Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

युरोपासह अमेरिकेला पुण्याच्या गुलाबाचा हेवा

$
0
0

'व्हॅलेन्टाइन'साठी परदेशात फुलांची निर्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि परिसरात उत्पादन होत असलेल्या रंगीबेरंगी गुलाबांचा गंध मुंबईसह भारताबरोबर आता युरोप आणि अमेरिकेतही दरवळू लागला आहे. प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणाऱ्या 'व्हॅलेन्टाइन डे' साठी पुण्यातून यंदा दीड कोटी गुलाबाच्या फुलांची निर्यात झाली आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात गुलाबांच्या फुलांची मोठी आवक होऊ लागली. गुलाबाच्या २० जुडींना १२० ते २२० रुपये दर मिळाला असून एका फुलासाठी दहा ते अकरा रुपये दर मिळाला आहे. 'पूर्व युरोपातील रशिया, कझाकिस्तान, उक्रेन या देशामध्ये आर्थिक संकट ओढवल्याने त्या ठिकाणाहून होणारी गुलाबाच्या फुलांची यंदा मागणी घटली आहे. परिणामी, पश्चिम युरोपातील हॉलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, युके, नॉर्थ स्वीडन, तसेच उत्तर अमेरिकेतही गुलाबाच्या फुलांची निर्यात वाढली आहे. पुणे आणि परिसरातून यंदा ४० ते ४५ लाख फुलांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात झाली होती. आता एका फुलाला आता १० ते १४ रुपये दर मिळू लागला आहे,' अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनलचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी 'मटा'ला दिली.

'पुण्यात वीस गुलाबाच्या जुड्यांना २२० रुपये दर मिळाला आहे. शहरासह बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांनी फुलांची गुरुवारी खरेदी केली. इंदूर, भोपाळ, अहमदाबाद, मुंबई, रत्नागिरीसह कोकण आणि कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी फुलांची खरेदी केली. गुलाबाला चांगली मागणी असून व्हॅलेंटाइन डेला अधिक आ‍वक होईल. त्याशिवाय स्थानिक भागातून मागणी वाढेल. पुण्यासह जातेगाव, यवत, आळंदी येथून फुलांची आवक झाली. तळेगावातून फुलांची थेट युरोपला निर्यात होते', अशी माहिती मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

पुणे प्रादेशिक बाजार समितीचे फूल विभागाचे प्रमुख प्रदीप काळे म्हणाले, 'मार्केट यार्डाच्या फुलबाजारात गुलाबाच्या फुलाची आठ ते बारा हजार जुड्यांची आवक झाली. त्याला १२० ते २२० रुपये दर मिळाला. दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र मागणी वाढली आहे. साधारण दररोज चार हजार जुड्यांची आ‍वक होते. खेड, तळेगाव, लोणी, शेळ पिंपळगाव, चाकण भागातून फुलांची आयात होते.'
......

इंग्लंडसह युरोपातील देशांमध्ये तळेगाव भागातून दीड कोटी फुलांची निर्यात करण्यात आली. त्या ठिकाणी १४ रुपये दर मिळाला. दिल्ली, रायरपूर, कानपूर, भोपाळ, कोलकात्ता, चंदीगड अशा राज्यांमध्ये येथून एक कोटी फुले खरेदी करण्यात आली. त्याला नऊ ते दहा रुपये असा दर मिळाला.
शिवाजी भेगडे - अध्यक्ष पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ


श्रद्धेचे नियंत्रण विवेकाने व्हावे

$
0
0

नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'श्रद्धेचे नियंत्रण विवेकाने करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास श्रद्धा भरकटते. याचा अर्थ धर्माच्या नावाखाली होणारी प्रत्येक गोष्ट धार्मिक असते असे नाही,' असे मत नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी मांडले.

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना गौरवण्यात आला. या कार्यक्रमात 'संत विवेकाचा आधारू' या विषयावर मोरे यांचे व्याख्यान झाले.

'आपल्याकडे वक्त्यांना विचारवंत व तंत्रज्ञांना वैज्ञानिक म्हणणे खेदजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम विध्वंसक असून, समाजासाठी आवश्यक आहे. कारण, त्यामागे विवेकाची दृष्टी व नवसमाजनिर्मितीची सकारात्मक भूमिका आहे,' असे डॉ. मोरे म्हणाले.

अनुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वापर करण्याला बुद्धी म्हणतात. अनुभवाच्या मर्यादा बुद्धीने पार करून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. आधी अनुभवातून ज्ञान मिळते. त्यात काही घटक मिसळून बुद्धी विकसित होते असे पाश्चात्य तत्त्वज्ञान सांगते. याचा अर्थ, विज्ञानात बुद्धीला संधी मिळते. मात्र विज्ञान परिपूर्ण आहे असे नाही. बुद्धीचे नियंत्रण विवेक करतो इतका विज्ञानाचा विचार व्यापक आहे. विज्ञान हा काही एकट्याने करायचा व्यवहार नाही. अनेक लोक एकत्र येऊन तो करावा लागतो. वैज्ञानिकांच्या गटात काही गोष्टीं अशा असतात, ज्या बुद्धीने चालत नाहीत. विज्ञानाचे निकष बुद्धीने नाही; तर विवेकाने ठरतात. धर्मातही तेच झाले पाहिजे,' असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या रोहितची ‘इस्रो’त भरारी

$
0
0

बाविसाव्या वर्षी शास्त्रज्ञ म्हणून निवड

>> संदीप भातकर, येरवडा

पुण्यातील रोहित पाटील या तरुणाची अवघ्या बाविसाव्या वर्षी भारतीय अवकाश विज्ञान संस्थेत (इस्रो) शास्त्रज्ञपदी निवड झाली आहे. बुद्धी आणि चिकाटीच्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे. मागील वर्षी 'इस्रो'त निवड झालेल्या शेकडो शास्त्रज्ञांमध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा, तर पुण्यातून एकट्या रोहितचा समावेश आहे.

इस्रो ही जगातील अग्रगण्य संस्थापैकी एक असलेली भारत सरकारची संस्था आहे. अशा नामवंत संस्थेत शास्त्रज्ञ पदावर कमी वयात निवड झाल्याने पाटील कुटुंबावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाटील कुटुंब हे मूळचे कोल्हापूरचे; पण रोहितच्या शिक्षणाकरिता काही वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झाले होते.

'चाळीसगावमधील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक, तर दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील गुड शेफर्ड हायस्कूलमध्ये पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अकरावीला असतानाच आयआयटी संस्थेत प्रवेश घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच तयारीला लागलो. याच दरम्यान 'इस्रो'विषयीची माहिती समजल्यानंतर प्रवेश परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१० साली बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर 'इस्रो'कडून घेण्यात येणाऱ्या 'आयसर' या प्रवेश परीक्षेला बसलो आणि उत्तीर्ण झालो. त्यानंतर काही महिन्यांनी त्रिवेंद्रम येथील भारतीय अवकाश विज्ञान महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. चार वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमानंतर २०१४ साली फिजिकल सायन्स विषयात बी. टेक. पदवी प्राप्त केली. २२ ऑगस्ट २०१४ रोजी 'इस्रो'कडून मला शास्त्रज्ञ या पदाकरिता निवड झाल्याचे पत्र देण्यात आले,' अशी माहिती रोहितने दिली.

महाराष्ट्रातील चारपैकी पुण्यातून रोहित

मागील वर्षी 'इस्रो'त भरती झालेल्या सुमारे ऐंशी शास्त्रज्ञांमध्ये महाराष्ट्रातील केवळ चार जणांचा समावेश आहे. या चार शास्त्रज्ञांत पुण्यातून एकट्या रोहितचा समावेश आहे.

मोदींना साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करणार

$
0
0

स्वागताध्यक्ष भारत देसडला यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंजाबमधील घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांच्या बारामती दौऱ्यात भेट घ्यायची, की दिल्लीत जाऊन भेटायचे हे अद्याप ठरलेले नाही.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, मृणाल कुलकर्णी, संजय मोने, अवधूत गुप्ते, सुबोध भावे, शर्वरी जमेनीस, अश्विनी एकबोटे, भार्गवी चिरमुले, वैभव जोशी आदी सेलिब्रेटींसह आतापर्यंत चौदाशे साहित्यप्रेमींनी शुल्क भरून नोंदणी केली आहे. अजून नऊशे जागा उपलब्ध आहेत. त्याशिवाय काही साहित्यप्रेमी स्वतःची सोय करून संमेलनाला येणार आहेत. त्यामुळे साडेपाच हजार साहित्यप्रेमी संमेलनाला येतील असा अंदाज असल्याचे देसडला यांनी सांगितले.

