Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षण मंडळाचे अधिकार कायम राहावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी किंवा कॉपीची प्रकरणे हा सामाजिक कलंक आहे. सध्या परीक्षेच्या आधी शिक्षण मंडळाचे अधिकार कायम राहावेत,' अशी भूमिका असल्याचे स्पष्ट करून शिक्षणमंत्री विनोद तावडे अर्धा एक तास मोबाइलवरून पेपर फुटल्याच्या काही घटना समोर येत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पुढील वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा स्वतंत्र वर्गात (आयसोलेटेड क्लास) घेण्याचा विचार सुरू आहे,' अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

'पूर्वी बोर्डाच्या परीक्षेआधी एक किंवा दोन दिवस पेपर फुटण्याच्या घटना समोर येत. सध्या परीक्षेआधी अर्धा एक तास दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पेपरफुटीच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा पूर्णतः स्वतंत्र ठिकाणी घेण्याबाबत विचार सुरू आहे. या परिसरात कोणालाही मोबाइलचा किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नाही,' असे तावडे म्हणाले. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शाळेशेजारी लग्न किंवा अन्य समारंभांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाचे अधिकार कायम राहावेत, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'प्रत्येक शाळेला किंवा शिक्षकांना गाडी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेत एकही उत्तरपत्रिका गहाळ होणार नाही, हे पाहणे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिप्लोमा अभ्यासक्रम बंद करण्याविषयी तावडे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले होते. डिप्लोमा बंद करण्याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्याबाबत विचारले असता, तावडे म्हणाले,'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. डिप्लोमा अभ्यासक्रमात काही बदल करणे आवश्यक आहे का, याचा आढावा घेण्याबरोबरच डिप्लोमानंतर एमबीएला प्रवेश देता येईल का, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू, असे विधान मी केले होते. डिप्लोमा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व काही फुकट नको...

घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून करण्यात यावे, अशी मागणी साहित्य महामंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याची मागणीही महामंडळाने केली आहे. त्यावर तावडे यांनी आपली भूमिका मांडली. 'राज्य सरकारही साहित्य संमेलनाला मदत करत आहे. मात्र, सर्व काही फुकट हवे, अशी भूमिका साहित्यिकांनी घेऊ नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना नवीन प्रमाणपत्र देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांना दिलेली निकृष्ट दर्जाची प्रमाणपत्रे परत मागविण्याची मागणी विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. ही प्रमाणपत्रे परत घेत, विद्यार्थ्यांना नवी प्रमाणपत्रे देण्याबाबतच्या या मागणीवर परीक्षा मंडळाच्या येत्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिल्यानंतरच या चर्चेवर पडदा पडला.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी छापलेल्या प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्याने विद्यापीठाला ती ऐनवेळी बदलावी लागल्याची बाब 'मटा'ने कार्यक्रमाच्या आधीच उघड केली होती. प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या दर्जाविषयी समाजाच्या सर्वच स्तरांमधून आक्षेप नोंदविण्यात आले होते. सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी त्या विषयी प्रशासनाला धारेवर धरणारा स्थगन प्रस्ताव मांडला. तब्बल दोन तास चाललेल्या या चर्चेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मयूर हिवाळे याच्यासह अशोक सावंत, डॉ. बी. जी. वाघ, डॉ. महेश आबाळे, डॉ. अशोक कांबळे,

शिवाजी साबळे, दादाभाऊ शिनलकर आदींनी प्रस्तावाच्या बाजूने मते मांडली. विद्यार्थ्यांना वितरित केलेली प्रमाणपत्रे परत मागवून नवी आणि चांगल्या दर्जाची प्रमाणपत्रे देण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. या गोंधळाची चौकशी करत कोणतीही समिती न नेमता, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. डॉ. गाडे यांनी या चर्चेला सविस्तर उत्तर देत परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गाडे म्हणाले, 'अगोदरच्या प्रमाणपत्रांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यानंतर विद्यापीठाने आपत्कालीन परिस्थितीत नवी प्रमाणपत्रे छापून घेतली; मात्र प्रमाणपत्रांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. दर्जाबाबतचे आक्षेप विचारात घेत परीक्षा मंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.'

कॉलेज- विद्यापीठ उपकेंद्रांवरही प्रमाणपत्र वितरण व्यवस्था ?

