Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पार्किंग ठेकेदाराकडून नागरिकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पार्किंगचा ठेका देताना महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्काकडे दुर्लक्ष करत शहरातील काही ठेकेदार दुप्पट तर काही भागात चक्क पाचपट शुल्क वसूल करत पुणेकरांची लूट करत असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश कला क्रीडा केंद्र येथे असलेल्या पार्किंगसाठी दोन रुपये घेणे अपेक्षित असतानाही संबधित ठेकेदार नागरिकांकडून दहा रुपये घेत असल्याचे पुढे आले आहे.

शहराच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या अनेक जागांवर महापालिकेने पार्किंग उभारली आहेत. टेंडर काढून महापालिकेने ही पार्किंग ठेकेदारांना चालविण्यासाठी दिली आहेत. या पार्किंगमधून पालिकेला दर वर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. पार्किंगचा ठेका देताना संबधित ठेकेदाराने दुचाकी वाहनचालकांकडून तसेच चारचाकी वाहनचालकाकडून तासाला किती शुल्क आकारायचे याबाबतचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसारच ठेकेदारांनी वाहनचालकांकडून पैसे घेणे गरजेचे आहे. मात्र शहरातील बहुतांश ठेकेदार मनमानी कारभार करत जादा पैसे घेत पुणेकरांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा पार्किंग चालक जादा दर घेत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिका प्रशासनाकडे करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

महापालिकेने ठेकेदारांबरोबर केलेल्या करारानुसार दुचाकीसाठी दोन तर चारचाकीसाठी पाच रुपये शुल्क घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही मंडई परिसरातील आर्यन पार्किंग, सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यान, बालगंधर्व, तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पार्किंगसाठी दुचाकीसाठी पाच रुपये घेतले जातात. तर गणेश कला क्रीडा येथील मोकळ्या जागेत केल्या जाणाऱ्या पार्किंगसाठी ठेकेदाराकडून दहा रुपये घेतले जातात.

शहरातील पार्किंग ठेकेदारांकडून होत असलेल्या लुटीच्या अनेक तक्रारी पालिकेच्या भूसंपादन विभागाकडे करण्यात आलेल्या असतानाही त्याकडे लक्ष देऊन त्याची कोणतीही शहानिशा या विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी करत नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

महापालिकेने केलेल्या करारानुसार नियमाप्रमाणेच ठेकेदारांनी वाहनचालकांकडून पार्किंगसाठी पैसे घेतले पाहिजे. जे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने पैसे घेत असतील, त्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- सतीश कुलकर्णी (उपायुक्त, भूसंपादन आणि व्यवस्थापन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रश्नपत्रिका संचाची सुविधा अपडेट नसल्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर असणाऱ्या प्रश्नपत्रिका संचांची सुविधा अपडेट नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या विषयी विद्यापीठाकडे विचारणा करायला गेलेल्या विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रश्नपत्रिकांचे संच उपलब्ध करून दिले जातात. प्रश्नपत्रिकांसाठीच्या या लिंकमधून २०१३ पर्यंतच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्यानंतरच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या लिंकवर उपलब्धच नाहीत. त्या विषयी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे चौकशी करायला गेल्यानंतर, या प्रश्नपत्रिका विद्यार्थी सुविधा केंद्रातून उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. तर, प्रेसमधून या उत्तरपत्रिका न मिळाल्याने त्या उपलब्ध नसल्याचे सांगून सुविधा केंद्राने परत पाठविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडरे कलादालनाच्या जागी ‘भूलभुलय्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पं. भीमसेन जोशी कलादालनात मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत सूर्यकांत मांडरे यांच्या नावाने उभारलेल्या कलादालनाची पूर्णतः दुरवस्था झाली असून, याच ठिकाणी आता 'भूलभुलय्या' अशी नवी संकल्पना आकाराला येत आहे. त्याबाबत, पालिकेच्या विभागांमध्येच गोंधळाचे वातावरण असून, पालिका आयुक्तांनी 'तातडीचे' आदेश देऊनही अतिरिक्त आयुक्तांनी तीन आठवड्यांनंतरही त्याबाबत निर्णय घेण्याचे टाळले आहे.

सहकारनगर येथील बागूल उद्यानात पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने कलादालन उभारण्यात आले आहे. याच कलादालनाच्या दुसऱ्या मजल्यावर मराठीतील नामवंत कलाकार सूर्यकांत मांडरे यांच्या नावे उभारण्यात आलेल्या कलादालनामध्ये त्यांची पेंटिंग आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याचे कायमस्वरूपी प्रदर्शन लावण्यात आले होते. मात्र, अवघ्या पाच वर्षांत मांडरे यांचे कर्तृत्व पालिकेसाठी नगण्य झाले असून, त्यांच्या नावाने उभारलेल्या कलादालनातील जागेवरच 'भूलभुलय्या' नावाने 'स्केअरी मिरर गॅलरी' आकाराला येत आहे. त्यामुळे, मांडरे यांच्या पत्नी सुशीला मांडरे यांनी पालिकेला भेट स्वरूपात दिलेले सर्व साहित्य कलादालनातील एका अडगळीच्या खोलीत पडून आहे. त्यापैकी, अनेक दुर्मिळ पेटिंगची मोडतोड झाली असून, मांडरे यांना मिळालेले काही पुरस्कारही गायब झाले असल्याची तक्रार त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांचे चिरंजीव प्रकाश मांढरे यांनी आयुक्तांची समक्ष भेटही घेतली होती.