संमेलनासाठीच्या रेल्वेना गुरू नानक आणि संत नामदेव यांची नावे दिली जाणार आहेतरेल्वेच्या डब्यांना पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर अशा साहित्यिकांची नावे दिली जाणार आहेत. साहित्यप्रेमींसाठी डब्यांमध्येही पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नोंदणीसाठी मुदतवाढ

संमेलनातील ग्रंथप्रदर्शनावर घातलेला बहिष्कार प्रकाशकांनी मागे घेतल्यामुळे आता प्रकाशकांची नोंदणीही सुरू झाली आहे. वीस प्रकाशकांनी नोंदणी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे प्रकाशक आणि साहित्यप्रेमींच्या मागणीनुसार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता २८ फेब्रुवारीपर्यंत शुल्क भरून नावनोंदणी करता येईल. संमेलनाची नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६६५० ५५०५५ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन देसडला यांनी केले.

साहित्यिक तुमच्या भेटीला

साहित्य संमेलनानिमित्त संयोजन समितीच्या वतीने शाळा-कॉलेजमध्ये साहित्यिक तुमच्या भेटीला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे होणार आहे. संमेलनासाठी राज्यभरातील सात हजार ग्रंथालयांना निमंत्रित करण्यात आले आहे.

वेश्याव्यवसायप्रकरणी तीन विदेशी तरुणी ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढवा परिसरात असलेल्या शालिमार सोसायटीमध्ये छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी वेश्या व्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी युगांडा येथून शिक्षणासाठी आलेल्या तीन तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेली एक तरुणी शुक्रवारी बिझनेस व्हिसावर पुण्यात आली होती.

घर भाड्याने घेऊन वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्यामुळे घरमालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटो ज्युलिअस (रा. शालिमार सोसायटी, कोंढवा खुर्द, मूळ - युगांडा) याला अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कर्मचारी नितीन तेलंगे यांना या सोसायटीमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक संजय निकम आणि कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या युगांडामधील मुली दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी आल्या आहेत. तर एक तरुणी शुक्रवारी बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. अटक आरोपी कोटो हा सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहे.

चाकण विमानतळाच्या निर्णयाची आज ‘भरारी’?

$
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या चाकण दौऱ्यादरम्यान प्रस्तावित विमानतळाच्या भरारीकडे एक पाऊल पुढे टाकले जाणार का, याकडे उद्योगविश्वाचे लक्ष आहे. पंतप्रधानांसमवेत राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीई कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राइस, दक्षिण आशियाचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये जागतिक स्तरावरील अनेक बड्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांमुळे चाकण औद्योगिक वसाहत ऑटो हब म्हणून नावारूपाला आलेली आहे. मात्र, या वसाहतीच्या परिसरात दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नसल्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. खेड तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात यावा, अशी उद्योग क्षेत्राची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. परंतु, याकडे शासन स्तरावर लक्ष न दिल्यामुळे हा प्रकल्प मागे पडत गेला आहे.

कृषिविषयक शिक्षण आता मराठीतूनही

$
0
0

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची मान्यता; कृषी विद्यापीठातील भरतीही होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कृषिविषयक शिक्षण इंग्रजीबरोबरच आता मराठीतून घेण्यास विद्यार्थ्यांना ऐच्छिक करण्यात आले असून, कृषी विद्यापीठांधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवून ६२ वर्षे करण्यास राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शुक्रवारी मान्यता दिली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी भरतीवरील बंदी उठविण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे.

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी परिषदेच्या संचालक मंडळाची बैठक खडसे यांच्या उपस्थितीत झाली. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, परिषदेचे महासंचालक एम. एस. सावंत, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु व्यंकटेशवरल्लु, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आदी सदस्य बैठक उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्यानुषंगाने जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ऍग्रो इंजिनीअरिंग कॉलेज, पाल येथे फलोत्पादन कॉलेज, जळगांव येथे केळी संशोधन केंद्रात टिश्यूकल्चरद्वारे निर्मितीला प्राधान्य तसेच चाळीसगांवमध्ये संत्रा संशोधन केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अकोला कृषि विद्यापीठात गेल्या अनेक दिवसांपासून तात्पुरत्या स्वरुपात काम करीत असलेल्या १४३ अधिकाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीने विद्यापीठातील कर्मचारी भरती करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.

