Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एसईझेड’चा बार फुसका

$
0
0

जितेंद्र अष्टेकर, पुणे

मोठा गाजावाजा करीत लागू करण्यात आलेले विशेष आर्थिक क्षेत्राचे (एसईझेड) धोरण गुंतवणूक व रोजगारनिर्मिती या आघाड्यांवर नापास झाल्याचे चित्र आहे. 'एसईझेड'मार्फत राज्यात येऊ घातलेल्या गुंतवणुकीपैकी फक्त १३ टक्के गुंतवणूक प्रत्यक्षात झाली आहे. तर, रोजगारनिर्मितीच्या अंदाजांपैकी केवळ सव्वादोन टक्के रोजगारच प्रत्यक्षात मिळाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणीच्या अहवालाने याची कबुली दिली आहे.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 'एसईझेड'ची संकल्पना मांडली गेली. त्यानंतर संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक 'एसइझेड'चे प्रस्ताव आले होते. त्यामधून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि काही लाख रोजगारांची निर्मिती होईल, असेही सरकारी अंदाजातून मांडण्यात आले होते. मात्र, गेल्या डिसेंबरपर्यंतची परिस्थिती पाहता गुंतवणूक आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर 'एसईझेड' हे मृगजळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याबाबतचा तपशील देण्यात आला असून, ही आकडेवारी सरकारची अधिकृत आकडेवारी ठरली आहे.

राज्यात १२४ 'एसईझेड' मंजूर करण्यात आले होते. त्यांपैकी ६६ 'एसईझेड'ची अधिसूचना काढण्यात आली आणि त्यांपैकी फक्त २४ 'एसईझेड' सुरू झाले आहेत. या 'एसईझेड'मार्फत राज्यात सुमारे एक लाख ४३ हजार ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत त्यापैकी १८,७८६ कोटी, म्हणजे केवळ १३ टक्के गुंतवणूक झाली असून, उरलेली सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक कागदावरच आहे.

'एसइझेड' सुरू झाल्यानंतर राज्यात ५५ लाख ८५ हजार रोजगार निर्माण होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत यांपैकी फक्त एक लाख ३१ हजार, म्हणजे फक्त २.३४ टक्के इतक्याच रोजगारांची निर्मिती झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

'एसईझेड'चे धोरण लागू झाले, तरी ते कार्यन्वित होण्यात सरकार पातळीवरूनही अनेक अडचणी आल्या. विशेषतः काही करसवलती जाहीर झाल्याप्रमाणे अंमलात येऊ शकल्या नाहीत, तसेच जागा मिळवून प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यातही अडचणी आल्या. अशा अनेक कारणांनी 'एसइझेड'मध्ये उत्पादन सुरू करणे आकर्षक राहिले नाही. त्यामुळे त्यांचा उद्देश सफल होऊ शकला नाही.

- अनंत सरदेशमुख, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

मुळात 'एसईझेड' म्हणजे उद्योग दलालांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी केलेली मोहीम होती; औद्योगिक प्रगतीशी त्याचा काही संबंध नव्हता, हे या माहितीतून सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे भू-संपादन धोरणही याच उद्योग दलालांचा फायदा करून देण्याच्या मानसिकतेतून आले आहे. 'एसईझेड'ला मंजुरी देणाऱ्यांची चौकशी करावी आणि जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.

- अजित अभ्यंकर, पुणे जिल्हाध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोफत उपचाराचा निर्णय जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या संसर्गामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरील गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचाराचा लाभ देण्यावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले. परिणामी, दोन मार्चपासून उपचार घेणाऱ्या पेशंटना वैद्यकीय परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'स्वाइन फ्लू'ची साथ सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मोफत उपचाराची घोषणा केली होती.

दोघांच्या घोषणेत मोफत उपचाराचा कोणत्या वर्गाच्या पेशंटना लाभ मिळणार याची स्पष्टता नव्हती. यावरून आरोग्य खात्याच्या अधिकारांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्या संदर्भात 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त देऊन वाचा फोडली होती. त्याशिवाय आरोग्यमंत्र्यांनी देखील आर्थिक दुर्बल व गरीब व्हेंटिलेटरवरील पेशंटनाच लाभ मिळणार असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने घोषणेनंतर अखेर १८ दिवसानंतर हा अध्यादेश जारी केला.