त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्वरेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही पालिकेच्या विविध विभागांकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केले जात असून, ही 'मिरर गॅलरी' उभारण्याबाबत पालिकेच्या काही विभागांना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल ६३ लाख रुपये खर्चून 'भूलभुलय्या'चे टेंडर काढण्यात आले होते; पण त्याबाबत सांस्कृतिक केंद्राच्या व्यवस्थापकांना माहिती देण्यात आली नव्हती.

आयुक्तांच्या आदेशांनुसार पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागानेही मांडरे यांची संग्रहित चित्रे काढून टाकण्यात आल्याचे मान्य केले आहे. तसेच, भवन रचना विभागातर्फे सुरू असलेल्या कामाला स्थगिती देण्याबाबत आदेश देण्याचे विनंतीवजा पत्र अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना दोन मार्चलाच पाठविले होते. पालिका आयुक्तांनी अत्यंत तातडीचे (z+) म्हणून पाठविलेल्या या विषयावरही अतिरिक्त आयुक्तांनी तीन आठवडे उलटल्यानंतरही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, मांडरे यांच्या संग्रहाची आणि पुरस्कारांची विटंबना केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; तसेच उपमहापौर आबा बागूल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष यांनी केली आहे.

'मांडरे यांच्या कलादालनातील वस्तुसंग्रहाला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प होता. त्यामुळे, तो दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येऊन तेथे भूलभुलय्याचे काम केले जात आहे. मांडरे यांच्याशी पालिकेने कोणताही करारनामा केलेला नाही.'

- आबा बागूल, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या विकासावर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुप्रतीक्षित पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या 'पीएमआरडीए'ची स्थापना झाल्यानंतर पुण्याच्या नियोजनबद्ध विकासाला 'सुपरफास्ट' वेग मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्याच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी जानेवारीत 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजिलेल्या 'पुणे सुपरफास्ट' या विशेष संवादसत्रात मुख्यमंत्र्यांनी 'पीएमआरडीए' मान्यतेचे सूतोवाच केले होते. त्याची पूर्तता त्यांनी केल्याचे मानले जात आहे. 'पीएमआरडीएच्या स्थापनेस मी मान्यता दिली असून, नुकतीच या आदेशावर सही केली आहे. येत्या काही दिवसांतच यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात येणार आहेत,' असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. नगरविकास विभागाशी विषयांवर विधानसभेत बुधवारी चर्चा झाली. आमदार विजय काळे यांनी 'एमएमआरडीए'च्या धर्तीवर 'पीएमआरडीए' स्थापन करावे, पाणीपुरवठा-घनकचरा व्यवस्थापन आणि मोठ्या प्रकल्पांना सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या केल्या होत्या. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

'पीएमआरडीए' आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि मोठ्या प्रकल्पांना आवश्यक भांडवली गुंतवणुकीचे स्रोत निर्माण करण्यासाठी पर्यायांचा शोध घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी 'मटा'च्या कार्यक्रमात केली होती.

पुणे आणि लगतच्या परिसराच्या एकत्रित विकासाला चालना देण्यासाठी यापूर्वी युती सरकार असताना 'पीएमआरडीए'च्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती; परंतु त्यानंतर पंधरा ते वीस वर्षे या विषयाला गती मिळू शकली नव्हती. आघाडी सरकारमध्येही 'पीएमआरडीए'च्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद झाल्याने त्याची स्थापना मार्गी लागू शकली नाही. त्यामुळे शहर व परिसरात विकासाचे अवाढव्य आणि प्रचंड आर्थिक गुंतवणुकीची गरज असलेले प्रकल्प उभे राहू शकले नव्हते.

अध्यक्षपदी पालकमंत्री?

'पीएमआरडीए'च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची, या वादातून या प्राधिकरणाची अंमलबजावणी रेंगाळली होती. काँग्रेसचा मुख्यमंत्री असल्याने 'पीएमआडीए'च्या अध्यक्षपदी मुख्यमंत्रीच असावा, अशी भूमिका घेण्यात आली होती. दुसरीकडे, पुण्याचे कारभारी राष्ट्रवादीचे अजित पवार यांना पालकमंत्री या नात्याने अध्यक्षपद आपल्या ताब्यात हवे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरदेखील तोडगा काढला आहे. पालकमंत्री हेच पीएमआरडीएचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री, भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची तपासणी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाहनचालकांकडून जादा दराने पैसे घेऊन त्यांची लूट करणाऱ्या पार्किंगच्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरातील सर्व पार्किंगची तपासणी केली जाणार असून पार्किंगसाठी जादा पैसे घेणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून तीन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.

पार्किंगचा ठेका घेतल्यानंतर महापालिकेबरोबर करण्यात आलेल्या कराराकडे दुर्लक्ष करत शहरातील अनेक पार्किंगचालक मनमानी करत जादा दराने पार्किंगसाठी पैसे घेत असल्याचे प्रकार समोर आले होते. पार्किंगच्या नावाखाली ठेकेदारांकडून होत असलेल्या लूटीच्या तक्रारी पालिकेकडे आल्याने शहरातील सर्व पार्किंगची पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तीन दिवसांत त्यांनी खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील पार्किंगची तपासणी करताना पालिकेच्या नियमानुसार माहिती फलक लावले आहेत का? पालिकेच्या जागे व्यतिरिक्त आणखी काही जागांचा वापर सुरू आहे का? याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भूसंपादन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षकांच्या संख्येचे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे दहावी- बारावीच्या परीक्षार्थींची संख्या वाढत असताना, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षक आणि नियामकांच्या संख्येत त्या तुलनेत वाढ होत नसल्याचे आता उघड झाले आहे. उत्तरपत्रिकांची असुरक्षितता आणि बोर्डाकडून परीक्षक- नियामकांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर येणारी ही बाब बोर्डाच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित करत आहे.

बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या असुरक्षित वाहतूकीमागे बोर्डाकडून वाहतूकीसाठी मिळणारा अत्यल्प मोबदला हे महत्त्वाचे कारण असल्याची बाब सांगण्यात येत होती. त्यापाठोपाठ विमाननगरमधील शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शिक्षकांच्या मानसिकतेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र बोर्डाच्या परीक्षक आणि नियामकांची संख्या पुरेशी नसल्याने आणि वेळेत काम करण्याचे बंधन असल्याने, अनेकदा शिक्षक - नियामकांकडून पेपर तपासणीसाठी इतरांची मदत घेतली जात असल्याची बाब समोर आली. उत्तरपत्रिकांचा अतिरिक्त ताण सहन होत नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याची बाजूही शिक्षक प्रतिनिधींकडून लावून धरण्यात आली. त्याचाच पाठपुरावा करताना, परीक्षक आणि नियामकांच्या संख्येची वस्तुस्थिती समोर आली.

बोर्डाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, वर्ष २०१३ मध्ये दहावीच्या परीक्षार्थींची संख्या ०.९ टक्क्यांनी वाढली असतानाच, परीक्षकांची संख्या मात्र ०.०६ टक्क्यांनी कमी झाली. बारावीच्या परीक्षार्थींची संख्या ४.७ टक्क्यांनी कमी झाली असतानाच, परीक्षकांची संख्या मात्र केवळ १.९ टक्क्यांनी कमी झाली. २०१४ च्या परीक्षेबाबत, दहावीची परीक्षार्थींची संख्या ३.३६ टक्क्यांनी वाढली असताना, परीक्षकांची संख्या मात्र २.९ टक्क्यांनीच वाढली. बारावीची परीक्षार्थींची संख्या १०.१२ टक्क्यांनी वाढली असतानाच, परीक्षकांची संख्या केवळ ०.०५ टक्क्यांनीच वाढल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परीक्षक- नियामकांच्या संख्या निश्चितीसाठी बोर्डाकडे काही आदर्श तत्त्वे पाळली जातात की नाही, असा प्रश्नच यातून उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरीत पुजाऱ्यांना लगाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जेजुरी येथील खंडोबारायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी दिलेल्या देणग्या, अभिषेक, नवसाच्या रकमा तसेच मौल्यवान वस्तू पुजारी, गुरव तसेच हक्कदारांना आपआपसांत वाटून घेण्यास मनाई करण्यात आली. या आदेशाची आजपासून अंमलबजावणी करण्याचे जेजुरी देवस्थानला आदेशही सहधर्मादाय आयुक्तांनी बजावले आहेत.

देवस्थानात जमा होणारी सर्व रक्कम व मौल्यवान वस्तू देवस्थानाच्या खात्यात जमा करावी. पुजारी, गुरव व हक्कदार यांनी देवस्थानात कोणतीही वैयक्तिक अभिषेक अथवा पूजा न करता देवस्थानाकडून रितसर पावती करावी नंतरच विधी करावा. तसेच पुजारी, गुरव यांना खंडोबारायासमोर पूजा- अर्चा, अभिषेकासाठी भाविकांकडून पैसे घेण्यास सहधर्मादाय आयुक्तांनी लगाम लावला आहे. देवस्थानासह दानपेटीत जमा होणारी सर्व रक्कम व मौल्यवान वस्तू न्यासाकडे जमा करून त्याची रितसर पावती घ्यावी, असे सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आदेश दिले.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी देवस्थानाला सह धर्मादाय आयुक्त डिगे यांनी आठ मार्चला भेट दिली. त्यावेळी अभिषेकासह इतर धार्मिक विधीसाठी तेथील पुजारी भक्तांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत देवस्थानाच्या विश्वस्तांकडे चौकशी केली असता देवासमोर जमा होणारी तसेच दानपेटीत जमा होणारी रक्कम तसेच मौल्यवान वस्तू हे तेथील पुजारी आपआपसांत वाटून घेतात. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ ई नुसार सह धर्मादाय आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. याबाबत सहायक धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषाणूंसह जीवाणूंचाही संसर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थंडी गायब होऊन अचानक उन्हाचे चटके काही दिवसांपासून बसू लागले आहेत. अशा वातावरणामुळे विषाणूंसोबत जीवाणूंच्या 'कॉम्बिनेशन'चा एकाचवेळी संसर्ग होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. वाढत्या उन्हामुळे आरोग्य सांभाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

'थंडी गायब झाली. यापूर्वी हळूहळू ऊन वाढत होते. मात्र यंदा अचानकपणे ऊन वाढल्याने त्याचा चटका बसू लागला आहे. वाढत्या उन्हाचा चटका बसत असला तरी काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे विषाणूंचे प्रमाण वाढत आहे. विषाणूंचा संसर्ग होऊन ताप येत आहे. तर त्याशिवाय जीवाणूंचा संसर्ग होऊन एकाचवेळी विषाणू जीवाणूंचे 'कॉम्बिनेशन'मुळे आजार वाढत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे कोरडा खोकला येत असून त्याचे रुपांतर कफमध्ये होत आहे', असे निरीक्षण फिजिशियन डॉ. संताजी कदम यांनी नोंदविले.