कृषी विभागाने केलेल्या एका पाहणीत, पूर्णा खोऱ्यातील जमिनी क्षारपड झाल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे; तसेच लोकांना कीडनी व अन्य मोठे आजारही होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठार्तंगत विशेष बाब म्हणून अशा जमिनींबाबत संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाषेची निवड करता येणार

'कृषी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी व मराठी भाषेतून अभ्यासक्रम शिकविला जात होता. आता तो ऐच्छिक ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांना भाषेची निवड करता येणार आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील महाविद्यालयांना मराठी विषय घ्यावा लागेल. शैक्षणिक नियमावलीत काही बदल करण्यात आले असून, ऍग्रो इंजिनीअर पदवी पाच वर्षांची असली आणि काही विषय राहिल्यास आठ वर्षांपर्यंत त्या विद्यार्थ्यांस परीक्षा देता येईल,' असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

दूधखरेदी बंदी निर्णयाला स्थगिती

$
0
0

महसूल व दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'परराज्यातील कंपन्यांनी महाराष्ट्रातील दूधाची न खरेदी करण्याच्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे,' अशी माहिती महसूल व दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व दूधाची विक्री होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

सहआयुक्त नीलिमा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी परराज्यातील कंपन्यांनी राज्यातील दुधाची खरेदी न करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे राज्यभरातील सुमारे चाळीस लाख लीटर दूध पडून राहिले. या दुधाची खरेदी राज्य सरकारला करावी लागली. या आदेशामुळे राज्य सरकारचे नुकसान झाले. परिणामी, राज्य सरकारने या आदेशाला स्थगिती दिली आहे.

परराज्यातील कंपन्यांना दूध खरेदीला बंदी करणारा हा आदेश कोणाशीही चर्चा न करता देण्यात आला होता. त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. तसेच असा आदेश का काढण्यात आला, त्याची चौकशीही राज्य सरकारच्या वतीने केली जाणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.


सिनेमातील शिव्यांवर सेन्सॉरबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एआयबी रोस्ट या कार्यक्रमातील अश्लील भाषेवर टीका झाल्यानंतर चित्रपटातील शिवराळ भाषेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) पुढाकार घेतला आहे. बोर्डाने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही शिव्यांची यादीच तयार केली असून, या शिव्या चित्रपटात न वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी बोर्डाने बंदी घातलेल्या काही शब्दांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. काही चित्रपटांतील शिवराळ भाषेवर बोर्डाने आक्षेप घेतला होता; मात्र ते शब्द चित्रपटांतून वगळले न गेल्याने चित्रपटांत वापरू नयेत असे शब्द बोर्डाने ठरवले आहेत. या नियम हिंदी चित्रपटांप्रमाणेच सर्व प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनाही लागू करण्यात आला आहे.

काही काळापूर्वी चित्रपटात दारू पिण्याच्या आणि सिगरेट ओढ‍ण्याच्या दृश्यांवरही बंदी घालण्यात आली होती; मात्र त्याला चित्रपटसृष्टीतून तीव्र विरोध झाल्यानंतर दारूची बाटली आणि सिगरेट ब्लर करून त्या दृश्यावेळी पडद्यावर वैधानिक इशारा देणे बोर्डाने बंधनकारक केले. अलीकडे वास्तववादाच्या नावाखाली चित्रपटांतील भाषा शिवराळ होत असल्यावर आक्षेप घेत शिव्यांवर नियंत्रण आणण्याचे बोर्डाने ठरवले आहे. त्यानुसार काही शिव्या चित्रपटात वापरता येणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

ठेकेदाराकडील बसचालकांचा मोर्चा

$
0
0

पीएमपीची सेवा विस्कळित
म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) खासगी बसच्या ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी सवलती देण्यासाठी कामगार आयुक्तालयावर मोर्चा काढला. सकाळच्या टप्प्यात ठेकेदारांच्या बस बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली; पण त्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, बहुसंख्य बस पुन्हा मार्गावर धावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