दोन मार्चनंतर खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचाराचा लाभ मिळेल. त्याशिवाय उपचारानंतर पेशंट घरी परतल्यास त्याला वैद्यकीय परतावा देखील दिला जाईल. पेशंट दगावला असल्यास त्याच्या नातेवाइकांची खातरजमा करून रक्कम दिली जाईल. केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेनुसार (सीजीएचएस) बिले आकारली जातील. खासगी हॉस्पिटलमधील उपचाराच्या खर्चाच्या बिलांची छाननीसाठी सिव्हील सर्जनच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती बिलांची छाननी करेल. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती वैद्यकीय परताव्यासाठी मंजुरी देणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. 'स्वाइन फ्लू'ची साथ संपेपर्यंर्यंत ही मोफत उपचाराची योजना लागू राहील, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे आता मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसचालकांचे ड्रायव्हिंग ‘रडार’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमुळे कोणताही गंभीर अपघात घडू नये, यासाठी 'ड्रायव्हर-चेकर स्क्वाड'ची निर्मिती केली जाणार आहे. या स्क्वाडद्वारे पीएमपीच्या बसचालकांची, बस चालविण्याच्या पद्धतीची नियमित तपासणी केली जाणार असून, त्याचा अहवाल डेपो मॅनेजरना दिला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात कात्रज बसस्थानकात पीएमपी चालकाच्या चुकीमुळे दोन नागरिकांना प्राण गमवावा लागला. त्यांची गंभीर दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, तिकीट तपासणीस पथकाप्रमाणेच चालकांच्या तपासणीसाठी नव्या विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे सूतोवाच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.

या विशेष पथकाद्वारे पीएमपी चालकांच्या कौशल्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात, चालक थांब्यांवर बस उभी करतात का, अधिक वेगाने बस चालवितात का, ब्रेक-क्लच आणि गिअर यांचा योग्य वापर करतात का, अशा विविध बाबींची निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत. त्याबाबतचा, सविस्तर अहवाल डेपो मॅनेजरला सादर केला जाणार आहे, असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.

लवकरच 'बस बे'

पीएमपीच्या महत्त्वाच्या बसथांब्यांवर प्रवाशांना सुरक्षितपणे बसमध्ये चढता-उतरता यावे, यासाठी २० प्रमुख ठिकाणी 'बस बे' तयार केला जाणार असल्याचे संकेत डॉ. परदेशी यांनी दिले. यापूर्वी, केवळ बसथांब्यांवर पट्टे मारून 'बस बे' तयार केले होते; पण गर्दीच्या ठिकाणी आता बॅरिकेटिंग केले जाणार असून, बसव्यतिरिक्त इतर वाहने त्यात येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या सहकार्याने १५ दिवसांत त्याबाबतची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसर्गजन्य आजारासाठी कायदा

$
0
0

मुस्तफा आतार, पुणे

स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, गॅस्ट्रोपासून इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांवर भविष्यात नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे आणि आरोग्य विभागाचा इतर खात्यांशी समन्वय साधला जावा, यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

'राज्यात स्वाइन फ्लू, इबोला, सिझनल फ्लू यासारख्या संसर्गजन्य आजारांबरोबरच डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविणे हे भविष्यातील आव्हान आहे. हे आव्हान ओळखूनच संसर्गजन्य आजारांवर कायमस्वरुपी नियंत्रणासाठी आरोग्य, महापालिका, सार्वजनिक प्रशासन अशा सर्व विभागांमध्ये समन्वय गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले आहेत,' अशी माहिती आरोग्य खात्याचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी 'मटा'ला दिली.

संसर्गजन्य आजार असो की कोणत्याही एका आजाराची साथ नियंत्रण करणे ही एकट्या आरोग्य खात्याची जबाबदारी नाही. संसर्गजन्य तसेच साथीचे आजार नियंत्रणासाठी आरोग्य खात्याबरोबर अन्य खात्याचा संबंध येतो. परंतु त्या विभागांकडून मदत मिळेल याची खात्री नसते. आजार नियंत्रणामध्ये खासगी हॉस्पिटल, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, नगरविकास, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांच्या मदतीची आवश्यकता असते. विभागांशी समन्वय साधला गेला तरी त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही अथवा जबाबदारी स्वीकारली जात नाही. परिणामी, साथरोग नियंत्रणात अनेक अडचणी येतात. त्यामुळे संससर्गजन्य आजार प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला तर विभागांशी समन्वय साधून आजार नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याला येत्या महिन्याभरात निश्चित स्वरूप प्राप्त होईल. कायद्याच्या आधारे तांत्रिक मार्गदर्शनासाठी देखील स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची देखील आम्ही मदत घेणार आहोत.

