Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणीपट्टीसाठी अभय योजना

$
0
0
पाणीपट्टीची बिले थकविलेल्या ग्राहकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार थकबाकीदारांना दुप्पट, तिप्पट दराच्या दंडाऐवजी सरसकट पद्धतीने दंड आकारण्यात येणार असून, त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी केला.

शनिवारवाडा उत्सव की नेत्यांचा उत्सव

$
0
0
महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारा यंदाचा शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सव हा नेत्यांचा उत्सव ठरणार आहे. कारण महापालिकेतील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भागात महोत्सव घेण्यासाठी आग्रह धरल्याने महापालिकेने आर्थिक तरतूद केली नसतानाही हा महोत्सव आठ ठिकाणी घेतला जाणार आहे.

आंबेडकर स्मारकासाठी महामोर्चा

$
0
0
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, विविध संस्था सर्व मतभेद विसरून एकत्र आल्या आहेत. स्मारकाच्या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय कृती समिती स्थापन केली असून, समितीतर्फे येत्या गुरुवारी (ता. ६) महामोर्चा काढण्यात येणार आहे.

'सोशल' संगीतवेड्यांचा 'पहला नशा'

$
0
0
कोणी इंजिनीअर, आर्किटेक्ट, कोणी व्यावसायिक तर कोणी सीए... त्यांची ऑर्कुट, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अचानक ओळख झाली. सर्वच संगीतवेडे असल्याने त्यांची गट्टीही जमते. ओळखीचे रूपांत वारंवार भेटीत होऊन त्यांचा एक ग्रुप बनतो. सहा वर्षांपासून हे संगीतवेडे तरुण गाण्यांची वाद्यांसह रिहर्सल करीत असून, त्यांच्या प्रयत्नांतून साकारला आहे, ‘पहला नशा’सारखा कार्यक्रम..

कोयना भरण्याच्या मार्गावर

$
0
0
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार दुपारपासून दमदार पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ दोन टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. शिवसागर जलाशयात सध्या १०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरण्यास अडचण राहिली नसल्याने वीजनिर्मितीसह शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.

ST स्थानकांवर CCTV ची नजर?

$
0
0
राज्यातील महत्त्वाच्या २७ एसटी बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याची योजना राज्य परिवहन महामंडळाने तयार केली आहे. ही योजना अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी दिली.

राज ठाकरेंची पालिका भेट रद्द

$
0
0
कायद्यानुसार प्रसिध्द होण्यापूर्वी शहराचा विकास आराखडा दाखविता येणार नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियोजित महापालिका भेट सोमवारी रद्द झाल्याचे समजते.

४०टक्के साखर कारखाने बंद पडणार?

$
0
0
पावसाने मारलेल्या दडीमुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती आणि उसाचे क्षेत्र घटल्याने यंदाच्या हंगामात राज्यातील चाळीस टक्के साखर कारखाने बंद राहतील, असा अंदाज आहे. परिणामी सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे सूतोवाच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी केले.

पिंपरीत स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण

$
0
0
पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये स्वाइन फ्लूचे दोन पेशंट आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूचे सहा संशयित पेशंट शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस मनाई

$
0
0
‘जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत विक्रीची कोणतीही प्रक्रिया करू नये,’ असा आदेश दिवाणी कोर्टाचे न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी सोमवारी दिला. या आदेशामुळे विक्रीची प्रक्रिया जागामालक लता मंगेशकर यांना तूर्त पूर्ण करता येणार नाही.

चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा

$
0
0
पुण्यातील ‘चिल्लर पार्टी’ झालेल्या ‘रिव्हर व्ह्यू हॉटेल’चे चालक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलतबंधू जयंत पवार, तसेच मालक किशोर पिंगळे यांच्या विरोधात अखेर मुंढवा पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

‘रिव्हर व्ह्यू’ व्यवहारांची माहिती ठेवा

$
0
0
पुण्यातील ‘चिल्लर पार्टी ’ प्रकरणी खटला भरण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत बंधू जयंत पवार आणि ‘रिव्हर व्हयू हॉटेल’चे मूळ मालक किशोर पिंगळे यांनी मंगळवारी लष्कर कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने त्यांची जामीन मंजूर केला. मात्र, आपल्या हॉटेलमध्ये काय सुरु आहे, याकडे लक्ष द्यायला हवे, अशी तंबीही त्यांना दिली.

