Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘राष्ट्रवादी’ला चपराक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर बढती मिळाल्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदावरून तडकाफडकी हटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. डॉ. परदेशी २७ मे २०१२ ते दोन जुलै २०१४ कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते. त्यांना या ठिकाणी आणण्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विशेषतः तत्कालिन पदाधिकारी मोहिनी लांडे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, योगेश बहल, मंगला कदम यांनी डॉ. परदेशी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत डॉ. परदेशी यांच्या बदलीचा अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. त्याची दखल घेऊन परदेशी यांची बदली करण्यात आली होती.

हायकोर्टाच्या आदेशानुसार डॉ. परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ते राजकीय दबावाला बळी पडले नाहीत. चुकीच्या कामांची पाठराखणही केली नाही. त्याचा सर्वाधिक त्रास 'राष्ट्रवादी'ला होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर, आमदार जगताप यांनी डॉ. परदेशी यांची बदली न झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट घातली होती. त्यामुळे डॉ. परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे 'राष्ट्रवादी'ला हायसे वाटले. परंतु, या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, या मागणीसाठी शहरात निदर्शने झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र निषेध करण्यात आला. उत्स्फूर्तपणे रॅली, मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेना, आम आदमी पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, सजग नागरिक मंच यांनी पुढाकार घेतला होता.

प्रामाणिकपणाची पावती

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डॉ. परदेशी यांना थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त केले आहे. त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची येथे पारख होऊ शकली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, प्रामाणिकपणे काम केल्याची पावती त्यांना मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे दर्शन’चे आउटसोर्सिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पीएमपीएमएल'तर्फे चालविल्या जाणाऱ्या 'पुणे दर्शन' सेवेत बदल करण्याची वारंवार होणारी मागणी आणि त्यात प्रशासनाला येत असलेले अपयश लक्षात घेऊन या सेवेचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. 'पुणे दर्शन'बरोबरच विमानतळ सेवेचाही चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

शहरात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना 'पुणे दर्शन' करता यावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पीएमपीने बस सेवा सुरू केली. यासाठी पीएमपीएमएलकडून पाचशे रुपये शुल्क घेण्यात येते. मात्र, असे असले तरी त्यासाठी ताफ्यातील एकच बस दिली जायची. या बसची संख्या वाढवावी; तसेच विशेषत: उन्हाळ्यात 'पुणे दर्शन'साठी एसी बस द्यावी, अशी मागणी अनेकदा प्रवाशांकडून केली जात होती. ती पूर्ण झाली नाही; तसेच या बसमध्ये पुणे आणि पुण्यातील ठिकाणांची विस्तृत माहिती देणाऱ्या गाइडचाही अभाव होता. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपीने आता आउटसोर्सिंगचा मार्ग निश्चित केला असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.

पुणे महापालिकेकडून पीएमपीला लवकरच १० एसी बस उपलब्ध होणार असून, त्याचा वापर करून या दोन्ही सेवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालविल्या जाणार आहेत. सध्या पुणे दर्शन बससाठी पीएमपीचा चालक आणि गाइड असतो.

कोथरूडपर्यंत विस्तार

विमानतळ सेवाही पीपीपी तत्वावर'पुणे दर्शन'सह विमानतळ सेवाही पीपीपी तत्वावर सुरू केली जाणार आहे. सध्या फक्त डेक्कन ते लोहगावदरम्यान सुरू असलेल्या या सेवेचा विस्तार कोथरूडपर्यंत केला जाणार आहे; तसेच या सेवेसाठी आठ एसी बस उपलब्ध करून दिल्या जातील, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

नव्या सूत्रानुसार बस पीएमपीची असली, तरी इतर सर्व सेवा संबंधित खासगी कंत्राटदाराकडून पुरविण्यात येतील. यामध्ये सर्व ठिकाणांची माहिती देण्यासह प्रवाशांशी संबंधित इतर सेवांचा समावेश असेल.

- डॉ. श्रीकर परदेशी, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी लगीन नव्या पालिकेचे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्या पालिकेच्या स्थापनेसह सर्व पर्यायांचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतरच महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. पुण्याच्या विस्तारामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळेच, नवीन पुण्यासाठी नवीन महापालिका स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या भूमिकेचे स्वागत करीत नवीन महापालिका स्थापण्याबाबत अनुकूलचा दर्शवली होती. आजच्या या भूमिकेमुळे 'मटा'च्या मोहिमेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गावांच्या समावेशाबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी २३ गावांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण आला होता. आता पुन्हा नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे विकासकामांसाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. तसेच एलबीटीही रद्द करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा आणखी एक स्रोत कमी होणार आहे. अशा काळात महापालिकेने निधी कोठून उपलब्ध करावा, असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले. नव्या पालिकेच्या पर्यायासह सर्वच पर्यायांवर सर्वंकष विचार करून महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असा निर्वाळा त्यांनी दिला.