- डॉ. सतीश पवार, आरोग्य संचालक, आरोग्य खाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसईझेड’चा बार फुसका

$
0
0

जितेंद्र अष्टेकर, पुणे

मोठा गाजावाजा करीत लागू करण्यात आलेले विशेष आर्थिक क्षेत्राचे (एसईझेड) धोरण गुंतवणूक व रोजगारनिर्मिती या आघाड्यांवर नापास झाल्याचे चित्र आहे. 'एसईझेड'मार्फत राज्यात येऊ घातलेल्या गुंतवणुकीपैकी फक्त १३ टक्के गुंतवणूक प्रत्यक्षात झाली आहे. तर, रोजगारनिर्मितीच्या अंदाजांपैकी केवळ सव्वादोन टक्के रोजगारच प्रत्यक्षात मिळाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणीच्या अहवालाने याची कबुली दिली आहे.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 'एसईझेड'ची संकल्पना मांडली गेली. त्यानंतर संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक 'एसइझेड'चे प्रस्ताव आले होते. त्यामधून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि काही लाख रोजगारांची निर्मिती होईल, असेही सरकारी अंदाजातून मांडण्यात आले होते. मात्र, गेल्या डिसेंबरपर्यंतची परिस्थिती पाहता गुंतवणूक आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर 'एसईझेड' हे मृगजळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याबाबतचा तपशील देण्यात आला असून, ही आकडेवारी सरकारची अधिकृत आकडेवारी ठरली आहे.

राज्यात १२४ 'एसईझेड' मंजूर करण्यात आले होते. त्यांपैकी ६६ 'एसईझेड'ची अधिसूचना काढण्यात आली आणि त्यांपैकी फक्त २४ 'एसईझेड' सुरू झाले आहेत. या 'एसईझेड'मार्फत राज्यात सुमारे एक लाख ४३ हजार ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत त्यापैकी १८,७८६ कोटी, म्हणजे केवळ १३ टक्के गुंतवणूक झाली असून, उरलेली सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक कागदावरच आहे.

'एसइझेड' सुरू झाल्यानंतर राज्यात ५५ लाख ८५ हजार रोजगार निर्माण होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत यांपैकी फक्त एक लाख ३१ हजार, म्हणजे फक्त २.३४ टक्के इतक्याच रोजगारांची निर्मिती झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

'एसईझेड'चे धोरण लागू झाले, तरी ते कार्यन्वित होण्यात सरकार पातळीवरूनही अनेक अडचणी आल्या. विशेषतः काही करसवलती जाहीर झाल्याप्रमाणे अंमलात येऊ शकल्या नाहीत, तसेच जागा मिळवून प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यातही अडचणी आल्या. अशा अनेक कारणांनी 'एसइझेड'मध्ये उत्पादन सुरू करणे आकर्षक राहिले नाही. त्यामुळे त्यांचा उद्देश सफल होऊ शकला नाही.

- अनंत सरदेशमुख, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

मुळात 'एसईझेड' म्हणजे उद्योग दलालांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी केलेली मोहीम होती; औद्योगिक प्रगतीशी त्याचा काही संबंध नव्हता, हे या माहितीतून सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे भू-संपादन धोरणही याच उद्योग दलालांचा फायदा करून देण्याच्या मानसिकतेतून आले आहे. 'एसईझेड'ला मंजुरी देणाऱ्यांची चौकशी करावी आणि जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.

- अजित अभ्यंकर, पुणे जिल्हाध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

$
0
0

पिंपरीः भांडणे करणाऱ्यास पकडून आणल्यानंतर पोलिसांच्या अंगावर धावून जात केबिनची काच फोडल्याप्रकरणी युवकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (२३ मार्च) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.दिनेश विकास गोसावी (वय ३६, रा. तालेरानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्यातील हवालदार बी. बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. रात्री बाराच्या सुमारास चिंचवड श्रीधरनगर या ठिकाणी भांडणे सुरू असल्याने तेथे जाऊन गोसावीला पकडून चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडाऊनमधून साहित्य चोरी करणाऱ्याला कोठडी