पदवीप्रदान कार्यक्रमामध्ये वाढत्या गर्दीमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठाची उपकेंद्रे आणि कॉलेज पातळीवर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्याची मागणीही सिनेट सदस्यांनी केली. असा निर्णय घेण्यासाठी प्रमाणपत्र वितरणासाठीच्या विद्यापीठाच्या परिनियमांमध्ये बदल करावा लागणार असल्याचे कुलगुरू डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले. परीक्षा मंडळाच्या बैठकीत या विषयीही चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटींचा कर्जघोटाळा वरिष्ठांच्या ‘आशीर्वादा’नेच!

0
0

प्रसाद पानसे, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रमधील ६५८ कोटी रुपयांच्या कर्जघोटाळ्यात अडकलेल्यांची बहुतांश कर्जप्रकरणे कोणतीही खातरजमा न करता वरिष्ठांच्या 'आशीर्वादा'ने मंजूर झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर, या घोटाळ्यातील ट्रकची गहाणखते न करताच ही कर्ज मंजूर करण्यात आल्याने कर्जवसुलीबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. ही वसुली न झाल्यास आर्थिक ताळेबंदावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.

'चालक से मालक' योजनेमध्ये महाराष्ट्र बँकेला ६५८ कोटी रुपयांचा 'चुना' लागला आहे. 'मटा' हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर बँकींग वर्तुळात याची मोठी चर्चा होती. त्यातच एवढी कर्जप्रकरणे करताना पुरेशी दक्षता घेतली गेली नसल्याचेही समोर आहे. तसेच, या प्रकरणांच्या फाइल शाखा पातळीवर तयार न करता थेट 'वरून' आलेल्या रेडिमेड फाइलनाच मंजुरी देण्यात आल्याने या मागचा संशय बळावला आहे.

'चालक से मालक' योजनेसाठी गुजरातहून खास विमानाने कंपनीशी संबंधित व्यक्ती पुण्यात आल्या होत्या. या व्यक्तींच्या स्वागतासाठी बँकेचे काही अधिकारी विमानतळावर गेले होते. त्यानंतर या व्यक्तींची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली. दरम्यानच्या काळात या सर्व कर्ज प्रकरणांना बँकेच्या वरिष्ठांची मान्यता आहे, असे सांगून या कर्ज प्रकरणांच्या 'रेडिमेड फाइल' बँकेच्या शाखांकडे पाठविण्यात आल्या. कोणत्याही चौकशीशिवाय तत्काळ त्या मंजूर करून पाठविण्याचे आदेशही देण्यात आले. थेट वरिष्ठ पातळीवरून निरोप आल्याने बँकेच्या शाखापातळीवरील अधिकाऱ्यांनीही तत्परतेने ही प्रकरणे मंजूर केली. सुरुवातीला ही कर्जखाती बँकेच्या काही शाखांमध्ये विभागलेली होती. परंतु, संबंधित कंपनीच्या सोयीसाठी अक्षरशः एका रात्रीत ही खाती बँकेच्या मॉडेल कॉलनी व डेक्कन जिमखाना शाखेत वर्ग करण्यात आल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली. वरिष्ठांच्या दबावामुळे किंवा आदेशामुळे ट्रक गहाण दाखवून ही कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र, या ट्रकचे गहाणखातेच करण्यात आलेले नसल्याने या ट्रकवर बँकेचा मालकीहक्क लागू झालेला नसल्याचेही समोर आले आहे. अगदी सुरुवातीला या कर्ज खात्यांपैकी काही खात्यांवरील हप्ते नियमितपणे भरले गेले.

वरिष्ठ अधिकारी बळीचा बकरा

महाराष्ट्र बँकेतील या कर्ज घोटाळ्यात राष्ट्रीय पातळीवरील बड्या व्यक्तींचा सहभाग आहे. या प्रकरणाची सर्व सूत्रे या बड्या व्यक्तींनीच हाताळली आहेत. यासाठी बँकेच्या पुण्यातील स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, त्यांच्या पदांचा व अधिकारांचा वापर करण्यात आला. मात्र, हे प्रकरण चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’चे आणखी दोन बळी

0
0

पुणेः 'स्वाइन फ्लू'चा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणखी दोघांचा या संसर्गाने बळी गेला आहे. पुण्यातील मृतांची संख्या ही ५६ वर पोहोचली आहे; तर शहरात लागण झालेल्या पेशंटपैकी २२ जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. राज्यात आणखी तेरा जणांचा मृत्यू झाल्याने त्यांची संख्या २७७ वर गेली आहे. राज्यात ३१ जण व्हेंटिलेटरवर आहेत.