'एचसीएमटीआर रद्द नाही'

शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (एचसीएमटीआर) रद्द झाल्याची चर्चा सुरू असल्याबाबतही अनंत गाडगीळ यांनी मुद्दा उपस्थित केला. याबाबत त्यांनी विचारले, तेव्हा 'एचसीएमटीआर रद्द करण्याचा कोणताही विचार नाही, या रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका आणि संबंधित विभागांनाही सूचना केल्या आहेत,' असे फडणवीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास सुपरफास्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/मुंबई

पुण्याच्या विकासाबाबत दीर्घ काळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात दिले. पुण्यातील नव्या उपनगरांसाठी नवी महापालिका स्थापणार असल्याचे त्यांनी सांगितले; तसेच पुण्याच्या भोवती होणारा रिंगरोड रद्द झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीएमआरडीएच्या स्थापनेची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली होती. त्याची संरचना स्पष्ट झाल्याने ती प्रत्यक्षात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा 'महाराष्ट्र टाइम्स'ने केला होता. 'मटा'च्या 'पुणे सुपरफास्ट' व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासनही दिले होते.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेची अधिसूचना राज्य सरकारने बुधवारी जारी केली. 'पीएमआरडीए'ची स्थापना करताना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) अस्तित्वही अबाधित ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, विकास योजनांच्या नियोजनाचे काम 'पीसीएनटीडीए'कडे सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

'पीएमआरडीए'च्या अध्यक्षपदाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पडदा टाकला आहे. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ सदस्यांची 'पीएमआरडीए'वर नियुक्ती करण्यात आली आहे. या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय हे पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या इमारतीतमध्येच असणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण-निमशहरी भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी 'पीएमआरडीए'ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्याच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'पुणे सुपरफास्ट' या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'पीएमआरडीए'च्या स्थापना करण्याचे सूतोवाच जानेवारी महिन्यात केले होते आणि अवघ्या दोन महिन्यांत त्याची घोषणा केली.

महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड अशा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे विकासाची एकत्र मोट बांधली जात नाही. त्यामुळे विकासाचा वेग मंदावतो. पुण्याचा 'सुपरफास्ट' वेगाने विकास करण्यासाठी व त्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी 'पीएमआरडीए'मुळे मदत होणार आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार 'पीएमआरडीए' ही कार्यकारी संस्था असणार आहे. पिंपरी-चिंचवड

नवनगर विकास प्राधिकरणाकडे विकास योजना काम सोपविण्यात आले आहे. अर्थात विकासाचे सर्वाधिकार 'पीएमआरडीए'कडे असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीए’च्या प्रमुखपदी जी. अशोककुमार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रमुखपदी नौदलाचे व्हाईस अॅडमिरल जी. अशोककुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. जी. अशोककुमार एनडीएच्याच ६० व्या तुकडीचे छात्र होते. एक जुलै १९८२ रोजी ते नौदलात दाखल झाले. वेलिंग्टनच्या 'डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज'मधून त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर माहू येथून 'आर्मी हायर कमांड कोर्स' आणि अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील क्वांटिको येथून 'एक्सपिडिशनरी ऑपरेशन्स कोर्स'ही त्यांनी पूर्ण केला. तीन दशकांहून अधिक काळाच्या नौदलाच्या सेवेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचबरोबर सिंगापूर येथील भारतीय दूतावासाचे सुरक्षा सल्लागार, नौदलाच्या पश्चिम विभागाचे 'चीफ ऑफ स्टाफ ऑफिसर' (ऑपरेशन्स) आदी जबाबदारीच्या पदावर त्यांनी काम केले आहे. जी. अशोककुमार यांना २०११ साली विशिष्ट सेवा पदक, तर २०१५ साली अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. नौदलप्रमुखांनीही २००० साली त्यांचा प्रशस्तीपत्रकाद्वारे गौरव केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्पाप वन्यजीवांचा ‘लाँग ड्राइव्ह’ने बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसल्याने काळ्या बिबट्याने जीव गमावल्याची साताऱ्यातील घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटातही दर वर्षी तीन हजारांहून अधिक निष्पाप वन्यजीव गाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेल्या शेकरूचाही समावेश आहे. सुट्टीच्या दिवशी ताम्हिणी घाटात 'लाँग ड्राइव्ह'ला जाऊन, भरधाव गाडी चालविण्याची पर्यटकांची हौस सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच रानमांजर, उदमांजर आणि अगदी खारींच्याही जीवावर बेतली आहे.

