Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाषाण तलावावर मालकी जलपर्णीची

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेल्या पाषाण तलावावर सध्या पक्ष्यांचे नव्हे तर जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर तलावाच्या सुरक्षेकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने या भागात सध्या मटक्यांचे खेळ आणि दारूपार्ट्या रंगत आहेत. मॉडेल कॉलनीतील लकाकी लेकच्या सुशोभीकरणाचे नियोजन करणाऱ्या उद्यान विभागाला पाषाण तलावाचा विसर पडला आहे.

'पाषाण तलाव हा निसर्ग समृद्ध असून जैवविविध्याच्या दृष्टीकोनातून संवेदनशील आहे, त्याचे सुशोभीकरण करू नका,' असे अनेक पर्यावरण अभ्यासक असे वारंवार सांगत होते. असे असतानाही महापालिकेच्या उद्यान विभागाने दहा वर्षांपूर्वी पाषाण तलावाच्या सुशोभीकरणाचा घाट घातला. पुण्यातील एका प्रसिद्ध 'पर्यावरणवादी' संस्थेला हे काम देण्यात आले. या संस्थेने अनेक स्वप्ने दाखवली होती. मात्र, प्रत्यक्षात या उपक्रमामुळे तलावातील नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. तेथील अनैसर्गिक सजावटीमुळे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना तलावाची दारे बंद झाली आहेत. दलदलीचा प्रदेश नष्ट झाल्याने त्या अधिवासात राहणाऱ्या पक्ष्यांनी तलावाकडे पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर या जलाशयाला आता जलपर्णीने संपूर्णपणे व्यापले आहे.

या संपूर्ण परिसरात सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. या परिसरात दिवसभर प्रेमीयुगुले, संध्याकाळनंतर सर्रास मटक्याचे खेळ आणि दारूपार्ट्या होतात. बहुतांश वेळेस सुरक्षारक्षक गायबच असल्याने तलावावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. तलावाच्या सभोवताली असलेल्या गवताळ भागात दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचेही साम्राज्य वाढते आहे. जे पर्यटक सध्या 'सुशोभीकरण झालेला पाषाण तलाव' बघण्यासाठी येतात, त्यांच्या पदरी निराशाच येते.

काही वर्षांपूर्वी पाषाण परिसरामध्ये मानवी हस्तक्षेप कमी असल्याने पाणकोंबडी, स्पॉट बिल्ड बदक, जकाना, वंचक, मिनिव्हेट्स असे स्थानिक, तर कॉमन पोचार्ड, ब्राह्मणी बदक, नकटे बदक, पेंटेड स्टॉर्क, नदी सूरया, थिरथिऱ्या, धोबी असे पक्षी येथे मोठ्या संख्येने दिसायचे. आता स्थानिक बगळ्यांशिवाय इतर कोणतेही पाणपक्षी दिसत नाहीत.

पाषाण तलावाच्या सुशोभीकरणामुळे तेथील नैसर्गिक संपत्ती हरवली आहे. येथील जीवसृष्टीचा विचार करून विकासकामे होणे अपेक्षित होते. आता तलावाचे नैसर्गिक पुनरुज्जीवन होण्यास अनेक वर्षे लागतील. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अभ्यासकांच्या पदरी निराशाच आली आहे. या तलावाचे अपयश लक्षात घेऊन तरी महापालिकेने आगामी उपक्रमामध्ये अभ्यासक आणि स्थानिक लोकांची सल्लामसलत घेऊन पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांची दिशा ठरवावी.

- धर्मराज पाटील, वरिष्ठ जैवविविधता संशोधक, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

जलपर्णीमुळे पाषाण तलाव संपूर्णपणे झाकला गेला असून दुर्गंधीही पसरली आहे. अनेक ठिकाणी किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरिबॅग्ज, थर्मोकोल या सारख्या अविघटनशील कचरा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. तलावाला वाचविण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत,

- लोकेश बापट, टेलस ऑर्गनायझेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छाप्यामागे भाजपचे षडयंत्र?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्याचा (डीपी) अहवाल सर्वसाधारण सभेत चर्चेला येऊन त्याला अंतिम मंजुरी देण्याचा विषय असतानाच सभागृह नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुभाष जगताप आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका उषा जगताप यांची चौकशी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. यामागे राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपचे षडयंत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी पर्वतीमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या जगताप आणि कसबा पेठेतून इच्छुक असलेल्या भाजपच्या एका माजी स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजपच्या एका बड्या नेत्याने त्याच्या हस्तकामार्फत या तक्रारी केल्या होत्या. राज्यातील एका वजनदार मंत्र्यासाठी हा हस्तक काम करत असून गेल्या महिन्यात महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला टीडीआरच्या प्रकरणात गुंतवून पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासही भाग पाडले होते. याच व्यक्तीने जगताप यांच्या विरोधात तक्रार करून त्यांची पुन्हा चौकशी करण्याचा अर्ज काही दिवसांपूर्वी लाचलुचपत खात्याकडे केला होता. त्यामुळे बुधवारी सकाळी जगताप यांच्या घरांवर धाड मारून ही चौकशी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लाचलुचपत खात्याकडे यापूर्वी जगताप यांच्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून खात्याने त्यांना क्लिनचिट देऊन ही केस 'क्लोज' केली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराचा डीपी अंतिम मंजुरीसाठ‌ी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला आहे. यावर योग्य तो निर्णय पालिकेतील सभासदांनी न घेतल्यास हा डीपी थेट मंजुरीसाठी राज्य सरकारकडे जाणार आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने सरकारने हा डीपी करावा, अशी भूमिका पालिकेतील भाजपच्या नेत्यांची आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने हा डीपी तयार केल्याने यामधील अनेक गोष्टींना आक्षेप घेत भाजप, सेनेने याला विरोध करत डीपी राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी केली आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने बुधवारी डीपीवर चर्चा करून तो मंजूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार होता. यामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारने अधिकाराचा वापर करत जगताप यांच्यावर कारवाई करण्याचा मुहूर्त निवडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतही आघाडीत बिघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक होणार असून, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्यामुळे मित्रपक्ष काँग्रेसच्या विरोधातच राष्ट्रवादी लढणार असून, तिहेरी लढतीत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम, काँग्रेसकडून चंदू कदम, तर भारतीय जनता पक्षाकडून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेवेळी झालेल्या चर्चेनुसार एक वर्ष स्थायीचे अध्यक्षपद काँग्रेसला दिले जाईल, असे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार, चंदू कदम यांना संधी देण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम यांनी अर्ज भरला असला, तरी तो मागे घेतला जाईल, अशी खात्री काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात, बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीने स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीसाठी 'व्हीप' काढला आहे. समितीतील सर्व सदस्यांनी कदम यांनाच मतदान करावे, असे स्पष्ट करण्यात आल्याचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीने आयत्यावेळी बदललेल्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या गोटात अनिश्चितता पसरली आहे. 'काँग्रेसला चौथ्या वर्षी स्थायीचे अध्यक्षपद मिळेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कबूल केले होते. ते शब्द पाळतील, अशी आमची अपेक्षा असून, काँग्रेसचा उमेदवारच विजयी होईल', असा विश्वास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

समितीतील आकडेवारी कोणाच्या बाजूने?

स्थायी समितीमधील १६ सदस्यांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीचे सहा, तर काँग्रेसचे तीन सदस्य आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचेही प्रत्येकी तीन सदस्य असून, शिवसेनेचा एक सदस्य आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप अशा तिहेरी लढतीत बाजी मारण्यासाठी कोणत्याही पक्षाला दुसऱ्या पक्षाची साथ घेणे आवश्यक ठरणार आहे.