$
0
0

पुणेः एका कंपनीच्या गोडाऊनमधून साहित्य चोरल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी कंपनीतील पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला कोर्टाने २६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या कर्मचाऱ्यांनी गोडाऊनमधून घड्याळे, मोबाइल, फोन, मेमरी कार्ड असे मिळून एकूण तीन लाख ६३,३९७ रुपयांचा माल चोरला आहे. याप्रकरणी किशोर रघुनाथ जाधव (वय २६, रा. आंबेगाव बुद्रूक, मूळ सातारा) याला अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय करजंकर (३४, रा. पर्वती पायथा), रोहित ​चिन्नी (२५, नाना पेठ), किरण घाटे (४०, रा. बिबवेवाडी), विजय मुल्या (३२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सुबोध प्रभाकर साळवी (३८, रा. सूर्यनगर, विटावा, ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच कंपनीत नोकरीला आहेत. डब्ल्यू. एस. रिटेल या ऑनलाइन शॉपिंग कंपनीत ते कामाला आहेत. आरोपींनी संगनमत करून कंपनीच्या गोडाऊनमधील तीन लाख ६३,३९७ रुपयांचा माल चोरून केला. या प्रकरणी अटक आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIT रॅगिंग : सरकारने कारवाई करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगच्या प्रकाराची चौकशी करून, संचालक आणि दोषी विद्यार्थ्यांवर सरकारनेच कारवाई करण्याचे आदेश विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिले. या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात कसूर करणाऱ्या कोथरूड पोलिस स्टेशनच्या भूमिकेबाबतही विधान परिषदेत आक्षेप घेण्यात आला.

एमआयटीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्याचा प्रकार नोव्हेंबरमध्ये उघड झाला होता. त्या विरोधात सातत्याने तक्रारी केल्यानंतरही कॉलेज प्रशासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने त्या विरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती. 'मटा'नेही त्या विरोधात आवाज उठविला होता. रॅगिंगचा हा प्रकार संसदेतही गाजल्याने, विद्यापीठ आणि राज्य प्रशासनावरही दरम्यानच्या काळात ताशेरे ओढण्यात आले होते. अखेर विधान परिषद सदस्य आमदार अनंत गाडगीळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरून झालेल्या चर्चेअंती सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारलाच कारवाई करण्याचे आदेश दिले.

'या प्रकरणी संस्थेने घेतलेली भूमिका धक्कादायक आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांची कोणतीही चौकशी न करता, आरोपी विद्यार्थ्यांना संस्थेने पुन्हा नियमित विद्यार्थी म्हणून सामावून घेतले. संस्थेच्या या दादागिरीविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी आज दाद मागितली. त्यामुळेच सभापतींनी संस्थेचे संचालक आणि रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले,' अशी माहिती गाडगीळ यांनी दिली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी अद्यापही चार्जशीट दाखल केलेले नाही. त्यामुळे पोलिसांची या प्रकरणातील भूमिकाही संशयास्पद असल्याने त्या विरोधात आवाज उठविल्याचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. कॉलेजांमध्ये रॅगिंग प्रतिबंधक समित्या नसल्याने आणि त्या विषयीचे समुपदेशनही न मिळाल्याने, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार थांबविण्यासाठी अशा समित्यांची स्थापना तातडीने करण्याची मागणीही या वेळी केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बैलगाडा शर्यतीसाठी कायद्यात दुरुस्ती करू

$
0
0

पिंपरीः आगामी उन्हाळी अधिवेशनामध्ये कायद्यात दुरुस्ती करून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पुण्यामध्ये बैलगाडा मालकांशी चर्चा करताना दिले.

भारतीय किसान संघ व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या बैलगाडा मालकांनी सोमवारी पुण्यातील वन भवन येथे केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे माऊली तुपे, अनंत चंद्रचूड यांच्यासह मावळ, पारनेर, जुन्नर, खेड, आंबेगाव, हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक उपस्थित होते. या चर्चत बैलगाडा मालकांनी जावडेकर यांना बैलगाडा शर्यतीची पार्श्वभूमी समाजावून सांगितली. मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम २२(२) नुसार अधिसुचना काढून बैल या पाळीव प्राण्याचा समावेश राजपत्रामध्ये केला आहे. याच कायद्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेच्या शाळांना सार्वजनिक दराने वीज द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ज्या शिक्षण संस्थांना व्यावसायिक दराने वीज बिले आकारली जात असतील, त्यांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात त्याविषयीची माहिती द्यावी. तातडीने त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल,' असे आश्वासन महावितरणचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी दिले. जिल्हा परिषेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी परिषदेच्या शाळांना सार्वजनिक दर आकारण्याची मागणी केली होती.

जिल्हा परिषदेच्या शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे बील भरणे कठीण होत अाहे. व्यावसायिक दराने वीजपुरवठा केल्याने शाळांची वीजबीले भरणे कठीण होत आहे. त्यामुळे काही शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली. शिक्षण संस्था या सार्वजनिक सेवा प्रकारात मोडतात. त्यांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिले आकारण्याचा नियम आहे. या पार्श्वभूमीवर वांजळे यांनी वाडेकर यांना पत्र पाठवून परिषदेच्या शाळांना सार्वजिनक दराने वीज देण्याची मागणी केली. त्यावर वाडेकर यांनी हे आश्वासन दिले.