पावसाळ्यात धबधब्यांनी फुललेल्या डोंगररांगाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि एरवी लाँग ड्राइव्हसाठी पर्यटक मोठ्या संख्येने ताम्हिणी घाटात फिरायला जातात. ताम्हिणीमध्ये वन्यप्राण्यांबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती सापडतात. पण या घाटातील वाढते पर्यटन वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. वेगाने रस्ता ओलांडता न आल्याने साप, सरडे, खारी, उदमांजर, रानमांजर दररोज प्राण गमावत आहेत. फर्ग्युसन कॉलेजच्या पर्यावरण शाखेचा विद्यार्थी अनीश परदेशी याने सणसवाडी ते ताम्हिणी गाव या २१ किलोमीटर परिसराचा पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात, थंडी आणि उन्हाळ्यामध्ये फिरून 'ताम्हिणीतील वन्यप्राण्यांचे अपघात' या विषयावर सर्वेक्षण केले आहे.

गाडी खाली चिरडल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांचे प्रमाण सर्वाधिक असून आत्तापर्यंत ३१ प्रकारच्या सापांचा मृत्यू झाल्याची माहिती मला मिळाली आहे. यामध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस यांसह कवड्या, दिवड, नानेटी, गवत्या आणि धामण हे बिनविषारी साप रस्त्यावर मृत्युमुखी पडल्याचे दिसले. 'यलो स्पॉटेड वुल्फ स्नेक' हा दुर्मिळ साप देखील रस्त्याखाली चिरडला गेला आहे' असे अनीष परदेशी याने सांगितले.

सर्वेक्षणादरम्यान मी पंधरा वेळा फिरून या रस्त्यांचा संपूर्ण अभ्यास केला आहे. यात अडीचशे प्राण्यांच्या अपघाताच्या नोंदी मिळाल्या आहेत. वार्षिक आकडा तीन हजारांपर्यंत असू शकतो. सापांबरोबरच प्राण्यांमध्ये रानमांजर, उदमांजर आणि खारींचे प्रमाण अधिक होते. पाली आणि सरड्यांची संख्याही जास्त आहे. पावसाळ्यात इतक्या प्रचंड प्रमाणात विविध जातीचे बेडूक गाडीखाली चिरडून मेले, की मी ते मोजूच शकलो नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे एका शेकरूचाही गाडीच्या धडकेने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. गाड्यांची संख्या कमी करणे, हा यावर व्यावहारिक उपाय नाही आणि तो शक्यही नाही. त्यामुळे आपण इतर पर्याय निवडले पाहिजेत, असे परदेशी यांने सांगितले.

असे आहेत उपाय

हरणटोळ, चापडा या सारंख्या झाडावर राहाणाऱ्या सापांची संख्या सर्वेक्षणात ३७ टक्के आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाच्या कमानी नसल्याने झाडावरचे साप, उदमांजरे, खारी आणि शेकरूला देखील रस्ता ओलांडण्यासाठी जमिनीवर येण्याशिवाय पर्याय नाही. भविष्यात वन विभागाने रस्त्याच्या दुतर्फा कमानी होतील अशी झाडे लावल्यास या प्राण्यांचे मृत्यू कमी होऊ शकतात. याशिवाय जंगलाच्या आतच ठिकाठिकाणी थर्मोरेग्युलेशन साइट केल्यास प्राणी थंडीत रस्त्यावर येणार नाही. रेप्टाइल्स टनेल्सचा पर्याय देखील अनीश परदेशीने सुचविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटरबॉक्स, पार्किंग धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दक्षिण पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये मीटरबॉक्स धोकादायक अवस्थेत आहेत. अनेक सोसायट्यांपर्यंत जाणारा रस्ता अरुंद असल्याने आणीबाणीच्या वेळी तिथे फायर ब्रिगेड अथवा अॅम्ब्युलन्स पोहोचणे मुश्किल आहे; तर अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये कचऱ्यासह, जुन्या सायकल, स्कूटर आणि अन्य अडगळ मोठ्या प्रमाणावर साठली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी या सोसायट्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थिनींनी केलेल्या पाहणीतून हे धक्कादायक प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. एमबीएच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींनी 'लाइव्ह प्रोजेक्ट' अंतर्गत संस्थेचे संचालक प्रा. डॉ. जगदीश पोळ आणि प्रा. डॉ. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १०० स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी आहे का, स्मार्ट सिटीच्या निकषांनुसार पुण्याची स्थिती काय आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या विद्यार्थिनींनी या पाहणीतून केला.

