुदानात वाढ करण्यात आली. मात्र, बऱ्याच ग्रंथालयांना या वाढीव अनुदानाचा फायदा अद्यापही मिळालेला नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या अनुदानाचा दुसरा हप्ताही प्रलंबित आहे. या वर्षात ग्रंथालयांना पहिल्या हप्त्याची काही रक्कम वितरित करण्यात आली. दुसऱ्या हप्त्याची रक्कम ३१ मार्चपूर्वी मिळणे अपेक्षित होते. नव्या आर्थिक वर्षात प्रलंबित अनुदानासह नियमित अनुदान वेळेत मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राजगुरूनगरच्या सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजेंद्र सुतार यांनी याबाबत माहिती दिली. 'ग्रंथालये खडतर परिस्थितीतून वाटचाल करीत आहेत. आर्थिक चणचण हा नेहमीचाच मुद्दा झाला आहे. त्यातच सरकारने अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कमही अद्याप दिलेली नसल्याने ग्रंथालयांच्या अडचणी वाढल्या आहेत,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस खाली सापडून तरुणीचा मृत्यू

$
0
0

पुणेः दुचाकीची धडक बसून पीएमपी बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड येथील रामबाग कॉलनी येथे शनिवारी घडली. साईना सत्यजित दळी (वय १८, रा. चांदणी चौक) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपी बस चालक दयानंद पंडित डांगे (रा. गोकुळनगर, कात्रज) व अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डांगे याला अटक करण्यात आली आहे. रामबाग कॉलनी येथील साईकुंज सोसायटीसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची तिला धडक बसली. त्यानंतर शेजारून चाललेल्या पीएमपी बसच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडली. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. साईना दळी ही भारती विद्यापीठात 'बीबीए'चे शिक्षण घेत होती. दरम्यान, साईना हिचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच वेदविहार सोसायटीमध्ये शोककळा पसरली. साईना हिच्या वडिलांच्या अलिबागमध्ये मॉल आहे. तर, आई गृहिणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई ऑनलाइन’ला मिळाले मर्यादित यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शहरात राबविण्यात आलेल्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदाही मर्यादितच यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रक्रियेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या २५ हजारांवर अर्जांच्या तुलनेत, १३ हजार ७८२ अर्जच प्रवेशासाठी अंतिम झाल्याने, जवळपास निम्मे अर्ज बादच ठरल्याचे उघड झाले आहे.

'आरटीई'च्या प्रवेशांसाठी दोन वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मुळात ज्या गटांसाठी ही प्रक्रिया राबविली जाते, त्यांच्याकडे ऑनलाइन यंत्रणेचा असणारा अभाव विचारात घेत, या प्रक्रियेवर समाजाच्या विविध स्तरांवरून टीका केली जात होती. त्यातच प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, मदत केंद्रांवरून पालकांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात खात्याला येणारे अपयश आणि कागदपत्रांच्या उपलब्धतेमध्ये होणाऱ्या अडचणींमुळे या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या संख्येवरही मर्याद येत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते. गेल्या वर्षी प्रायोगिक पातळीवर केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईमध्येच झालेल्या या प्रवेशप्रक्रियेला मुंबईसारख्या शहरामधूनही मर्यादितच प्रतिसाद मिळाला. त्या पाठोपाठ यंदाच्या आकडेवारीमधूनही ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