शहरात दिवसभरात २ हजार २२३ जणांची 'स्वाइन फ्लू'ची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६२ संशयितांना 'टॅमी फ्लू' औषधे देण्यात आली. नव्याने १४ जणांना लागण झाली आहे. ५४ जणांच्या घशातील द्रवाचे मुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. लागण झालेल्या ९६ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर आहे. पूर्णपणे बरे झालेल्या १९ जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात २,५७१ जणांना 'स्वाइन फ्लू'च्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात १६९ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील लागण झालेल्या पेशंटची संख्या ३,३०४ एवढी झाली आहे. राज्यात २७७ जणांचा मृत्यू झाला आहे; तर ३१ जण अत्यवस्थ आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिकिनी डान्स’चे समर्थन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बिकिनी डान्स'सारख्या आक्षेपार्ह बाबींवर 'मला विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणवून घ्यायला लाज वाटते,' अशी प्रतिक्रिया नोंदविली असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीमध्ये शनिवारी सिनेट सदस्यांनी मात्र 'बिकिनी डान्स'चे समर्थनच केले. बिकिनी डान्स झाला असल्यास तो कोणा प्राध्यापकाने वा विद्यार्थ्याने केला नाही...सदर कार्यक्रमाला मंत्रालयानेच परवानगी दिली...सेन्सॉर बोर्डाने सिद्ध केले तरच तो डान्स आक्षेपार्ह, अशी भूमिका मांडत सिनेट सदस्यांनी विद्यार्थी प्रतिनिधीलाच धारेवर धरले.

विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीमध्ये विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी मयूर हिवाळे याने स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून बिकिनी डान्सच्या प्रकारावर विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका मोठ्या संस्थेमध्ये झालेला हा आक्षेपार्ह प्रकार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया त्याने नोंदविली. या प्रकाराबाबत विद्यापीठाने उचललेल्या पावलांवरही त्याने सवाल उपस्थित केला. शिक्षण राज्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर विद्यापीठाची यंत्रणा हलली; मात्र तोपर्यंत विद्यापीठाने काहीही कारवाई न केल्याचे त्याने सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

सिनेट सदस्य डॉ. राजकुमार शेटे, डॉ. श्रीधर देव, डॉ. शर्मिला चौधरी यांनी या प्रस्तावावरील चर्चेत हिवाळे याला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. कोणत्या प्राध्यापकाने वा विद्यार्थ्याने हा डान्स केला नसल्याने तो आक्षेपार्ह नसल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले. असे प्रकार आक्षेपार्ह आहेत वा नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार सेन्सॉरकडे असल्याने या प्रकाराची चौकशी सेन्सॉरमार्फत व्हावी, अशी मागणी डॉ. देव यांनी केली. संबंधित संस्था विद्यापीठाशी संलग्नित असली, तरी हा प्रकार झाला ते केंद्र विद्यापीठाशी संलग्नित नसल्याचा दावाही या वेळी करण्यात आला. अखेर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला.

विद्यार्थ्यांचे आंदोलन

सिनेटच्या बैठकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चाच होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सिनेटच्या बैठकीपूर्वीपासूनच विद्यापीठात आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच गैरप्रकारांमधील दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. कुलगुरू डॉ. गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांना निवेदन देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 'आइसा'नेही एम. फिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्कॉलरशिपच्या प्रश्नावर सिनेटच्या सभागृहाबाहेर आंदोलन केले.