त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत सोसायटीसंबंधीची माहिती ऑनलाइन उपलब्ध करता येईल का, याची चाचपणही त्यांनी केली. यामध्ये सोसायटीची माहिती, रहिवाशांची प्राथमिक माहिती, सोसायटीतील पायाभूत व अन्य सुविधा, हॉस्पिटल, बँक, पोस्ट अशा सार्वजनिक सुविधांपासूनचे अंतर याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यास नव्याने फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, या हेतूने ही चाचपणी करण्यात आली. तसेच, कोणत्या सोसायट्यांचा किंवा इमारतींचा पुनर्विकास होऊ शकतो, याची पाहणीही या विद्यार्थिनींनी केली. यामध्ये सोसायटी किती जुनी आहे, कन्व्हेयन्स डीड झाले आहे का, पुनर्विकास सोसायटीचे सभासद स्वतः करणार की बांधकाम व्यावसायिकाकडून करवून घेणार, याची पाहणी करण्यात आली.

सोसायट्यांच्या पाहणीविषयी माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, 'प्राथमिक व प्रायोगिक तत्वावर आम्ही पुण्याच्या दक्षिण भागात ही पाहणी केली. यामध्ये सहकारनगर, मार्केट यार्ड, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, बिबवेवाडी व लगतच्या परिसराचा समावेश होता. यामध्ये विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सोसायट्यांना भेट देत पाहणी केली. यात सोसायटीच्या अॅप्रोच रोडची लांबी-रुंदी, आवश्यक पायाभूत सुविधा, दोन इमारती किंवा दोन घरांमधील मोकळी जागा, पार्किंगची स्थिती, मीटर बॉक्स, इलेक्ट्रिक बोर्डची पाहणी करण्यात आली. अरुंद रस्ते, अंधाऱ्या जागेतील व धुळीने माखलेले मीटर बॉक्स, पार्किंगमधील अडगळ व पार्किंगमध्ये केलेले बांधकाम हे संबंधित सोसायट्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते,' असे डॉ. पवार म्हणाले.

पुढील टप्प्यात पश्चिम पुणे

हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चतर्फे करण्यात आलेल्या या प्राथमिक पाहणीत दक्षिण पुण्यातील सोसायट्यांची पाहणी करण्यात आली. यानंतर पुढील टप्प्यात वारजे, कर्वेनगर, कोथरूड, पाषाण, औंध, बावधन अशा पश्चिम पुण्यातील परिसराची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात मध्यवर्ती व उर्वरित भागाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. पोळ व डॉ. पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ला चपराक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर बढती मिळाल्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदावरून तडकाफडकी हटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. डॉ. परदेशी २७ मे २०१२ ते दोन जुलै २०१४ कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते. त्यांना या ठिकाणी आणण्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विशेषतः तत्कालिन पदाधिकारी मोहिनी लांडे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, योगेश बहल, मंगला कदम यांनी डॉ. परदेशी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत डॉ. परदेशी यांच्या बदलीचा अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. त्याची दखल घेऊन परदेशी यांची बदली करण्यात आली होती.

हायकोर्टाच्या आदेशानुसार डॉ. परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ते राजकीय दबावाला बळी पडले नाहीत. चुकीच्या कामांची पाठराखणही केली नाही. त्याचा सर्वाधिक त्रास 'राष्ट्रवादी'ला होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर, आमदार जगताप यांनी डॉ. परदेशी यांची बदली न झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट घातली होती. त्यामुळे डॉ. परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे 'राष्ट्रवादी'ला हायसे वाटले. परंतु, या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, या मागणीसाठी शहरात निदर्शने झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र निषेध करण्यात आला. उत्स्फूर्तपणे रॅली, मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेना, आम आदमी पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, सजग नागरिक मंच यांनी पुढाकार घेतला होता.

प्रामाणिकपणाची पावती

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डॉ. परदेशी यांना थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त केले आहे. त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची येथे पारख होऊ शकली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, प्रामाणिकपणे काम केल्याची पावती त्यांना मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे दर्शन’चे आउटसोर्सिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पीएमपीएमएल'तर्फे चालविल्या जाणाऱ्या 'पुणे दर्शन' सेवेत बदल करण्याची वारंवार होणारी मागणी आणि त्यात प्रशासनाला येत असलेले अपयश लक्षात घेऊन या सेवेचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. 'पुणे दर्शन'बरोबरच विमानतळ सेवेचाही चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