परिणामी, यापूर्वी सत्तेचा पुणे पॅटर्न दिलेल्या पालिकेत नवीन कोणता सत्तापॅटर्न येणार, यासाठी सर्व पक्षीय तत्वांना तीलांजली देत बुधवारी सर्वच स्थानिक नेतेमंडळींची खलबते सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील महिलांचा नारा… आम्ही अचिव्हर्स!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयटीपासून सोशल सर्व्हिसपर्यंत आणि शिक्षिकांपासून मेडिकल-इंजिनीअरिंगपर्यंत... समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहून यशाची शिखरे गाठणाऱ्या सर्व वयोगटांमधील महिलांनी एकच नारा दिला आहे... आम्ही अचिव्हर्स. आणि याच अचिव्हमेंटचा गौरव करण्यासाठी येत्या रविवारी धूम होणार आहे... 'मटा विमेन बाईक रॅली'ची! निमित्त आहे महिलादिनाचे.

टू-व्हीलरवरून आपल्या करिअरकडे धूम ठोकणाऱ्या महिला दररोज शहर व परिसरात हजारोंच्या संख्येने दिसतात. घड्याळाच्या तालावर, प्रत्येक क्षण सत्कारणी लावून त्यांच्याकडून सर्वंच क्षेत्रात छाप पाडणारी कामगिरी केली जात आहे. याच आधुनिक आदिशक्तीला अभिवादन करण्यासाठी 'मटा'ने गेल्या वर्षी 'विमेन बाइक रॅली'ची घोषणा केली आणि पुणेकर महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'बाइक रॅली' म्हणजे केवळ मोटरसायकलवर धूम ठोकणाऱ्या महिलाच नव्हे, तर अगदी दररोजच्या वापरातील स्कूटरेट-मोपेडवरून महिला या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या रॅलीमध्ये सहभागी झालेली प्रत्येक महिला खरी नायिका होती. ती प्रत्येक जण एकमेकींच्या आणि समस्त पुणेकर महिलांच्या कर्तृत्वाला या रॅलीच्या भरारीमधून सलाम करीत होती.

या वर्षीदेखील महिलादिनानिमित्त 'मटा'ची 'विमेन बाइक रॅली' आयोजित करण्यात आली आहे. कॉलेज युवतींपासून गृहिणींपर्यंत आणि भिशी मंडळांपासून ऑफिसमधील ग्रुपपर्यंत सर्वच क्षेत्रांमधील महिलांनी या रॅलीसाठी मोठ्या संख्येने नावनोंदणी सुरू केली आहे. तेव्हा वाट कसली पाहताय...हेल्मेट उचला आणि या वुमन रॅलीमध्ये सहभागी व्हा. व्हाय शुड मेन हॅव ऑल दी फन?

मटा बाइक रॅली - २०१५

दिनांक : ८ मार्च, सकाळी ७.३० वाजता (फ्लॅगऑफ - स. ८ वा)

स्थळ : संभाजी पार्क

नावनोंदणीसाठी संपर्क :

०२० - ३०११७५३२, ३०११७४७५. त्याचप्रमाणे, BikerallyPUN असे लिहून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा. womenbikerally.mtonline.in या वेबसाइटवर तपशील उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्तादजी आळवताहेत… घरयाचनेचा आलाप

0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

धृपद धमार गायकीतील प्रसिद्ध डागर घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद सईदुद्दीन डागर गेली २५ वर्षे कलावंतांसाठीच्या राखीव कोट्यातील घरासाठी झगडत आहेत. धृपद धमार ही अनवट गायनशैली टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या या ज्येष्ठ गायकाला वास्तवात भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत झारीतील शुक्राचार्यांनी उस्तादजींच्या मागणीचा सूर 'विसंवादी' ठरवला. आता सत्तेत आलेले नवे सरकार तरी उस्तादजींना घर देणार का, हा खरा प्रश्न आहे.

सध्या कर्वेनगर येथील काकडे सिटीत भाड्याने वास्तव्याला असलेले डागर १९८६मध्ये जयपूरहून पुण्यात आले. १९८९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी उस्तादजींना कलावंतांसाठीच्या दहा टक्के राखीव कोट्यातून पुण्यात ८०० चौरस फुटांपर्यंतचा फ्लॅट देण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याची कागदोपत्री कार्यवाहीदेखील झाली. १९९५मध्ये उस्तादजींना घर मंजूर करण्यात आले. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांनी 'टेबलाखालून' मागणी केल्याने उस्तादजी नाराज झाले. त्या मागण्या त्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. तेव्हापासून दुरावलेले सरकारी कोट्यातील घर अद्यापही उस्तादजींना लाभले नाही. १९८९ पासून सातत्याने त्यांचा या घरासाठी पाठपुरावा सुरू आहे. या दरम्यान त्यांना अनेकदा घर बदलावे लागले. त्यामुळे त्यांच्यासह घरच्यांची आणि शिष्यांचीही बरीच ओढाताण झाली.

पवार यांच्यानंतर मनोहर जोशी, नारायण राणे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण असे जवळपास सर्वच मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्या पत्राला उत्तर मिळाले नाही. २०१२मध्ये सांस्कृतिक कार्यसंचालनालयाने त्यांच्या पत्राची कागदोपत्री दखल घेतली होती. मात्र, पुढील कार्यवाही प्रलंबितच राहिली. आता सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना उस्तादजींनी घरासाठी पत्र पाठवले आहे. जानेवारीमध्ये हे पत्र पाठवण्यात आले असून, अद्याप त्याला उत्तर देण्यात आलेले नाही.

राज्य सरकारने २००५मध्ये पुरस्कार दिला होता. त्या वेळी घरासंदर्भातील विषय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडे मांडला होता. त्याचे काही झाले नाही. सरकारला अपेक्षित असलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. तरीही नेमके काय चुकतेय हे अद्याप मला कळलेले नाही. माझ्या पंचवीस वर्षांतील पत्रव्यवहाराला उत्तर देण्याचीही तसदी घेतलेली नाही.

- उस्ताद सईदुद्दीन डागर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाष जगताप यांच्या घरावर छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पुणे महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या घरावर लाचतलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी छापा टाकला. जगताप आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात या संदर्भात सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे एक कोटी २० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याची माहिती देण्यात आली.

जगताप यांच्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जगताप यांच्या मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. जगताप आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेचे १९९२ ते २०१३ या दरम्यानचे परीक्षण करण्यात आले. त्यांच्याकडे ४६ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी सकाळी चार पथकांनी छापा टाकून तपासणी केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या तपासणीत मालमत्तेची माहिती घेण्यात आली. त्यात जगताप यांच्याकडे ८० लाख रुपयांची आणखी बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी दिली.

सहकारनगरमध्ये 'बंदोबस्त'

सहकारनगर परिसरात जगताप यांच्या घरावर कायमच स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची ऊठबस असते. बुधवारी सकाळपासून कारवाई सुरू झाल्याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि तळजाई परिसरातील नागरिकांनी जगताप यांच्या घराच्या परिसरात गर्दी केली. या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजकीय दबावावरून ही कारवाई करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे यापूर्वी सरकारकडे दिल्याने सूडबुद्धीने बऱ्हाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठिंब्यामुळेच हे झाले आहे.

- सुभाष जगताप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंडाप्रकरणातील दोघांना अटक

0
0

लोणावळा : हुंड्यासाठी वाकसाई येथे एका वधुपित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर पोलिसांनी नवऱ्या मुलासह उर्वरित दोघांना अटक केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन रद्द केले आहे.