सर्व शिक्षण संस्था या सार्वजनिक सेवा प्रकारामध्ये येत असल्याकारणाने त्यांना सार्वजनिक सेवा दरानुसारच आॅगस्ट २०१२ पासून आकारणी करण्यात येत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना आॅगस्ट २०१२ नंतरही व्यावसायिक दराने बील आकारले असेल, त्यांची जादा रक्कम पुढील बिलांमध्ये समायोजित केली जाईल, असेही वाडेकर यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिका प्रशासनाचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महापौर शकुंतला धराडे यांना सन्मानाची वागणूक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांची अंमलबजावणी, या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

'प्रशासन आपल्याला जुमानत नाहीत,' असा आरोप करीत महापौर शकुंतला धराडे यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यपद्धतीविषयी खेद व्यक्त केला होता. त्याचा संदर्भ घेत धनंजय आल्हाट आणि रमा ओव्हाळ यांनी लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. महापौर एका पक्षाच्या नाहीत. त्या प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना दुजाभावाची वागणूक मिळू नये, अशीच सदस्यांची भावना आहे. त्याचा आदर प्रशासनानेही करायला हवा. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन योग्य कामे करायलाच हवीत, असेही आल्हाट यांनी सांगितले. त्याची दखल घेण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांनी दिले.

नदीपात्रांमध्ये वाढणारी जलपर्णी आणि डासांचा प्रादूर्भाव याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीतील जलपर्णी तातडीने काढून नागरिकांना दिलासा द्यावा. येत्या १५ दिवसांत जलपर्णी काढण्याचे आणि डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आयुक्त जाधव यांनी आश्वासन दिले. साबरमती नदीच्या धर्तीवर पवना नदीची यांत्रिकी बोटीच्या साह्याने दैनंदिन स्वच्छता करण्याची सूचना बाळासाहेब तरस आणि सविता साळुंके यांनी केली. त्यावर एक वर्षाकरिता पवना नदीची प्रायोगिक तत्त्वावर स्वच्छता करण्याबाबतच्या प्रस्तावाचा विचार करण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष शितोळे यांनी दिले.

शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याच्या चर्चेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शहरातील भटकी कुत्री पकडून ती जंगलात सोडण्याच्या पर्यायाचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

जलपर्णीवरून पालिकेचे वातावरण तापले

पिंपरीः जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात डास-चिलटांची उत्पत्ती वाढल्यामुळे जलपर्णी काढा, असे खडे बोल पिंपरी महापौर शकुंतला धराडे यांनी आयुक्त राजीव जाधव यांना सुनावताच या कामाला वेग आला आहे. जलपर्णी साठल्याने नदीकाठच्या परिसरात डास आणि चिलटांची उत्पत्ती वाढली आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिक त्रस्त झाले असून, खुद्द महापौर शकुंतला धराडे यांनी सोमवारी धारेवर धरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'खेड येथील एसईझेडबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून अधिवेशनानंतर बैठक घेऊ,' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसेच, या परिसरातील सुमारे नऊ हजार एकर जमिनींच्या सातबारावरील एसईझेडचे शिक्केही काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासंदर्भातील आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

खेड येथील एसईझेड रद्द झाल्याने त्यासाठी संपादित जमिनी परत कराव्यात, प्रकल्पग्रस्तांना नोकरी व पंधरा टक्के विकसित जमीन देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि नियोजित विमानतळासाठी सरकारने थेट शेतकऱ्यांकडून जमिनी घ्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीच्या वतीने खेडपासून पुण्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व अन्य नेते यामध्ये सहभागी झाले होते. ही पदयात्रा मंगळवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. इन्स्पेक्शन बंगल्याच्या चौकात या वेळी पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरव राव यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच या विषयावर शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती. विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त झाल्यावर या प्रश्नात लक्ष घालून सर्व संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने त्यांचा आदर करून आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले. मात्र, या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेला चिमटा

या आंदोलनात शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग नव्हता. त्याबाबत विचारले असता,'आपण शिवसेनेच्या नेत्यांशी, तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, नंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. यावरूनच त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य समजले नाही, असे म्हणावे लागेल,' असा चिमटा शेट्टी यांनी काढला.