यंदा पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील शाळांच्याच जोडीने पुणे जिल्हापरिषदेच्या हद्दीमधील एकूण ४४९ शाळांचा या प्रवेश प्रक्रियेसाठी विचार करण्यात आला आहे. या शाळांमधील प्रवेशांसाठी एकूण २५ हजार ४४४ अर्ज नोंदविण्यात आले होते. मात्र अंतिम टप्प्यामध्ये या एकूण अर्जांपैकी केवळ १३ हजार ७८२ अर्जच निश्चित झाले. याच १३ हजारांवर विद्यार्थ्यांचा २५ टक्क्यांच्या प्रवेशांसाठी विचार होत आहे. प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेल्या ११ हजार ६६२ विद्यार्थ्यांना या ना त्या कारणाने प्रक्रियेबाहेरच राहावे लागले आहे. शहरात पूर्वप्राथमिक वर्गांसाठी एकूण ५ हजार २२३, तर पहिलीच्या वर्गांसाठी एकूण ८ हजार २८४ असे एकूण १३ हजार ५०७ प्रवेश उपलब्ध आहेत. १३ हजारांवर विद्यार्थी या प्रवेशांसाठी उपलब्ध असले, तरी त्यापैकी प्रत्येकच विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, याची कोणतीही शाश्वती सध्या देता येत नाही. त्यामुळेच यंदाही या प्रक्रियेला मर्यादितच यश लाभणार असल्याचे प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यामध्येच स्पष्ट झाले आहे.

राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने गेल्या वर्षी प्रमाणे यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांचा नेमका तपशील जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न आहे. संचालनालयाने शाळानिहाय जागा, भरलेल्या जागा आणि रिक्त जागांचा तपशील द्यायलाच हवा. अन्यथा ही प्रक्रिया मर्यादित प्रमाणातच यशस्वी ठरेल.'

- प्रा. शरद जावडेकर, समाजवादी अध्यापक सभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी असून फ्री शिपला विलंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक वर्ष संपण्यासाठी एक दिवस राहिला असताना राज्य सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्री शिप अदा करण्यासंबंधीचा आदेश काढला. त्यामुळे एका दिवसात लाखो विद्यार्थ्यांना फ्रीशिप वाटपाचे आव्हान सामाजिक न्याय विभागासमोर उभे राहिले होते. या एका दिवसात सर्व विद्यार्थ्यांना पैसे वाटप करणे शक्य नसल्याने निधी उपलब्ध होऊनही हजारो विद्यार्थ्यांवर त्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थांना त्यांनी भरलेल्या फीची प्रतिपूर्ती (फ्रीशिप) केली जाते. त्यामध्ये खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित कॉलेजातील पात्र विद्यार्थ्यांनाही या फ्रीशिप योजनेला लाभ मिळतो. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून हा निधी दिला जातो. त्यासाठी राज्य सरकारककडून दर वर्षी त्यासंबंधीचा आदेश काढला जातो. यावर्षी हा आदेश ३० मार्चला काढण्यात आला आणि ३१ मार्चपर्यंत ते वाटप करणे आवश्यक होते. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या यंत्रणेने उपलब्ध एका दिवसात सर्व विद्यार्थ्यांना फ्रीशिपचे वाटप केले का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. एका दिवसात सर्व विद्यार्थ्यांना फ्रीशिप देणे शक्य नसल्याचे विभागातील अधिकारी मान्य करत आहेत.

पुण्यात नुकत्याच झालेल्या सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या राज्य अधिवेशनात विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. एका दिवसात पाच लाख विद्यार्थ्यांना फ्रीशिप वाटप करणे शक्य नसल्याचेही मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

निधी आहे तर आदेश नाही!

फ्रीशिप वेळेवर मिळत नसल्याची ओरड विद्यार्थ्यी दर वर्षीच करतात. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज उशिरा प्राप्त झाल्यामुळे आणि काही वेळा अपुऱ्या निधीमुळे फ्रीशिप दिली जात नाही. मात्र, या वर्षी सामाजिक न्याय विभागाकडे निधी उपलब्ध असूनही फक्त राज्य सरकारने त्यासंबंधीचा आदेश उशिरा काढल्याने विद्यार्थ्यांना फ्रिशिपपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेक़डी मार्केट यार्डातील बेकायदा व्यापार करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्या आदेशावर पणनमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या विक्रेत्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे बाजार समितीने स्पष्ट केले. या आदेशामुळे शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

'मार्केट यार्डातील ८३ व्यापाऱ्यांचा किरकोळ व्यापार हा बाजार समिती कायद्याशी विसंगत होता. त्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले होते. त्या आदेशाला पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायम केले. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांना अखेर टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येणार आहे. किरकोळ विक्रेत्यांपैकी काहींकडे घाऊक तसेच किरकोळ विक्रीचे परवाने आहेत. घाऊक विक्रेत्यांना किरकोळ विक्री करण्यास मनाई करण्यात येणार आहे,' असे बाजार समितीचे सचिव धनंजय डोईफोडे यांनी 'मटा'ला सांगितले.

