Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कलेचे क्षेत्र कोणत्याही पक्षाचे नाही

0
0

शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कलाकारांना आधाराचा हात देणे हा शिवसेना चित्रपट सेनेचा मुख्य उद्देश आहे. राजकारण करण्यासाठी चित्रपट सेना नाही. कलेचे क्षेत्र कोणत्याही पक्षाचे नाही,' अशी स्पष्ट भूमिका शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष, अभिनेता सुबोध भावे यांनी गुरुवारी मांडली.

शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने पुण्यात स्नेहमेळावा झाला. त्यावेळी भावे बोलत होते. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कीर्ती पाठक, शहर संघटक सचिन तावरे या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना या वेळी शिवबंधन धागा बांधण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिरातील असुविधांबाबत 'मटा'ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा संदर्भही भावे यांनी घेतला. 'सर्वसामान्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ म्हणून चित्रपट सेना काम करणार आहे. आतापर्यंत चित्रपट सेनेने मुंबईत कलावंतांचे मानधन, आरोग्य सुविधा, वाहतूक आदी समस्यांचे निराकरण केले आहे. चित्रपट सेना ही प्लेसमेंट एजन्सी, कास्टिंग एजन्सी नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रासाठी कार्यरत असलेल्या चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद या संस्थांना काही मर्यादा आहे. त्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. कलावंतांना मदत करताना तो चित्रपट सेनेचा सदस्य आहे की नाही, याचा विचार केला जाणार नाही. तसेच मदत करण्यासाठी जात, धर्म, पक्ष पाहिला जाणार नाही, असेही भावे यांनी सांगितले. 'कोणतेही आंदोलन करण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. परस्पर आंदोलन केल्यास त्याची जबाबदारी घेतली जाणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

'चुकीचे काम केल्यास कारवाईचा बडगा'

कलाकारांच्या हक्कांसाठी लढताना इतरांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. कोल्हे यांनी दिला. तसेच चुकीच्या कामासाठी सेनेच्या व्हिजिटिंग कार्डचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शारदाबाई पवार वसतिगृहाचा निधी इतर कामांसाठी

0
0

माजी महापौरांनी केली सदस्यांची कानउघडणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणानिमित्त तसेच नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या मुलींची राहण्याची सोय व्हावी, यासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'शारदाबाई पवार मुलींचे हॉस्टेल'च्या निधीचे वर्गीकरण इतर कामांसाठी करण्याचा प्रयत्न गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या प्रकारामुळे नाराज होत माजी महापौर चंचला कोद्रे यांनी प्रशासनाला धारेवर धरत सभासदांची कडक शब्दात कानउघडणी केली. सभागृहातील सर्वपक्षीय महिला सभासदांनी कोद्रे यांना पाठिंबा दिल्याने वर्गीकरणाचा हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला.

पुणे शहरात शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींना शहरात राहण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध होत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने मुलींचे वसतिगृह बांधण्याची योजना गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आणण्यात आली होती. 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने घोले रोड येथे मुलींचे वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. माजी स्थायी अध्यक्ष विशाल तांबे यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये या हॉस्टेलसाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही केली होती; मात्र हे वसतिगृह नक्की कुठे बांधायचे, याचा निर्णय घेतला जात नव्हता. महापौरपदाची जबाबदारी संभाळताना चंचला कोद्रे यांनी हे वसतिगृह हडपसर येथे व्हावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्याला पक्षातून विरोध झाल्याने हे काम थांबले होते. गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या सदस्यांनी या निधीचे वर्गीकरण करून दुसरीकडे हे पैसे वापरण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. या निर्णयामुळे मुलींचे हॉस्टेल होणार नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आलेला असताना माजी महापौर कोद्रे यांनी याला आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त केली. मुलींचे हॉस्टेल व्हावे, यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. हडपसर येथे जागा उपलब्ध असल्याने त्याचे टेंडरही काढण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. स्थायी समितीच्या सदस्यांनी वर्गीकरण करून हॉस्टेलचा निधी आपल्या प्रभागात वापरण्याचा निर्णय घेतल्याने कोद्रे यांनी सभासदांचीही कानउघडणी केली. सभागृहातील महिला सभासदांच्या भावना लक्षात घेऊन वर्गीकरणाचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला.

शहरात मुलींचे हॉस्टेल व्हावे, यासाठी बजेटमध्ये ही योजना आणण्यात आली होती. हडपसर भागात हॉस्टेलसाठी जागा उपलब्ध असून त्याचे टेंडरही यापूर्वीच झालेले आहे. त्यामुळे या भागात हॉस्टेल बांधण्यासाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. - चंचला कोद्रे (माजी महापौर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक शिक्षणाची ‘यत्ता कंची’?