विद्यार्थीकेंद्री मुद्दा

गेल्या कित्येक बैठकांमध्ये अत्यल्प असणारा विद्यार्थ्यांचे प्रश्न अखेरच्या का होईना, पण शनिवारच्या सिनेटच्या बैठकीत अधिक चांगल्या पद्धतीने चर्चेला आले. अगदी पहिल्या स्थगनप्रस्तावापासूनच विद्यार्थीकेंद्री मुद्दे चर्चेला आले. विद्यार्थी प्रतिनिधी मयूर हिवाळे यानेही सिनेटच्या चर्चांमध्ये प्रभावीपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात उद्या रिक्षा बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सीएनजीसाठी तासन्तास करावी लागमारी प्रतीक्षा, खासगी कंपनीच्या रेडिओ कॅबमार्फत सुरू असलेली टप्पा वाहतूक, मीटर कॅलिब्रेशनचे काम वैधमापन यंत्रणेकडे देण्याचा निर्णय आणि ई-रिक्षांना मान्यता देण्याच्या विरोधात येत्या सोमवारी (१६ मार्च) 'रिक्षा बंद' करण्याची हाक रिक्षा पंचायतीने दिली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध तसेच सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्याचा निर्णय रिक्षा पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रिक्षाचालकांची राज्य सरकार चोहोबाजूंनी कोंडी करीत आहे. रिक्षाचालकांना काही महिन्यांपूर्वी स्व-खर्चाने इलेक्ट्रिक मीटर बसविण्याचे आदेश देण्यात आले. प्रदूषण टाळण्यासाठी रिक्षांना सीएनजी बसविण्याची सक्ती करण्यात आली. मात्र, पुरेशा पंपांअभावी सीएनजीसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागते. ही सक्ती करून नऊ वर्षे उलटल्यानंतरही सीएनजी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. परिणामी, रिक्षाचालकांना मानसिक त्रास होत आहे.

येत्या सोमवारी सकाळी अकरा वाजता जुनी जिल्हाधिकारी कचेरीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून विधानभवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

- नितीन पवार, पंचायतीचे निमंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हायरिस्क’ना तातडीने ‘टॅमी फ्लू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात 'स्वाइन फ्लू'च्या संसर्गाने दगावलेल्या ६४ टक्के 'हायरिस्क' पेशंटना ताप नसला तरी सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसताच तातडीने 'टॅमी फ्लू'चे उपचार सुरू करा, असे आदेश आरोग्य खात्याने शनिवारी जारी केले.

राज्यातील 'स्वाइन फ्लू'च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यात २४७ जणांचा झालेल्या पेशंटच्या मृत्यूची कारणमिमांसा आरोग्य खात्याने गुरुवारी केली होती. त्या नुसार राज्यात ६४ टक्के पेशंटना 'स्वाइन फ्लू'च्या संसर्गासोबत मधुमेह, रक्तदाब, दमा, किडनी, न्यूमोनिया तसेच अन्य आजार होते. त्यात गर्भवतींचाही समावेश होता. त्यानुसार 'स्वाइन फ्लू'चा केवळ संसर्ग झालेल्या पेशंटसोबत आता इतर आजाराच्या पेशंटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला.

'राज्यात आतापर्यंत २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सुमारे ६४ टक्के पेशंटचा मृत्यू मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, न्यूमोनिया, दम्यासारख्या आजारांमुळे झाला आहे. या आजारांमुळे पेशंटची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यात संसर्ग झाल्याने आणखीनच कमी होते. त्यामुळे या पेशंटसाठी उपचारपद्धती आता बदलण्यात आली आहे. 'हायरिस्क' वर्गातील पेशंटना ताप नसेल आणि सर्दी, खोकला येत असेल; तर अन्य लक्षणांची वाट न पाहता तातडीने 'टॅमी फ्लू'चे उपचार सुरू करावेत', असे आदेश आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी दिले आहेत.

राज्यात पुण्यासह बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद येथे अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, या भागात पेशंट वाढतील या शक्यतेने घरोघरी जाऊन पेशंटचे सर्वेक्षण करावे. तसेच ताप असलेल्या पेशंटचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पॉझिटिव्ह आणि मृत्यू झालेल्या पेशंटच्या ठिकाणांचे मॅपिंग करून त्या भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी सांगितले.

