Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सायकल खरेदीचा प्रस्ताव पुढे ढकलला

$
0
0
पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना; तसेच नागरवस्ती विभागांतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सायकलींच्या दरावरून स्थायी समितीमध्ये एकमत न झाल्याने हा प्रस्तावच पुढे ढकलण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.

घरबांधणी परवानगी आठवड्यात

$
0
0
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम लागू केलेली टाइप प्लॅनची योजना बुधवारी राज्यभरात लागू करण्यात आली. आपल्या मालकीच्या दोन गुंठ्यांच्या प्लॉटवर सरकारने निश्चित करून दिलेल्या टाइप प्लॅनपैकी एखादा आराखडा निवडला, तर फक्त अर्जाद्वारेच आठ दिवसांतच घर बांधण्याची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी आर्किटेक्टची गरज लागणार नाही.

मुंबईतील सराफाची रास्तापेठेत लॉजमध्ये हत्या

$
0
0
रास्ता पेठेतील सुंदन लॉजमध्ये मुंबईतील एका व्यावसायिकाचा धारधार हत्यारांनी वार करत खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी दोघे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

प्राथनास्थळावरील कारवाईचे पडसाद

$
0
0
सहकारनगर भागातील प्रार्थनास्थळावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना, भाजपच्या सभासदांनी सभागृहात गोंधळ घातला. सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर सभासदांना कारवाईची आठवण झाली आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

समकालीन जाणिवांचे संगीत नाटक हवे

$
0
0
‘मराठी संगीत नाटकांची परंपरा उज्ज्वल आहे. मात्र, आताच्या काळातही मानापमान, सौभद्रच्या पलीकडे संगीत नाटक जात नाही. त्यामुळे संगीत नाटकांची अवस्था बिकट आहे. मात्र, संगीत नाटकांची परंपरा जतन करतानाच समकालीन जाणिवांचे प्रतिबिंब उमटणाऱ्या संगीत नाटकांची गरज आहे,’ अशी भूमिका नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैय्याज यांनी मांडली.

खासगीकरणाची टपाल खात्याला झळ

$
0
0
टपाल खाते घरोघरी पोहोचले असले, तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खासगीकरणाची झळ पोहोचल्याने या खात्याला ‘घरघर’ लागली आहे. सेवाभावी वृत्तीने लोकांना टपाल सेवा देणाऱ्या या खात्याला गेल्या वर्षभरात तब्बल पाच हजार ४२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला असल्याने ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी स्थिती झाली आहे.

नदीपात्रातील रस्ता झालाच पाहिजे

$
0
0
सिंहगडरोडवरील वाढती वाहतुकीची समस्या पाहता नागरिकांच्या हितासाठी विठ्ठलवाडी ते वारजे हा नदीपात्रातील रस्ता महत्त्वाचा आहे. हा रस्ता झालाच पाहिजे, अशी मागणी गुरुवारी मुख्य सभेत करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाने संपूर्ण अभ्यास करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘महसूल विभागाची तत्परतेने कारवाई’

$
0
0
भ्रष्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महसूल विभाग चालढकल करीत असल्याचे लाचलुचपत खात्याने निरीक्षण योग्य नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

स्वागताध्यक्षपदी डॉ. साठे

$
0
0
बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होणार हा प्रश्न गुरुवारी मिटला. बेळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक साठे यांची निवड करण्यात आली. त्याबाबतचे पत्र नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर व बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी डॉ. साठे यांना दिले.

पुण्यातही खबरदारीच्या सूचना

$
0
0
प्रजासत्ताक दिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट या पार्श्वभूमीवर पुणे शहरात खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात विशेषतः मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवल्यामुळे पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

बेवारस नोंद केल्याने मृताचे नातेवाइक संतप्त़़

$
0
0
टेम्पोच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची बेवारस मृतदेह म्हणून नोंद करून शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्याच मोबाईल फोनवरून त्याच्या मृत्यूची माहिती नातेवाइकांना देण्याचा प्रकार येथे घडला. यामुळे संबंधित तरुणाच्या संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी (ता. २२) सकाळी वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन गृहाबाहेर गर्दी केली होती.

पिंपरीत २ दिवसांत विनयभंगाच्या ४ घटना

$
0
0
युवतीची छेडछाड आणि त्यानंतर तिने केलेली आत्महत्या यामुळे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसांत चार महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना एकट्या पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

कबुतरांच्या ढाबळी काढून टाका

$
0
0
शहरातील झोपडपट्ट्यांसह वसाहतींमधील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांवर आणि इतर परिसरात असलेल्या कबुतरांच्या ढाबळी काढून टाकण्याचे आदेश महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी गुरुवारी दिले.

‘सांस्कृतिक धोरण ६ महिन्यांत ठरवू’

$
0
0
‘महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबरोबर सांस्कृतिक क्षेत्राचाही विकास केला जाईल. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक धोरण येत्या सहा महिन्यात ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली.

हिंजवडीत सुरक्षेसाठी कंपन्यांचाही पुढाकार

$
0
0
पुण्याला ‘आयटी हब’ अशी ओळख मिळवून देणाऱ्या हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसराच्या सुरक्षेसाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील गस्तीसाठी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने पोलिस खात्याला दोन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली.

कचऱ्यासाठी मोफत ‘बकेट’

$
0
0
ओला आणि सुका कचरा स्वतंत्ररित्या साठविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक कुटुंबाला प्लॅस्टिकच्या दोन बकेटचे मोफत वाटप महापालिकेमार्फत केले जाणार आहे.

‘हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक उभारणार’

$
0
0
‘थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली जाईल. तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती व वेगवेगळ्या माध्यमातून देखील टप्प्याटप्प्याने या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

बारामती आरटीओ कार्यालय एजंटमुक्त

$
0
0
महाराष्ट्रातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी सरकारने राज्यातील आरटीओ कार्यालये एजंटांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी बारामती कार्यालय सज्ज झाले होते.

बिया वेगळे करणारे यंत्र विकसित

$
0
0
सीताफळातील गर व बिया वेगळे काढणारे यंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेे. सासवड येथे जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने फळउत्पादक शेतकरी यांच्यासाठी या यंत्राचे उद‍्घाटन करण्यात आले, असल्याची माहिती राज्य जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.

सावित्रीबाई फुलेंचा पुरस्कार देणे गौरवाचे

$
0
0
‘अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे काम उभे केले तोच वारसा आजही आपल्या आवडीच्या क्षेत्रात ताकदीने पुढे नेत असलेल्या दोन महिलांना अत्रे यांच्या भूमीत सन्मानित करण्याचे भाग्य मला लाभले आहे,’ असे ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images