0
0

'टेट'मध्ये राज्यातील केवळ पाच टक्के उमेदवारच ठरले पात्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टेट) बसलेल्या राज्यातील एकूण उमेदवारांपैकी केवळ एक टक्का उमेदवारच प्राथमिक शिक्षक म्हणून, तर ४.९२ टक्के उमेदवारच माध्यमिक शिक्षक होण्यासाठी पात्र ठरले आहेत. राज्य पातळीवर नुकत्याच घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतरिम निकालाच्या आकडेवारीमधून ही वस्तुस्थिती समोर येत असून, शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १४ डिसेंबर, २०१४ ला घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टेट) अंतरीम निकाल गुरुवारी परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर केला. परिषदेने mahatet.in या वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध करून दिला असून, या वेबसाइटवरील 'Result' या लिंकवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहावयास मिळेल. आपल्या परीक्षा बैठक क्रमांकाच्या आधारे विद्यार्थ्यांना स्वतःचा निकाल जाणून घेण्याची संधी परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. या निकालाविषयी परिषदेनेच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामधून निकालाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या परीक्षेत निकालाची टक्केवारी अत्यल्पच राहिल्याने, शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमांची गुणवत्ता पुन्हा एकदा चर्चेला येणार आहे.

परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शिक्षक होण्यासाठीच्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या एकूण २ लाख ४० हजार २४ उमेदवारांपैकी दोन हजार ५४९ तर इंग्रजी माध्यमाच्या चार हजार ३५ उमेदवारांपैकी १३ उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र ठरले आहेत. उर्दू माध्यमाच्या एकूण सोळा हजार ५७० उमेदवारांपैकी एकही उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. मराठी माध्यमाच्या उमेदवारांची उत्तीर्णतेची टक्केवारी १.१३ टक्के, तर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांची ०.३५ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. उर्दू माध्यमातील उमेदवारांची उत्तीर्णतेची टक्केवारी शून्य टक्केच आहे. माध्यमिक शिक्षक होण्यासाठीच्या परीक्षेची एकूण टक्केवारी ४.९२ टक्के इतकीच नोंदविली गेल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.

माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षा

माध्यम ...... एकूण परीक्षार्थी ...... उपस्थित परीक्षार्थी ...... पात्र विद्यार्थी ...... पात्रतेची टक्केवारी मराठी ...... एक लाख ४३ हजार २४१ ...... एक लाख ३२ हजार ७३६ ...... ६ हजार ९७३ ...... ५.२५ इंग्रजी ...... पाच हजार १३३ ...... चार हजार ५३८ ...... ४८ ...... १.०६ उर्दू ...... पाच हजार ८२७ ...... पाच हगजार ५८४ ...... १० ...... ०.१८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानशेतचे जंगल मानवी विकासाचे ‘लक्ष्य’

0
0

ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या पाहणीत निष्कर्ष, तातडीने पुनरुज्जीवन करण्याची निकड

चैत्राली चांदोरकर, पुणे

पानशेत धरण परिसरात भूछत्र्यांप्रमाणे 'उगविणारी' फार्म हाउस, जळणासाठी होणारी लाकूडतोड आणि देवरायांप्रती घटणारी श्रद्धा यामुळे पानशेतचे वनक्षेत्र धोक्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेला हा ऱ्हास त्वरित थांबविला नाही, तर हे जंगल नष्ट होईल.

ग्लोबल फॉरेस्ट वॉच या आंतरराष्ट्रीय उपक्रमासाठी इकॉलॉजिकल सोसायटीने पानशेत धरण परिसर आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांची नुकतीच पाहणी केली. या दोन्ही वनक्षेत्रातील वृक्षाच्छादन, परिसंस्था आणि वन्यजीवनाचा सविस्तर अभ्यास या पाहणीत करण्यात आला. भीमाशंकर अभयारण्य 'राखीव जंगल' असल्याने त्याची हानी तुलनेने कमी झाली आहे. पानशेत धरण परिसर झपाट्याने मानवी विकासाच्या भक्ष्यस्थानी पडते आहे, असा निष्कर्ष या पाहणीत काढण्यात आला आहे.

पानशेत परिसरात संस्थेने १२० स्क्वेअर किलोमीटर परिसरातील कॅचमेंटमध्ये सहा महिने पाहणी केली. या भागातील जमिनीचा गेल्या काही वर्षात कोणकोणत्या कामासाठी वापर होत गेला, याची माहिती घेतली. संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश गोळे यांनी याच क्षेत्राचे १९८६मध्ये पाहणी केली होती. त्याचा आधार घेऊन वनक्षेत्राच्या सद्यस्थितीचा तौलनिक अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती इकॉलॉजिक सोसायटीच्या संस्थापक स्वाती गोळे यांनी 'मटा'ला दिली.

'गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला फार्म हाउस बांधण्याचा धडाका तसाच राहिल्यास त्याचे दुष्परिणाम तेथील परिसंस्थेवर होणार आहेत. त्यामुळे तातडीने नष्ट झालेल्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,' असे संस्थेच्या विश्वस्त मानसी करंदीकर यांनी स्पष्ट केले.

'ग्लोबल फॉरेस्ट वॉच'च्या निमित्ताने या भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सविस्तर 'डॉक्युमेंटेशन' झाले आहे. या भागाचे नकाशेही आम्ही तयार केले आहेत. वनक्षेत्राचे शास्त्रीय दृष्टीकोनातून पुनरुज्जीवन कसे करता येईल, याचेही नियोजन आम्ही केले आहे. या भागातील स्थानिकांना आजही गॅस नसल्यामुळे इंधनासाठी सरपणावर अवलंबून राहावे लागते आहे. सरपणाची समस्या दूर केल्यास या भागातील वृक्षतोड कमी करण्यात नक्कीच यश येईल,' असा विश्वास करंदीकर यांनी व्यक्त केला.