नवऱ्या मुलाचा मेहुणा अनिल राघू वावरे व चुलतभाऊ राजेंद्र दत्तात्रय लालगुडे (दोघेही रा. नायगाव, मावळ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणावळ्याजवळील वाकसई येथील शेतकरी बाबूराव राघू येवले यांनी त्यांच्या मुलीचा विवाह कामशेतजवळील नायगाव येथील बाळू भागूजी लालगुडे याच्याशी विवाह निश्चित केला होता. कुकूंमतिलक व साखरपुड्यानंतर नवरदेव मंडळींनी हुंडा मागितल्यानंतर येवले यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी नवरा मुलगा बाळू भागुजी लालगुडे यास अटक केली होती. परंतु, इतर आरोपींनाही तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोणावळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या वेळी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उर्वरित चारजणांपैकी दोघांना अटक केल्याने ग्रामस्थांनी बुधवारी होणारे रास्ता रोको मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी पोलिसाला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आरोपींचे मोबाईल आणि पाकिट परत देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. टी. ढवळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल होणारे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालय सुरू झाल्यानंतर प्रथमच ही शिक्षा सुनावण्यात आली.

सुदाम रामभाऊ पडवळ, असे शिक्षा झालेल्या पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी शंकर राजू पाटील (रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी एका कंपनीत पर्यवेक्षक म्हणून नोकरी करीत होते. चार मे २०१२ रोजी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी कोर्टात त्यांची जामिनावर सुटका झाली. पोलिस चौकीत त्यांनी मोबाइल आणि वस्तू परत मागितल्या. त्यावेळी पडवळ उपस्थित नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांनी पडवळ यांची भेट घेतली. त्यांना वस्तू परत हव्या असतील, तर प्रत्येकी दोन हजार रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडवळ यांना ९ मे २०१२ रोजी सापळा रचून पकडण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टॅम्प ड्यूटी भरणे झाले सुलभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दस्तनोंदणीच्या ग्रास प्रणालीमध्ये विविध तांत्रिक सुधारणा केल्यामुळे आता दस्तनोंदणी करणे आणि स्टॅम्प ड्यूटी भरणे अधिक सुलभ झाले आहे. ही प्रणाली हँग झाल्याने गेल्या ३१ डिसेंबर रोजी राज्यभरातील हजारो पक्षकारांना फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर या सुधारणा करण्यात आल्या असून आता या ऑनलाइन कामांचा वेळ पन्नास टक्क्यांनी कमी होणार आहे.

राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्यभरातून हजारो नागरिकांनी एकाच वेळी लॉगइन केल्याने गेल्या ३१ डिसेंबर रोजी वित्त विभागाची गव्हर्न्मेंट रिसिट अकाउंट्स सिस्टम(ग्रास) प्रणाली हँग झाली. त्यामुळे हजारो पक्षकारांना दस्तांची नोंदणी करता आली नाही आणि वाढीव स्टॅम्प ड्यूटीचा त्यांना फटका बसला. त्यानंतर विभागाच्या वतीने या सिस्टीममध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. या प्रणालीच्या होमपेजवर सर्वच विभागांमधील ई-पेमेंट करण्याची सुविधा आहे. आता नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी होमपेजवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी आता एकाच चलनाचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे कष्ट आणि वेळ वाचणार असून या सिस्टीमवरील लोड पन्नास टक्क्यांनी कमी होणार आहे, असे डॉ.परदेशी यांनी सांगितले.

पूर्वी नागरिक, स्टॅम्प व्हेंडर आणि इन्स्टिट्यूशन यांच्यासाठी एकाच फॉर्मची व्यवस्था होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनावश्यक तपशील भरावा लागत असे, आता सर्वांना स्वतंत्र फॉर्म उपलब्ध झाल्याने मोजकाच तपशील भरावा लागणार आहे. तसेच, पैसे भरणाऱ्यांना फक्त नाव आणि मोबाइल नंबर इतकीच माहिती भरावी लागेल. त्यांनी भरलेल्या मूळ तपशीलामधून येथील तपशील आपोआप उपलब्ध होणार असल्याने पुनरावृत्ती टळणार आहे. तसेच, अपील फीची रक्कम आणि दंड भरण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी शहर किंवा तालुक्याची निवड केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाची निवड चुकली, तरीही ही रक्कम योग्य ठिकाणी जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष समाप्त होत असल्याने मार्चअखेर पुन्हा नागरिकांची दस्तनोंदणी आणि स्टॅम्प ड्यूटीची गर्दी होते, असा अनुभव आहे. मात्र, या सुधारणांमुळे यंदा ३१ डिसेंबरच्या गोंधळाची पुनरावृत्ती होणार नाही, असे डॉ. परदेशी यांनी म्हटले आहे.

दस्तसंख्या कमी; उत्पन्न अधिक

गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत २० लाख ६६ हजार दस्तांची नोंदणी करण्यात आली असून राज्यभरातून १९ हजार ४७५ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे. पूर्वीच्या आर्थिक वर्षात २३ लाख ३० हजार दस्तांची नोंदणी झाली होती, यंदा ती २२ लाख ७० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दस्तांची संख्या कमी झाली असली, तरी रेडीरेकनरमधील वाढीमुळे उत्पन्न अधिक मिळेल, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

९५ टक्के ई-पेमेंट

नोंदणी व मुद्रांकशुल्क भरण्यासाठी ई-पेमेंट पद्धतीचा वापर महाराष्ट्रात चांगलाच रुळला आहे. गेल्या वर्षभरात विभागाला मिळालेल्या उत्पन्नामध्ये ९५ टक्के वाटा ई-पेमेंटचा असल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाषाण तलावावर मालकी जलपर्णीची

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेल्या पाषाण तलावावर सध्या पक्ष्यांचे नव्हे तर जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर तलावाच्या सुरक्षेकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने या भागात सध्या मटक्यांचे खेळ आणि दारूपार्ट्या रंगत आहेत. मॉडेल कॉलनीतील लकाकी लेकच्या सुशोभीकरणाचे नियोजन करणाऱ्या उद्यान विभागाला पाषाण तलावाचा विसर पडला आहे.

'पाषाण तलाव हा निसर्ग समृद्ध असून जैवविविध्याच्या दृष्टीकोनातून संवेदनशील आहे, त्याचे सुशोभीकरण करू नका,' असे अनेक पर्यावरण अभ्यासक असे वारंवार सांगत होते. असे असतानाही महापालिकेच्या उद्यान विभागाने दहा वर्षांपूर्वी पाषाण तलावाच्या सुशोभीकरणाचा घाट घातला. पुण्यातील एका प्रसिद्ध 'पर्यावरणवादी' संस्थेला हे काम देण्यात आले. या संस्थेने अनेक स्वप्ने दाखवली होती. मात्र, प्रत्यक्षात या उपक्रमामुळे तलावातील नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. तेथील अनैसर्गिक सजावटीमुळे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना तलावाची दारे बंद झाली आहेत. दलदलीचा प्रदेश नष्ट झाल्याने त्या अधिवासात राहणाऱ्या पक्ष्यांनी तलावाकडे पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर या जलाशयाला आता जलपर्णीने संपूर्णपणे व्यापले आहे.