शहरात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना 'पुणे दर्शन' करता यावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पीएमपीने बस सेवा सुरू केली. यासाठी पीएमपीएमएलकडून पाचशे रुपये शुल्क घेण्यात येते. मात्र, असे असले तरी त्यासाठी ताफ्यातील एकच बस दिली जायची. या बसची संख्या वाढवावी; तसेच विशेषत: उन्हाळ्यात 'पुणे दर्शन'साठी एसी बस द्यावी, अशी मागणी अनेकदा प्रवाशांकडून केली जात होती. ती पूर्ण झाली नाही; तसेच या बसमध्ये पुणे आणि पुण्यातील ठिकाणांची विस्तृत माहिती देणाऱ्या गाइडचाही अभाव होता. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपीने आता आउटसोर्सिंगचा मार्ग निश्चित केला असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.

पुणे महापालिकेकडून पीएमपीला लवकरच १० एसी बस उपलब्ध होणार असून, त्याचा वापर करून या दोन्ही सेवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालविल्या जाणार आहेत. सध्या पुणे दर्शन बससाठी पीएमपीचा चालक आणि गाइड असतो.

कोथरूडपर्यंत विस्तार

विमानतळ सेवाही पीपीपी तत्वावर'पुणे दर्शन'सह विमानतळ सेवाही पीपीपी तत्वावर सुरू केली जाणार आहे. सध्या फक्त डेक्कन ते लोहगावदरम्यान सुरू असलेल्या या सेवेचा विस्तार कोथरूडपर्यंत केला जाणार आहे; तसेच या सेवेसाठी आठ एसी बस उपलब्ध करून दिल्या जातील, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

नव्या सूत्रानुसार बस पीएमपीची असली, तरी इतर सर्व सेवा संबंधित खासगी कंत्राटदाराकडून पुरविण्यात येतील. यामध्ये सर्व ठिकाणांची माहिती देण्यासह प्रवाशांशी संबंधित इतर सेवांचा समावेश असेल.

- डॉ. श्रीकर परदेशी, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी लगीन नव्या पालिकेचे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्या पालिकेच्या स्थापनेसह सर्व पर्यायांचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतरच महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. पुण्याच्या विस्तारामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळेच, नवीन पुण्यासाठी नवीन महापालिका स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या भूमिकेचे स्वागत करीत नवीन महापालिका स्थापण्याबाबत अनुकूलचा दर्शवली होती. आजच्या या भूमिकेमुळे 'मटा'च्या मोहिमेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गावांच्या समावेशाबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी २३ गावांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण आला होता. आता पुन्हा नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे विकासकामांसाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. तसेच एलबीटीही रद्द करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा आणखी एक स्रोत कमी होणार आहे. अशा काळात महापालिकेने निधी कोठून उपलब्ध करावा, असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले. नव्या पालिकेच्या पर्यायासह सर्वच पर्यायांवर सर्वंकष विचार करून महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असा निर्वाळा त्यांनी दिला.

'एचसीएमटीआर रद्द नाही'

शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (एचसीएमटीआर) रद्द झाल्याची चर्चा सुरू असल्याबाबतही अनंत गाडगीळ यांनी मुद्दा उपस्थित केला. याबाबत त्यांनी विचारले, तेव्हा 'एचसीएमटीआर रद्द करण्याचा कोणताही विचार नाही, या रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका आणि संबंधित विभागांनाही सूचना केल्या आहेत,' असे फडणवीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास सुपरफास्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/मुंबई

पुण्याच्या विकासाबाबत दीर्घ काळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात दिले. पुण्यातील नव्या उपनगरांसाठी नवी महापालिका स्थापणार असल्याचे त्यांनी सांगितले; तसेच पुण्याच्या भोवती होणारा रिंगरोड रद्द झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीएमआरडीएच्या स्थापनेची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली होती. त्याची संरचना स्पष्ट झाल्याने ती प्रत्यक्षात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा 'महाराष्ट्र टाइम्स'ने केला होता. 'मटा'च्या 'पुणे सुपरफास्ट' व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासनही दिले होते.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेची अधिसूचना राज्य सरकारने बुधवारी जारी केली. 'पीएमआरडीए'ची स्थापना करताना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) अस्तित्वही अबाधित ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, विकास योजनांच्या नियोजनाचे काम 'पीसीएनटीडीए'कडे सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

'पीएमआरडीए'च्या अध्यक्षपदाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पडदा टाकला आहे. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ सदस्यांची 'पीएमआरडीए'वर नियुक्ती करण्यात आली आहे. या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय हे पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या इमारतीतमध्येच असणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण-निमशहरी भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी 'पीएमआरडीए'ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्याच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'पुणे सुपरफास्ट' या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'पीएमआरडीए'च्या स्थापना करण्याचे सूतोवाच जानेवारी महिन्यात केले होते आणि अवघ्या दोन महिन्यांत त्याची घोषणा केली.

महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड अशा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे विकासाची एकत्र मोट बांधली जात नाही. त्यामुळे विकासाचा वेग मंदावतो. पुण्याचा 'सुपरफास्ट' वेगाने विकास करण्यासाठी व त्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी 'पीएमआरडीए'मुळे मदत होणार आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार 'पीएमआरडीए' ही कार्यकारी संस्था असणार आहे. पिंपरी-चिंचवड

नवनगर विकास प्राधिकरणाकडे विकास योजना काम सोपविण्यात आले आहे. अर्थात विकासाचे सर्वाधिकार 'पीएमआरडीए'कडे असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत रंगला साहित्य कट्टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कविता-गाण्यांच्या भेड्या... साहित्य संमेलनांच्या आठवणी... साहित्यिक गप्पा... स्टेशनवर गाडी थांबल्यावर काढलेले फोटो-सेल्फी... अशा धमाल वातावरणात साहित्यप्रेमींचा रेल्वे प्रवास झाला. तब्बल चाळीस तासांचा हा रेल्वे प्रवास म्हणजे 'मिनी साहित्य संमेलन असल्यासारखेच वातावरण होते.

पंजाबमधील घुमान या गावी आजपासून (३ ते ५ एप्रिल) ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमी घुमानला रेल्वेने रवाना झाले आहेत. मात्र, या रेल्वे प्रवासानेच साहित्यप्रेमींना साहित्य संमेलनाचा अनुभव दिला. मुंबईतून सुटलेल्या रेल्वेत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, डॉ. सदानंद बोरसे, पं. वसंतराव गाडगीळ अशा काही साहित्यिकांचाही समावेश होता. त्यामुळे साहित्यप्रेमींना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

नायगावकरांनी साहित्यप्रेमींमध्ये मिसळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. काहींच्या फर्माईशीवरून कविताही सादर केल्या. रेल्वेत काही वारकरीही असल्याने भजन-अभंगांचेही गायन झाले. बियासपर्यंतच्या या चाळीस तासांच्या रेल्वे प्रवासात धमाल करून मिनी संमेलन साजरे केले.

रेल्वे स्टेशनवर रांगोळी

ग्रंथदिंडीत सहभागी होणाऱ्या एका गटाने झाशी रेल्वे स्टेशनवर रांगोळीही काढली. रेल्वे स्टेशनवर गाडी थांबताच काहींनी फोटो-सेल्फी काढून सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगाचे दोन गुन्हे

$
0
0

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पिंपरीमध्ये एका ४८ वर्षीय महिलेचा, तर निगडीमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. पिंपरी येथील वैभनगरमध्ये कुटुंबासमेत फिरायला जाणाऱ्या एका ४८ वर्षांच्या महिलेचा मोटारकार मधून आलेल्या तिघांनी विनयभंग केला. चिखली येथील आकाशनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश जनार्दन कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कामगाराचा मृत्यू

पिंपरीः भोसरी 'एमआयडीसी'मधील अॅटोलाइन कंपनीमध्ये काम करीत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रकांत विठ्ठल चव्हाण (वय २०, रा. विठ्ठलनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. काम करताना त्याचा तोल गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन हवेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करीत हाती घेतलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे तीन तेरा वाजले असून, सदरच्या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेला निधी व्याजासह परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. या खेदजनक परिस्थितीला महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची टीका लोकप्रतिनिधी करीत आहेत.

शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसंदर्भात महापालिका प्रशासनाला प्रश्न विचारले होते. त्यावरील लेखी उत्तरात प्रशासनाने १८ हजार ३६८ सदनिकांपैकी केवळ ९ हजार २८८ सदनिकांचे काम करणे शक्य होणार आहे. तर, उर्वरित दहा हजार ८० सदनिकांचा प्रकल्प गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. ही कामे 'जेएनएनयूआरएम' अंतर्गत मार्च २०१५ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ५० टक्केही कामे झाली नाहीत. त्यामुळे उर्वरित इमारतींचे बांधकाम हाती घेणे शक्य नसल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी मान्य केले आहे.