'आदेशाचा अभ्यास करून त्यासंदर्भातील धोरण ठरविले जाईल,' अशी प्रतिक्रिया दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली. चेंबरमधून बाहेर पडलेल्या सात संचालकांपैकी राजेश शहा म्हणाले, 'दि पूना मर्चंट चेंबरच्या विरोधात आमची भूमिका नव्हती. मात्र बेकायदेशीर कामांना चेंबरने पाठिंबा देऊ नये असे वाटत होते. तरीही चेंबरने बेकायदेशीर कामांना पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही अन्य घाऊक विक्रेत्यांच्या बाजूने उभे राहिलो. संबंधित किरकोळ विक्रेत्यांवर बाजार समितीने कारवाई करावी.'

'पणनमंत्र्यांनी किरकोळ व्यापार मनाई केल्याने अखेर सत्याचाच विजय झाला आहे. आंदोलनातून चेंबरचे अध्यक्ष व त्यांच्या काही संचालकांचे खरे रूप समोर आले आहे,' अशी खोचक प्रतिक्रिया ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केली. पणनमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाने स्वागत केले आहे. बाजार समितीने आता मार्केट यार्डातील किरकोळ विक्रीची दुकाने बंद करून आदेशाचे पालन करावे, अशी मागणी महामंडळाचे सचिन निवंगुणे यांनी केली.

'मूठभर धनाढ्य लोकांची बाजार समिती आवरात सुरू असलेली संपुष्टात येइल. शेतकरी हिताचा हा निर्णय योग्य आहे. माजी पणन संचालक सुभाष माने यांचा निर्णय अबाधित ठेवून पणनमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.

- राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींचे भाव कडाडले

$
0
0

म. ट. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील भुसार विभागातील तूरडाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, शेंगदाणा तेलासह भाजकीच्या डाळीच्या दरात भाववाढ झाली आहे. क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे.
तर बेसनासह गोटा खोबऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, साखर, मीठ, अन्य खाद्यतेल, गूळ, साबुदाणा, शेंगदाणा, मिरची, भगर, धने, पेंड, मका, रवा, आटा, मैदा, नारळाचे भाव स्थिर आहेत. शेंगदाण्याचे यंदा पीक कमी आले आहे. त्याची निर्यात देखील वाढली आहे. त्यामुळे शेंगदाणा तेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे २५ ते ३० रुपयांनी दर वाढ झाली आहे.

भाजकीच्या डाळीच्या दरात ४० किलोमागे ८० ते १०० रुपये दर वाढ झाली आहे. तूर डाळ, हरभरा डाळ, मूसर डाळ, उडीद डाळीच्या दरात क्विंटलमागे सुमारे २०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साठवणुकीचे धान्य घेण्यासाठी बाजारात गर्दी होते. यंदाही वार्षिक साठवणुकीचे धान्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे डाळींना मागणी वाढली असून, डाळींच्या भावात वाढ झाली आहे. सध्या डाळींना मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. गोटा खोबऱ्याच्या दरात दहा किलोस ५० रुपयांनी घट झाली आहे. गव्हासह ज्वारीची २० एप्रिलनंतर आवक होईल.

हनुमान जयंतीसह अक्षयतृतीयेच्या सणासाठी गुळास अधिक मागणी आहे. त्यामुळे गुळ बाजार तेजीत आहेत. बाजारात सध्या ग्राहक कमी असून, त्यामुळे तुलनेने उलाढाल कमी आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, साखर, मीठ, अन्य खाद्यतेल, गूळ, शाबुदाणा, शेंगदाणा, मिरची, भगर, धने, पेंड, मका, रवा, आटा, मैदा, नारळाचे दर स्थिर आहेत.

