Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुर्गसंवर्धन शास्त्रीय पद्धतीने व्हावे

$
0
0
‘दुर्गांच्या संवर्धनासाठी तेथील स्वच्छतेसाठी अनेक उत्साही तरुणांच्या संघटना सध्या पुढे येत आहेत. दुर्गांचे संवर्धन झालेतच पाहिजे मात्र ते शास्त्रीय पद्धतीने करा अन्यथा या दुर्गांमधील वनसंपदा आणि जलसृष्टी नष्ट होऊ शकते,’ असे मत ‘पर्यावरण आणि गिर्यारोहण’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

नव्या कलाकारांच्या कलेची ‘अनुभूती’

$
0
0
ग्वाल्हेर येथे दर वर्षी होणारा पुरुषोत्तम तळेगावकर स्मृती संगीत समारंभ यंदा अंतर्नाद संस्थेच्या सहकार्याने पुण्यातही होणार असून, नवीन कलाकारांचा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

आता आम्हीही होणार ‘नेट’कर…

$
0
0
केवळ दृष्टी नाही, म्हणून इतरांप्रमाणे सोशल नेटवर्किंग करायचे नाही, हे ‘त्यांना’ तसे न पटणारे होते. त्यामुळेच, आजच्या इंटरनेटच्या तंत्राचा आपल्यासारख्याच इतरांसाठी फायदा घेण्याचा निश्चय त्यांनी केला.

दोन संमेलनाध्यक्ष एकाच मंचावर

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व बेळगावला होणाऱ्या ९५व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज गुरुवारी (२२ जानेवारी) प्रथमच एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

बेळगावच्या नाट्यसंमेलनासाठी ३५० संस्थांना निमंत्रण

$
0
0
नाट्यचळवळीचा प्रमुख घटक असलेल्या प्रायोगिक आणि हौशी रंगकर्मींना बेळगावच्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे. त्याबाबतचे पत्रही राज्यभरातील ३५० संस्थांना पाठवण्यात आले आहे.

कंत्राटी कामगारांच्या वेतनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

$
0
0
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना किमान वेतनाच्या निम्माच पगार मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महागाई भत्त्यासह प्रत्येक कामगाराला ९ हजार ९८५ रुपये किमान वेतन देणे गरजेजे असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ चार हजार ७५० रुपये दिले जातात.

बँक खाते गॅस एजन्सीशी न जोडल्यास सिलिंडर नाही

$
0
0
सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी ग्राहकांनी बँक खाते हे गॅस एजन्सीशी सलग्न न केल्यास सिलिंडर पुरवठा बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तब्बल २ लाख २१ हजार ग्राहक या योजनेशी जोडले गेले आहेत.

विज्ञानकथांच्या दर्जासाठी निकष गरजेचे

$
0
0
मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथांचा दर्जा निश्चित करणारे, त्यांचा चांगले-वाईटपणा ठरविणारे निकष पुढे येणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

नोकरीच्या बहाण्याने तिघांची फसवणूक

$
0
0
नामांकित कंपन्यामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिघांकडून पाच लाख ५५ हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी एका कंपनीच्या संचालका​विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवक शिळीमकर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी

$
0
0
बेकायदेशीरपणे दुकान पाडून नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र आबा शिळीमकर, सतीश नाना मोरे, मनोज सतीश मोरे, श्रीपाल राजेंद्र शहा, महेश यशवंत शिळीमकर, जयंत गुंदेशा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला ‘केअरटेकर’ने लुटले

$
0
0
बोट क्लब रोडवर विजय चंद्रा हौसिंग सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला त्यांच्याच केअरटेकरने आपल्या साथीदारांच्या मदतीने लुटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला चाकुच्या धाकाने बांधून ठेवत घरातील पावणे सात लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.

फूल बाजारासही हवी साप्ताहिक सुटी

$
0
0
मार्केट यार्डातील फळ, पालेभाज्यांसह भुसार विभागाप्रमाणे फूल बाजाराला सुट्टी देण्याचे आदेश तत्कालीन पणन संचालकांनी दिल्यानंतरही त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.

‘अंनिस’चे शिष्टमंडळ मोदींना भेटणार

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटले आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागालाही मारेकऱ्यांचा शोध घेता आलेला नाही. तपासातील या दिरंगाईच्या निषेधार्थ १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, दिल्ली येथे आंदोलनही करण्यात येणार असल्याचे ‘अंनिस’चे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

‘SRA’चा प्रस्ताव थेट मुख्य सभेत

$
0
0
महापालिकेच्या मालकीची १ लाख ६० हजार चौरसफूट जागा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी (एसआरए) विकसनासाठी खासगी बिल्डरला ताब्यात देताना पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक होते.

आयटी कंपनीच्या इमारतीला येरवड्यात आग

$
0
0
येरवडा येथील कॉमरझोन आयटी पार्क आवारातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली.

रस्ते होणार ‘हॅपी स्ट्रीट’

$
0
0
वाहनांची गर्दी, कर्णकर्कश हॉर्न आणि सततचा ट्रॅफिक जाम....या ‘रूटिन’ पेक्षा वेगळा शांत, मोकळा रस्ता आणि जोडीला ताजी, शुद्ध प्रदूषण मुक्त हवा....हे स्वप्न लवकरच साकारणार आहे.

अल्पवयीन मुलीचा विवाह; महिन्यानंतर गुन्हा दाखल

$
0
0
वाकड परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी एक महिन्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती, सासू-सासरे, आई-वडील आणि भटजी या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस ठाण्याचे फौजदार आर. पी. केंद्रे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

एजंटांना अधिकृत परवाने द्या

$
0
0
आरटीओतील एजंटांना परिवहन विभागाने अधिकृत परवाना द्यावा, अशी मागणी पुण्यातील एजंटांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे मंगळवारी केली.

चाकूच्या धाकाने डंपर पळवला

$
0
0
परिवहन विभागाच्या (आरटीओ) आवारात कारवाईसाठी आणलेला डंपर चाकूच्या धाकाने घेवून गेल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी स्कॉर्पिओमधून आलेल्या चौघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हजार जणांवर ‘रेल्वे’ची कारवाई

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात नियमांकडे दुर्लक्ष करित अस्वच्छता करणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या एक हजार ३२९ प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images