शिक्के काढणार

एसईझेडच्या तिसऱ्या टप्प्यातील पाच हजार एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवरील एसईझेडचे शिक्के काढण्याचा प्रस्ताव नोव्हेंबरमध्येच पाठविण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील चार हजार एकर जागेवरील शिक्के काढण्याचा प्रस्तावही आठवड्यात पाठविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राव यांनी या वेळी दिले. दरम्यान, खेड येथील नियोजित विमानतळासाठी एसईझेडसाठी संपादित केलेली जागा महागड्या दराने देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्याला आपला विरोध आहे. जागा संपादित करून पाच वर्षे प्रकल्प उभा न राहिल्याने नियमानुसार या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात आणि कोणत्याही मध्यस्थाविना सरकारने त्या थेट शेतकऱ्यांकडून घ्याव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण डाकसेवकांचे बेमुदत आंदोलन

$
0
0

भोरः ग्रामीण भागात काम करणाऱ्या डाकसेवकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया पोस्टल एक्स्ट्रा डिपार्टमेंटल एम्प्लॉइज युनियनने गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हा संप मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या संपात देशभरातील पावणेतीन लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्ट अथवा सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण डाक कर्मचारी समितीची स्थापना करावी, कर्मचाऱ्यांचे विभागीकरण थांबवावे, वेतनवाढ व्हावी, कायमस्वरूपी सुविधा मिळाव्यात, खासगीकरण थांबवावे, वेठबिगारी पद्धत बंद करावी यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर राखावा आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. २०१२मध्ये १९ दिवसांचा संपाची सरकारने कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे आता मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पशू प्रदर्शना’ची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने सासवड येथे भरविलेल्या पशू प्रदर्शनादरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत काही सदस्यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी परिषदेसमोर या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. यामध्ये परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आशा बुचके, शिवसेनेचे अन्य सदस्य माऊली खंडागळे, कुलदीप कोंडे, दशरथ काळभोर, बाजीराव सायकर, गंगाराम जगदाळे, काँग्रेसच्या ऋतुजा पाटील, श्रीमंत ढोले आदी या वेळी उपस्थित होते. अध्यक्ष प्रदीप कंद व बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कंद यांनी या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केल्यावर त्यांनी उपोषण सोडले. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कंद यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून प्रदर्शनासाठी तीन लाख रुपये, पशुसंवर्धन समितीकडून १२ लाख रुपये आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दोन लाख रुपये, असे एकूण १७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. प्रदर्शनात ४५० स्टॉल होते. त्यांच्याकडून भाड्यापोटी प्रत्येकी १५ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्याद्वारे ६७ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण ८४ लाख ५० हजार रुपये उपलब्ध झाले होते. या पैशांचा विनिमय कोठे केला, हे कागदपत्रांनिशी सादर करावे, अशी विरोधकांची मागणी आहे.

लाभार्थ्यांची होणार चौकशी

शौचालये असलेल्या नागरिकांनाच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ घेता येतो. जिल्ह्यात इंदापुरात वैयक्तिक शौचालयांची संख्या संपूर्ण तालुक्यात सर्वाधिक कमी आहे. अशी परिस्थिती असतानाही तेथील नागरिकांना योजनांचा लाभ कसा घेतला? नागरिकांनी खोटे पुरावे सादर करून त्यांना लाभ देण्यात आला आहे का, या

प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी काँग्रेसच्या श्रीमंत ढोले यांनी सर्वसाधारण सभेत केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी चौकशीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सत्यजीत बढे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्या समितीमध्ये वित्त व लेखा अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोराला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी चोरल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाला २६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जावेद उर्फ जावा मन्सूर शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. येरवडा येथील गांधीनगर येथे चार मार्च रोजी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी भारती पोपट शिंदे (वय ४५, रा. वाकडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या आई आजारी आहेत. त्यामुळे आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी भारती या घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. त्यावेळी आरोपीने कुलूप उचकटून सोनसाखळी पळवली. आरोपीने सोनसाखळी सोलापूर येथे विकल्याची कबुली दिली आहे. त्या दुकानात जाऊन माहिती घ्यायची आहे. माल हस्तगत करायचा आहे. तसेच तेथील सराफाचा आणि आरोपीचा संबंध काय याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील सुचित्रा नरोटे यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्ड्यांमुळे महागणार वीज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वरिष्ठ नेते-अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही महावितरणसाठी रस्ते खोदाईशुल्काचा वाढीव दर कायम ठेवण्याचा महापालिकेतील लोक​प्रतिनिधींचा अट्टहास पुणेकरांच्या मूळावर येणार आहे. या वाढीव दरामुळे महावितरणच्या योजनांचे अर्थकारण कोलमडून पडणार आहे. त्यामुळे पुण्यातील पायाभूत सुविधांच्या योजना रद्द होण्याची किंवा पुणेकरांसाठी वीज महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रस्तेखोदाईसाठी महापालिकेने प्रति रनिंग मीटर पाच हजार ९५० रुपये इतका अवाढव्य दर लागू केला आहे. हा दर सरकारची कंपनी असलेल्या महावितरणलाही लागू झाला आहे. यापूर्वी राज्याचे माजी ऊर्जामंत्री अजित पवार, तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्यासारख्या वरिष्ठांनीही महापालिकेस हा दर कमी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माननीयांनी तो मान्य केला नाही.