डाळ डाळींचे दर

(क्विंटलमध्ये )

उडीद डाळ ८५०० ते ९२००

मसूर डाळ ६५०० ते ६८००

हरभरा डाळ ४५०० ते ५०००

तूर डाळ ८३०० ते ९२००

मटकी डाळ ८८०० ते ९०००

मूग डाळ ९५०० ते १०५००

शेंगदाणा तेल १५०० ते १६५०

(१५ लिटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॉवर, पावटा महागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची बऱ्यापैकी आवक झाली. मात्र, हिरवी मिरची, फ्लॉवर, पावटा, मटारच्या किमतीत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमला मिरचीसह तोतापुरी कैरी स्वस्त झाली आहे.

मार्केट यार्डात १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. राजस्थानातून गाजराची दोन ट्रक, कर्नाटकातून ५ते ६ ट्रक कोबीची आवक झाली आहे. कर्नाटक, मध्यप्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरचीच्या ट्रकची आवक झाली. आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून शेवग्याची ५ ते ६ टेम्पो आवक झाली आहे. तोतापुरी कैरीची कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पोची आवक झाली. आंध्र प्रदेशातून दोन ट्रक गवारीची आवक झाली आहे.

स्थानिक भागातून आल्याची ५५० ते ६०० पोती आवक झाली. सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पो, पुणे विभागातून टोमॅटोची सहा हजार पेट्यांची आवक झाली. फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो आणि कोबीची १८ ते २० टेम्पो इतकी आवक झाली आहे. पुरंदर, पारनेरमधून मटारच्या १५० गोणींची आवक झाली. गावरान गाजराची ७ ते ८ टेम्पो, चिंचेची १२५ ते १५० पोतींची आवक झाली आहे.

कांद्याची १५० ट्रक आवक झाली. इंदौर, आग्रा, गुजरात, स्थानिक भागातून बटाट्याची ४० ट्रक, तसेच मध्यप्रदेशातून लसणाच्या साडेतीन हजार गोणींची आवक झाली आहे. कोथिंबीरीच्या सव्वादोन लाख जुड्या तर मेथीच्या चाळीस हजार जुड्यांची आवक झाली आहे. काही फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे हिरवी मिरची, फ्लॉवर, पावटा, मटारच्या दरात वाढ झाली आहे. त्या तुलनेत तोतापुरी कैरीसह सिमला मिरचीची आवक वाढल्याने ते स्वस्त झाले आहेत.

रत्नागिरी हापूसच्या १२०० पेट्यांची आवक

रत्नागिरीहून हापूस आंब्याच्या १००० ते १२०० पेट्यांची आवक झाली. चार ते सहा डझनाच्या कच्च्या आंब्यासाठी २,५०० ते ३,००० रुपये दर, तर मोठ्या आकाराच्या पेटीसाठी ३,००० ते ४,००० रुपये दर मिळाला आहे. तयार आंब्यासाठी ३ हजार ते साडेतीन हजार रुपये दर मिळाला आहे. अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर वीस एप्रिलनंतर रत्नागिरीहून आंब्याची आवक होण्यास सुरुवात होईल. त्याशिवाय कर्नाटक आंब्याची ४ ते ५ हजार गोणींची आवक झाली आहे. या आंब्याला मागणी कमी असल्याने मालाची आवकही कमी आहे. कर्नाटकाहून लालबाग, पायरी, हापूसची आवक झाली आहे.

द्राक्षे महाग, खरबूज, लिंबांना मागणी

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. माल खराब झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी आवक कमी झाली. दहा ते पंधरा टन द्राक्षांची आवक झाली. परिणामी द्राक्षांच्या दरात वाढ झाली आहे. मद्रासी लिंबाची दीड हजार गोणी, तसेच स्थानिक भागातून तीन हजार लिंबांची आवक झाली. मोसंब्याचे १८ ट्रक, संत्र्याची १० टनांची आवक झाली. डाळिंबाची २५ ते ३० टन आवक झाली. उन्हाळ्यामुळे रसवंतीगृह तसेच ग्राहकांकडून फळांना मागणी वाढली आहे. त्यात कलिंगड, खरबूज, लिंबाचा समावेश आहे. कलिंगडाची ४० ते ५० ट्रक, खरबुजाची २५ ते ३० टेम्पोची आवक झाली.