ठेकेदारांकडील चालकांना पीएमपीने सर्व सुविधा देण्याची मागणी केली जात होती; मात्र पीएमपी अथवा ठेकेदार यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच पीएमपीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने चालक जमा झाले होते. ठेकेदारांकडील बसचालक आंदोलनात सहभागी झाल्याने सकाळी गर्दीच्या वेळेत बऱ्याच बस रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्र कामगार मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली चालकांच्या शिष्टमंडळाने डॉ. परदेशी यांची भेट घेतली. चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देतानाच, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस मार्गावर आणा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार काही ठराविक ठेकेदारांच्या बसचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बस मार्गावर धावल्या.

दरम्यान, कामगार सहआयुक्तांनी महामंडळ व ठेकेदारांना कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली असल्याची माहिती दिलीप मोहिते यांनी दिली.

भरती प्रक्रिया पुन्हा होणार

पीएमपीतील चालक-वाहकांच्या भरतीला यापूर्वी दिलेली स्थगिती मागे घेत, ही सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) सहकार्याने पीएमपीने ही भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, केवळ अर्जस्वीकृती आणि त्याची छाननीचे अधिकार दिले असताना, एमकेसीएलने इच्छुकांची परीक्षा घेत त्याचा निकालही जाहीर केला. त्याला आक्षेप घेण्यात आल्याने या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. शुक्रवारी संचालक मंडळाने ही स्थगिती मागे घेत प्राप्त झालेल्या अर्जांनुसारच पुन्हा परीक्षा घेण्याच्या सूचना पीएमपी प्रशासनाला दिल्या. त्यासाठी पेपर काढण्याचे सर्वाधिकार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांना देण्यात आल्याची माहिती पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी दिली.

शववाहिनीच्या दरांत कपात

पीएमपीने गेल्या डिसेंबरमध्ये केलेल्या दरवाढीत 'पुष्पक' शववाहिनीच्या दरांमध्येही मोठी वाढ केली होती. त्यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे दर कमी करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. त्यानुसार संचालक मंडळाने 'पुष्पक'चे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता तीनशे रुपये आकारले जातील.

रिंग रोडची नव्याने आखणी करा

$
0
0

केंद्राला प्रस्ताव देण्याच्या गडकरी यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी नियोजित असलेल्या रिंगरोडची नव्याने आखणी करण्याची सूचना केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. पुण्याभोवती असलेल्या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नवीन आराखडा राज्य सरकारने दिल्यास रिंग रोड करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी शनिवारी दिले.

पुण्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्याभोवती रिंग रोड आखण्यात आला आहे. मात्र, त्या जमिनींवरील अतिक्रमणे झाली आहेत. पुण्याजवळ मुंबई-बेंगळुरू आणि पुणे-हैदराबाद हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्या महामार्गांना जोडणारी रिंगरोडची नव्याने आखणी करून त्याबाबत राज्य सरकारने पत्र द्यावे. त्यानंतर केंद्राकडून या योजनेसाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिंगरोड हा १९९७ च्या प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत या रस्त्याचे भिजत घोंगडे आहे. राज्य सरकारने या रस्त्याला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरून हा रस्ता जातो. शहरातील वाहतुकीवरील ताण या रस्त्यामुळे कमी होणार आहे. मात्र, कार्यवाही न झाल्याने या रस्त्याच्या नियोजित मार्गात अनेक अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नव्याने आखणी करण्याची सूचना गडकरी यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून पुण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची रस्त्याची कामे केली जाणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

बायो सीएनजी, इथेनॉलवरील बसेसचे धोरण

प्रदूषण वाढत असल्याने बायो ​सिएनजी, इथेनॉल आणि इलेक्ट्रॉनिकवरील बसेस चालविण्याचे धोरण तयार करण्यात आले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रदूषण रोखण्यासाठी वाहतुकीची रोप वे सिस्टिम, वॉटर पोर्ट, वॉटर वे यांसारखे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. याबाबत पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जमीन आणि पाण्यात चालू शकणाऱ्या वाहनाची मुंबईत लवकरच प्रात्यक्षिक आणि चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवस्मारकाचा मार्ग मोकळा