या संपूर्ण परिसरात सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. या परिसरात दिवसभर प्रेमीयुगुले, संध्याकाळनंतर सर्रास मटक्याचे खेळ आणि दारूपार्ट्या होतात. बहुतांश वेळेस सुरक्षारक्षक गायबच असल्याने तलावावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. तलावाच्या सभोवताली असलेल्या गवताळ भागात दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचेही साम्राज्य वाढते आहे. जे पर्यटक सध्या 'सुशोभीकरण झालेला पाषाण तलाव' बघण्यासाठी येतात, त्यांच्या पदरी निराशाच येते.

काही वर्षांपूर्वी पाषाण परिसरामध्ये मानवी हस्तक्षेप कमी असल्याने पाणकोंबडी, स्पॉट बिल्ड बदक, जकाना, वंचक, मिनिव्हेट्स असे स्थानिक, तर कॉमन पोचार्ड, ब्राह्मणी बदक, नकटे बदक, पेंटेड स्टॉर्क, नदी सूरया, थिरथिऱ्या, धोबी असे पक्षी येथे मोठ्या संख्येने दिसायचे. आता स्थानिक बगळ्यांशिवाय इतर कोणतेही पाणपक्षी दिसत नाहीत.

पाषाण तलावाच्या सुशोभीकरणामुळे तेथील नैसर्गिक संपत्ती हरवली आहे. येथील जीवसृष्टीचा विचार करून विकासकामे होणे अपेक्षित होते. आता तलावाचे नैसर्गिक पुनरुज्जीवन होण्यास अनेक वर्षे लागतील. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अभ्यासकांच्या पदरी निराशाच आली आहे. या तलावाचे अपयश लक्षात घेऊन तरी महापालिकेने आगामी उपक्रमामध्ये अभ्यासक आणि स्थानिक लोकांची सल्लामसलत घेऊन पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांची दिशा ठरवावी.

- धर्मराज पाटील, वरिष्ठ जैवविविधता संशोधक, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

जलपर्णीमुळे पाषाण तलाव संपूर्णपणे झाकला गेला असून दुर्गंधीही पसरली आहे. अनेक ठिकाणी किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरिबॅग्ज, थर्मोकोल या सारख्या अविघटनशील कचरा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. तलावाला वाचविण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत,

- लोकेश बापट, टेलस ऑर्गनायझेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला ‘मनसे’ साथ

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. परंतु, नाशिकच्या स्थायी समितीचा विचार करूनच त्यांनी ही बेगमी केली आहे. त्यांच्या तीन मतांनी अश्विनी कदम यांचा विजय सोपा केला.

पुणे महानगरपालिका ही वेगवेगळ्या 'पॅटर्न'साठी ओळखली जाते. राज्याच्या राजकारणाला नवनवे 'पॅटर्न' देणाऱ्या पुणे महानगरपालिकेत आज आणखी एक पॅटर्न अस्तित्वात आला आहे. राष्ट्रवादीला काँग्रेससोबतच मनसेनंही पाठिंबा देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचा १२ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. स्थायी समिती सभापतीपदी निवडल्या गेलेल्या कदम या तिसऱ्या महिला आहेत. त्यांना मिळालेल्या १२ मतांमध्ये तीन मतं मनसेची आहेत.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं पुण्यातील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हं होती. परंतु, काँग्रेसचे चंद्रकांत ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अश्विनी कदम यांचा विजय निश्चित झाला. कारण, राष्ट्रवादीची सहा आणि काँग्रेसची तीन मतं त्यांच्या पारड्यात पडणार होती. असं असतानाही, कितीतरी महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहणाऱ्या, मनसेच्या तीन सदस्यांनीही अश्विनी कदम यांनाच पाठिंबा दिला.

मनसेच्या या मतदानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी नाशिकच्या तिजोरीची किल्ली मिळवण्यासाठीच त्यांनी ही खेळी केल्याचं जाणकार सांगतात. नाशिकच्या स्थायी समितीसाठी मनसेला राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. ती मिळवण्यासाठीच त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीला खुश केल्याचं बोललं जातंय. आता राष्ट्रवादी या मदतीची परतफेड नाशकात करतं का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ वर्षीय मुलीचा गुदमरल्यामुळे मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धुळवड साजरी केल्यानंतर अंघोळीसाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा बाथरूममध्ये गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी कुंबरे पार्क येथे ही घटना घडली. गॅसगिझरमुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

ऋजुता चंद्रशेखर पवार (वय १४, रा. शिवसागर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) ​हिचा मृत्यू झाला. ऋजुताचे कुटुंब काही वर्षांपूर्वी कुंबरे पार्क येथे राहायला होते. नंतर ते सिंहगड रोड येथील सोसायटीमध्ये राहण्यासाठी गेले होते. परंतु, ती सर्व सण-उत्सव, वाढदिवस हे कुंबरे पार्कमध्येच साजरी करीत असे. धुळवडीलादेखील ती तिच्या मैत्रिणींसमवेत कुंबरे पार्क येथे आली होती.

धुळवड साजरी केल्यानंतर ऋतुजा मैत्रिणीच्या घरी गेली. त्यानंतर अंघोळीला जाऊन बराच वेळ झाला, तरी ती बाहेर येत नसल्याने मैत्रिणींनी तिला हाका मारल्या. त्यानंतरही तिने प्रतिसाद न दिल्याने मैत्रिणीच्या आईने शेजारच्यांच्या मदतीने बाथरूमचे दार तोडले. त्या वेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत तातडीने सह्याद्री हॉस्पिटलला नेण्यात आले. तिच्यावरील उपचारावरून त्या ठिकाणी वाद झाला. त्यानंतर तिला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिचा मृत्यू गॅस गिझरमधील गळतीने गुदमरून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. ऋजुता दस्तुर हायस्कूलमध्ये नववीत शिकत होती. तिला एक मोठी बहीण आहे. तिचे वडील इंजि​नीअर असून भारत फोर्जमध्ये नोकरीस आहेत.

'बाथरूममध्ये व्हेंटिलेशन आवश्यक'

बाथरूममध्ये गॅस गिझर वापरणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. गिझरपासून तयार होणारी वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग ठेवला पाहिजे. सातत्याने वाफ तयार झाल्याने तेथील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते जाते व कार्बनडाय ऑक्साइड वाढतो. हळूहळू ऑक्सिजनचे प्रमाण नाहिसे होते. त्यामुळे व्हेंटिलेशन व्यवस्थित होणे आवश्यक आहे, अशी माहिती फायरब्रिगेडचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

आगम टेकडीवर खून

कात्रज : दुचाकीवरून आलेल्या दहा जणांनी एकावर लाकडी वासा व धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री आगम टेकडीवरील वाघजाईनगरमध्ये घडली. विजय रामा चांदणे (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव असून या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आगम टेकडीवरून दुचाकीवरून दहाजण आरडाओरडा करत आंबेगाव खुर्द हद्दीतील वाघजाईनगरकडे निघाले होते. मार्गातील समृद्धी एन्टरप्रायझेस कारखान्यासमोर उभ्या असलेल्या विजय याच्यावर लाकडी वासा व धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही या समाजकंटकांनी पादचाऱ्यांनाही मारहाण केली होती. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार काही मार्गावर शोधाशोध केली. मात्र हल्लेखोर पसार झाले. रवींद्र रामा चांदणे (वय २३) याने आकाश थोरात, अक्षय इंगुळकर, चेतन सरोदे, गण्या मांगडे, भावड्या यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री मृणाल ओव्हाळ (वय २२) याला अटक केली आहे.