झेंडू, गुलछडी स्वस्त

विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आवक मोठी असूनही फुलांना फारशी मागणी नाही. त्यामुळे झेंडू, गुलछडीच्या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. त्याशिवाय अन्य फुलांमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. झेंडूच्या फुलांना किलोमागे ८ ते १५ तर गुलछडीच्या फुलांना ७० ते १०० रुपये दर मिळाला आहे. मोगऱ्याला २०० ते ४०० रुपये असा दर आहे.

मासळीची आवक घटली

उन्हाळ्यात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातून येणारी मासळी कमी झाली आहे. परिणामी दहा टक्के दरवाढ झाली आहे. आंध्र, रहू, कतला आदीची सोळा टन एवढी आवक झाली. खोल समुद्रातील मासळीची सहा टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो, तसेच नदीच्या मासळीची २०० ते ३०० किलोंची आवक झाली आहे. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १० ते १५ रुपयांची घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये यात्रेदरम्यान पोलिसांवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दौंड तालुक्यातील नानगावच्या यात्रेत गोंधळ करणाऱ्या युवकांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. नानगाव येथील श्री रासाई देवीच्या यात्रेत तमाशा सुरू असताना हा प्रकार घडला.

पोलिस हवालदार प्रदीप जाधव व पोलिस कॉन्स्टेबल संतोष पंडित अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणी नीलेश गुंड, दीपक खळदकर, गोट्या गाढवे, शिवाजी खळदकर, दीपक काळे, (सर्व रा. नानगाव, ता. दौंड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तमाशा सुरू असताना आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समज दिली. त्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा गोंधळ सुरू झाला. अखेर पोलिसांनी तमाशा बंद करायला सांगितला. मात्र,'आमच्या गावाची यात्रा आहे, आम्ही काहीही करू,' असे म्हणून आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली.

या वेळी पोलिस हवालदार जाधव यांनी खळदकरला बाजूला घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुंड याने जाधव यांना खुटीने मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या उजव्या कानाला गंभीर दुखापत झाली. तर खळदकर याने पंडित यांच्या डोक्यात खुटी मारली. त्यानंतर ते गर्दीत पळून गेले. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासाची स्वप्नपूर्ती होणार

$
0
0

धनंजय जाधव, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर पुण्याच्या भविष्यातील विकासावर मोहोर उमटली आहे. गेली कित्येक वर्षे केवळ घोषणा आणि अध्यक्षपदाच्या वादात अडकलेल्या 'पीएमआरडीए'ला अखेर मुहूर्त लागला आणि पुणेकरांच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या गावांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाताना आणि त्याजागी सेवासुविधा पुरविताना स्थानिक स्वराज्य संस्थांची दमछाक होत आहे. विस्तारत चाललेल्या या महानगर प्रदेशाची भविष्यातील वाटचाल त्यामुळे शंकास्पद वाटत होती. पण 'पीएमआरडीए' स्थापना व या प्राधिकरणामार्फत होणारे नियोजन, त्याची अंमलबजावणी, आर्थिक हातभार या विश्वासार्ह वाटतो. त्यामुळे पीएमआरडीएच्या स्थापनेचे पाऊल हे स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाणारे वाटू लागले आहे.