$
0
0

टेंडर काढून काम सुरू केले जाणार : मुख्यमंत्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास केंद्रीय पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याने जगातील सर्वांत उंच आणि मोठे स्मारक बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला करण्याऐवजी टेंडर काढून काम सुरू करूनच केले जाईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

'याबाबत ६० दिवसांचा हरकती आणि सूचनांचा कालावधी देण्यात आला होता. एकच हरकत आलेली होती. हा कालावधी संपताच २४ तासांमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जगातले सर्वांत उंच आणि मोठे स्मारक बांधले जाणार आहे,' ते म्हणाले. या स्मारकाचे १९ फेब्रुवारीला भूमिपूजन करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार टेंडर काढून थेट काम सुरू करूनच भूमिपूजन केले जाणार आहे. याबाबत १० दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुढची तारीख घेणार असल्याचे कळविल्याचे त्यांनी सांगितले.

'नवीन टोल धोरण आणणार'

राज्यातील ६५ टोल रद्द करण्यात आले असून, आणखी १०० टोलची यादी आली आहे. आगामी काळात सव्वाशे टोल बंद केले जाणार असून, देशामध्ये नवीन टोल पॉलिसी आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. टोल पॉलिसी अद्याप अंतिम झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपी​पी) मॉडेलनुसार सुमारे १०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यावरील टोल रद्द करून संबंधित कंत्राटदारांना रक्कम दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 'राज्यात तीन राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्न आहे. या रस्त्यांची कामे २००६ पासून बंद आहेत. त्याबाबत हायकोर्टात खटले दाखल आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री तसेच रस्ते आणि परिवहन मंत्री यांनी मार्ग काढावा,' असे हायकोर्टाने आदेश दिले होते. त्यानुसार तिघांची बैठक झाली. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल येथे असलेल्या अभयारण्यामुळे अडचण आहे. जावडेकर यांच्यामुळे यातून मार्ग काढला जाणार आहे. नागपूर-जबलपूर आणि वैनगंगा-छत्तीसगड या महामार्गांचा प्रश्न मार्गी लागू शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिव्यांवर सेन्सॉरची बंदी

$
0
0


पुणेः एआयबी रोस्ट या कार्यक्रमातील अश्लील भाषेवर टीका झाल्यानंतर, चित्रपटातील शिवराळ भाषेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) पुढाकार घेतला आहे. बोर्डाने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही शिव्यांची यादीच तयार केली असून, या शिव्या चित्रपटात न वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चित्रपटात 'बॉम्बे' या शब्दाऐवजी मुंबई याच शब्दाचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी बोर्डाने बंदी घातलेल्या काही शब्दांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. चित्रपटांत वापरू नयेत, असे शब्द बोर्डाने ठरवले आहेत. हा नियम हिंदी चित्रपटांप्रमाणेच सर्व प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनाही लागू करण्यात आला आहे.

सहावीच्या पुस्तकांना विलंब

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रम बदलांचे नियोजन बाजूला सारून गेल्या वर्षी पाचवीची पुस्तके छापण्यात टाळाटाळ करणाऱ्या 'बालभारती'ने यंदाही तोच कित्ता गिरविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच यंदा सहावीसाठीचा अभ्यासक्रम छपाईसाठी तयार झालेला असतानाही, त्यासाठीची नवी पाठ्यपुस्तके मात्र विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध होऊ शकणार नाहीत.

संस्थेकडे कुशल आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे पाठ्यपुस्तकांची वेळेत उपलब्धता होण्यात होणारा विलंबही त्या निमित्ताने समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील अभ्यासक्रम बदलांच्या टप्प्यांना सुयोग्य अशा पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमध्ये मात्र 'बालभारती' सातत्याने मागेच पडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच यंदाही सहावीची पुस्तके तयारच होणार नसल्याचे उघड होत आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाचवी आणि सहावीची पुस्तके नव्याने छापण्याचे नियोजन असतानाही 'बालभारती'ने सहावीची पुस्तके छापलेली नाहीत.

अभ्यासक्रम बदलांबाबतचे नियोजन ठरविण्याचे अधिकार 'एससीईआरटी'कडे आहेत. त्यानुसार गेल्या वर्षी तिसरी ते पाचवीची पुस्तके बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, 'बालभारती'ने केवळ तिसरी व चौथीचीच पुस्तके छापली.

