Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मिळकतकर थकविणाऱ्या २५ हजार जणांना नोटीस

0
0
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स थकविणाऱ्या शहरातील २५ हजार मोठ्या मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाने नोटीसा बजाविल्या आहेत. या मिळकतधारकांनी थकीत प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यास त्यांना वॉरंट बजावून मालमत्ता जप्ती केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

उद्यानाचे आरक्षण निसटण्याची भीती

0
0
गुलटेकडी येथील सॅलसबरी पार्क परिसरातील पावणेदोन एकर जागा ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेला ६५ कोटी रुपयांचा निधीच पालिकेकडे उपलब्ध नसल्याने त्याबाबत त्वरेने निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर दाखल करण्यात आला आहे.

जमीन वाटपाचा ताळमेळ

0
0
पुनर्वसनाच्या जमीन वाटपाचे बनावट दाखले करून शेकडो एकर जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुनर्वसनाच्या जमिनींचा ताळमेळ घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे. मूळ रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष वाटप याची पडताळणी झाल्यावर वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या जमिनींच्या प्रतीक्षेत असलेल्या खऱ्या प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळू शकणार आहे.

‘यंग सीनिअर्स’साठी आधुनिक श्रावणबाळांची वाहने

0
0
आपल्या वृद्ध आई-वडिलांची इच्छापूर्ती करण्यासाठी श्रावणबाळ त्यांना कावडीतून काशीयात्रेला घेऊन निघाल्याची रामायणातील गोष्ट आपल्याला माहिती आहे. सध्याच्या काळात मुले परप्रांतात असलेल्या वृद्ध आई-वडिलांची अशी काळजी कोण घेणार?

एजंट हटाव मोहिमेचा धसका

0
0
‘फक्त लर्निंग लायसन्ससाठीची अपॉइंटमेंट घ्या, आज कोणाचीच पावती करू नका. वातावरण थोडे थंड झाले की मग कामाला लागा’ अशी सूचना संगमपुलाजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) काही एजंट इतरांना करत होते.

कट्-ऑफ ‘अशास्त्रीय’?

0
0
शहरात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या टक्केवारीचे ‘कट्-ऑफ’ निश्चित करण्यासाठी कोणताही शास्त्रीय वा सरकारी नियमांचा आधार घेतला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे.

नियोजित बँक संप मागे

0
0
बँक कर्मचाऱ्यांनी २१ ते २४ जानेवारीदरम्यान पुकारलेला देशव्यापी संप पुढे ढकलला आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशनदरम्यान सोमवारी उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाषा धोरणाला सूचनांची प्रतीक्षा

0
0
मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी गळे काढणाऱ्या व्यक्ती आणि संस्था राज्य सरकारच्या भाषा धोरणावर हरकती आणि सूचना नोंदवण्यात पिछाडीवरच आहेत. या धोरणावर हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन करून दोन महिने उलटून गेले, तरी राज्यभरातून शंभर हरकती सूचनाही अद्याप मराठी भाषा विभागाकडे आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.

अश्विनीची झुंज अखेर अपयशी

0
0
रोडरोमिओंकडून छेडछाड झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अश्विनी वरकड (वय १५) या मुलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. रविवारी रात्री उशिरा तिचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मॅक्डोनाल्डची दिलगिरी

0
0
गरीब मुलाला मॅक्डोनाल्डमधून हाकलून दिल्याप्रकरणी विविध संस्था-संघटनांच्या वतीने सोमवारी जंगली महाराज रस्त्यावर मॅक्डोनाल्डसमोर निदर्शने-आंदोलने करण्यात आली.

लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर

0
0
व्यंगचित्रातून ‘कॉमन मॅन’ला देशभर पोहोचविणारे ज्येष्ठ कॉर्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रकृती गंभीर असली तरी सोमवारी स्थिर होती.

दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

0
0
आत्यासोबत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने ६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १९) पुणे-नाशिक महामार्गावरील बोराटेवस्ती येथे दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

५ जणांना ठोकरणाऱ्या इंडिका चालकास अटक

0
0
भरधाव वेगाने मोटार चालवत पाच जणांना ठोकरणाऱ्या इंडिका चालकास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे अपघातानंतर इंडिकामध्ये आपण सहप्रवासी असून, चालक पसार झाल्याचे त्याने गर्दीला भासविले होते.

‘PMP’साठी हवी ९८ कोटींची तरतूद

0
0
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आगामी बजेटमध्ये ९८ कोटी रुपयांची तरतूद करावी. ही रक्कम दरमहा अदा करावी, अशी मागणी ‘पीएमपीएमएल’चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली आहे.

‘बीआरटी’ होणार ‘इंटेलिजेंट’!

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजित ‘बीआरटीएस’ प्रकल्पांतर्गत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठीच्या (आयटीएमएस-इंटेलिजेंट ट्रान्झिस्ट मॅनेजमेंट सिस्टीम) सुमारे २४ कोटी ६२ लाख रुपयांच्या खर्चास मंगळवारी (२० जानेवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

औंधमधील ३५० सोसायट्यांचे पाणी कनेक्शन तोडणार

0
0
अनेक महत्त्वाच्या केंद्रीय, राज्य संस्था तसेच मान्यवर व्यक्तींचे निवासस्थान असलेल्या औंध क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

घरांमधून वायू प्रदूषणामुळे १५ टक्के बालकांना संसर्ग

0
0
घरांमधील प्रदूषणामुळे १५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींमध्ये फुफ्फुसाचे आजार बळावले आहेत. महानगराकडे झेपाविणाऱ्या पुण्यातील ही परिस्थिती आहे. येरवडा, कासेवाडीसह पर्वतीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या झोपडपट्टींमध्ये स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणाऱ्या रॉकेलमुळे वायू प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पीयूसी’चा सावळा गोंधळ

0
0
शहरात धूर ओकणारी कितीतरी वाहने राजरोसपणे रस्त्यांवरून फिरत असताना, त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘पीयूसी’ प्रमाणत्रांचा एकीकडे सावळा गोंधळ आहे. दुसरीकडे, ही प्रमाणपत्रे वाहनचालकांकडे आहे की नाही, याची तपासणी कोणी करत नाही.

पक्ष्यांच्या अधिवासासंबधी खास वेब अॅप्लिकेशन

0
0
देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवासासंबंधी डेटाबेस तयार करण्यासाठी एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. इला फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरातर्फे मंगळवारी हे अॅप सादर करण्यात आले.

‘गिरीप्रेमी’ देणार गिर्यारोहणाचे धडे

0
0
गेल्या ३३ वर्षांपासून गिर्यारोहण या खेळाचा प्रसार आणि प्रचार करणारी आणि नागरी मोहिमेअंतर्गत एव्हरेस्ट, ल्होत्से वा मकालू शिखरांना यशस्वी गवसणी घालणारी गिरीप्रेमी संस्था आता तरुणांना गिर्यारोहणाचे धडेही देणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images