'पीएमआरडीए'बद्दल विश्वास वाटण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए. मुंबईची वाढ होत असताना आणखी एका नवीन मुंबईची गरज भासू लागली आणि त्यानुसार ती करण्यातही आली. पण त्यानंतरही ही गरज वाढत असल्याचेच वाटत होते. याच काळात महापालिकांना न पेलवणारा विकास करण्यासाठी 'एमएमआरडीए' पुढे आले आणि मुंबईचा विकास 'न भूतो न भविष्यती' अशा पद्धतीने होत गेला. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प, मिठी नदी विकास प्रकल्प, मेट्रो व मोने रेल, स्कायवॉक, विरार ते अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका (मल्टीमोडल कॉरिडोर), अधेरी-घाटकोपर लिंकरोड अशी यादीच वाचून दाखवता येईल.

पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन्ही जुळी शहरे झपाट्याने वाढत आहेत. पुण्यात वाहतूक कोंडीपासून कचऱ्याच्या प्रश्नापर्यंत समस्यांचे जंजाळ उभे आहे. कोणताही नवा असा ठोस प्रकल्प पुण्यात राबविला गेला नाही. नदीपात्रातील रस्ता असो की रिंग रोड, मेट्रो रेल्वे असो की बीआरटी यात असंख्य अडथळे येतात. केवळ चर्चा आणि विरोध याच्या पलिकडे फारसे काही होत नाही. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत कोणताही ठोस असा विकास झालेला नाही. पिंपरी-चिंचवडचे रुपडे रूंद रस्त्यांमुळे बदलले, पण या शहराचा सर्वंकष विकास होऊ शकलेला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये मोकळ्या जागांमुळे विकासाला अजूनही मोठी संधी आहे. पण पुणे शहराचा विकास सिमित राहिला आहे आणि या विकासावर भौगोलिकतेमुळे मर्यादा येत आहेत. पुण्याचा विकास व्हायचा असेल तर लगतच्या गावांमध्ये शहराचा विस्तार होणे गरजेचे आहे. मुंबईच्या विकासामध्ये 'एमएमआरडीए'चा सहभाग कोणीच नाकारू शकत नाही. पीएमआरडीएची स्थापना त्याच धर्तीवर करण्यात आली आहे. 'पुणे सुपरफास्ट' या विकासाच्या गाडीची शिट्टी मुख्यमंत्र्यांनी वाजविली आहे. आता ही विकासाची गाडी रूळावरून सुपरफास्ट वेगाने धावावी अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

पुण्याचा 'सुपरफास्ट' विकास शक्य

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद, तीन कँटोन्मेंट बोर्ड, नगर परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास कामे करताना कायदेशीर अडचणी उद्भवतात. या स्वराज्य संस्थांच्या संमतीने एकत्र काम करणे मोठे दिव्यच ठरते. या सर्वांची एकत्र मोट बांधली जात नाही आणि विकासाला पहिला खो तेथूनच बसतोे. 'पीएमआरडीए' हे त्याच्यावरचे आता उत्तर ठरणार आहे. या सर्वांची मोट बांधून एकसूत्री विकास करण्यास पीएमआरडीए बांधिल आहे. त्यामुळे पुण्याचा 'सुपरफास्ट' वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक निर्णयापूर्वी हवा सर्वंकष विचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक राजकारण, तांत्रिक ज्ञान व व्हिजनचा अभाव, निधी उभारणीची अपुरी क्षमता आणि लालफितशाही... अशा दुष्टचक्रात अडकलेले विकासाचे गाडे पुढे नेण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्राधिकरणाद्वारे विकासप्रकल्प राबविताना याच सर्व बाबी आड येणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी आता राज्य सरकार आणि पीएमआरडीएच्या कारभाऱ्यांवर आली आहे. राज्यात मुंबई (उपनगर) आणि ठाण्यापाठोपाठ सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भाग अशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराची ओळख आहे. पण या भागात आवश्यक नागरी सुविधा पुरविणाऱ्या सर्वच यंत्रणा विकासाच्या या वेगाशी स्पर्धा करण्यात कमी पडल्या. त्यात कधी स्थानिक राजकारण आड आले, तर कधी व्हिजन कमी पडले. मग विकासप्रकल्पांचा विचारच न होणे, झाला तर निधीची तरतूद न होणे, तर कधी विरोधासाठी होणाऱ्या विरोधामुळे प्रकल्प रेंगाळणे, त्याचा खर्च वाढत जाणे, अशा दुष्टचक्रात परिसराचा विकास फसला. त्यामुळे या भागात वाढलेल्या लोकसंख्येचे दैनंदिन जीवन कधी पाण्याअभावी, तर कधी वाहतूक साधनांअभावी हलाखीचे बनले.