महिलेची सोनसाखळी हिसकावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्ता ओलांडत असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेली. कॉन्व्हेंट कॅम्प हुसेनी बाग येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी संबंधित महिलेने लष्कर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख ५० हजार रुपयांची सोनसाखळी तोडून चोरून नेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सांगवीत साखळीचोरी

पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेली. न्यू डीपी रोड, विशालनगर येथे निको स्काय स्पार्क सोसायटीसमोर दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित ६० वर्षीय महिलेने सांगवी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी आणि त्यांची मुलगी रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोनसाखळी तोडून चोरून नेली, अशी माहिती दिली.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फर्ग्युसन रोडवर दिनदयाळ हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

या घटनेत विलास गुनाजी ​​शिंदे (वय ५०, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


‘PMP च्या अपघातांची चौकशी करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेब्रुवारीच्या पहिल्या १० दिवसांत पीएमपीच्या तीन बसना अपघात झाला असून, त्यात ठेकेदारांच्या बसचे प्रमाण अधिक आहे; पण संबंधित चालकांची कोणतीही माहिती पीएमपीकडे नाही, अशी तक्रार पीएमपी प्रवासी मंचाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. संचलन कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासह प्राणांतिक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. फेब्रुवारीपूर्वी शंभर दिवसांमध्ये एकही प्राणांतिक अपघात घडला नव्हता. मात्र, ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये तीन नागरिकांना प्राण गमवावे लागले. गेल्या सोमवारी झालेल्या अपघातामध्ये तर ठेकेदाराकडील चालकाची कोणतीही माहिती पीएमपीकडे उपलब्ध नसल्याने संबंधित आगार प्रमुखांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी मंचाच्या जुगल राठी यांनी केली आहे. त्यापूर्वीही, एका अपघातामध्ये ठेकेदाराचीच बस होती. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने, प्रत्येक अपघाताची चौकशी करावी व कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘स्वाइन फ्लू’ने दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या संसर्गामुळे शहरातील एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. राज्यात नव्याने ४६ जणांना लागण झाली; तर पुण्यात बारा जणांना लागण झाली आहे. त्यापैकी सहा जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

अक्षय भंडारे (वय २४, रा. येरवडा) असे मृत्यू पावलेल्या पेशंटचे नाव आहे. कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भंडारे याच्यावर उपचार सुरू होते. लक्षणे दिसल्याने त्याच्या लाळेची तपासणी करण्यात आली असता त्याला लागण झाल्याचे निदान झाले. परंतु, सेप्टिसेमियाबरोबर विविध अवयव निकामी झाल्याने त्याचा 'स्वाइन फ्लू'ने मृत्यू झाला.

रुबी हॉलमध्ये उपचार घेणाऱ्या चाळीस वर्षांच्या कांचन मोटवाणी (रा. काळेवाडी) यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. परंतु, निदान होण्यापूर्वीच श्वसनप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन संसर्गामुळे मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युमुळे शहरातील मृतांची संख्या चौदा झाली आहे. राज्यात 'स्वाइन फ्लू'ची नव्यान ४६ जणांना लागण झाली आहे. राज्यातील स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या ३९८ झाली आहे. आतापर्यंत आजाराच्या संसर्गामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा जण हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील आहेत. आतापर्यंत राज्यातील बरे झालेल्या १७७ पेशंटना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

शेतकऱ्यांच्या फायद्याचे मिशन राबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी फायद्याचे मिशन राबवा,' असे आदेश राज्याचे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्य कृषी पणन मंडळ व तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला पाटील यांनी भेट दिली. त्या वेळी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला आमदार माधुरी मिसाळ, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, पणन संचालक दिनेश ओऊळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, आंबा काजू मंडळाचे कार्यकारी संचालक विकास पाटील, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक डी. एल. तांभाळे, पुणे बाजार समितीचे सचिव धनंजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात पूर्वीच्या सरकारकडून रखडलेली कामे पूर्ण करण्यात अधिक वेळ गेला. या पुढील काळात बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांती कक्ष या सोयी सुविधा मिळायला हव्यात. त्याशिवाय त्यांच्या शेतीमालाला योग्य माल मिळावा यासाठी आम्ही काम करणार आहोत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मिशन म्हणून काम केले पाहिजे, अशी भूमिका सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