वाढत्या उन्हामुळे पोट खराब होणे, काविळी, गॅस्ट्रो, विषाणूजन्य संसर्ग, गोवर, कांजण्याची साथ येण्याचे प्रकार आढळून येतात. उन्हामुळे शरिरातील पाणी घटणे. त्याशिवाय उष्माघाताचे प्रकार घडण्याची भीती संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी व्यक्त केली.

काय काळजी घ्याल ?

उन्हात फिरताना टोपी घालावी.

सोबत पाण्याची बाटली ठेवावी.

अवेळी खाऊ नये.

उपाशी राहू नये.

गॉगल घालावे तसेच मास्कही वापरावे.

थोड्या थोड्या अंतराने लिंबू सरबत अथवा ज्यूस घ्यावे.

पाणी जादा प्यावे.

सफरचंद, केळी, शहाळे, द्राक्षे खावीत.

काय टाळाल ?

उन्हातून घरात येताच थंड पाणी पिण्याचे टाळावे

शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे

तेलकट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन एफएसआय बारगळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) सरसकट तीन एफएसआय दिल्यास सर्वच व्यवस्थांवर ताण निर्माण होण्याची भीती असल्याचा साक्षात्कार अखेर कारभाऱ्यांनाही झाला आहे. त्यामुळे, तीन एफएसआयची नियोजन समितीची शिफारसही मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्याचे स्पष्ट संकेत दिले असून, शहराच्या हिताचे निर्णय घेण्याची तंबी सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. 'राष्ट्रवादी'तर्फे डीपीच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत बुधवारी अजितदादांनी तीन एफएसआयला पूर्ण विरोध करा, असे आदेशच पालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिले.

मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरपर्यंत चार एफएसआय देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप आराखड्यात मांडण्यात आला होता. त्यावरील हरकती-सूचनांच्या सुनावणीसाठी नेमलेल्या समितीने मेट्रो मार्गासाठी प्रस्तावित केलेला चार एफएसआय रद्द करून संपूर्ण शहरात तीन एफएसआय देण्याची शिफारस केली होती. शहरातील तीन एफएसआयला स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी तीव्र विरोध दर्शविला होता. 'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षांचाही वाढीव एफएसआयला विरोध होता. त्यावरून, पक्षात फूट पडल्याचेही समोर आले होते. अखेर, वाढीव एफएसआयमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडणार असल्याने त्याला विरोध करा, असे अजित पवार यांनी सुचविले. त्यामुळे, नियोजन समितीने केलेली शिफारस बारगळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहराच्या मध्यवस्तीत रस्त्यांचे रुंदीकरण रद्द करण्याची शिफारसही नियोजन समितीने केली होती. मात्र, मध्यवस्तीतील रस्त्यांचा अपवाद वगळता इतर भागांतील रस्त्यांचे रुंदीकरण कायम ठेवा, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठीच्या घरांसाठी (ईडब्ल्यूएस) रद्द केलेली आरक्षणे कायम ठेवा, उंच इमारतींसाठी अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचे आयुक्तांचे अधिकार कायम ठेवा, अशा काही सूचनाही त्यांनी केल्या आहेत. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, शहराध्यक्षा अॅड्. वंदना चव्हाण, सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

'महावितरणला सवलत द्या'

महावितरणच्या इन्फ्रा प्रकल्पासाठी खोदाई शुल्कात सवलत देण्याची मागणी सर्वसाधारण सभेने फेटाळून लावली. त्याबाबतही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली असून, केवळ इन्फ्रा प्रकल्पासाठी महावितरणला सवलत द्या, असे पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. महावितरणच्या इन्फ्रा प्रकल्पाव्यतिरिक्त इतर कोणालाही सवलत देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र तापला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गारपिटीच्या तडाख्यातून अजूनही न सावरलेल्या राज्याला आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. या तापमानवाढीमुळे मुंबईत उष्माघाताचा एक बळी गेल्याची घटनाही समोर आली आहे. पुढील काही दिवस उन्हाळ्याची तीव्रता कायम राहणार आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले. पश्चिमेकडून वाहणारे कोरडे व थंड वारे आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रवाहात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस झाला. मात्र, हवामानाची स्थिती पूर्ववत झाल्यानंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या पाच सात दिवसात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरी पाच ते सात अंशांची वाढ नोंदली गेल्याने हवेतील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला. देशातही अनेक ठिकाणी तापमान वाढ झाली आहे. गुजरात आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट आहे.

बुधवारी राज्यातील सर्वाधिक तापमान कोकणातील भीरा येथे ४३.५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले. मुंबईत सांताक्रूझ येथे ४०.८ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. मालेगाव आणि सोलापूर येथे ४०.८ अंश सेल्सियस, उस्मानाबाद येथे ४०, अकोला येथे ४०,५ तर नागपूर येथे ३९.८ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले.

उकाडा कायम राहणार

दरम्यान, पुढील चार दिवस राज्यातील उकाडा कायम राहणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी सलग पाच सहा दिवस तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नगरसेवकाचा इंदापुरात खून

$
0
0

इंदापूर तालुक्यात कडकडीत बंद

म. टा. वृत्तसेवा, बारामती

इंदापूर शहर नगरपालिकेतील काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करीत मंगळवारी रात्री हत्या केली. मंगळवारी रात्री शहरातील बाबा चौकात धनंजय यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर धनजंय यांना अकलूज येथील हॉस्पिटल हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या खुनाचे वृत्त पसरताच संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

इंदापूर शहरातील नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष धनंजय वाशिंबेकर बाबा चौकात आले होते. त्या वेळी तेथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून धूम ठोकली.