त्या पार्श्वभूमीवर विकासाचा वेग लक्षात घेऊन वेगाने नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी पीएमआरडीएसारख्या कायद्याने अधिकार असलेल्या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि महापालिका आयुक्त जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे पदाधिकारी, तसेच आयएएस आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याबरोबरच पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असून, येत्या काळात स्वतः मुख्यमंत्रीही पीएमआरडीएच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. साहजिकच नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादांना धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसची कारखान्यावरील बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. बालेकिल्ल्यातील सहकारात पवारांना धक्का देऊन अजित पवारांची सहकारातील सत्ता हद्दपार केली. शेतकरी पॅनलने आपला झेंडा माळेगाववर रोवला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सभासद असलेला आणि पवारांचा घरचा कारखाना म्हणून माळेगावची ओळख आहे. अजित पवार यांची एकाधिकारशाही, त्याच त्या चेहऱ्यांना झुकते माप, तरुणाईकडे पाठ, ऊस दरवाढीच्या आंदोलनाने तापलेले वातावरण, कारखाने खासगीकरणाच्या विरोधातील संतप्त प्रतिक्रिया अशा वातावरणाचा फटका पवारांना निवडणुकीच्या दरम्यान बसला.

शरद पवारांचे जुने सहकारी व खंदे समर्थक अशी ओळख असणारे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांनी पवार विरोधकांची बांधणी करून पवारांना चारीमुंड्या चीत केले आहे. बालेकिल्ल्यातील सहकार क्षेत्रात झालेला हा दारूण पराभव पवारांना स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले होते. तरीही, मतदारांनी त्यांना अस्मान दाखविले. राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी केवळ ६ जागावर समाधान मानावे लागले आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलने तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

सहकार पॅनलमधील विजयी उमेदवार

रंजनकुमार तावरे, राजेंद्र बुरूंगुले, प्रताप जगताप, शशिकांत पोकळे, चंद्रराव तावरे, सुरेश खलाटे, तानाजी पोद्कुले, रामदास आटोळे, अविनाश देवकाते, जनार्दन झाबरे, प्रमोद गावडे, उज्ज्वला कोकरे, चितांमणी नवले, जवाहर इगुले, विलास देवकाते.

या विजयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता माळेगावमधील सहकार वाचला आहे. कारखान्यात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू.

- रंजनकुमार तावरे, विजयी उमेदवार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार वाचवण्यासाठी सामान्य शेतकरी जागा झाला आहे. त्यामुळे ही लढाई खासगीकरण विरुद्ध सहकार अशी झाली आहे.

- चंद्रराव तावरे, विजयी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर सेवा : सर्वाधिक तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सर्वाधिक तक्रारी गॅस सिलिंडरच्या सेवेबाबत आल्या आहेत. त्याबरोबरच वेगवेगळे दाखले, स्वस्त धान्य दुकानदार आणि वेगवेगळ्या फायलींची सद्यस्थिती याबाबत आलेल्या तक्रारींचे प्रमाणही मोठे असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनातील कामकाजाबाबतच्या वेगवेगळ्या तक्रारी स्वीकारण्यासाठी हेल्पलाइन आणि ऑनलाइन तक्रारी स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन तांत्रिक बिघाडामळे गेले सहा महिने बंद होती. जानेवारीमध्ये ती पूर्ववत सुरू झाली. त्यावर ४९ तक्रारी आल्या असून त्यापैकी सर्वाधिक, म्हणजे ३७ तक्रारी या गॅसपुरवठ्याच्या सेवेबाबत आहेत. त्यामध्ये गॅस सिलिंडर वेळेत मिळत नाही, डीबीटीएल योजनेमध्ये बँक खात्यात अनुदान जमा झाले नाही, गॅस एजन्सीतील कर्मचारी उद्धटपणा करतात, घरपोच सिलिंडर मिळत नाही, नव्या सिलिंडरसाठी शेगडीची सक्ती करण्यात येते, अशा तक्रारींचा त्यामध्ये समावेश आहे. या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविण्यात येतात आणि आठ दिवसांमध्ये तक्रारदारास फोन किंवा इमेलद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येते. या तक्रारींचे निवारण झाले की नाही, याचा आढावा जिल्हाधिकारी दरमहा घेतात. त्यामुळे या हे्ल्पलाइनवर आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ऑनलाइन तक्रारीचीही सोय...