शेतजमीन मोजणी होणार स्वस्त

$
0
0


पुणे : महापालिका व नगर पालिकेच्या हद्दीतील शेतजमीन मोजणीसाठी चौरस मीटरऐवजी आता हेक्टरी दर आकारण्यात येणार असल्याने मोजणी 'स्वस्त' होणार आहे. महापालिका हद्दीमधील चाळीस गुंठे शेतजमिनीला साध्या मोजणी दराने साधारणतः अडीच हजार रुपये आकारले जात होते. ही मोजणी फी आकारताना पहिल्या दहा गुंठ्यांसाठी एक हजार रुपये आणि पुढील प्रत्येक दहा गुंठ्यांसाठी पाचशे रुपये प्रमाणे फी आकारली जाते. चाळीस गुंठे (एक एकर) क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीची मोजणी करायची झाल्यास ही आकारणी काही हजार रुपयांत जात होती.

मोदी-पवारांचे ‘साथी हाथ बढाना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

अवघ्या चार महिन्यांपूर्वी काका पुतण्यांच्या गुलामगिरीतून जनतेला सोडविण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. 'पवारांचा आणि आपला पक्ष वेगळा असला, तरी विकासाचा आमचा हेतू एकच आहे,' असे मोदींनी जाहीर केले. राजकारण निवडणुकीपुरतेच मर्यादित असल्याचे सांगून पवारांनीही मोदी यांना सहकार्याचा हात पुढे केला.

मोदींचा बहुचर्चित बारामती दौरा शनिवारी पार पडला. पवार यांच्या निमंत्रणावरून बारामतीत आलेल्या मोदींनी तेथील कृषी आणि शिक्षणविषयक संस्थांना भेटी दिल्या. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात मोदी आणि पवार या दोघांनीही विकासाच्या मुद्द्यावर परस्पर सहमती दर्शविली.

'व्हॅलेंटाइन डे'च्या मुहूर्तावर झालेल्या आजच्या कार्यक्रमात पवार आणि मोदी या दोघांनीही परस्परांवर स्तुतिसुमने उधळली. 'मोदी पूर्वी काय बोलले आणि आज काय बोलणार,' याबद्दल मीडियाला उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पवार यांच्या पूर्वीच्या भाषणाच्या टेपही मीडियानी काढून ठेवल्या आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. मोदी म्हणाले, 'लोकशाहीचे हेच खरे सौंदर्य आहे. विवाद आणि संवाद या दोन रूळांवरून लोकशाहीची गाडी चालते. आम्हा राजकारणी मंडळींचा पक्ष आणि अजेंडाही वेगळा असतो; परंतु पक्षापेक्षा देश मोठा असतो. राजनीतीपेक्षा राष्ट्रनीती महत्त्वाची असते. सत्ताधारी म्हणून मीच पुढाकार घेऊन वेगवेगळ्या विषयांवर पवार यांना काय वाटते, असे विचारले पाहिजे.'

पूर्वीपासून संपर्कात

'पवार आणि माझी पूर्वीपासून नेहमीच चर्चा होत असे. आमच्यात चर्चा झाली नाही, असा एकही महिना नाही. मी गुजरातचे सरकार चालवित असताना केंद्राकडून अनेक अडचणी येत असत. अशा वेळी मी पवार यांना मध्यस्थीची विनंती करीत असे आणि पवार यांनीही राज्य सरकारांसाठी योग्य भूमिका पार पाडली,' असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. 'येथून गेल्यानंतर मी तिखट चमचमीत विधान करून शकतो आणि पवारही तसेच देऊ शकतील; परंतु पवार आणि माझे पक्ष वेगळे असले, तरी देशाच्या विकासाचा आमचा उद्देश एकच आहे,' असे ते म्हणाले.

दोन दिवस राजकारणाचे....

राजकारणात संघर्ष होऊ शकतो, मात्र हे दोन दिवस सोडले, तर ३६५ दिवसांपैकी ३६३ दिवसांत विकासाचे काम हाती घेतले पाहिजे. त्यामुळे मोदी हे विकासासाठी जी पावले उचलतील, त्याला सहकार्य करण्याचीच आमची भूमिका राहील, असे पवार यांनी जाहीर केले.

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images