दरम्यान, महावितरणच्यावतीने पुणे शहरात पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, ३५१ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा नवी उपकेंद्रे, १५ नवी स्वीचिंग स्टेशन्स, तसेच उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मर्सची क्षमतावाढ, चारशे नवे ट्रान्सफॉर्मर्स या कामांचा समावेश आहे.

अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च

दरम्यान, या सर्व कामांसाठी महावितरणला सुमारे एक हजार किलोमीटर अंतराच्या भूमिगत वीजवाहिन्या टाकाव्या लागणार असून, त्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत. मात्र, महापालिकेने लागू केलेले अवाढव्य दर विचारात घेतले, तर खोदाईशुल्काची रक्कम ३८३ कोटी रुपयांच्या घरात जाते. हा खर्च योजनेच्या मूळ प्रस्तावित रकमेपेक्षाही (३५१ कोटी रुपये) अधिक आहे.

पिंपरी-चिंचवड पुढे; पुणे पडले मागे

शेजारील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र, महावितरणने विनंती केल्यानंतर तेथे खोदाईसाठी तेवीसशे रुपये दर लागू करण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचा कार्यक्रम सुरू होत आहे. पण पुण्यातील वाढीव दरांमध्ये एकही काम सुरू होऊ शकलेले नाही.

नगरविकास खात्याकडे धाव

या संदर्भात महापालिका आयुक्तांनी विशेषाधिकार वापरून सर्वसाधारण सभेचा ठराव रद्द करावा आणि तेवीसशे रुपयांचा दर मान्य करावा, अशी मागणी महावितरणने केली आहे. तसेच शेवटचा पर्याय म्हणून नगरविकास खात्याकडे दाद मागण्यात येणार आहे. वाढीव दर कायम राहिले, तर पायाभूत सुविधांचा कार्यक्रम रद्द करणे किंवा वीज नियामक आयोगाच्या वतीने हा खर्च पुणेकर वीजग्राहकांकडून वसूल करण्याचा पर्याय आहे. त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालयांच्या समस्या सुटणार कधी?

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे
वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचे काम करणाऱ्या राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याविषयी सातत्याने आवाज उठवूनही त्यांचा विचार झालेला नाही. आता संस्कृतीचा डंका पिटणारे नवे सरकार तरी या मागण्या पूर्ण करून वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने नुकतेच वार्षिक अधिवेशन झाले. या अधिवेशनात ग्रंथालयांच्या अडचणींचाच पाढा वाचण्यात आला. या पार्श्वभूमीवर, ग्रंथालयांच्या समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'गाव तेथे ग्रंथालय' या योजनेचा बोजवाराच उडाल्याचे दिसून येत आहे. पाचशे ते दहा हजार लोकसंख्येसाठी एक, पंचवीस हजारांसाठी दोन, पन्नास हजारांसाठी तीन आणि एक लाख लोकसंख्येसाठी चार ग्रंथालयांना सरकार दरबारी मान्यता आहे. मात्र, आजही अनेक गावांमध्ये शासकीय ग्रंथालय नाही. त्यातच राज्य सरकारकडून गेल्या वर्षी नवीन ग्रंथालयांना मान्यता देणार नसल्याचा अध्यादेश काढण्यात आला असल्याने ग्रंथालयाच्या चळवळीलाच खीळ बसली आहे.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ग्रंथालयाच्या समस्यांबरोबरच बोगस ग्रंथालयांची समस्याही निर्माण झाली होती. त्याची चाचपणी करण्यासाठी पटपडताळणी करून आजारी ग्रंथालयांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ग्रंथालयांच्या समस्या सुटणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झालेले नाही. ग्रंतालयांच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही.