जिल्हा प्रशासनाच्या संबंधित सेवांविषयी १८०० २३३ ३३७० या क्रमांकावर किंवा www.collectorpunehelpline.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. या वेबसाइटवर तक्रार अर्जांचे नमुने, अर्जांची सद्यस्थिती यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. याबरोबरच प्रत्यक्ष आणि टपालाद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यावर संबंधित नागरिकास एसएमएस व इमेल द्वारे कळविण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पोलिस ‘चष्मेबहाद्दर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भर उन्हात रस्त्याच्या मधोमध उभे राहून शहराचे वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलिस खरे तर चष्मेबहाद्दूरच आहेत ! चाळिशीनंतरचा अनेकांना चष्मा असूनही त्याचा वापर केला जात नसल्याचे आढळले. मोतिबिंदू तसेच वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, चुरचुरण्यासारखे १४५ वाहतूक पोलिसांमध्ये डोळ्याचे विकार असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) वतीने पुणे पोलिस दलातील वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी वाहतूक पोलिसांच्या डोळे तपासणीसाठी पुढाकार घेतला. सुमारे वीस दिवसांच्या तपासणीतील निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. शहरातील अकराशेपैकी सहाशेच पोलिसांनी डोळ्यांची तपासणी करून निगा राखत असल्याचे दाखवून दिले.

'रस्त्यावर उभे राहून वाहतूक पोलिसांना वाहनांचे नियमन करावे लागते. त्या वेळी वाहनांच्या प्रदूषणामुळे डोळ्यांचे विकार होत असल्याचे आपले निरीक्षण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या डोळे तपासणीचे आयोजन करण्यात आले. अकराशेपैकी सहाशे पोलिसांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दहा टक्के पोलिसांना चाळिशीनंतरचा चष्मा आहे. त्यातील बहुतांशजण चष्मा असूनही त्याचा वापर करीत नाही. अनेकांना नंबर लागला असला, तरी त्यांनी चष्मा घेतलेला नाही. तसेच १८ जणांना मोतिबिंदू झाल्याचे निदान झाले आहे. योग्य वेळी निदान झाले आहे. वेळ आल्यानंतरच त्यांच्या मोतिबिंदूचे ऑपरेशन करावे लागेल,' अशी माहिती 'एनआयओ'चे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

'उन्हापासून डोळ्यांच्या सरंक्षणासाठी टोपी असणे आवश्यक आहे. मात्र त्याचा वापर होत नाही. बहुतांश वाहतूक पोलिस डोळ्यांवर गॉगल लावत असल्याने उन्हासह प्रदूषणापासून डोळ्यांची निगा राखली जाते आहे. इतर पोलिसांकडून डोळ्यांची निगा राखली जात नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे डोळे कोरडे होणे, डोळे चूरचूरणे, डोळ्यांची आग होणे यासारखा तक्रारी पुढे आल्या आहेत. डोळे लाल होणे अथवा चुरचुरणे कमी होण्यासाठी डोळ्यात टाकण्यासाठीचे औषधे देण्यात आली आहेत,' असेही डॉ. केळकर यांनी सांगितले. पोलिसांच्या डोळे तपासणीसाठी डॉ. केळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जाई केळकर, डॉ. ऐश्वर्या मुळे, डॉ. संदीप अंजणकर, डॉ. मानस देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images