Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रशिक्षण घेणाऱ्यांना लायसन्स काढून देणे ग्राह्य

$
0
0
‘मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना लायसन्स काढून द्यावे. पण, त्यांच्याकडे प्रशिक्षण न घेतलेल्या एखाद्या व्यक्तीलाही एजंट म्हणून ते लायसन्स काढून देऊन जादा पैसे आकारत असतील, तर ते चुकीचे आहे.

शेंगदाणा, तूरडाळ, नारळाच्या दरात वाढ

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने खाद्यतेल स्वस्त झाले आहे, तर शेंगदाण्याच्या निर्यातीसाठी मागणी वाढल्याने त्याच्यासह, तूरडाळ, नारळाच्या दरात वाढ झाली आहे.

बटाटा, टोमॅटोसह कोबी, फ्लॉवर स्वस्त

$
0
0
मार्केट यार्डात शनिवारसह प्रजासत्ताक दिनामुळे सोमवारी बाजार बंद असल्याने रविवारीच शेतीमालाची आवक मोठी आवक झाली. त्यामुळे बटाटा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, घेवडा, पावट्यासह फळभाज्या स्वस्त झाल्या आहेत. ग्राहकांना या आठवड्यात फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ट्रॉलीला धडकून तीन दुचाकीस्वार ठार

$
0
0
ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोथरूड येथील तिघे तरुण ठार झाले आहेत. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज गावच्या हद्दीत रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. घटनास्थळी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सोनसाखळी चोराला श्रीरामपूरमधून अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या युन‌िट तीनने श्रीरामपूर येथील एका सोनसाखळी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कंत्राटी कामगारांनाही प्रॉव्हिडंट फंडाचा लाभ

$
0
0
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता येण्यासाठी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) विभागाने आदेश काढला आहे. त्यानुसार सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणारे कंत्राटी कामगार आणि बांधकाम कामगार यांना सक्तीने प्रॉव्हिडंट फंडाचा (पीएफ) लाभ ​मिळणार आहे.

भारिप बहुजन पक्षातर्फे जातिमुक्ती आंदोलन

$
0
0
‘सत्ता टिकवण्यासाठी काही जातींना एकत्रित करून उर्वरित जातींना दूर करायचे, असा प्रकार देशात आता सुरू झाला आहे,’ अशी टीका भारिप बहुजन पक्षाचे नेते व सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले.

है तय्यार हम...

$
0
0
‘परेडच्या रंगीत तालिमीच्या निमित्ताने परवाच ‘ते’ भारावलेलं वातावरण आमच्यापैकी प्रत्येकानेच अनुभवलं. तेच वातावरण पुन्हा अनुभवायचं आहे. मुलं आता वाट पाहताहेत ती प्रत्यक्ष २६ जानेवारीच्या संचलनाची. त्यांच्यासाठी ती महत्त्वाचीच आहे.

भाजप-राष्ट्रवादीची ‘साखरपेरणी’?

$
0
0
निवडणुकीच्या काळात तिखट हल्ले चढविलेल्या शरद पवार यांच्याच कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीवरून जिल्ह्यातील भाजपजनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपजनांबरोबरच मोदी यांच्या झेंड्याखाली एकवटलेल्या पवार विरोधकांनीही या भेटीवर नाराजी व्यक्त केल्याने नवे राजकारण रंगले आहे.

राम मंदिर, ‘घरवापसी’चा निर्धार

$
0
0
आयोध्येत राम मंदिर होणारच, याचा नारा देत ‘घरवापसी’ सुरू राहणार असल्याचा निर्धार आणि सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनामध्ये रविवारी ​​करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

बाजारात कांद्याची विक्रमी आवक

$
0
0
हिवाळ्यात गुलाबी रंगाच्या गरवी कांद्याच्या हंगामास प्रारंभ झाल्याने मार्केट यार्डात रविवारी सर्वाधिक आवक झाली. चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने आखाती देशांमध्ये निर्यात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. परिणामी आवक वाढल्यानंतरही कांद्याचे दर स्थिरच राहिले आहेत.

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

$
0
0
मोबाइल विक्रीच्या कामामुळे सतत फेसबुकवर ऑनलाइन राहण्याची सवय. त्यातच लोभस चेहऱ्याच्या मुलीने पाठवलेली फ्रेंडरिक्वेस्ट, ती अॅक्सेप्ट केल्यानंतर महिन्यातच भेटण्याचे ठरते. पुढे जाऊन फोटोतील मुलगी स्वतः भेटायला येते आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जायला दोघे निघतात.

कॉन्स्टेबलचा हार्टअटॅकने मृत्यू

$
0
0
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट दिल्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. सागर सुभाष गेंगजे (वय २५, रा. वाकड पोलिस लाइन) असे त्यांचे नाव आहे.

आर. के. लक्ष्मण यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे आज (सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आर. के. लक्ष्मण यांचा अल्पपरिचय

$
0
0
ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूरमध्ये झाला. सूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन. लहानपणापासूनच व्यंगचित्रांची आवड. त्यानंतर फ्री प्रेस जनर्ल्समध्ये पूर्णवेळ पहिली नोकरी. येथेच बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्याशी मैत्री झाली.

महिलेला दारुविक्रेतेकडून मारहाण

$
0
0
बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणा-या माळेगाव बुद्रुक या गावात अनेक बेकायदेशीर दारुधंदे सुरु आहेत. येथील अनेक कुटुंब दारुपायी देशोधडीला लागली आहेत. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना जगताप यांनी गावात दारुबंदीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पुढाकार घेतला होता.

पहाः लक्ष्मण यांचे बेस्ट कार्टून्स

लक्ष्मण यांचं स्मारक उभारणार!

$
0
0
‘कॉमन मॅन’ला प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य सरकार त्यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कॉफीचा पाहुणचार नि बाजारपेठेत फेरफटका

$
0
0
निवृत्तीनंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी आर. के. लक्ष्मण हे औंधला स्थायिक झाले आणि पत्रकार या नात्याने त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. लक्ष्मण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येणार होते.

साहित्यिक नि भाष्यकारदेखील!

$
0
0
लक्ष्मण यांना मी केवळ एक कार्टूनिस्ट मानण्यास तयार नाही. तेदेखील साहित्यिकच होते. त्यांच्या चित्रांमधून रेषा जेवढ्या प्रभावीपणे बोलत, तेवढ्याच त्यामधील अतिशय कमी शब्दांमधील आशयघन संवाददेखील बोलका होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images