वॉच... 'ग्लोबल फॉरेस्ट वॉच'चा

गुगल मॅपच्या धर्तीवर वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या सहभागातून 'ग्लोबल फॉरेस्ट वॉच' ही वेबसाइट गेल्या वर्षी सुरू झाली. जगभरातील वृक्षाच्छादनाचा सखोल अभ्यास आणि 'वॉच' ठेवण्याचे काम ही संस्था करणार आहे. सध्या या वेबसाइटवर सॅटलाइटद्वारे घेतलेले नकाशे प्रसिद्ध केलेले असले तरी जगभगातील पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने हे नकाशे अपडेट करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी त्यांनी संस्थांना आर्थिक सहकार्य करून पाहणी करण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रुटी आढळलेले प्रश्न वगळणार

0
0

'एमबीए-सीईटी'च्या मूल्यांकनाबाबत 'डीटीई'चा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेल्या शनिवारी आणि रविवारी एकूण चार सत्रांत झालेल्या ऑनलाइन 'एमबीए-सीईटी'मध्ये तांत्रिक आणि इतर काही त्रुटी आढळलेले प्रश्न मूल्यांकनासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत,' असे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) स्पष्ट केले आहे.

यंदाची एमबीए-सीईटी ऑनलाइन पद्धतीने घेतली गेली. गेल्या १४ आणि १५ मार्चला एकूण चार सत्रांत ती पार पडली. या चारही सत्रांसाठी चार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या. परीक्षेतील प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून तांत्रिक आणि इतर काही तक्रारी 'डीटीई'कडे करण्यात आल्या होत्या.

'या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी 'डीटीई'ने तांत्रिक आणि शैक्षणिक तज्ज्ञांची समिती नेमली. समितीच्या निरीक्षणामध्ये काही प्रश्न चुकीचे असल्याचे आणि विद्यार्थ्यांच्या त्याबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे आढळले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्रुटी असलेले प्रश्न मूल्यांकनासाठी पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे 'डीटीई'ने या संदर्भात वेबसाइटवर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

'मूल्यांकनासाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या सर्वांसाठी विचारात घेऊन 'इक्वी-पर्सेंटाइल' पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येईल. या निर्णयामुळे कोणत्याही सत्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे,' असे 'डीटीई'ने नमूद केले आहे.

सत्रनिहाय त्रुटी आढळलेल्या प्रश्नांची संख्या

तारीख - सत्र - एकूण प्रश्न - मूल्यांकनासाठी वगळण्यात आलेले प्रश्न - ग्राह्य धरण्यात आलेले प्रश्न १४ मार्च - सत्र १ (स. १० ते दु. १२.३०) - २०० - १९ - १८१ १४ मार्च - सत्र २ (दु. २ ते ४.३०) - २०० - १८ - १८२ १५ मार्च- सत्र १ (स. १० ते दु. १२.३०) - २०० - ११ - १८९ १५ मार्च - सत्र २ (दु. २ ते ४.३०) - २०० - ११ - १८९

'काही प्रश्नांमध्ये त्रुटी आढळल्या, तर काही प्रश्न तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना नीट पाहताच आले नाहीत. समितीने अशा दोन्ही तक्रारींची दखल घेतली आहे. निकाल जाहीर करताना 'इक्वी-पर्सेंटाइल' पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही. पुढील आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर होईल.' - डॉ. एस. के. महाजन, तंत्रशिक्षण संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

0
0

गतवर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी कमी साठा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पाचा जलसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. या प्रकल्पातील धरणांत गतवर्षीपेक्षा तीन टक्के कमी म्हणजे १३.५३ अब्ज घनफूट (४६.४१ टक्के) पाणी शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची तूर्त शक्यता नाही.

खडकवासला धरण प्रकल्पात आरक्षित असलेले शहराचे पिण्याचे पाणी आणि ग्रामीण भागातील शेतीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून दर वर्षी वाद होतात. धरणातील प्रत्यक्ष पाणीसाठा आणि पाण्याचे वितरण याचा मेळ घालताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागते. या कसरतीनंतर शहराच्या पाण्यावर कपातीचे संकट येते. गतवर्षी धरणांत पुरेसे पाणी नसल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात करावी लागली होती.

शहराच्या पाणीकपातीचा अनुभव गाठीशी असल्याने यंदा पाण्याचे नियोजन करताना शहराला प्राधान्य देण्याचे कालवा समितीच्या बैठकीत ठरले. शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीच्या बैठकीनंतर दिले. मात्र, धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता आणि पावसाचे आगमन लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे शहराला दर वर्षी साधारणतः १४.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची गरज भासते. या पाण्यातही आणखी वाढ देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा करण्याचे कालवा समितीत ठरले असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. खढकवासला प्रकल्पातील टेमधर धरणातील पाणीसाठा संपला आहे. पानशेत धरणात पाच टीएमसी म्हणजे ४७.५७ टक्के पाणी आहे. वरसगाव धरणात ५५.२० टक्के म्हणजे ७ टीएमसी पाणीसाठा आहे. खडकवासला धरणात १.३० टीएमसी (७० टक्के) पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याच काळात खडकवासला प्रकल्पातील धरणांत ४९.२८ टक्के पाणी होते. यंदा या साठ्यापेक्षा साधारणतः तीन टक्के कमी पाणी आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. तसेच ग्रामीण भागाची शेती व पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. सध्या शेतीसाठी खडकवासला कालव्यातून चौदाशे क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. ५ मार्च ते १८ एप्रिल असे ४५ दिवस पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शहराला १५ जुलैपर्यंत एवढा पाणीसाठा धरणांत आरक्षित करून ठेवण्यात आला आहे.

धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी

खडकवासला १.३० ७०.०० पानशेत ५.०७ ४७.५७ वरसगाव ७.०८ ५५.२० टेमघर ०० ००

गतवर्षीचा पाणीसाठा- १४.३७ ४९.२८ यंदाचा पाणीसाठा- १३.५३ ४६.४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त

0
0

दहशतवाद विरोधी सेलची कारवाई; दोघे ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी सेलने महापालिकेजवळील श्री शिवाजी महाराज पुलावर पश्चिम बंगालमधील दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा पश्चिम बंगाल येथील मालदा येथून आणण्यात आल्या आहेत.

फैझुद्दीन अली उर्फ लालू तौफसर अली (वय २२, रा. मलदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अली बरोबर असलेल्या त्याचा एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. पश्चिम बंगाल येथील काही व्यक्ती शिवाजीनगर परिसरात बनावट नोटा वितरित करण्यास येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी सेलचे पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार महापालिका परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले.

फौजदार दत्तात्रय कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघाही संशयितांकडून ५०० रुपये दराच्या ३९८ नोटा जप्त केल्या आहेत. नोटांचे चार बंडल त्यांच्याकडे होते. भारतीय चलनात हुबेहुब दिसणाऱ्या या नोटा आहेत. त्यांनी यापूर्वी पुण्यात बनावट नोटा वितरित केल्या असाव्यात, असा संशय असून त्यादृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. या नोटा त्यांनी कोठून आणल्या, याबाबतही विचारपूस करण्यात येत असल्याचे भामरे यांनी सांगितले.

अली हा मूळचा मालदा येथील असून यापूर्वी दोनदा पुण्यात आलेला आहे. बनावट नोटा त्याच्या एका मित्राने त्याला मालदा येथे दिल्या होत्या. या नोटा वटवल्यानंतर​ त्यांना पैसे मिळणार होते. अलीने पैसे वटवण्यासाठी एका लहान मुलाला बरोबर आणले होते. त्याचा वापर करून पैसे वटवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र, पोलिसांना खबर मिळाल्याने त्यांना वेळीच ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत फौजदार कोल्हे, सहायक फौजदार दत्तात्रय गरूड, उदय मोरे, कर्मचारी निजाम तांबोळी, उमेश आटोळे, सुहास कदम, अमित छडीदार आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीच्या वर्गीकरणाला विरोध

0
0

'स्थायी'च्या निर्णयाला सर्वपक्षीय सदस्यांनी धुडकावले; प्रस्ताव दफ्तरी दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कागदावरच राहणाऱ्या बजेट मधील प्रकल्पांचा निधी केवळ स्वत:च्या प्रभागात वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून घेण्याचा समिती सदस्यांचा डाव सर्वपक्षीय सभासदांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत उधळून लावला. बजेटमधील सात कोटी रुपयांचे वर्गीकरण करून हा निधी स्वत:च्या प्रभागासाठी खर्च करण्याचा घाट समितीच्या सदस्यांनी घातला होता. सदस्यांच्या या वर्गीकरणाला सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध झाला. सभासदांचा वाढता विरोध लक्षात घेऊन हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्यासह तत्कालीन स्थायी समिती सदस्यांनी समित‌ीच्या बैठकीत शहरातील मोनोरेल आणि शारदाबाई पवार मुलींच्या हॉस्टेलसाठी बजेटमध्ये ठेवण्यात आलेले सात कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे समितीच्या प्रत्येक सदस्याच्या प्रभागात वाटून घेतले होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायीमध्ये मान्य करून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. तब्बल महिन्यापूर्वी हे वर्गीकरण कोणताही गाजावाजा न करता मान्य करण्यात आले होता. प्रभागातील कामांसाठी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांच्या निधीची विशेष भेट दिली होती. गुरूवारी हा प्रस्ताव मुख्य सभेत मान्यतेसाठी आल्यानंतर मनसेचे नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह, सर्वपक्षीय सभासदांनी त्याला विरोध केला.

स्थायी समिती सदस्यांनी केवळ आपल्या प्रभागातील कामे करण्यासाठी हे वर्गीकरण का केले, याचा खुलासा करावा, अशी मागणी करत सभासदांनी केली. वर्गीकरणाला सभासदांचा वाढता विरोध लक्षात घेऊन उपसूचना देऊन हा विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. स्थायीचे तत्कालीन अध्यक्ष कर्णे गुरुजी यांचा अध्यक्षपदाचा तर इतर आठ सदस्यांचा समितीचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपल्याने अधिक निधी आपल्या प्रभागात मिळावा, यासाठी हे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र, स्थायी समिती सदस्यांच्या मनमानी कारभाराला सर्वसाधारण सभेत सभासदांनी विरोध करून लगाम लावल्याची चर्चा पालिकेत रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारा @ ३५.८

0
0

उन्हाच्या झळा वाढणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही दिवसांच्या पावसानंतर आता राज्यभर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शहरातही उन्हाचा चटका जाणवत असून, गुरुवारी पारा ३५.८ अंशांवर पोहोचला. पुढील दोन दिवसात शहरातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेले काही दिवस कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. परंतु, आता संपूर्ण राज्यात आकाश निरभ्र आहे. परिणामी, तापमानात वाढ झाली आहे.

गुरुवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूर येथे (३९.७ अंश सेल्सियस) नोंदले गेले. अहमदनगर येथे ३५.८, महाबळेश्वर येथे ३१.५, औरंगाबाद येथे ३७.८ तर नागपूर येथे ३४ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहून शहरातील कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातही हवामान कोरडे राहून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील तापमान

शहर - तापमान (अंश सेल्सियसमध्ये) सोलापूर - ३९. ७ औरंगाबाद ३७. ८ पुणे - ३५. ८ अहमदनगर - ३५.८ नागपूर - ३४ महाबळेश्वर - ३१.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट कार्डाद्वारे पन्नास हजारांची फसवणूक

0
0

गोपनीय माहिती न देण्याचे पोलिसांकडून आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे ऑनलाइन खरेदी करून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक नागरिकांना परराज्यात बसलेल्या आरोपींकडून फोन करून फसवण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपला क्रेडिट, डेबिट कार्डची गोपनीय माहिती देऊ नका,' असे आवाहन पोलिसांच्या सायबर सेलने केले आहेत.

रोहन पिसे (वय ३३ ,रा.सिंहगड रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिसे यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळून त्याद्वारे सुमारे नऊ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

दुसऱ्या घटनेत, भगवान प्रसाद (वय ७१, रा.वडगांव-शेरी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद यांना आरोपींनी फोन करून आपण सरकारी बँकेतून बोलत असल्याचा बहाणा केला. आरोपींनी प्रसाद यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना क्रेडिट कार्डच्या नंबर्समध्ये फेरबदल करायचे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवल्यानंतर त्यांच्या कार्डवरून सुमारे ४० हजार रुपयांचा ऑनलाईन व्यवहार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना फोन करून क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती मिळवून फसवण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. बँकाकडून क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती विचारण्यात येत नाही. त्यामुळे कुठल्याही खातेदाराने कोणालाही आपला पासवर्ड तसेच कार्डचे क्रमांक सांगू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवादावरील उपाय

> फोनवर कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कोणत्याही कारणास्तव देऊ नका. > आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या कम्प्युटरवरून करू नका. > अनोळखी वेबसाइटना भेटी देण्याचे टाळा. > चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा. > कम्प्युटर वापरताना जागरूक राहा. अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्राम लोड करू नका. > स्पायवेअर व व्हायरस यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये चांगला अँटी व्हायरस व अँटी स्पायवेअर प्रोग्रॅम बसवून घ्या. > दर दोन किंवा तीन दिवसांनी कम्प्युटरच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाका. > पासवर्ड असे ठेवा, की जे सहज ओळखायला कठीण असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन बांगलादेशी नागरिकांना शिक्षा

0
0

बनावट नोटा चलनात आणल्याचा गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निगडी येथील एका मेडिकलच्या दुकानामध्ये एक हजार रुपयाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन बांगलादेशी नागरिकांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी महंमद बिलाल शेख (वय २५), अब्दुल कदुस शेख (२२), असादुल नूर हसन शेख (वय २०, सर्व रा. भालेकर वस्ती, मूळ बांगलादेश) या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी साकोरे यांचे विघ्नहर्ता मेडिकल व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये महंमद शेख हा खरेदीसाठी आला होता. त्या वेळी त्याने एक रुपयांच्या बनावट नोटा दिल्यामुळे तो सापडला होता. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्या वेळी तो आणि त्याच्या साथीदाराकडे एक हजार रुपयांच्या बांगलादेशातून आणलेल्या २५० नोटांपैकी ६१ बनावट नोटा सापडल्या.त्यांनी काही नोटा चलनात आणून खरेदी केलेला माल पोलिसांनी जप्त केला होता. एक लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

या केसमध्ये सरकारी वकील एन. डी. पाटील (धायगावे) यांनी १२ साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि दोन पंच यांची साक्ष या केसमध्ये महत्त्वाची ठरली. या प्रकरणी कोर्टाने आरोपींना बनावट नोटा बाळगणे, हेतुपरस्पर फसवणूक करणे, बनावट नोटा खऱ्या असल्याप्रमाणे वापरणे, संगनमत करून गुन्हेगारी कट रचणे या कलमाअंतर्गत शिक्षा सुनावली. या निकालामुळे अशा प्रकारे बनावट नोटा चलनात आणून आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वचक बसेल, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील ए. डी. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणार्थी फौजदारांकडून चिरीमिरीची ‘कामगिरी’

0
0

लाचलुचपत विभागाकडून पुण्या-मुंबईतील १८ जणांवर कारवाई

प्रशांत आहेर, पुणे

'सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय'चे ब्रीद घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची घडी कायम ठेवण्यासाठी पोलिस सेवेत दाखल झालेले काही अधिकारी प्रशिक्षणाच्या काळातच 'चिरीमिरी' घेण्याचे धडेही गिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या तीन वर्षांत १८ प्रशिक्षणार्थी फौजदारांवर लाचप्रकरणी कारवाई केली आहे. सेवेत कायम झालेल्या ८५ फौजदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांपैकी बहुतेकांनी मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये ही 'कामगिरी' केली आहे.