या घटनेनंतर इंदापूर शहरात तणावाची स्थिती आहे. या हल्ल्यापूर्वीही वाशिंबेकरांवर एक हल्ला झाला होता. वाशिंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गुरुवारी सकाळी वाशिंबेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या तपासासाठी चार पथके विविध भागांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक बंडूपंत कोंडुभैरी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाईचा शेतीला फटका

$
0
0

संतराम घुमटकर, बारामती

बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील शेतकऱ्यासाठी वरदान ठरणाऱ्या 'शिरसाई' पाणी उपसा सिंचन योजनेबाबत पाटबंधारे विभागाचा ढिसाळ कारभार सुरू आहे. ढिसाळ कामकाजामुळे थकीत पाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीषण झळ पोहोचत आहे.

शिरसाई उपसा सिंचन योजनेतून नियमित पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिके जळून जात असताना पाहावे लागत आहे. या सिंचन योजनेची कामे अद्यापही अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करावी लागली आहे. त्यासाठी कर्जही घ्यावे लागले आहे. पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभाराचा फटका गरीब शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, साबळेवाडी, शिर्सुफळ, गोजुबावी, बऱ्हाणपूर, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, उंडवडी कडेपठार, अंजनगाव, जराडवाडी, खराडेवाडी आदी गावांच्या परिसरातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी 'शिरसाई' उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी खडकवासल्यातून शिर्सुफळच्या ब्रिटिशकालीन तलावात पाणी सोडण्यात येते. त्या तलावातून शिरसाई उपसा सिंचन योजना करण्यात आली असून, सहा पंपाद्वारे पाणी उचलून जिरायती भागातील गावांना दिले जाते. शिरसाई योजनेतील कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पोटकालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. लाभार्थी गावामध्ये पाझर तलावात पाणी सोडले जाते. त्यासाठी पाणीपट्टीही भरली जाते. ही योजना अद्यापही लाभार्थी गावांमध्ये हस्तांतरित झालेली नाही. शिर्सुफळ तलावाच्या परिसरात स्थानिक शेतकऱ्यांनी पाटबंधारे परवानगी घेऊन शेतीपंप लावले आहेत. मात्र, पाणीवाटपाबाबत खडकवासला कार्यकारी अभियंता लोहार यांनी बोलण्यास नकार दिला असून, शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न बाजूला टाकला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभाग व चासकमान प्रकल्प विभाग अर्थात शिरसाई उपसा सिंचन योजना या दोन्ही विभागात ताळमेळ नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बहुतांशी गावात शिरसाई योजनेच्या पाण्याचे आवर्तन थकीत पाणीपट्टी भरूनही मिळालेले नाही. आदल्या रात्री शेतकऱ्यांनी कॅनॉल्सच्या सर्व दारांची साफसफाई भाड्याचा जेसीबी आणून केली आहे. मात्र, तरीही पाणी सोडण्यात आले नाही.

खडकवासलामधून शिर्सुफळ तलावात १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते; मात्र वाढीव पाणी मिळण्याबाबत कोणतीही मागणी संबधित खात्यांकडून झालेली नाही. तलावातील पाणी कुठे गेले, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पाणी हवे असल्याची मागणी केली पाहिजे, म्हणजे तसे नियोजन करता येते.

- आर. के. जाधव, उपअभियंता, खडकवासला विभाग

शेतकऱ्याच्या पाण्याबाबत मला काहीही माहिती नाही.

- बी. बी. लोहार, कार्यकारी अभियंता, खडकवासला

मागितले तितके पाणी मिळालेले नाही. आम्ही २५० दशलक्ष घनफूट पाणी मागितले होते. प्रत्यक्षात फक्त ५० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. उर्वरित पाणी येत्या आठवड्यात मिळणे अपेक्षित आहे.

- के. डी. टुले, उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवर्धन समितीचा निर्णय स्वागतार्ह

$
0
0

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे किल्ले संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त पांडुरंग बलकवडे यांच्याशी चैत्राली चांदोरकर यांनी साधलेला संवाद...

प्रश्न : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी बजेटमध्ये स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याबरोबरच सरकारने समिती नेमून दुर्गप्रेमींसाठी चांगला निर्णय घेतला आहे, असे वाटते का?

बलकवडे : नक्कीच. मला कोणत्याही सरकारवर टीका करायची नाही. पण या पूर्वीच्या सरकारने किल्ल्यांकडे गांभीर्याने पहिले नाही. दुर्गप्रेमींनी वारंवार पाठपुरावा करूनही किल्ले दुर्लक्षित राहिले. या सरकारने समिती नेमून स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुरवस्था आणि राजस्थानातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सातत्याने तुलना केली जाते. यामागचे नेमके कारण काय आहे?

बलकवडे : राजस्थान हे पर्यटनाच्या दृष्टीनेच विकसित केलेले राज्य आहे. येथील आर्थिक बाजारपेठ पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत राजस्थान सरकारने तेथील किल्ल्यांच्या, राजवाड्यांच्या संवर्धनासाठी खूप मेहनत घेतली. कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यामुळे हे किल्ले आज पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. तेथील अर्थव्यवस्थेत रुपयामागे ६५ पैशांचे उत्पन्न हे पर्यटनातून मिळते. त्यामुळे ते किल्ल्यांचे जतन आपुलकीने करतात. आपल्याकडे मात्र ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर किल्ल्यांना संघर्ष करावा लागला. किल्ले ताब्यात आल्यावर त्यांनी ते जाणीवपूर्वक उदध्वस्त केले. गडाच्या वाटा सुरुंग लावून पुसून टाकल्या. याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. स्वातंत्र्यानंतर मात्र या किल्ल्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे आजही ते दुर्दैवी अवस्थेतच आहेत.

