Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन व्यंगचित्रकारांची अविस्मरणीय भेट

$
0
0
दोन समवयस्क व्यंगचित्रकार... दोघांच्या करिअरची एकाचवेळी आणि एकाच ठिकाणी सुरुवात... ‘व्यंगा’वर अचूक बोट ठेवणारा ‘कॉमन मॅन’, तर राजकारणावर ‘मार्मिक’ भाष्यही... सहा दशकांच्या मैत्रीच्या अखेरच्या टप्प्यावर एकाची वाचा अबोल, तर एकाचा हात थरथरता... तरीही मित्रानं दिलेल्या हाकेला तितक्याच तत्परतेनं दिलेला प्रतिसाद, असं या दोघांतलं मैत्र!

‘कॉमन मॅन’ हे त्यांचेही प्रेरणास्थान!

$
0
0
सर्वसामान्य भारतवासीयांच्या भावभावनांचे प्रतीक ठरलेला ‘कॉमन मॅन’ हाच खुद्द आर. के. लक्ष्मण यांचेही प्रेरणास्थान होता. देशातील पहिल्यावहिल्या आणि बहुधा एकमेव असलेला ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्यावर लक्ष्मण यांचा खूप जीव होता.

शिल्परूपात ‘कॉमन मॅन’ साकारताना…!

$
0
0
४ मे २०००. तो दिवस मला अजूनही आठवतो. सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार आणि आर. के. लक्ष्मण यांच्यासमवेत पहिली बैठक. कोणतेही शिल्प साकारायचे म्हटले, की त्यातील बारकावे टिपण्यासाठी फोटोंची आवश्यकता असते.

ज्ञान सेवाव्रती

$
0
0
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. रावसाहेब शिंदे म्हणजे लढाऊ व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांशी दोन हात करून मिळविलेले स्वातंत्र्य पुढे समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व अॅड. शिंदे यांनी केले.

‘कॉमन मॅन’च्या जनकाला अखेरचा निरोप

$
0
0
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’ या अजरामर व्यक्तिरेखेचे जनक आर. के. लक्ष्मण मंगळवारी दुपारी अनंतात विलीन झाले. ते ९४ वर्षांचे होते. २६ जानेवारीला सायंकाळी दीर्घ आजारानंतर त्यांचे पुण्यात निधन झाले होते.

पिंपरीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रजासत्ताक दिन समारंभ सुरू असताना सोमवारी (२६ जानेवारी) सकाळी अचानक स्मिता सुरेश बलकवडे (वय ४५) यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन त्यांना रोखले.

‘सोमेश्वर सहकारी’च्या मालमत्तेची होणार विक्री

$
0
0
ऊस उत्पादकांना गेल्या वर्षीच्या वाजवी दराच्या (एफआरपी) रकमा न दिल्याबद्दल बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करण्याचा आदेश साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी नुकताच काढला आहे.

साखरेबाबत उद्या बैठक

$
0
0
सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कमटॅक्सच्या नोटिसा आणि ऊस उत्पादकांना वाजवी दर (एफआरपी) देण्यातील अडचणी, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर उद्योगातील नेत्यांची पुण्यात बैठक होणार आहे.

‘पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज’

$
0
0
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ या मोहिमेकडे केवळ संकल्पना म्हणून पाहण्याऐवजी गावपातळीवर जनजागृतीचे काम करताना लोकसंवादाचे प्रभावी माध्यम म्हणून वापर करणे गरजेचे आहे. महिलांनी पुढाकार घेऊन यशोगाथा समाजासमोर आणल्यानंतरच ही मोहीम प्रभावी होईल.

मारणे काका-पुतण्याला न्यायालयीन कोठडी द्या

$
0
0
मारणे टोळीचा प्रमुख गजानन मारणे आणि त्याचा पुतण्या रुपेश मारणे या दोघांच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी असा अर्ज पोलिसांनी विशेष न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्या कोर्टात केला आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

कंत्राटी कामगारांचे ‘शिट्टी वाजवा’ आंदोलन

$
0
0
कंत्राटी कामगारांना हक्काचे किमान वेतन मिळालेच पाहिजे, प्रत्येक सुरक्षा रक्षकाला भविष्यनिर्वाह निधी, तसेच ईएसआयचा क्रमांक मिळालाच पाहिजे, अशा अनेक मागण्यासाठी पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी महापालिका भवनासमोर ‘शिट्टी वाजवा आंदोलन’ करण्यात आले.