इस्त्री सुरुच राहिल्याने गुरुवार पेठेत घराला आग

इस्त्रीला वीज पुरवठा करणारे बटण सुरू राहिल्याने इस्त्री गरम होऊन खाली असलेल्या गादीने पेट घेतला आणि त्यामुळे संपूर्ण घराला आग लागल्याची घटना गुरुवार पेठत शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

गुरुवार पेठेत मोमीनपुरा भागातील एका चारमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. या फ्लॅटमध्ये मोहम्मद अब्बास हे भाडेकरू राहतात. मोहम्मद यांच्या घरात बेडरूममध्ये गादीवर कपड्यांना इस्त्री केली जात होती. मात्र, त्यावेळी अचानक वीज गेली. त्यामुळे इस्त्री तेथेच ठेवून त्यांच्या कुटुंबातील सदस्य काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर निघून गेले. मात्र, इस्त्रीच्या वीज पुरवठ्याचे बटण बंद करण्याचे राहून गेले. थोड्यावेळाने पुन्हा वीज पुरवठा सुरळित झाल्यानंतर इस्त्री गरम होऊन गादीने पेट घेतला आणि संपूर्ण घरात आग पसरली. यामध्ये बेडरूम आणि संपूर्ण घरातील घरगुती सामानाचे नुकसान झाले आहे. परंतु, नागरिकांनी भरलेले गॅस सिलेंडर तेथून हलविल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती फायर ब्रिगेडचे स्टेशन प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग चौथ्यांदा NCPकडेच स्थायी

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेल्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी बाजी मारली. काँग्रेसचे उमेदवार चंदू कदम यांनी ऐन वेळेस आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीच्या कदम यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मनसेनेही कदम यांना पाठिंबा जाहीर करत मतदान केले. कदम यांना १२ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना चार मते मिळाली. या विजयामुळे सलग चौथ्या वर्षीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्वत:कडे ठेवण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याने नवीन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. पालिकेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीने काँग्रेसला 'एक वर्ष स्थायीचे अध्यक्षपद तुम्हाला दिले जाईल,' असा शब्द दिला होता. यंदाच्या वर्षीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार असल्याने या निवडणुकीत काँग्रेसकडून चंदू कदम, भाजपकडून मुक्ता टिळक, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी कदम यांनी अर्ज भरला होता. राष्ट्रवादी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेईल, असा विश्वास पहिल्या दिवसापासून काँग्रेसचे पालिकेतील नेते व्यक्त करत होते; मात्र सभागृह नेते सुभाष जगताप यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढणारच, असे जाहीर केले होते.

पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मिळवण्यासाठी कोणती खेळी खेळली जाणार, स्थायीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणता नवीन पॅटर्न समोर येणार, याची ‌उत्सुकता सर्वांनाच लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन उमेदवारांची नावे जाहीर होइपर्यंत अध्यक्षपद मिळवण्यासाठी कोणत्या पक्षाची मदत घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप यांनी काम पाहिले. तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे जाहीर करून माघार घेण्यासाठी पीठासन अधिकाऱ्यांनी १५ मिनिटांची वेळ दिली. या वेळेत काँग्रेसच्या कदम यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अश्विनी कदम यांचा विजय निश्चित झाला. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने विकासकामे करण्यास अडथळे निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करत असल्याचे जाहीर करत मनसेच्या सभासदांनी कदम यांना मतदान केले. सेनेने भाजपला मतदान केले.

'यंदा आम्हीच, पुढच्या वर्षी तुम्ही'

राजकारणात कधी काय होईल आणि काहीही मनात नसताना कुणाला लॉटरी लागेल, हे सांगता येत नाही, असे म्हणतात ते काही खोटे नाही. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीतही असेच काही घडले, ज्यामुळे काँग्रेसला आपला उमेदवार मागे घ्यावा लागला.

महापालिकेच्या २०१२-१३च्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पाच वर्षांतील एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन काँग्रेसला त्या वेळी देण्यात आले होते. गेली तीन वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद भोगल्यानंतर चौथ्या वर्षी काँग्रेसला संधी देण्याचे ठरले असल्याचे जाहीर करत पालिकेतील काँग्रेसच्या नेत्यांनी हे पद आम्हालाच मिळणार असल्याचे गृहीत धरले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या विश्वजित कदम यांनी आपले नातेवाइक असलेल्या चंदू कदम यांना या पदावर बसवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचा उमेदवारी अर्जही आणला. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी चंदू कदम यांची वर्णी लागणार हे निश्चित मानले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेसह, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने चालतो. 'दादां'च्या इच्छेविरोधात राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा आदेश येथे चालत नाही.

'स्थायी'च्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला सहकार्य करण्यासाठी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सुरुवातीच्या काळात 'दादां'कडे न जाता थेट वरिष्ठ पातळीवर कारभार पाहणाऱ्या 'साहेबांकडे' धाव घेत मदत करण्याचे आवाहन केले. त्यामुळे काहीशा नाराज झालेल्या 'दादां'नी 'स्थायी'ची निवडणूक लढवायचीच आहे, कामाला लागा, असे आदेश पालिकेतील आणि शहरातील पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यानच्या काळात नाराज झालेल्या दादांची मनधरणी करण्यासाठी अनेक पातळ्यांवरून प्रयत्न करण्यात आले. पण त्यामध्ये यश आले नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चौथ्या वर्षीचे स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने काँग्रेला दिले होते. अरविंद शिंदे त्या वेळी अध्यक्ष झाले होते. त्यानंतरच्या वर्षी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदाची टर्म असतानाही तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्याविरोधात शंकर पवार यांना काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्या वेळी काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत गणेश बीडकर यांना संधी देऊन 'पुणे पॅटर्न' अस्तित्वात आणला होता. यंदाही काँग्रेसला अध्यक्षपद दिले आणि पुढील वर्षी त्यांनी जुनी नीती पुन्हा अवलंबली, तर सत्ता असूनही राष्ट्रवादीला पदापासून वंचित रहावे लागेल, यासाठी 'यंदा आम्हीच, पुढच्या वर्षी तुम्ही' असे आश्वासन देत दादांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या पहिल्या, स्थायीच्या तिसऱ्या महिला अध्यक्षा

अश्विनी कदम यांच्या रूपाने राष्ट्रवादीने पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान एका महिलेला दिला आहे. यापूर्वी काँग्रेसने नीता रजपूत आणि संगीता देवकर यांना स्थायी समितीत संधी देऊन त्यांना अध्यक्षपद दिले होते. काँग्रेसने मार्च १९९४ ते ९५ या काळात रजपूत यांना, तर मार्च २००४ ते २००५ या वर्षात देवकर यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हार्ड रॉक’: मेट्रो अधिक खर्चिक?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकप्रतिनिधींपासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकजण शहरात भुयारी मेट्रोचा आग्रह धरत असले, तरी पुण्यासारख्या शहरात जमिनीखाली असलेल्या 'हार्ड रॉक'मधून मेट्रो नेणे अतिशय जिकिरीचे ठरणार आहे. बेंगळुरूमध्येही जमिनीखाली असाच 'हार्ड रॉक' असल्याने तेथील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित राहिले असून, त्यामुळे खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

एलिव्हेटेड ऐवजी भुयारी मेट्रो झाली, की शहरातील सर्व प्रश्न सुटतील, असा दावा स्वयंसेवी संस्था आणि काही लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. रस्त्याऐवजी मेट्रोचे काम जमिनीखाली सुरू राहिल्यास कोणतेच अडथळे येणार नाहीत, असे सांगितले जात असले, तरी त्यात तथ्य नसल्याचे बेंगळुरू मेट्रोच्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे. मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी आवश्यक बोगद्यांची खोदाई करणाऱ्या दोन अद्ययावत मशिनद्वारे काम सुरू झाले. परंतु, बेंगळुरूमध्ये जमिनीखाली अत्यंत कठीण दगड असल्याने कामात वारंवार अडथळे निर्माण झाले. त्याचा फटका अत्याधुनिक मशिनला बसल्याने एक मशिन नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे, मेट्रोला आणखी विलंब होत आहे. या विलंबामुळे २००६ मध्ये भूमीपूजनावेळी अंदाजित धरण्यात आलेला ४२ किमीच्या मार्गासाठीचा ६ हजार कोटींचा खर्च आत्ताच १४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे, पाच वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प आठ वर्षे होऊनही अद्याप अपूर्णावस्थेतच आहे.