प्रश्न : किल्ल्यांच्या विकासाला दुर्गप्रेमींचा प्रचंड विरोध असतो. किल्ल्यांमुळे होणाऱ्या पर्यटनाला त्यांचा विरोध आहे, अशा वेळी तुम्ही संवर्धन आणि पर्यटनाचा मेळ कसा साधणार आहात ?

बलकवडे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेले गड-किल्ले ही महाराष्ट्राला मिळालेली ऐतिहासिक देणगी आहे. त्यामुळे या किल्ल्यांविषयी लोकांच्या मनात श्रद्धा आणि आपुलकी आहे. शेकडो वर्षांच्या इतिसाहाची परंपरा घेऊन उभ्या असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे. पण याचा अर्थ तिथे सिमेंट काँक्रिटचे जंगल उभारायचे असा होत नाही. समितीमार्फत आम्ही या किल्ल्यांवरील वास्तूंची दुरूस्ती आणि देखभाल करणार आहोत.

प्रश्न : समिती कार्यरत झाल्यावर सर्वप्रथम काय करणार आहात?

बलकवडे : किल्ल्यांचे जतन करणे हे केवळ शिवभक्तांपुरते मर्यादित काम नाही. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा, पुरातत्व खात्याचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासक, वनस्पती अभ्यासक, पुरातत्त्व शास्त्र अभ्यासक, पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सर्वप्रथम या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी बैठक घेण्याचा विचार आहे. या सगळ्यांकडून सूचना जाणून घेतल्यास संवर्धनाचे काम नेमकेपणाने करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संवेदनातून जन्मते साहित्य’

$
0
0

पाचव्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जीवन हे काही एका भावनेवर आधारलेले नसते. त्यामुळे साहित्य जीवनातील विविध भावना उलगडून दाखवते. सकस साहित्यनिर्मितीसाठी मन संवेदनशील असणे आवश्यक आहे,' असे मत पाचव्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट यांनी गुरुवारी मांडले.

युनिक फीचर्सच्या वतीने आयोजित पाचव्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. अवचट बोलत होते. युनिक फीचर्सचे डॉ. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, गौरी कानेटकर आदी या वेळी उपस्थित होते. जगभरातील साहित्यप्रेमींना http://www.uniquefeatures.in/ या वेबसाइटच्या माध्यमातून या संमेलनात घरबसल्या सहभागी होता येईल.

लेखक व्हायचे असे काही ठरवले नव्हते असे सांगून अवचट म्हणाले, 'माझ्या ओतूर या गावी साधे ग्रंथालय नव्हते. कधी लेखक पाहायलाही मिळाला नव्हता. त्यामुळे लेखन, साहित्य हा आपला प्रांत नव्हे असेच वाटायचे. काही न ठरवता लिहित गेलो. इतरांचे साहित्य वाचून समृद्धानुभव मिळतो. त्यासाठी मन संवेदनशील असले पाहिजे. इतरांच्या वेदना, दुःख, आनंद न सांगता कळणे आवश्यक आहे.'

'इतर भाषांतील साहित्य अनुवादाच्या माध्यमातून मराठीत येत आहे ही चांगली बाब आहे. त्यामुळे नवी दालने वाचकांसाठी खुली होतात. वेगळे जीवन अनुभवता येते. अनुवादित पुस्तकांना चांगली मागणी असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अनुवादाचा दर्जा चांगला असणे खूप आवश्यक आहे. पुस्तके विकली जातात म्हणून काहीही प्रसिद्ध करून चालणार नाही,' असेही त्यांनी सांगितले.

'मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे'

इंग्रजी भाषा जागतिक असल्याने न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यातून सांस्कृतिक आत्मविश्वास मिळतो. मातृभाषेत शिकल्यावर इतर संस्कृती-भाषांशी जोडले जाणे जास्त सोपे होते, असेही अवचट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाचे अनुदान सुपूर्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या अनुदानासाठीची साहित्य महामंडळाची प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपली. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून पंचवीस लाखांच्या अनुदानाचा धनादेश अखेर महामंडळाच्या हाती सोपविण्यात आला.

साहित्य महामंडळाने घुमान येथे संमेलन घेण्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच अनुदान मिळण्याबाबतचे पत्र राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागाने घुमान येथील साहित्य संमेलनासाठी अनुदान मंजूर केल्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्याचे पत्रही साहित्य महामंडळाला पाठवल्यानंतरही प्रत्यक्ष धनादेश देण्यासाठी मध्ये बराच वेळ गेला. आता संमेलन दहा दिवसांवर आले असताना राज्य सरकारचे अनुदान महामंडळाच्या हाती आले. महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी हा धनादेश स्वीकारला.