गेल्या पाच वर्षांत पोलिस दलात दर वर्षी सरासरी एक हजारप्रमाणे फौजदारांची भरती झाली आहे. या फौजदारांना प्रबोधिनीत प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष ​फिल्डवर प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. याच दरम्यान लाचखोरीचे धडे गिरविले जात असल्याचे समोर आले आहे. नागपूर आणि पुण्यात अनुक्रमे पाच आणि चार प्रशिक्षणार्थी फौजदारांवर कारवाई झाली आहे. या प्रशिक्षणार्थी फौजदारांचे प्रबोधिनीत प्रशिक्षण झाल्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांच्यावर लाचखोरीचा कारवाई झाली आहे. सरकारने त्यांच्यावर केलेला खर्च वाया जात आहे. पकडले गेले ते आरोपी, या न्यायाने या फौजदारांवर कारवाई झाली असली, तरी इतर फौजदारांवरच्या 'कार्यक्षमते'वरदेखील शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

'टक्केवारीच्या भाषेत हा आकडा कमी असला, तरी पोलिसदलात भरती होणाऱ्या युवक-युवतींची लाचखोरीची मानसिकता धोकादायक ठरते आहे,' अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लाचखोर फौजदारांचा तपशील लवकरच पोलिस दलाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार असून, त्याच्या आधारे प्रशिक्षणार्थींची झाडाझडतीदेखील घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांकडून तक्रार देण्याचे प्रमाण वाढत असल्याने लाचखोरांवरील कारवाई वाढली आहे. प्रशिक्षणार्थी फौजदारांवर लाचप्रकरणी झालेली कारवाई ही धोक्याची घंटा आहे. - डॉ दिगंबर प्रधान, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर

प्रशिक्षणार्थी फौजदार ०२ ०३ ०४ ०२ ०० ०५ कायमस्वरूपी फौजदार १५ ११ १३ १० १७ ०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडीतील मुलांच्या जीवाशी खेळ

0
0

मुले आणि गॅस सिलिंडर एकाच खोलीत; मोशीतील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंगणवडीच्या परिसरात मुलांच्या शिकण्याच्या खोलीतच धोकादायक पद्धतीने ठेवलेल्या शंभर सिलिंडरचा साठा जिल्हा प्रशासनाने गुरुवारी छापा घालून जप्त केला. मोशी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत येथील अंगणवाडी सेविका, जागामालक आणि संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस एजन्सीच्या गोडाउनशिवाय शिवाय अन्य कोणत्याही ठिकाण गॅस सिलिंडरचा साठा करणे बेकायदा आहे. त्यातही शाळा, अंगणवाडीच्या परिसरात तर गॅस सिलिंटरचा साठा करण्यास मनाई आहे. मात्र, मोशी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे तब्बल शंभर सिलिंडर धोकादायक पद्धतीने ठेवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनास आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून पुरवठा विभागाने गॅस एजन्सी आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या तपासणीची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये वाघोली, चाकण, राजगुरुनगर आणि बिबवेवाडी येथे अनाधिकृत गॅस सिलिंडरचा साठा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये विभागातील अधिकारी मोशी येथे तपासणीला गेले असता सरकारी अंगणवाडी केंद्रांतच शंभर गॅस सिलिंटरचा अनधिकृत साठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंगणवातील लहान मुले व गॅस सिलिडंर एकाच खोलीत होते.

अंगणवाडीचे जागामालक बाळासाहेब बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे गॅस सिलिंडर देवाची आंळदी येथील माऊली गॅस एजन्सीचे आहेत. त्यांनीच ते येथे साठविले आहेत,' असे सांगितले. परंतु याबाबत कोणतीही कागदपत्रे त्यांना दाखविता आली नाहीत. त्यामुळे सर्व गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, अनधिकृतपणे गॅस सिलिंडरचा साठा केल्याप्रकरणी बोराटे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

कडक कारवाईचे आदेश

माऊली गॅस एजन्सीकडे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकारात दोषी आढळल्यास एजन्सीचा परवाना रद्द करावा, असा प्रस्ताव संबंधित गॅस कंपनीला पाठविण्यात येणार आहे. याशिवाय अंगणवाडीत गॅस सिलिंडरचा साठा करण्यास परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजदरात आणखी घट

0
0

दरवाढीचा प्रस्ताव मान्य होईपर्यंत दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांच्या पूर्वीच्या थकबाकी वसुलीची मुदत समाप्त होत असल्याने येत्या एप्रिल महिन्यात वीजदरात आणखी घट होणार आहे. परंतु, 'महावितरण'चा वीज दरवाढीचा प्रस्ताव मान्य होईपर्यंतच हा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांना चार हजार ३१५ कोटी रुपये देण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने 'महावितरण'ला दिले होते. ही रक्कम मार्च २०१४ ते मार्च २०१५ या काळात ग्राहकांकडून वसूल करण्यास मान्यता देण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वीच्या महसुली तुटीपोटी 'महावितरण'ला अंतरिम साह्य म्हणून पाच हजार कोटी रुपयांची वसुली करण्यात येत होती. या दोन्ही घटकांमुळे गेल्या वर्षी वीजदरांमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, या दोन्ही प्रकारच्या वसुलीची मुदत मुदत या महिन्यात समाप्त होत असल्याने घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना एप्रिलमध्ये वीजदरांमध्ये दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात वीजदरात बारा टक्के, तर मार्चमध्ये सुमारे १९ टक्के घट होणार आहे. दुसरीकडे 'महावितरण'ने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाकडून राज्यभरात जाहीर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होऊन दरवाढीच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर नवे वीजदर लागू होणार आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये मिळणारा दिलासा किती काळ टिकणार, याबाबत शंका आहेत.