बेंगळुरूप्रमाणेच दख्खनच्या पठारावर आणि सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या पुण्यामध्ये बहुतांश भागांत जमिनीखाली कठीण दगड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, शहरातील एकूण ३१ किमीपैकी अवघ्या पाच किमीचा मार्गच भुयारी आखण्यात आला आहे. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी मेट्रो एलिव्हेटेड आहे. त्यामुळे, आता पुन्हा पुण्याच्या मेट्रोमध्ये बदल करायचा झाल्यास, भविष्यात होणारा विलंब आणि वाढता खर्च याचाही साकल्याने विचार करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही पालिकांचा PMP ला ठेंगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी रहदारी शुल्क बंद झाल्यापासून पूर्ण रिकामे झालेले पालिकेच्या मालकीचे जकात नाके पीएमपीला द्यावे, अशी मागणी करूनही त्याकडे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. दोन्ही शहरांतील मुख्य रस्त्यांलगतच्या सोळा जकात नाक्यांची मागणी पीएमपीने पालिकेकडे केली असून, महिना उलटूनही त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दोन्ही पालिकांचे प्रत्येकी तीन पदाधिकारी पीएमपीच्या संचालक मंडळावर असूनही, जागा मिळविण्यासाठी पीएमपीला अजून झगडावे लागत आहे.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर काही काळ रहकारी शुल्क (एस्कॉर्ट) सुरू असले, तरी गेल्या १५ ऑगस्टपासून ते पूर्णतः बंद झाले आहे. जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांवर 'ट्रान्सपोर्ट हब' सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मांडला होता. खासगी बस, पीएमपी आणि रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीसाठी त्याचा वापर करण्याचे नियोजन होते. हा प्रस्ताव सहा महिन्यांहून अधिक काळ पक्षनेत्यांच्या मान्यतेसाठी रखडला आहे. तोवर, पालिकेच्या जकात नाक्यांपैकी सात महत्त्वाच्या जागा पीएमपीला बस पार्किंगसाठी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी पालिका आयुक्तांसह महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. रस्त्याच्या लगत असणाऱ्या आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या पिंपरीतील नऊ जकात नाक्यांची जागा उपलब्ध व्हावी, असा आग्रह पिंपरी-चिंचवड पालिकेकडेही धरण्यात आला आहे. जकात नाक्यांच्या जागांबाबतचे धोरण निश्चित होत नाही, तोवर तात्पुरत्या स्वरूपात पीएमपीला या जागा द्याव्यात; त्यानंतर दोन्ही पालिका निर्णय घेतील त्यानुसार पीएमपी जागा वापरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, जकात नाक्यांची हक्काची जागा सोडण्यास दोन्ही पालिका तयार नाहीत. या वेळकाढू भूमिकेमुळे तेथे अनधिकृत व्यवसाय आणि पार्किंग वाढण्यास सुरुवात झाली आहे.

हितसंबंधासाठीच जागा देण्यास टाळाटाळ?

रहदारी शुल्क बंद झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या एलबीटी विभागाने अवघ्या महिन्याभरात सर्व जागा पालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाकडे हस्तांतरित केल्या. त्यानंतर, या जागांकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळच मिळाला नसून, या ठिकाणी आसपासच्या परिसरातील व्यावसायिक अनधिकृतपणे पार्किंग करत आहेत. त्यांना हटकणारेच कोणी नसल्याने जकात नाक्यांच्या जागांबाबत त्वरेने निर्णय घेण्यात आली नाही, तर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे पालिकेकडे मागितलेल्या जागा

शेवाळेवाडी (सोलापूर रस्ता), भेकराईनगर (सासवड रस्ता), बालेवाडी (कात्रज-देहूरोड बायपास), फुगेवाडी (पुणे-मुंबई रस्ता), चंदननगर (नगर रस्ता), शिंदेवाडी (सातारा रस्ता) आणि भूगाव (पौड रस्ता)

पिंपरी-चिंचवड पालिकेकडे मागितलेल्या जागा

फुगेवाडी (पुणे-मुंबई रस्ता), मोशी (नाशिक रस्ता), निगडी (पुणे-मुंबई रस्ता), दिघी (आळंदी रस्ता), किवळे फाटा (मुंबई रस्ता), वाकड-हिंजेवाडी चौक (बायपास रस्ता) तळवडे नाका आणि रावेत नाका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैवविविधता मंडळ काय करतेय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'होळीच्या प्रथेसाठी दर वर्षी एरंडाची शेकडो झाडे तोडल्यामुळे अत्यंत महत्त्वाची वनौषधी नष्ट होत असताना राज्याचे जैवविविधता मंडळ काय करते आहे,' अशा शब्दांत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जैवविधता मंडळाचे कान उपटले आहेत. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी काय करता येईल, याचे प्रतिज्ञापत्र तातडीने सादर करण्याचे आदेशही न्यायाधिकरणाने मंडळाला दिले आहेत.

दर वर्षी होळीच्या निमित्ताने होणारी एरंड या वनौषधीची बेसुमार कत्तल थांबवण्यासाठी अॅड. असीम सरोदे आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वकिलांच्या टीमने राष्ट्रीय हरित लवादासमोर दाखल केलेल्या पर्यावरणहित जनहितयाचिकेची सुनावणी होळीच्या दिवशीच झाली. या वेळी राष्ट्रीय हरित लवाद न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस पाठवली आहे. या याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

राज्यात सध्या नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर एरंड ही बहुमूल्य वनौषधी दिसत असली, तरी दर वर्षी तिचे प्रमाण वेगाने घटते आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी, तसेच राज्य शासनाला वर्षाला दोन कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या एरंडाच्या झाडांचा होळीच्या वेळी करण्यात येणारा वापर हा पर्यावरण याचिकेचा विषय आहे. एरंड या वनस्पतीच्या बिया, फुले, साल, मुळे आणि लाकूड अत्यंत उपयुक्त आहे.

धुळवड पार्टीवर वारज्यात कारवाई

'डीजे'च्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद नृत्य करत धुळवड साजरी करणाऱ्या २५० तरुण-तरुणींवर वारजे पोलिसांनी कारवाई केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. राजाराम पुलाजवळील दी रिपब्लिक हॉटेल येथे विनापरवाना सुरू असलेली ही धुळवड 'पार्टी' उधळून लावत दोघांना अटक करण्यात आली. तरुण-तरुणींना समज देऊन सोडण्यात आले.

हॉटेल मालक अभिषेक रामकृष्ण पवार (३१, रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि आयोजक वैभव नंदकुमार शेळके (२५, रा पर्वती, सहकारनगर) यांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती वारजे-माळवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली. वारजे पोलिसांकडून धुळवडीनिमित्त बंदोबस्त सुरू असताना हॉटेलमधून 'डीजे'चा जोरजोरात आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर ही कारवाई झाली.