तुटपुंजे अनुदान

राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयांना राज्य सरकार अनुदान देते. मात्र, अलीकडील काळात वाढलेल्या महागाईच्या तुलनेत हे अनुदान तुटपुंजे आहे. या अनुदानात वाढ करावी, नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी, ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अनुदान वेळेत मिळावे आदी मागण्या वेळोवेळी मांडण्यात आल्या. त्यासाठी सातत्याने आवाज उठवूनही सरकार दरबारी त्याची पुरेशी दखल घेण्यात आलेली नाही. ग्रंथालयांच्या समस्यांबाबत सरकारची अनास्थाच असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांची दिंडी घुमानला

$
0
0

पुणे : पुणे जिल्हा बार असोसिएशनचे पंधरा वकील सदस्य पंजाब येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांचा असोसिएशनतर्फे शाही पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी वकील साहित्य दिंडीची घोषणा करण्यात आली. असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार, माजी उपाध्यक्ष अॅड. शिरिष शिंदे, पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स सोसायटीचे माजी चेअरमन अॅड. श्रीकांत अगस्ते, अॅड. संदीप चोरगे, अॅड. दीपक शामदिरे, अॅड. राहुल दिडोंकर आदी वकील साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

सदानंद मोरे म्हणाले, 'वकिलांचा आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. अनेक न्यायमूर्ती, वकिलांनी उत्तम लेखन व साहित्य निर्मिती केली आहे. घुमान येथे वकील दिंडी येत आहे, ही बाब साहित्यिकांना ऊर्जा देणारी आहे.' असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरिश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. हेरंब गानू, अॅड. योगेश पवार, सचिव अॅड. राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएसएनएल’ची सेवा विस्कळित

$
0
0

पुणेः भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही भागांत 'बीएसएनएल'ची सेवा मंगळवारी विस्कळित झाली. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.'बीएसएनएल'ची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना सेवा सतत विस्कळित झाल्याचा अनुभव घ्यावा लागतो. मोबाइलधारकांना नेहमी 'आउट ऑफ रेंज' असणे, क्रॉस कनेक्शन लागणे, आवाज स्पष्ट ऐकू न येणे असे अनुभव येतात. त्यामुळे मोबाइलधारक हैराण होत असतात. मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याने बहुतांश भागात मोबाइल सेवा 'आउट ऑफ रेंज' होती. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. दरम्यान, याबाबत 'बीएसएनएल'चे उपसरव्यवस्थापक आशिष पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा विस्कळित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत अधिक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डी. वाय. पाटील’ संचालकांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

दिघीतील डी. वाय. पाटील कॉलेजबाहेर बेकायदा शुल्क वसुलीविरोधात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी मारहाण झाली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी कॉलेजच्या संचालकांसह दहा ते पंधरा संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. कार्यकर्त्यांना मारहाण करण्यासाठी बाउन्सर्स वापरल्याचा दावा 'अभविप'ने केला आहे. या प्रकरणी प्रदीप गावडे (वय २३, रा. सदाशिव पेठ) या 'अभविप'च्या कार्यकर्त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. विमानतळ पोलिसांनी कॉलेजचे संचालक, सात ते आठ सुरक्षारक्षक, तसेच इतर आठ ते दहा व्यक्तींविरुद्ध दरोडा, मारहाण तसेच धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती विमाननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कुरंदकर यांनी दिली.

स्टेशनरी फीच्या नावाखाली डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपयांवर बेकायदा फी वसूल करत असल्याचा दावा 'अभविप'ने केला आहे. त्या विरोधात कॉलेजशी यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहारानंतर संघटनेने याच मुद्द्यावरून कॉलेजसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी कॉलेजसमोर गेले असताना हा प्रकार घडला. मारहाणीदरम्यान कॉलेजने लावलेल्या भाडोत्री गुंडांनी फावड्याच्या दांड्यांनी मारहाण केल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या मारहाणीमध्ये आनंद पुरोहित, केदार देशपांडे आणि प्रणव गुरव जखमी झाले. या आंदोलनाबाबत संघटनेने दिघी पोलिस स्टेशनची परवानगी घेतल्यानंतरही पोलिसांनी या मारहाणीदरम्यान केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी कार्यकर्ते विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी तेथे धाव घेत, या प्रकाराचा निषेध केला.

'अभविप'च्या विरोधात झालेला हा हल्ल्याचा प्रकार विद्यार्थ्यांवरचाच हल्ला असल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेऊन आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. आरोपींवर कारवाई न झाल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही 'अभिवप'ने मंगळवारी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images