Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रस्त्यासाठी स्थानिक आक्रमक

$
0
0
‘आमची इमारत पाण्याखाली गेली, तर पर्यावरणवादी वाचवायला येणार आहेत का?’, ‘रस्त्याचा सगळा भराव हा नदीपात्रातला गाळच आहे’, ‘कोर्टाने काहीही आदेश दिले, तरी भराव आणि संरक्षक भिंत हटवून देणार नाही’... अशा शब्दांत तीव्र भावना व्यक्त करत सिंहगड रोड परिसरातील स्थानिक नागरिकांनी हरित लवादाच्या निर्णयाविरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्याचा निर्धार मंगळवारी केला.

विद्यापीठातील बांधकामे विनापरवाना?

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या बांधकामांसाठी विद्यापीठ प्रशासनाने महापालिकेची अधिकृत परवानगी न घेता, इमल्यावर इमले चढविल्याची चर्चा आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये त्याबाबत प्रश्न उपस्थित करून चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

पुनर्वसन जमीन घोटाळबाजांवर गुन्हे

$
0
0
पुनर्वसनाच्या जमीन वाटपाचे बनावट दाखले करून लाभक्षेत्रातील शेकडो एकर जमीन गिळंकृत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली.

‘राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल’

$
0
0
‘राज्यातील सरकारकडे अनुभव नाही, सरकारमधील अनेक मंत्री नवे आहेत. उत्साहाच्या भरात त्यांनी अनेक घोषणा केल्या असल्या, तरी सरकार चालविणे कठीण असल्याचे त्यांना आता समजले असेल.

काँग्रेस शिष्टमंडळ भेटले आयुक्तांना

$
0
0
काँग्रेस सरकार केंद्रात असताना शहरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी जेएनएनयूआरएम योजनेअतंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला होता. मात्र नवीन आलेल्या सरकारने हा निधी रखडून ठेवल्याने बहुतांश प्रकल्पांची कामे खोळंबली आहे.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन

$
0
0
गरीब शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ काही उद्योगसमूहांना लाभदायक ठरतील असे निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनास्त्र उगारले आहे.

कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा भाजप-सेनेचा बेत फसला

$
0
0
निवडणुकीच्या लोकशाही मार्गाला बगल देऊन राज्यातील मार्केट कमिट्यांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा नव्या सत्ताधाऱ्यांचा बेत फसला आहे. मुदत समाप्त झालेल्या सर्व मार्केट कमिट्यांच्या तातडीने निवडणुका घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

‘हॅपी स्ट्रीट’चा रविवारी जल्लोष

$
0
0
वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासूनदेखील सुटका करून घेण्याची संधी येत्या रविवारपासून ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमांतर्गत पुणेकरांना मिळणार आहे. फिटनेसच्या विविध उपक्रमांपासून बॅडमिंटन-सायकलिंगसह पारंपरिक खेळांचा आनंद लुटता येईल.

एकदा डिफॉल्टर; सगळीकडे अपात्र

$
0
0
एखाद्या संस्थेत थकबाकीदार (डिफॉल्टर) ठरलेल्या सभासदाला राज्यातील अन्य कोणत्याही सहकारी संस्थेमध्येही मतदान किंवा उमेदवारीचा अधिकार राहणार नाही. सहकार कायद्यातील या नव्या तरतुदीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टीकरण दिले आहे.

एलबीटीचा टक्का वाढला

$
0
0
गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उत्पन्नात झालेली घट काही प्रमाणात भरून निघाली असून, डिसेंबर महिन्यात पालिकेला त्यातून ११४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणेकर झाला ४ देशांचा ‘CA’

$
0
0
‘सीए’ची मुख्य परीक्षाच नव्हे, तर ‘सीपीटी’चा अडथळा पार करतानाही किती दमछाक होते, याचा अनुभव कालच जाहीर झालेल्या निकालादरम्यान हजारो पुणेकर विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला. मात्र, त्यांच्यापैकीच एका पुणेकर विद्यार्थ्याने चार देशांमधील ‘चार्टर्ड अकाउंटन्ट’ची पदवी संपादन करण्याचा पराक्रम केला आहे!

बरेलीतून हरवला, पुण्यात सापडला?

$
0
0
मॅक्डोनाल्डच्या पुण्यातील आउटलेटमधून एका गरीब मुलाला हाकलण्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात चांगलेच गाजले होते. त्या मुलासाठी तो प्रसंग नक्कीच मानहानिकारक होता; मात्र त्यामुळे त्याला त्याचे आई-वडील भेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वाभिमानीचा भाजपशी काडीमोड?

$
0
0
सत्तेत वाटा देण्याबाबत दुर्लक्ष आणि ऊसदरासारख्या प्रश्नांवर शेतकरीविरोधी धोरणे, अशा भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीतील स्वाभिमान पक्ष भाजपशी काडीमोड घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

बकोरियांची बदली सरकारकडून रद्द

$
0
0
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीबाबत पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने राज्य सरकारने ही बदली रद्द केली. बकोरिया यांच्याकडील पालिकेचा कार्यभार कायम ठेवण्याचा आदेश मंगळवारी काढण्यात आला.

फूल बाजाराला सुटीचा निर्णय

$
0
0
फळ, पालेभाजी, पानबाजार, कांदा बटाटा विभागाला शनिवारी सुट्टी असल्याने त्यानुसार फुल बाजाराला सुट्टी देण्याच्या मागणीनंतर बाजारातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्पष्ट केले आहे.

विमा पॉलिसीच्या बोनसमध्ये वाढ करा

$
0
0
विमा प्रतिनिधींना वयाच्या साठ वर्षानंतर मिळणारी ग्रॅच्युटीत वाढ करावी, पेन्शन योजना सुधारित स्वरूपात लागू करावी, तसेच विमाधारकांच्या विमा पॉलिसीच्या बोनसमध्ये वाढ करण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी एलआयसी एजंट्स फेडरेशनतर्फे सरकारविरोधात मंगळवारी ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले.

खटल्यांनंतर ३८ गांडूळखत प्रकल्प सुरू

$
0
0
क्षेत्रीय कार्यालयातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या कचरा वर्गीकरणाच्या सक्तीला धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दोघांना सक्तमजुरी

$
0
0
घरात बेकायदा घुसून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन खाडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

नृत्यातून शिक्षण संघभावनेचे

$
0
0
कॉर्पोरेट जगतामध्ये काम करताना संघभावना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. ही संघभावना विद्यार्थीदशेतच वाढीस लागावी, यासाठी इंजिनीअरिंग कॉलेजांमधून अनेक प्रयोग होतात. मात्र, यातील बरेचसे प्रयोग हे संवाद सत्रांपुरते मर्यादित असतात.

फूल बाजाराला सुटीचा निर्णय

$
0
0
फळ, पालेभाजी, पानबाजार, कांदा बटाटा विभागाला शनिवारी सुट्टी असल्याने त्यानुसार फुल बाजाराला सुट्टी देण्याच्या मागणीनंतर बाजारातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्पष्ट केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images