शेळकेने या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी प्रत्येकाकडून ३०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या पार्टीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. पोलिसांनी छापा घातला, तेव्हा 'डीजे'च्या तालावर सुमारे २५० तरुण-तरुणी नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या वेळी हॉटेलमधून अंदाजे दोन लाख रुपये किमतीची डीजे व म्युझिक सिस्टीम जप्त केली.

संरक्षित वृक्षवल्ली का जाहीर करत नाही?

राज्य जैवविविधता मंडळ त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसल्याने प्रत्येक सणाला अशा वेगवेगळ्या वृक्षांची तोड सर्रास सुरू आहे. मंडळाने अशा वृक्षवल्लींना 'संरक्षित वृक्षवल्ली' म्हणून जाहीर करणे आवश्यक असतानाही, त्यांच्याकडून कोणते काम झालेले नाही. राज्य सरकारने मंडळ स्थापन करून चार वर्षे उलटली तरी हे मंडळ कार्यरत नाही,' अशी बाजू आम्ही न्यायाधिकरणासमोर मांडली असल्याचे सरोदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम क्षेत्राला सरकारने प्रोत्साहन द्यावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्याची आणि लाखो रोजगारांच्या निर्मितीची क्षमता बांधकाम क्षेत्रात आहे. ही संधी ओळखून सरकारने बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवरांनी नुकतेच व्यक्त केले.

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'इकॉनॉमिक टाइम्स रिअॅल्टी कनव्हेन्शन'मध्ये बांधकाम आणि संबंधित अन्य विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये स्मार्ट सिटीजपासून सस्टेनेबल-अॅफोर्डेबल हाउसिंग अशा विविध विषयांवरील चर्चांमध्ये सद्यस्थितीचा आढावा घेऊन भविष्यकाळाची दिशा या मान्यवरांनी मांडली.

'बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली, तर सिमेंट, स्टील अशा अन्य क्षेत्रांनाही चालना मिळते आणि अर्थव्यवस्थेची बंद पडलेली चाके फिरू लागतात. त्यामुळे सरकारने ही संधी गमावून चालणार नाही,' असे मत 'कुमार अर्बन डेव्हलपमेंट'चे सीएमडी ललितकुमार जैन यांनी व्यक्त केले. दरम्यान, 'स्मार्ट सिटी कन्सेप्ट-फ्रॉम व्हिजन टू अॅक्शन पॉइंट' या विषयावरील चर्चेत जैन यांच्यासह 'मेटाफर डिझाइन'च्या प्रिन्सिपल आर्किटेक्ट आमला सेठ, लव्हेकर डिझाइन असोसिएट्सचे अश्विन लव्हेकर,परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, अलाइड डिजिटल सर्व्हिसेसचे ग्लोबल सीईओ परेश शहा, 'एसएसआयएल'चे जेएमडी संदीप सोमाणी, 'केपीएमजी'चे पार्टनर जयेश कारिया आणि गोयल गंगा ग्रुपचे एमडी अतुल गोयल यांनी भाग घेतला.

लोकांच्या गरजा ओळखून त्यांना दर्जेदार दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी स्मार्ट गव्हर्नन्स ही आवश्यक बाब असल्याचे लव्हेकर म्हणाले. इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नन्स, हेल्थकेअर, शिक्षण या विषयांवर भविष्याचा वेध घेऊन २०३०पर्यंतचा कार्यक्रम आखणे आवश्यक असल्याचे अतुल गोयल म्हणाले. स्मार्ट सिटीसाठी निधी हा मुद्दा दुय्यम असून, त्यासाठी आवश्यक मानसिकता तयार करणे महत्त्वाचे असल्याचे जैन यांनी सांगितले. या संकल्पनेत तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक असल्याचे शहा यांनी नमूद केले. सरकार, खासगी क्षेत्र आणि तंत्रज्ञ यांनी याबाबत एकत्रित नियोजन करावे, असे सेठ म्हणाल्या.

'सस्टेनेबल अँड अफोर्डेबल हाउसिंग सोल्युशन फॉर अ बेटर टुमॉरो'या चर्चासत्रात कोलते-पाटील डेव्हलपर्सचे सीईओ अतुल काळेले, नाईकनवरे डेव्हलपर्सचे संचालक हेमंत नाईकनवरे, श्रीकांत परांजपे, प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्सचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट प्रसन्न देसाई, सुनील पाटील अँड असोसिएट्सचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट सुनील पाटील सहभागी झाले होते. सस्टेनेबल हाउसिंगसाठी सर्वंकष विचार केला पाहिजे, असे मत या मान्यवरांनी व्यक्त केले. अफोर्डेबल हाउसिंगसाठी सरकारने पुढाकार घेऊन आणि बांधकाम क्षेत्राला विश्वासात घेऊन योग्य धोरणे आखावीत, ग्लोबल एफएसआय द्यावा आणि योग्य इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी पावले टाकावीत, अशी मते यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच 'एसएसआयएल'चे व्हाइस प्रेसिडेंट व्ही. कृष्णमूर्ती यांनीही या वेळी सादरीकरण केले. टीसीएल, 'बीसीसीएल'च्या प्रोजेक्ट हेड फ्लॅव्हिया परेरा आणि 'एसआयएल'चे जेएमडी संदीप सोमाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

उपक्रम कशासाठी?

येत्या २०२५पर्यंत देशात सुमारे पावणेदोन कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता बांधकाम क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे या क्षेत्रासमोरील आव्हाने व संधींबाबत चर्चा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे 'टाइम्स कॉन्फरन्स लिमिटेड'चे प्रेसिडेंट दीपक लांबा यांनी या परिषदेच्या निमित्ताने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूळ खात पडलीय ९० लाखांची मशीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेंटल हॉस्पिटलमध्ये मनोरुग्णांचे कपडे धुण्यासाठी आरोग्य खात्याने प्रत्येकी ४५ लाख रुपयांचे खरेदी केलेले दोन ड्रायर धुलाई मशीन धूळखात पडून असल्याचे उघडकीस आले. आमदार जगदीश मुळीक यांनी हॉस्पिटलला अचानक भेट दिली. त्यावेळी कामगारांऐवजी चक्क मनोरुग्णच पीठ गिरणीवर दळण दळत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

मेंटल हॉस्पिटलसंदर्भातील त्रुटी आणि गैरसोयींबाबत पेशंटसह नातेवाइकांनी अनेकदा तक्रारी केल्या. या तक्रारींची वारंवार 'मटा'ने दखल घेतली. त्यानंतरही मेंटल हॉस्पिटल प्रशासनाला जाग आली नसल्याचे स्पष्ट होत आहे. हॉस्पिटल संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार मुळीक यांनी अचानक दुपारी मेंटल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच हॉस्पिटल प्रशासनाचा गैरकारभार सुरू असल्याचेही निदर्शनास आले.