प्रवेश परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करा

$
0
0
मेडिकल आणि इंजिनिअरिंग शाखांसाठी २०१३ मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी मंगळवारी ‘डिपर संस्थे’तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

माजी माननीयांचा वैद्यकीय खर्च पालिकेच्या खिशातून नाही

$
0
0
माजी माननीयांच्या वैद्यकीय उपचाराचा शंभर टक्के खर्च महापालिकेच्या खिशातून करण्याचा बेत मंगळवारी रहित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर कारभाऱ्यांनी हा प्रस्ताव रद्द केल्याचे समजते. या विषयावरून स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी-मनसे आणि दुसरीकडे काँग्रेस व भाजप-सेना मतदानासाठी एकत्र आले होते.

सिग्नलचा ‘स्टॉप’ चालकांना महागात पडणार

$
0
0
एसटी चालकाने सिग्नल किंवा थांबा नसणाऱ्या ठिकाणी बस थांबवल्यास त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. संबधित बसच्या चालकाविरुद्ध प्रवाशांनी संबधित डेपो मॅनेजरकडे तक्रार नोंदवल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

‘अभाविप’चा कॉलेज बंद यशस्वी

$
0
0
कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचार आणि बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ आणि ‘युथ अगेन्स्ट करप्शन’तर्फे मंगळवारी (४ ऑगस्ट) कॉलेज बंद आंदोलन करण्यात आले. संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये वाडिया कॉलेज, एस. पी. कॉलेज आणि बीएमसीसी कॉलेज बंद केल्याने मंगळवारी या कॉलेजांच्या आवारांमध्ये शुकशुकाट पसरला होता.

शनिवारवाडा महोत्सवाला वाढती मागणी

$
0
0
महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारा यंदाचा शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सव सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भागात घेण्यासाठी आग्रह धरल्यानंतर स्थायी समितीच्या अन्य सदस्यांनीही त्यांच्या प्रभागात महोत्सव करण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मंगळवारी कोंडी झाली. यातून मार्ग काढण्याऐवजी या विषयावर पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे ठरवून सत्ताधाऱ्यांनी तात्पुरती सुटका करून घेतली.

ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत सुरू

$
0
0
‘ पुणे विद्यापीठाच्या परीक्षा अर्जांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेली ऑनलाइन प्रक्रिया सुरळित सुरू असून, पुढील दोन दिवसांत विद्यार्थ्यांपर्यंत हॉल तिकिट पोचण्यासही सुरुवात होईल. येत्या दहा सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असून, त्यापूर्वी हॉल तिकिट विद्यार्थ्यांच्या हातात पडतील, याची पूर्ण दक्षता पुणे विद्यापीठ घेत आहे,’ अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी ‘मटा’ला दिली.

शोध विश्व संमेलनस्थळाचा

$
0
0
टोरोंटो येथे रद्द झालेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनासाठी नव्या ठिकाणाची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने चाचपणी सुरू केली आहे. संमेलनासाठी दोन निमंत्रणे आली असली,तरी प्रत्यक्षात संबंधित संस्थांकडून लेखी प्रस्ताव आल्याशिवाय या विषयी अधिक बोलणे उचित ठरणार नसल्याचेही महामंडळाने मंगळवारी स्पष्ट केले.

अंधांच्या क्षमता सिद्ध करायच्या आहेत

$
0
0
‘हातामध्ये पांढरी काठी, डोळ्यावर काळा चष्मा, हिंडण्या-फिरण्यासाठी कायमच डोळसांच्या मदतीची अपेक्षा मनी बाळगणारा एक व्यक्ती म्हणून तुमच्या मनांमध्ये आम्हा अंधांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. आता तीच प्रतिमा आम्हाला बदलायची आहे; असे सतीश नवले यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images