घरबसल्या घ्यासंमेलनाचा आनंद

घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आता www.lifepune.com या वेबसाइटवर थेट केले जाणार आहे. त्यामुळेच, कम्प्युटर-लॅपटॉपसह स्मार्टफोनवरून घरबसल्या संमेलनाचा आनंद लुटता येणार आहे. हेमंत जाधव आणि समीर देसाई यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घुमानचे संमेलनस्थळ आणि संत नामदेवांच्या आठवणी जपणारा 'तापियाना' तसेच गुरुद्वारा येथे हे चित्रिकरण करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंटरनॅशनल थिएटर’चे पुण्यात केंद्र

$
0
0

जागतिक नाट्य उपक्रमांची माहिती होणार; वैचारिक देवाणघेवाण शक्य

चिन्मय पाटणकर, पुणे

जगभरातील रंगकर्मींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी 'युनेस्को'च्या वतीने स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे केंद्र भारतात सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 'युनेस्को'ने भारतात केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली असून, या केंद्राचे कामकाज पुण्यातून होण्याची शक्यता आहे.

'युनेस्को'ने दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. शीतयुद्धाच्या काळात तुटलेला संवाद कलावंतांमुळे पुन्हा सुरू करण्याचा उद्देश त्यामागे होता. या संस्थेचे १९६३ पर्यंत बारा देशच सदस्य होते. त्यानंतरच्या काळात या संस्थेची सदस्यसंख्या वाढवण्यास सुरुवात झाली. सध्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ८६ देशांमध्ये कार्यरत आहे. लवकरच या इन्स्टिट्यूटचे केंद्र भारतातही सुरू होणार आहे. भारतात होऊ घातलेल्या केंद्राविषयीची माहिती रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी 'मटा'ला दिली.

'अर्मेनिया देशातील येरेव्हॅन या शहरात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटची ३४वी परिषद झाली. त्या परिषदेत भारतात केंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला. आता या केंद्राचे काम सुरू करण्याच्या हालचाली वेग घेत आहेत. या इन्स्टिट्यूटचे भारतात केंद्र सुरू झाल्यामुळे जगभरातील नाट्यविषयक घडामोडी भारतातील रंगकर्मींपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे माध्यम उपलब्ध होईल. सध्या जागतिक स्तरावरील नाट्य उपक्रमांची माहिती भारतातील रंगकर्मींपर्यंत तितक्याशा पोहोचत नाही. ही उणीव या इन्स्टिट्यूटमुळे भरून निघणार आहे. या केंद्रामुळे विविध देशातील रंगकर्मी आणि भारतातील रंगकर्मी यांच्यांत वैचारिक व कलात्मक देवाणघेवाण करणे शक्य होईल,' असे वनारसे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्याहून जास्त गुण मिळवणारे २५ टक्केच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नुकत्याच झालेल्या राज्याच्या एमबीए-सीईटीमध्ये केवळ २५ टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मार्क मिळू शकले आहेत. परीक्षेला बसलेल्या ५७ हजार २२४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५०० विद्यार्थ्यांना १५० मार्क मिळाले आहेत. ही परीक्षा एकूण २०० मार्कांची होती.

राज्यातील एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी घेण्यात येणारी एमबीए-सीईटी गेल्या १४ आणि १५ मार्चला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिलेल्या आकडेवारीनुसार, ५७,२२४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १४,६०० विद्यार्थ्यांना १०० किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवता आले आहेत.

यंदाच्या परीक्षेनंतर त्यातील काही प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आल्याने हे प्रश्न मूल्यांकनातून वगळण्यात आले होते. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात वरील विश्लेषण समोर आले आहे. परीक्षेत ५० ते १०० या दरम्यान मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ३९,८०४ इतकी आहे. एकूण विद्यार्थी संख्येशी तुलना करता ही संख्या ६९.५ टक्के इतकी आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर ७५ टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्के मार्कही मिळवता आलेले नाहीत.

परीक्षेमध्ये शून्य गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ आहे. परीक्षेत सर्वाधिक १७० गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे. परीक्षेमध्ये सर्वाधिक १२९७ विद्यार्थ्यांना ६६ मार्क मिळाले आहेत, तर प्रत्येकी एका विद्यार्थ्याला परीक्षेत १६५, १८ आणि ८ मार्क मिळाले आहेत.

निकाल एमबीए-सीईटीचा

- परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी : ५७,२२४

- मिळालेले सर्वाधिक गुण : १७०

- १००हून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी : १४,६००

- ५०हून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी : ५४,४०४

- ० गुण मिळालेले विद्यार्थी : ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर

$
0
0

राजकीय पातळीवर हालचालींना वेग; नागरिकांत संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कळीचा मुद्दा ठरलेल्या आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील ज्वलंत प्रश्न म्हणून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकारणही तापू लागले आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम येत्या एक एप्रिलपासून पुन्हा एकदा हाती घेणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी म्हटले आहे. तर, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. एकीकडे आशावाद आणि दुसरीकडे कारवाईची भीती यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण अजूनही कायम आहे. प्रलंबित प्रश्नांचे घोंगडे भिजतच असल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई प्रशासनान स्थगित करावी, या मागणीसाठी खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली. त्यासंदर्भात माहिती देताना बारणे म्हणाले, 'अनधिकृत बांधकामांबाबत गेल्या तीन वर्षांपासून लढा देत आहे. परंतु, हा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसला मार्गी लावता आला नाही. शिवाय विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले तरी राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना जाणीव करून दिली. त्यांनी धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कारवाई करू नये, असे पत्र हायकोर्टाला देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.'