आजार नसलेल्या पेशंटसाठीही वेगळे उपचार

'हायरिस्क' वर्गात न मोडणाऱ्या आणि केवळ संसर्ग होत असलेल्या पेशंटसाठीची उपचाराची पद्धती बदलण्यात आली आहे. सर्दी, खोकला आणि ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप असणाऱ्या पेशंटना 'टॅमी फ्लू' सुरू करण्यात यावेत, असेही आदेश राज्यातील आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, महापालिकांचे आरोग्य प्रमुख, जिल्हा शल्यचिकित्सकांना देखील याची अमंलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लील डान्स : १३ जण अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉटेल ल मेरिडीयनमधील परमीट रुममध्ये परवानगी नसताना अश्लील हावभाव करत डान्स केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या १३ जणांना शनिवारी सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना चार हजार रुपयांचा जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मनोजकुमार प्रेमनारायण गुप्ता (वय ४२, रा. बाणेर पाषाण लिंक रोड), किरण पालसिंग अहुवालिया (४३, रा. सिंध कॉलनी औंध), सुब्रनील एकनाथ कर्माकर ( ३५, रा. मोरवाडी पिंपरी), यांच्यासह दहा महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक अशोक वाघ यानी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.आरोपी मनोजकुमार, किरण, सुब्रनील हे तिघे एका कंपनीचे एरिया मॅनेजर आहेत. त्यांनी कंपनीचे वाहन विक्रीचे टार्गेट पूर्ण केलेल्यांना ल मेरिडयनमधील स्किम द कल्ब रुममध्ये बक्षीस देण्यासाठी पार्टी आयो​जित केली होती. हॉटेलमधील परमिट रुममध्ये बेकायदेशीररित्या १३ मुली व आयोजकांना बोलावून अश्लील हावभाव करत डान्स केला. तसेच, हॉटेलचे मालक राम अगरवाल आणि स्किम द क्लबचा मॅनेजर अॅड्रयुस मायक फ्रेक्स यांनी पबचा परवाना रद्द केला असतानाही तो विनापरवाना सुरू ठेवला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपींतर्फे अॅड. ए. जी. बीडकर यांनी काम पाहिले. कोर्टाने आरोपींची प्रत्येकी चार हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आघाडीतून बाहेर पडा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सत्ता आणण्यासाठी वापर आणि धोरण ठरविताना विसर' अशा शब्दांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत शनिवारी मित्रपक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढविण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर भाजपच्या बाजूने बोलू लागताच संतप्त कार्यकर्त्यांनी रोष प्रकट करून त्यांना भाषण गुंडाळायला भाग पाडले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीस पुण्यात सुरुवात झाली. संस्थापक खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत; तसेच आमदार जानकर यांच्यासह कुमार सप्तर्षी, विश्वंभर चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. भूसंपादन कायद्यातील शेतकरी विरोधी तरतुदींवरून या वेळी सर्वच वक्त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दरम्यान, रासपचे जानकर यांनी 'भाजपला थोडासा वेळ द्या,' असा सूर लावून भाजपची बाजू मांडण्यास सुरुवात करताच श्रोत्यांमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांनी शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे जानकर यांना आपले भाषण गुंडाळावे लागले. त्यावरून पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपसोबत जाऊ नका, अशाही घोषणा दिल्या.

पूर्वी विनोबा भावे यांची भूदान चळवळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षणकार्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत; पण आता चोर किंवा दरोडेखोरांना जमिनी का द्याव्यात, असा सवाल शेट्टी यांनी केला.

'रस्त्यावरची लढाई लढू'

'दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जमिनी काढून घेण्याचा धंदा सुरू आहे,' अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी हल्ला चढविला. सहकारी संस्थांमध्ये घोटाळे करणाऱ्यांच्या चौकशा होत नाहीत, सिंचन घोटाळ्यात अडकलेल्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकारमधील नेते बसतात, त्यामुळे यापुढे आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर लढाई लढावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

एलबीटीचा भार शेतकऱ्यांवर नको

राज्यातील प्रमुख महापालिकांच्या हद्दीतील एलबीटी रद्द करण्याची तयारी सरकारने सुरू केली असून त्याबदल्यात मूल्यवर्धित करावर (व्हॅट) अधिभार लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, व्यापारी आणि उद्योगपतींना फायदा व्हावा, यासाठी ग्रामीण जनतेच्या डोक्यावर भुर्दंड बसविण्यास सदाभाऊ खोत यांनी विरोध केला.

टोल वाचविणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक

0
0

पिंपरीः टोल वाचवण्याच्या प्रयत्नात एका कंटेनरची धडक दुचाकीला बसल्याने यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोल नाक्याजवळ रात्री साडेआकराच्या सुमारास झाला. मारुती गुंड (रा. कुसगाव, लोणावळा) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर एमएच १४ बीबी ५२३६ या कंटेनर चालकाविरुद्ध लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल चुकवून पळून जाण्याच्या नादात कंटेनर (एमएच ०४ सीपी २५३६) चालकाने लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या गुंड यांच्या दुचाकीला (एमएच १४ बीबी ५२३६) मागून जोरात धडक दिली. या अपघातात गुंड यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कंटेनर चालकाने दारूच्या नशेत दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेली. यामध्ये दुचाकी कंटेनरच्या चाकाखालीच आडकल्याने जॅक लावून गुंड यांना बाहेर काढण्यात आले. कंटेनर चालकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऑनलाइन खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