'जेएनएनयूआरएम'अंतर्गत महापालिकेने निगडी सेक्टर क्रमांक २२, अजंठानगर, मिलिंदनगर, वेताळनगर, उद्योगनगर, पत्राशेड (लिंकरोड) या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे काम हाती घेतले होते. त्यासाठी झोपडपट्टी मुक्त पिंपरी-चिंचवडचा नारा देण्यात आला होता. या प्रकल्पांची कामे २००७ मध्ये सुरू झाली. सदरच्या कामांसाठी केंद्र सरकारडून १८६ कोटी रुपयांच्या मंजूर निधीपैकी १७१ कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून ११५ कोटी रुपयांपैकी १०१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. याशिवाय महापालिकेच्या निधीच्या बळावर कामे हाती घेण्यात आली. मात्र, गेल्या सात वर्षांत संबंधित ठेकेदारांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे खर्चाचा बोजा वाढला. हा वाढीव खर्च पालिका प्रशासनाला देणे आवाक्याबाहेर झाले. त्यामुळे उर्वरित प्रकल्प गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.

प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्याची कारणे

प्रकल्प पूर्ण न होण्याची कारणे प्रशासनाने दिली आहेत. त्यानुसार निगडीतील प्रकल्प रेडझोनच्या हद्दीत असून, हायकोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. लिंकरोड, पत्राशेड येथील प्रकल्पाच्या जागेबाबत जनहित याचिका दाखल आहे. पर्यावरण विभागाकडून ना हरकत दाखला मिळण्यास विलंब झाला. लाभार्थ्यांची सोसायटी करण्यास विलंब झाला. लाभार्थ्यांची बँक कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर झाली नाहीत. महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाकडून प्रशासकीय बाबींची पूर्तता विहित मुदतीत झाली नाही. त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊनही इमारतींचा ताबा देता आला नाही. हा ताबा वेळेत न दिल्यामुळे पुढील इमारतींच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली नाही, असे उत्तरात नमूद केले आहे.

प्रकल्पाचे नाव मंजूर सदनिका रद्द सदनिका

विठ्ठलनगर १,४५६ ०

अजंठानगर १,४५६ ६७२

वेताळनगर १,३४४ ३३६

उद्योगनगर ४४८ ४४८

लिंकरोड ६७२ ११२

मिलिंदनगर १,२३२ ६७२

सेक्टर २२ ११,७६० ७,८४०

एकूण १८,३६८ १०,०८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी तरुणास कोठडी

$
0
0

पुणेः अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. कोर्टाने त्याला चार एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संदीप सुरेश साळुंके (वय २० रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैं​गिक अत्याचार संरक्षण ​अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. २५ मार्च रोजी हा प्रकार घडला. फिर्यादीच्या मुलीला आरोपीने खाऊच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. मात्र, ती पळून येण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर तिच्यावर शाळेच्या इमारतीमध्ये अत्याचार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लांबणीवर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाळी पाऊस आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्याच्या आदेशामुळे अशा सभासदांना थकबाकीदार न धरण्याची याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे. त्याची सुनावणी होईपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुदत समाप्त झालेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदारयादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रकरणी बबनराव भेगडे यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी त्यांच्या कर्जाची फेररचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना थकबाकीदार धरण्यात येऊ नये, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेचा निर्णय लागल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचा मतदान प्रक्रियेत समावेश करावा की नाही, याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निर्णय जाहीर होईपर्यंत मतदारयादी जाहीर करू नये, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे.

याचिकेवर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची मतदारयादी जाहीर करण्याचा कार्यक्रमही काही दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ लाख रुपयांचे कोकेन जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आफ्रिकन नागरिकाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने १६ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पकडलेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा कोकेनचा साठा आहे. याप्रकरणी चेरीफ मोहंमद (वय ३७, रा. तरुण रेसिडेन्सी, कोंढवा, मूळ नायजेरिया) याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी अविनाश शिंदे यांना कोंढवा परिसरात आफ्रिकन नागरिक लष्कर ​परिसरात कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून चेरीफला अटक करण्यात आली.

अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलिस कर्मचारी अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, प्रफुल्ल साबळे, सचिन चंदन, विठ्ठल खिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तस्करी व विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकांवर गेल्या काही महिन्यांपासून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत चार आफ्रि​कन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २२ लाखाचे कोकेन, मॅथॅक्युलॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. विमाननगर, कोरेगांव पार्क, कल्याणी नगर, एनआयबीएम रोड, लष्कर भागात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

विनयभंगप्रकरणी तरुणाला अटक

बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धनराज संजय वाहुळ (वय २०, रा. लातूर) याला अटक केली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सारसबागेसमोर ही घटना घडली. फिर्यादी तरुणी ही पर्वती गाव येथे आत्याला भेटण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपी तिच्या गाडीसमोर येऊन थांबला. त्याने शिवीगाळ करून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलने रिकामटेकड्यांची नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'साहित्य संमेलन ही वारीच आहे. ज्ञानोबा, तुकोबांची ही पालखी पुढे न्यायलाच हवी. त्यामुळे साहित्य संमेलने व्हायलाच हवीत. त्यामुळे साहित्य संमेलन हा काही रिकामटेकड्यांचा उद्योग नाही,' असा टोला ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे नाव न घेता हाणला.