ग्राहकाची वर्गवारी मार्चचा दर एप्रिलचा दर (रु. प्रतियुनिट)

घरगुती शंभर युनिटपर्यंत वीजवापर ३.६५ ३.३६ १०१ ते ३०० युनिट ६.५४ ६.०५ औद्योगिक एक्स्प्रेस फीडर ७.५९ ७.०१ नॉन एक्स्प्रेस फीडर ६.८८ ६.३३ व्यावसायिक ग्राहकांना एप्रिलमध्ये १.४५ रु. ते २.५८ रु. इतका दिलासा मिळणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात स्वस्तात औषधे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डायबेटिस, बीपी, हार्टसारख्या दीर्घ आजाराची महागडी औषधे आता पुण्यात स्वस्तात मिळणार आहेत. 'क्वालिटी मेडिसीन अॅट अॅफॉर्डेबल प्राइस' (क्यूमॅप) या स्वतंत्र कंपनीमार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यात औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. येत्या रविवारी (दि. २२) या उपक्रमास प्रारंभ होणार आहे.

जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजाराची औषध खरेदी करणे हे सामान्यांना परवडत नाही. ही औषधे सातत्याने घ्यावी लागत आहेत. त्यामुळे सामान्यांचे दरमहा पाच ते दहा हजार रुपये खर्च होत आहेत. परिणामी त्यांचे कंबरडे औषधाच्या खर्चामुळे मोडले आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वस्तात औषधे देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

'डायबेटिस, बीपी, हार्टसारख्या दीर्घकालीन उपचार घ्याव्या लागणाऱ्या आजाराची औषधे महागडी आहेत. सामान्यांना परवडणाऱ्या दरात औषधे देण्याचे केंद्र व राज्य सरकार धोरण तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून स्वस्तातील औषधे हा उपक्रम हाती घेतला आहे. 'क्वालिटी मेडिसीन अॅट अॅफॉर्डेबल प्राइस' (क्यूमॅप) या स्वतंत्र कंपनीमार्फत औषधे राज्यात सर्वत्र उपलब्ध केली जाणार आहेत',अशी माहिती 'महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड डिस्ट्रीब्युटर्स अलायन्स लिमिटेड' (एमएससीडीए लि.) कंपनीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

स्वस्तात दरात मिळणारी औषधे ही गुणवत्तेसह चांगल्या दर्जाची आहेत. पहिल्या टप्प्यात वीस विविध प्रकारची औषधे उपलब्ध केली जातील. त्यानंतर इतर जीवनावश्यक औषधे या क्यू मॅप विभागामार्फत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वाइन फ्लू’ चाचणीसाठी ‘रुबी’ला परवानगी

0
0

शहरात दोन खासगी लॅबमध्ये चाचणी सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'चा संसर्ग होत असल्याने राष्ट्रीय विषाणू संस्थेवर (एनआयव्ही) येणारा वाढता ताण पाहता आरोग्य खात्याने पुण्यात रुबी हॉस्पिटलला संसर्गाच्या चाचणी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे शहरात चाचणीच्या सुविधा दोन ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.

'राज्यातील खासगी हॉस्पिटलमधील आणखी प्रयोगशाळांना परवानगी देण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या आधारे हॉस्पिटलमधील प्रयोगशाळांमध्ये तपासणी करून त्यानंतरच परवानगीचा निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार भांडारकर रस्त्यावरील गोळविलकर मेट्रोपोलिस या प्रयोगशाळेस आरोग्य खात्याने नुकतीच परवानगी दिली. त्या परवानगीनंतर रुबी हॉस्पिटलला तीन वर्षासाठी 'स्वाइन फ्लू'ची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे,' अशी माहिती सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कोणत्याही दुसऱ्या हॉस्पिटल अथवा लॅबचा प्रस्ताव आला नाही. त्यामुळे नव्याने आणखी परवानगी देण्यात आली नाही. पिंपरीत बिर्ला हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटलसह आणखी एका हॉस्पिटलचे प्रस्ताव मिळाले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चाचणीच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याचे दिसून आले, असेही त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलमध्ये एका चाचणीसाठी ५ हजार ८०० रुपये शुल्क आकारत आहोत. दुपारी एक वाजेपूर्वी सॅम्पल दिल्यास त्याच दिवशी अहवाल दिला जातो. दुपारनंतर चाचणीचे सॅम्पल दिल्यास दुसऱ्या दिवशी अहवाल देण्यात येईल, अशी माहिती रुबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिक कृती समितीचे ‘रुपी’समोर आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुपी बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांकडून कर्जांची तातडीने वसुली करावी, या मागणीसाठी पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेपुढे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात येत्या मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