मोबाइल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त किंमतीत मिळवून देतो असे सांगून एका तरुणाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपळे निलख येथे नुकताच उघडकीस आला. तेजस बारी (२७, रा. फुरसुंगी, पुणे) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पराग नारायण गौतम (१८, रा. अमनोरा, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस व पराग हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. परागने आपण मोबाइल व इलेक्ट्रोनिक वस्तूंचे वितरक असल्याचे सांगून इलेक्ट्रोनिक वस्तू थेट कंपनीतून आणून त्याची विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तेजसने परागच्या सांगण्यावरून सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत सहा लाख ६८ हजार ७३० रुपये ऑनलाइन खरेदीसाठी बँकेत भरले. परंतु परागने त्याची आर्थिक फसवणूक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भू-संपादनात शेतकऱ्यांना विस्थापित करू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या संमतीविना जमीन संपादित करण्याची तरतूद करण्यात आली असली तरी ही प्रक्रिया करताना शेतकरी विस्थापित होणार नाही. याची खबरदारी घेण्यात यावी, अशी आरपीआय पक्षाची आग्रही मागणी असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी लोणावळ्यात आयोजित आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीत आठवले बोलत होते.

आरपीआय पक्ष हा केवळ दलितांचा चेहरा न राहता तो सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांना सामावून घेऊन जाणारा पक्ष व्हावा, पक्षाला व्यापक चेहरा मिळावा यासह राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, वाढती महागाई आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आठवले म्हणाले, 'आमच्या मतांवर मित्र पक्ष विजयी होतात मात्र त्यांची मते आम्हाला मिळत नाहीत. यामुळे पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश येते याकरिता पक्षाचे ध्येय धोरण ठरविण्यासाठी जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधार पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच हा जाहीरनामा प्रसिद्ध करू,' असे सांगितले. 'लोणावळ्यातील बालिका हत्या प्रकरणी आठवले यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. 'राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याची जबाबदारी गृह विभागाची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य प्रकारे ती सांभाळतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, 'पूर्वीच्या कायद्यात ७० टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय जमीन संपादित करू नये अशी अट होती. त्यामुळे मागील काळात प्रोजेक्ट होऊ शकले नाही असा सरकारचा समज आहे. राज्यात व देशात उद्योग वाढविण्यासाठी जमीन संपादन करणे ही गरज असल्याने शेतकऱ्यांच्या ७० टक्के संमतीची अट वगळण्यात आली आहे. असे असले तरी शेत जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांचा विचार करण्यात यावा, भूमीहिन होणार नाही, शेतकऱ्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळावा,' अशी आरपीआय पक्षांची आग्रही मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’च्या बैठकीत मोदींवर हल्लाबोल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तुम्ही शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवायला निघाला आहात, त्यामुळे स्वतःला 'सेवक'म्हणवून घेत असलात, तरी तुम्ही सेवक नसून राक्षसाची अवलाद आहात,' अशा शब्दांमध्ये भाजपचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी हल्लाबोल करण्यात आला. मित्रपक्षाकडून सर्वोच्च नेत्यांवर हल्ला झाल्यानंतर आता भाजप काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र आणि राज्यात भाजपच्या मित्रपक्षांची कोंडी झाली आहे. त्यामुळे या पक्षांनी आघाडीत राहूनच भाजपवर हल्ले चढविण्यास सुरूवात केली आहे. भूमी अधिग्रहण कायद्याच्या मद्द्यावरून स्वाभिमानीने थेट विरोध करून रस्त्यावर उतरण्याचीही तयारी सुरू केली आहे. त्याची प्रचित पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशांना मदत करतात, परंतु आपल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असून त्यासाठी सरकारची झोळी कधीच रिकामी होत नाही, अशा शब्दांमध्ये संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. पंतप्रधान इतर घरांना मदत करतात, पण आपले घर उध्वस्त होत असताना काही करीत नसल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही मोदी यांना टार्गेट केले. 'आपण प्रधान'सेवक' आहोत, असे मोदी यांनी पूर्वी म्हटले होते. मात्र, तुम्ही शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवायला निघाला आहात, त्यामुळे हे सेवक नसून राक्षसाची अवलाद आहेत, असे खोत म्हणाले. टाटा, बिर्ला, अंबानी आणि अडानी यांच्यासाठी आमच्या बापजाद्यांनी जमिनी राखून ठेवलेल्या नाहीत,' असे ते म्हणाले.