'डीएसके गप्पा' या कार्यक्रमात प्रा. मिलिंद जोशी यांनी पाटील यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. त्यावेळी पाटील बोलत होते. निसर्गाच्या सान्निध्यात गेलेल्या बालपणापासून ते पानिपत असा प्रवास या मुलाखतीत उलगडण्यात आला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामध्ये सध्या रस नसल्याचे पाटील म्हणाले. 'राजकारण्यांच्या कार्यक्रमांना तीन-चार लाख लोक जमतात; तेव्हा कोणाच्या पोटात मुरडत नाही. मायमराठीच्या उत्सवाला मात्र लाखो लोक जमतात, तेव्हा कसे काय इतरांच्या पोटात दुखते,' असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

'गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य साचेबद्ध झाले आहे. मराठी चित्रपट सातासमुद्रापार जात असताना मराठी साहित्य मात्र बांधावरच आहे. मराठी साहित्यिकांपुढे नव्या काळाचे आव्हान आहे. कादंबऱ्यांचे अनेक विषय आजूबाजूला असताना मराठी लेखक त्यांना भिडत नाही, हे दुर्दैव आहे. नव्या काळाचे लेखकांपुढे मोठे आव्हान आहे. अलिकडच्या काळात मराठी वाचक वाढलेत. मात्र, त्या प्रमाणात लेखकच दिसत नाही. साहित्यिकांची संख्या रोडावली आहे. नव्या लेखकांना टीव्ही मालिकांचे भाग लिहिण्यात जास्त रस आहे. त्यातून पैसा खूप मिळत असला, तरी कथा-कादंबऱ्या लिहिण्यातच लेखकाचा खरा कस लागतो. तेच खरे अक्षरसाहित्य आहे,' असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

हडपसरः ट्रॅक्टरच्या ट्रॅालीची धडक बसल्याने सायकल खेळणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीच्या गेट क्र. १ येथे गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्टरचालकास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

ऋषीकेश मुकुंद मोरे (वय १४, रा. आनंदनगर, रामटेकडी , हडपसर) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. नवनाथ अशोक मदने (वय ३५ रा . कासुर्डे ,ता. दौंड जि. पुणे) या चालकास पोलिसांनी अटक केली आहे. कचऱ्याच्या खताने भरलेला ट्रॅक्टर रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडत होता. त्याचवेळी ऋषीकेश मित्रांसोबत सायकल खेळत होता. या वेळी वेगात आलेल्या ट्रॅक्टरची ऋषीकेशला धडक बसली. धडक बसल्याने तो खाली पडला. छातीला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऋषीकेश महापालिकेच्या क्रांतीवीर वासुदेव फडके शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख मतदान केंद्रांवर नाव, पत्त्यामधील बदलांसह मतदारांना ओळखपत्राशी आपला आधार क्रमांक जोडता येणार आहे.

राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत (एनईआरपीएपी) मतदार याद्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी १२ एप्रिल रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख मतदान केंद्रांवर नावातील बदल, निवासी पत्त्यामधील सुधारणा, यादीतून नाव वगळणे अशी कामे करता येणार आहेत. मतदार यादीत असलेले दुबार नावही कमी करता येणार आहे.

'मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणे हा लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० अन्वये गुन्हा आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ६२ हजार मतदारांची नावे दुबारांच्या यादीत आहेत. संबंधित मतदारांना यापूर्वी दुबार नाव काढण्याची संधी देण्यात आली होती. या मोहिमेत सुद्धा संबंधितांना आपले नाव एकाच ठेवण्याची संधी आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊ शकते,' असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी सांगितले.

'आधार'शी जोडणी का?

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण करण्याचा हेतू हा बोगस मतदार कमी करण्याचा आहे. मतदारांचे ओळखपत्र हे आधार क्रमांकांशी लिंक केल्यास बोगस मतदारांमुळे फुगलेली यादी कमी होण्यास मदत होणार आहे.

'आधार' कसे जोडावे?

'आधार' मतदार ओळखपत्राशी जोडण्यासाठी या क्रमांकावर एसएमएस करा - ५१९६९

टोल फ्री क्रमांक - १९५०

आयोगाच्या ई-मेल आयडीवर अथवा मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live

Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>