मेंटल हॉस्पिटलमधील अठराशेहून अधिक असलेल्या पेशंटचे कपडे धुण्यासाठी एक हजार किलो क्षमतेचे दोन वॉशिंग मशीन आहेत. तसेच दोन ड्रायर मशीनची २००९ मध्ये खरेदी करण्यात आली आहेत. नव्वद लाख रुपये किंमतची ही दोन मशीन २००९ पासून हॉस्पिटलमध्ये धूळखात पडून असल्याचे दिसून आले. त्याशिवाय पीठ गिरणीच्या ठिकाणी मनोरुग्ण काम करीत असल्याचे आढळून आले. कामगार गैरहजर असल्याने त्यांच्याऐवजी मनोरुग्णच दळण दळत असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी मुळीक यांनी विविध वॉर्डांची पाहणी केली. वॉर्डात वीज व्यवस्था योग्य नसल्याचे दिसून आले. तसेच घाण, अस्वच्छता, दुर्गंधी पाहायला मिळाली. स्वच्छतागृह, शौचालयात बल्ब नसल्याचे आढळले. हॉस्पिटलमध्ये रामभरोसे कारभार सुरू असून, यासंदर्भात आमदार मुळीक यांनी संताप व्यक्त केला. मात्र, शासकीय कामानिमित्ताने वैद्यकीय अधीक्षक मुंबईला गेल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मनोरुग्णांना देण्यात येणाऱ्या कपड्यांचा दर्जाही निकृष्ट असल्याचे मुळीक यांना आढळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंच न्याय देईल?

0
0

अॅड. प्रणाली सावंत

पुण्यात आजपासून (७ मार्च) राज्य आयोगाचे सर्किट बेंच कामकाज पाहणार आहे. १३ मार्चपर्यंत बेंचचे कामकाज चालेल. यानिमित्ताने पुण्यातील प्रलंबित प्रकरणे येथेच निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

राज्य आयोगाचे सर्किट बेंच पुणे व अन्य तीन जिल्ह्यांसाठी मंजूर झाल्याची बातमी आली आणि ग्राहक चळवळीशी निगडीत सर्वांमध्ये एक उत्साहाचे व आशादायी वातावरण तयार झाले. सर्किट बेंचच्या स्थापनेच्या बातमीबरोबर सर्किट बेंचचे कामकाज कशा प्रकारे चालेल? मुंबईहून सर्व अपील पुणे येथे वर्ग होतील का? नवीन नेमणुका करणार का? कामकाज कुठे चालेल? या शंका सर्वांच्या मनात उभ्या राहत आहेत. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे यशावकाश मिळतीलच; पण सध्या ७ मार्च २०१५ ते १३ मार्च २०१५ या कालावधीमध्ये पुणे येथे राज्य आयोगाचे सर्किट बेंच कामकाज चालेल. राज्य आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण व पी. बी. जोशी यांचे खंडपीठ अपिलाचे काम पाहतील. तसेच हे सर्किट बेंच नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आपले कामकाज करेल.

ज्यांची अपील किंवा अन्य अर्ज मुंबई येथे प्रलंबित आहेत. ज्यांना पुणे येथे आपले प्रकरण चालवायचे आहे त्यांनी आपले प्रकरण येथे चालविणेत यावे, असा अर्ज देणे आवश्यक आहे. अपिलातील दोन्ही पक्षकारांची हरकत नसल्यास, अशी अपील पुणे येथे ७ ते १३ मार्च या कालावधीमध्ये चालविली जातील. त्यामुळे अशा प्रकारची लेखी संमती अथवा अर्ज तातडीने, पुणे येथील ग्राहक न्यायमंच किंवा राज्य आयोग, मुंबई यांच्याकडे इच्छुक पक्षकारांनी किंवा त्यांच्या वकिलांनी द्यावेत. म्हणजे त्यांच्या फाइल पुणे येथे पाठविण्याची व्यवस्था करून, अशा अपीलची अथवा अन्य अर्जांची सुनावणी ७ मार्च ते १३ मार्च या कालावधीमध्ये पुणे येथे घेता येणे शक्य होईल.

सध्या राज्य आयोगाचे सर्किट बेंच पुणे येथे महिन्यातील काही कालावधी करितासाठी राहील. पहिलेच सिटिंग असल्यामुळे पक्षकारांच्या संमतीने किंवा अर्जांप्रमाणे प्रकरणे पुणे येथे वर्ग करण्यात येत असली तरीही कालांतराने पुण्याची सर्वच अपिल्स मुंबईवरून पुणे येथे वर्ग करण्यात येतील. या संदर्भातील प्रतिसाद व अनुभव पाहून पुणे येथे कायमस्वरूपी बेंचची आवश्यकता आहे का? याबाबत भविष्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पुण्याला सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची व ग्राहकांच्या सोयीची गोष्ट होईल ती म्हणजे मंचाच्या आदेशाविरुद्ध अपील पुण्यालाच दाखल करण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. म्हणजेच काही कालावधीनंतर पुण्याच्या पक्षकारांना किंवा वकिलांना पुण्याच्या केसेससाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता उरणार नाही. मुंबईला राज्य आयोगाकडे महाराष्ट्रातील ४० जिल्ह्यांतील अपील चालतात. एवढ्या मोठ्या संख्येतून आपला नंबर येईल तेव्हा प्रकरण ऐकलं जायचे किंवा एवढ्या मोठ्या संख्येमुळे तारखाही लांबच्या पडायच्या. मात्र, या नवीन व्यवस्थेमुळे म्हणजेच सर्किट बेंचमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा, तर वाचेलच पण त्यांना खऱ्या अर्थाने जलद न्याय मिळू शकेल.

राज्य आयोगाचे सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती चव्हाण यांचा नवीन तंत्रज्ञानावर प्रचंड विश्वास आहे. ग्राहक न्यायमंच व राज्य आयोगाचे कामकाज नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अत्यंत सोपे व सहज करण्याचा त्यांचा मानस आहे. येत्या काळामध्ये ते त्यांच्या कल्पना सगळ्यांसमोर मांडतील व त्याची अंमलबजावणी देखील करून घेतील. फक्त त्यांच्या या नवीन कल्पनांना यशस्वी करण्यासाठी ग्राहक, ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते, राज्यकर्ते, कर्मचारी व वकील या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद व प्रयत्न आवश्यक आहेत. पुण्याची बुद्धीजीवी व स्वत: नवीन प्रयोगांमध्ये आघाडीवर असणारी मंडळी यात मागे पडणार नाहीत व त्या निमित्ताने ग्राहक यंत्रणा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात आपण सगळेजणच यशस्वी होऊ ही आशा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर ‘लाइफ सर्टिफिकेट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रॉव्हिडंट फंडची (पीएफ) पेन्शन सुरू राहण्यासाठी ​पेन्शनरधारकांना 'लाइफ सर्टिफिकेट' द्यायचे असल्यास आता एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनच्या (ईपीएफओ) कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. कारण लवकरच हे प्रमाणपत्र मोबाइलवरून देण्याची सुविधा केली जाणार आहे.

'ईपीएफओ'ने याबाबत प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प दिल्ली आणि चंडीगड येथे सुरू केला आहे. लवकरच ही सुविधा सर्व विभागीय कार्यालयांमध्ये होणार आहे. पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या 'पीएफ' पेन्शनरांना याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे 'ईपीएफओ'च्या पुणे कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

'पीएफ'च्या प्रत्येक पेन्शनरधारकाला दर वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये लाइफ सर्टिफिकेट द्यावे लागते. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 'ईपीएफओ'च्या कार्यालयात यावे लागते. त्याचा त्यांना त्रास होत असतो. त्यामुळे ही सुविधा पुण्यामध्ये करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइलवरून लाइफ सर्टिफिकेट देण्याची सुविधा हवी असल्यास पेन्शनरांना त्यांची वैयक्तिक माहिती 'ईपीएफओ' कार्यालयाकडे सादर करावी लागेल. त्यामध्ये आधार कार्ड नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक खाते आणि मोबाइल क्रमांक आदी माहितीचा समावेश आहे. ही माहिती दिल्यानंतर पेन्शनरांना लाइफ सर्टिफिकेट देण्यासाठी 'ईपीएफओ'च्या कार्यालयात येण्याची गरज राहणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images