'अच्छे दिन फक्त उद्योजकांसाठीच'

केंद्रातील सरकार 'अच्छे दिन'आणण्याची घोषणा देत सत्तेवर आले, पण या सरकारची धोरणे पाहता फक्त उद्योगपतींना अच्छे दिन आल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली. भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधातील लढा हा दुसरा स्वातंत्र्यलढा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कायद्याच्या विरोधात सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढणार असून लवकरच त्याचा कार्यक्रम घोषित करण्यात येईल, असे हजारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा निर्णय तुम्ही ठरवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचण्यासाठी आम्ही लोकसभा आणि निवडणुकीत भाजपची सत्ता आणली, पण शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा ज्या हातांनी तुम्हा सत्तेवर बसविले, त्याच हाती खाली खेचू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दिला. 'शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही प्राणपणाने लढतच राहणार, मग आम्हाला बरोबर घ्यायचे की नाही, ते तुम्हीच ठरवा,' अशी भूमिका संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी घेतली.

'स्वाभिमानी'च्या विस्तारीत राज्य कार्यकारिणीच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सदाभाऊ खोत,माजी पणन संचालक सुभाष माने, वर्षा काळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांनी भाजपवर रोष प्रकट करून 'आघाडीतून बाहेर पडा,'अशा घोषणा दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार आमच्या पाठिंब्यावर असले, तरी वेळप्रसंगी त्या सरकारला तुडवायला आम्ही कमी करणार नाही. मग आमच्याशी दोस्ती ठेवायची की नाही, हे ज्याचे त्याने ठरवावे,' असे शेट्टी यांनी भाजपला बजावले. लोकसभा आणि विधानसभेत आमचे संख्याबळ नाही, परंतु, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड येथील सेझच्या भूसंपादनातील गोंधळाच्या विरोधात येत्या २३ मार्च रोजी खेड ते पुणे पदयात्रा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

आतापर्यंत सरकारने विविध कामांसाठी शेतकऱ्यांच्या किती जमिनी घेतल्या आणि त्याचा कोणत्या कामांसाठी, उद्योगांसाठी नेमका काय वापर केला, याची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढा, अशा मागणीचा ठराव या वेळी करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीविना भूसंपादनाची तरतूद मागे घेईपर्यंत यापुढे संपूर्ण राज्यात भूसंपादन कायद्याविरोधात आंदोलन सुरूच राहील, शहरांजवळ संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, बागायती जमिनी भूसंपादनातून वगळा, राज्यातील बंद असलेले सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या यांच्या विक्री प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि आडत रद्द करा, असे ठराव या वेळी करण्यात आले.

सुभाष मानेंचा 'स्वाभिमानी'त प्रवेश

शेतीमालावरील आडत, बाजार समित्यांमधील घोटाळ्यांची चौकशी अशा विविध निर्णयांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले माजी पणन संचालक सुभाष माने आणि वर्षा काळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. पुणे, नागपूर आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे सर्वाधिक शोषण होते, असा आरोप करून शेतकऱ्यांच्या डोक्यावरून आडतीचा बोजा हटविण्यासाठी माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्याचा कार्यक्रम या वेळी ठरविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तवेरा-एसटी धडकेत एक जण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

एसटी बस आणि तवेराच्या धडकेत माळशेज घाटात एक ठार झाला. करमाळा येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. एसटी बस अहमदनगरहून पनवेलकडे निघाली होती. ओतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी ही माहिती दिली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. तन्वी वाघमारे (वय १७), सिद्धेश दुधे (१३), लता वाघमारे (२५), पंडीत वाघमारे (४८), प्रीती चितळकर (६), मनीषा चितळकर (२१) आणि गोपीनाथ चितळकर (३२) जखमी झाले आहेत. ओतूर पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

चोराकडून दीड लाखाचे दागिने जप्त

येरवडा : पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला महिन्याभरापूर्वी खराडी भागात पकडण्यात आले होते. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असिफ सलीम पटेल (वय २८, रा.दत्तवाडी) त्याचे नाव आहे. आरोपी असिफने गेल्या काही दिवसांत चंदननगर भागात सोनसाखळी चोरी केली होती. अशाच प्रकारचे काही चोरीचे गुन्हे त्याने कोंढवा हद्दीत केले असल्याने त्याची रवानगी कोंढवा पोलिसांकडे केल्याची माहिती चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live

Latest Images