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे 'पीएमआरडीए'मध्ये विलिनीकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही केल्याचे बारणे यांनी सांगितले. प्रलंबित प्रश्नांचे राष्ट्रवादीने भांडवल केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा ठोस निर्णय लवकरच घेतील, असा दावा भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, 'अनधिकृत बांधकामांचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांनी विश्वास दाखविल्यामुळेच राज्यात भाजपचे सरकार आले. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पावले टाकत आहेत. उर्वरित विकास आराखड्याला मंजुरी, मोशी कचरा डेपो येथील बफर झोन याबाबत सकारात्मक निर्णय घेतले. कुंटे समितीचा अहवाल आल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही विधानपरिषदेत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच ठोस निर्णय होईल.'

राजकीय भांडवलाचा प्रयत्न

कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस राज्यात सत्तेवर असताना त्यांनी प्रश्न सोडविला नाही, म्हणून आघाडी सरकारवर खापर फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न नक्की सोडवतील, असा दावा केला आहे. तर, विद्यमान खासदार आणि आमदारही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लाभ घेण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठ्यातील तक्रारी यंत्रणेद्वारे शोधणार

$
0
0

प्रयास ऊर्जा गटाकडून यंत्रणा सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमी व्होल्टेज, वारंवार होणारे बिघाड आणि लोडशेडिंग अशा वीजपुरवठ्यातील तक्रारींचा वेध घेणारी यंत्रणा प्रयास ऊर्जा गटाने सादर केली आहे. 'इलेक्ट्रिसिटी सप्लाय मॉनिटरिंग इनिशिएटिव्ह' (इएसएमआय) या इंटरनेटबेस्ड यंत्रणेद्वारे वीजपुरवठ्याच्या दर्जाची त्याच क्षणी (रिअल टाइम) नेमकी माहिती मिळणे शक्य होणार आहे, अशी माहिती प्रयास ऊर्जा गटाचे शंतनू दीक्षित आणि अश्विनी चिटणीस यांनी दिली. इएसएमआय या उपक्रमास गुगल इम्पॅक्ट चॅलेंजमध्ये पुरस्कार मिळाला होता. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत हा उपक्रम देशात अव्वल ठरला होता. आता ही यंत्रणा देशभरातील वीजपुरवठा कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. www.watchyourpower.org या वेबसाइटवर देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा दर्जाबाबत माहिती मिळविता येईल, असे च्या वतीने कळविण्यात आले आहे.

वीजपुरवठा सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच आपल्याला मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता तपासून घेण्यासाठी ग्राहकांना ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. वीजपुरवठा यंत्रणेमध्ये यासंदर्भातील उपकरणे सहजपणे बसविणे शक्य होणार आहे. सध्या आठ राज्यांमधील पाच महानगरे आणि अन्य काही ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेत व्होल्टेज रेकॉर्डर आणि कम्युनिकेशन मोडेम बसविण्यात आले असून प्रत्येक मिनिटाला त्याठिकाणच्या व्होल्टेजची माहिती मोबाइल डेटा नेटवर्कच्या माध्यमातून सहजपणे सेंट्रल सर्व्हरला पाठविणे शक्य होणार आहे.

दरम्यान, ग्राहकांबरोबरच धोरणकर्ते आणि वीज नियामक आयोगांनाही या माहितीचा धोरणे ठरविण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याबरोबरच वीजपुरवठा सेवा क्षेत्रात सुधारणेचे विविध उपक्रम हाती घेण्यासाठी सरकारसाठीही ती मार्गदर्शक ठरणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी esmi@prayaspune.org या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस मृतदेहांच्या पोस्टर प्रदर्शनातून खुनाचा गुन्हा उघड

$
0
0

'एलसीबी'ची कारवाई; चौघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेवारस मृतदेंहाचे प्रदर्शन पाहिलेल्या व्यक्तीने पोलिसांना निनावी पत्र पाठवून सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) तत्काळ कारवाई करत चौघा आरोपींना गजाआड केले आहे. दरम्यान, पोलिसांना मात्र खून झालेल्या व्यक्तीचे संपूर्ण नाव समजू शकलेले नाही.

तारकनाथ उर्फ बाळू तुकाराम इचके (वय ३४, सध्या रा. पनवेल, मूळ रा. खेड, जि. पुणे), संजय उर्फ ढवळा जिजाबा बुरसे (३२, रा. पनवेल, मूळ रा. बुरसेवाडी, ता. खेड, पुणे), सुनील उर्फ भावड्या रावजी तनपुरे (२८, रा. बुरसेवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि तुकाराम विठ्ठल गोपाळे (२५, रा. पनवेल, मूळ रा. कळमोडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस कर्मचारी नामदेव जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मृत व्यक्तींचे पोस्टर प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाबाबत माहिती मिळालेल्या एका व्यक्तीने २० मार्च रोजी 'एलसीबी'ला निवावी पत्राद्वारे खुनाच्या गुन्ह्याची माहिती दिली होती. 'एलसीबी'चे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, फौजदार प्रकाश शितोळे, कर्मचारी शरद बांबळे, सतीश कुदळे, शफी शिलेदार यांनी आरोपींचा माग काढत चौघांनाही अटक केली.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव विकास असल्याचे समजले आहे. एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात विकास आणि आरोपी संजय यांच्यात वाद झाले होते. आरोपी आणि विकास हे २० एप्रिल २००७ रोजी पनवेल येथे दारू पिण्यास बसले असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाले होते. या वादातून आरोपींनी विकासला बेदम मारहाण केली. त्यात विकासचा मृत्यू झाला. आरोपींनी त्याला पाईट व अंबोलीगावाच्या दरम्यान एका मोरीजवळ चारीमध्ये फेकून दिले होते. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images