औषधखरेदीचे टेंडर लष्कराच्या रडारवर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये खासगी कंत्राटदारामार्फत होणाऱ्या औषधखरेदीचे टेंडर बोर्डाकडून काढण्यात आले आहे. दर वर्षी औषधखरेदीचे टेंडर काढण्यात आल्यावर आरोप-प्रत्यारोप होतात.

प्रलंबित तक्रारींचा ‘बोनस’

$
0
0
प्रॉव्हिडंट फंडाबाबतच्या (पीएफ) नागरिकांच्या तक्रारी एकीकडे वाढत असताना ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) राज्यातील विभागीय कार्यालयांना त्यांची सोडवणूक करण्यात अपयश येत असल्याचे समोर आले आहे.

गुंतागुंतीचे ऑपरेशन सात तासांनंतर यशस्वी

$
0
0
जन्मतःच गुदद्वार (शौचाची जागा) नसलेल्या तरुणावर सात तास ऑपरेशन केल्यानतंर त्याला नवे जीवन मिळाले. पूना हॉस्पिटलमधील पोटविकार, यकृत तज्ज्ञ डॉ. विनय थोरात, पोटाचे सर्जन डॉ. महेश ठोंबरे, मूत्रपिंड सर्जन डॉ. जयदीप दाते, डॉ. भरत दीक्षित यांनी हे ऑपरेशन यशस्वी केले.

बोपोडीतील रस्त्याचा ‘डाव’ हाणून पाडला

$
0
0
बोपोडी येथील एका बिल्डरच्या हितासाठी रस्ता आखण्याचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठेवलेला प्रस्ताव मनसे, काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी बहुमताने हाणून पाडला.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?

$
0
0
वानवडीतील इनामदार हॉस्पिटल प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून महापालिका आयुक्त कार्यालयात धूळ खात पडला आहे. हा प्रस्ताव आयुक्त कार्यालयातील अधिकारी आयुक्तांसमोर ठेवत नसल्याने दोषी अधिकाऱ्यांना अभय मिळत असल्याचे समोर आले आहे.

ग्राहक मंचाने दिला पतसंस्थेला दणका

$
0
0
मुदत ठेवीच्या रकमेची वारंवार मागणी करूनही सात वर्षे टोलवाटोलवी करणाऱ्या पतसंस्थेला ग्राहक न्यायमंचाने दणका दिला आहे. तक्रारदार महिलेला २५ हजार रुपये परत द्यावेत; त्यांना झालेल्या आर्थिक, शारिरिक आणि मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चाचे दोन हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला आहे.

‘हाय-वे’वर हॉटेलांना जादा ‘FSI’

$
0
0
राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या ‘शेती व ना विकास’ विभागातील जमिनीवर तारांकित हॉटेल्स व रिसोर्टसाठी जादा चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जादा ‘एफएसआय’साठी रेडिरेकनरच्या पन्नास टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे.

गांडूळखत प्रकल्प पडले बंद

$
0
0
शहराचा मध्यवर्ती भागात लोकसंख्येच्या तुलनेत कचऱ्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. शहराचा मध्यवस्तीचा भाग, अशी ओळख असलेल्या कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाच प्रभाग येतात. या पाच प्रभागांतून ओला आणि सुका असा रोज ९० ते ९५ टन कचरा गोळा होतो.

पोस्टमनची होणार ‘पोस्टिंग’

$
0
0
पोस्टमनच्या पुरेशा संख्येअभावी टपाल पोहोचण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी राज्यात पोस्टमनची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमुळे एक हजार ५४२ पोस्टमन नव्याने नेमले जाणार असून, त्यापैकी २३८ पोस्टमन एकट्या पुणे विभागात उपलब्ध होणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images