समितीचे सचिव मिहीर थत्ते यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी बँकेच्या मुख्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. बँकेची दोन हजार कोटी रुपयांची कर्जे थकीत असून, थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. तातडीने ही वसुली करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. निदर्शकांनी काही काळ येथील रस्ता अडविल्याने वाहतुकीची कोंडी झाली. प्रशासक डॉ. संजयकुमार भोसले यांनी शिष्टमंडळाशी भेट घेऊन चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी स्कॉलरशिप परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी (२२ मार्च) राज्यभरात आयोजित चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ९५ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरातील एकूण नऊ हजार ३०९ परीक्षा केंद्रांवरून सकाळी ११ ते ४ या वेळेत तीन वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर गुणांचे तीन पेपर सोडवावे लागणार आहेत. सकाळी ११ ते १२, १ ते २ आणि ३ ते ४ या वेळेत हे पेपर होणार आहेत. चौथीच्या स्कॉलरशिपसाठी राज्यभरातून एकूण नऊ लाख २७ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी, तर सातवीच्या स्कॉलरशिपसाठी राज्यभरातून एकूण सहा लाख ६७ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे पाच हजार ५१५ आणि तीन हजार ७९४ स्वतंत्र परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, सिंधी, तेलगू आणि कन्नड अशा एकूण आठ माध्यमांमधून ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी परिषदेने ऑनलाइन माध्यमातून प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन परिषदेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाने रिक्षाचालकाला लुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे स्टेशन येथून कोथरूडला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या प्रवाशाने डेक्कन येथे नदीपात्रात रिक्षा चालकाला लुटल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. डेक्कन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपींला त्याच्या मिळालेल्या वर्णनावरून डेक्कन येथे ताब्यात घेतले.

या प्रकरणी मनोज मिश्रा (वय ४८, रा. गंज पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अक्षय रामदास मालपोटे (वय २०, रा. पौड रोड, कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. मिश्रा रिक्षाचालक आहेत. मालपोटे याच्यावर यापूर्वी हत्यार बाळगणे, हाणामारी करण्याचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रमेश मोरे यांनी दिली.

आरोपी मालपोटे पुणे स्टेशन येथून मिश्रा यांच्या रिक्षात कोथरूडला जाण्यासाठी बसला होता. त्याने रिक्षा नदीपात्रातून घेण्यास सांगितले होते. रिक्षा नदीपात्रात आल्यावर त्याने आपल्याकडील कोयत्याचा धाक दाखवून मिश्रा यांना लुटले. त्यांच्याकडील रोख सहाशे रुपये घेऊन त्याने पळ काढला.

मिश्रा यांनी या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. सहायक निरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मिश्रा यांच्याकडून आरोपीबाबत माहिती विचारली. आरोपीचा शोध घेत असताना मालपोटे हा डेक्कन येथील एका रिक्षा स्टँडवर सापडला होता. मालपोटेला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० कोटींवर बँक पाणी सोडणार?

0
0

प्रसाद पानसे, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने 'चालक से मालक' योजनेतील बुडित खात्यांसाठी नफ्यामधून २५ टक्के तरतूद करण्याचा निर्णय गुरुवारी कायम ठेवला असून, त्याद्वारे सुमारे दीडशे कोटी रुपयांहून अधिक रकमेवर पाणी सोडण्याची तयारी बँकेने दाखवली आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील 'बॅलन्सशिट'वर परिणाम होऊ नये, यासाठी संपूर्ण तरतूद करणे टाळले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि रिझर्व्ह बँकेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात टाळाटाळ केली जात आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा ऑडिट कमिटीचीही बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही संचालकांनी 'चालक से मालक' योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याचे मान्य करण्याची मागणी केली. त्याचबरोबर या खात्यातून वसुली होणे शक्य नसल्याने संपूर्ण १०० टक्के रकमेसाठी तरतूद करण्याची मागणी केली; परंतु कर्ज प्रकरण निर्लेखित करण्यासाठी (राइट ऑफ) २५ टक्केच तरतूद कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

बँकांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांसाठी नियमांप्रमाणे 'बुडित खात्या'साठी काही अंशी तरतूद करणे बंधनकारक असते. पूर्णतः बुडित खात्यांसाठी ही तरतूद ७० ते १०० टक्के दरम्यान असते. बँकेने ३१ डिसेंबर २०१४ रोजी 'चालक से मालक' योजनेतील खाती बुडित असल्याचे मान्य केले; परंतु आर्थिक पत वाचविण्यासाठी त्यासाठीची तरतूद केवळ २५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तोच निर्णय गुरुवारच्या बैठकीतही कायम ठेवण्यात आला.

आता लक्ष रिझर्व्ह बँकेकडे

नियमांप्रमाणे येत्या मार्चअखेर बँकेची 'बॅलन्सशिट' तयार होणार आहे. 'चालक से मालक' योजनेतील खाती बुडित आहेत. मात्र, यासाठी १०० टक्के तरतूद केल्यास बँक तोट्यात जाण्याचा धोका आहे. त्याचा विपरित परिणाम बँकेच्या 'बॅलन्सशिट'वर होऊ शकेल. संचालक मंडळाने हा घोटाळा जाहीर करण्याचे टाळले असले, तरीही आता लेखापरीक्षक (ऑडिटर) आणि रिझर्व्ह बँक याबाबत काय भूमिका घेते यावर या प्रकरणाचा तपास, संबंधितांवर कारवाई आणि कर्जाची वसुली यांचे भवितव्य अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images