Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विठ्ठलवाडी नदीपात्राच्या रस्त्याला ब्रेक

0
0
विठ्ठलवाडी नदीपात्राच्या पूररेषेत रस्त्यासाठी घातलेला भराव आणि केलेले बांधकाम तीन महिन्यांच्या आत काढून टाका, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महापालिकेला बुधवारी दिला.

दुबईला नेण्याच्या बहाण्याने ४६ लाखांची फसवणूक

0
0
दुबईला घेऊन जाण्यासाठी पुण्यातील ८४ जणांकडून ४६ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांना दुबईला न नेता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बकोरियांची बदली रद्द करा

0
0
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची राजकीय हेतूने करण्यात आलेली तडकाफडकी बदली रद्द करावी, यासाठी राजकीय पक्षांसह शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी आंदोलन करून भाजप सरकारच्या निर्णयाबाबत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.

बकोरियांकडे ‘अतिरिक्त’ कार्यभार

0
0
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बुधवारी क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर गुरुवारी त्यांच्याकडे पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आल्याचे नवे आदेश राज्य सरकारने काढले.

बदल्यांच्या आदेशाला बाबूंची केराची टोपली!

0
0
राज्याच्या समतोल कारभारासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असला, तरी त्यातील बहुतांश अधिकऱ्यांनी नियुक्तीच्या जागी रुजू होण्याचे टाळले आहे.

मांज्यामुळे येतेय पक्ष्यांवर ‘संक्रांत’

0
0
मकरसंक्रातींनिमित्त टेकड्या, नदीकाठचा परिसर आणि मैदानांवर पतंग उडविण्याची नागरिकांची हौस पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरते आहे. पुण्यामध्ये दर वर्षी जानेवारी ते मार्च या काळात तीनशेहून अधिक घारी मांजामध्ये अडकून जखमी होतात.

७५ लाख भरण्यास ‘विसरले’ बारामती आरटीओ अधिकारी

0
0
बारामती परिवहन कार्यालयातील रोखपाल आणि त्यांचे सहकारी ७५ लाख रुपयांचा व्यावसायिक कर बँकेत भरण्यास ‘विसरल्या’चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१० ते २०१२ च्या दरम्यान घडला होता.

आता पोस्टाचेही ATM कार्ड मिळणार

0
0
टपाल खात्याच्या बचत बँकांमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) कार्ड दिले जाणार असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

नाट्य संमेलनाचे अनुदान दुप्पट

0
0
बेळगाव येथे होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनापासून नाट्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून दुप्पट अनुदान मिळणार आहे.

पल्स पोलिओची रविवारी मोहीम

0
0
देशातून पोलिओचा नायनाट झाला असला, तरी नजीकच्या देशांमधून त्याचा प्रसार होऊ नये याची दक्षता म्हणून ‘दो बूँद जिंदगी के’ अर्थात पोलिओची रविवारी (१८ जानेवारी) मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील एक कोटी ३४ लाख बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे.

३० हजार सहकारी संस्था कागदावरच

0
0
राज्यातील वेगवेगळ्या सहकारी संस्थांपैकी सुमारे १५ टक्के संस्थांचे अस्तित्व निव्वळ कागदोपत्री असल्याचे समोर आले असून, प्रत्यक्षात या संस्था मृतप्राय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘रुपी’चे विलिनीकरण आवाक्यात

0
0
रुपी बँकेची देणी व मालमत्ता घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कॉर्पोरेशन बँकेने सादर केलेल्या ‘ड्यू डिलिजन्स’च्या प्रस्तावास रिझर्व्ह बँक आणि ठेव विमा महामंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे.

राज्यात फसवणुकीचा कारभार

0
0
निःस्वार्थी भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणे अपेक्षित असताना एकाच वेळी दोन ठिकाणचा पगार लाटणारे राज्यात तब्बल तीन हजार शिक्षक सापडले आहेत. त्याची शरम बाळगण्याऐवजी ही बोगसगिरी उघडकीस आणणाऱ्या ‘शालार्थ’ हे सॉफ्टवेअरच कसे ‘लॉग-ऑफ’ करता येईल, यासाठी आता आंदोलनाचा कांगावा उभा केला जात आहे.

आता जमवू ‘मैफल’!

0
0
कार्निव्हलची धमाल झाली, आता वेळ आहे साहित्यिक मैफल जमवण्याची. आपल्या भावना, आपलं वाटणं साऱ्यांसमोर तितक्याच तरलतेनं मांडण्याची... आता भेटू या १७ आणि १८ जानेवारी रोजी गोखले इन्स्टिट्यूटला मटाच्या मैफलीत.

स्वतः ड्रायव्हिंग करताय… सावधान!

0
0
एसटी-खासगी प्रवासी बस वा टुरिस्ट कारऐवजी स्वतःच ड्रायव्हिंगची मजा लुटत ‘एक्स्प्रेस-वे’वर भरधाव जाणाऱ्यांनो सावधान! ‘एक्स्प्रेस-वे’वर कारच्या अपघातांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्याकडे येताना खंडाळा घाट चढल्यानंतर चालकांना झोप येण्याचे प्रकार नोंदवण्यात आले आहेत. पुण्याकडे येताना घाट चढल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तब्बल ६७ अपघात झाले आहेत.

मटा मैफलीत रंगणार ‌अभिवाचन

0
0
लेफ्टनंट कर्नल राइट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांच्यातला हा संवाद आणि पुढे तो रस्ता बांधण्याची सारी धडपड... सैन्य, त्यातील माणसं, त्यांच्यातलं माणूसपण, आपल्या अधिकाऱ्यांविषयी, आपल्या माणसांविषयी असलेली आत्मीयता, ती करडी शिस्त या सगळ्यांतून अतिशय वेगळा अनुभव देणारी ‘रारंगढांग’ ही भन्नाट कथा.

मेडिक्लेम पाहावा करून

0
0
मेडिक्लेम सेटल करण्याची प्रक्रिया अ‌तिशय किचकट आहे. ज्येष्ठ नागरिकांना या प्रकारात प्रचंड मनस्ताप होतो. विमाधारकांना सेवा द्यायची असेल तर एजन्सी नेमण्यापेक्षा स्वत: विमा कंपन्यांनी क्लेम मंजूर करावा. त्यातच ग्राहकांचा फायदा आहे.

जबाबदाऱ्यांचेही हवे भान

0
0
हक्कांसाठी कायम जागरूक असणाऱ्या ग्राहकांनी जबाबदाऱ्यांचेही तेवढेच भान ठेवणे आवश्यक आहे. हक्क आणि जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही खटल्यामध्ये ग्राहकांची भूमिकाही महत्त्वाची असते. सध्याच्या जाहिरात युगात प्रलोभनांना बळी पडता कामा नये.

‘फॉर्च्युन’चा बासमती पुणेकरांसाठी दाखल

0
0
खाद्यतेलाच्या उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या फॉर्च्युन ऑइल कंपनीने आता बासमती तांदूळ विक्री क्षेत्रात पदार्पण केले आहे. कंपनीने खवय्यांसाठी बासमती तांदूळ पुण्यात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

मोरेश्वर मंदिराची सुरक्षा विघ्नहर्त्यावरच

0
0
अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती मोरगाव मोरेश्वर गणपती मंदिराची रक्षा फक्त चार खासगी सुरक्षा रक्षक करतात. पुरातन काळात ५० फूट उंचीची तटबंदी बांधून मंदिराची सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत; मात्र दहशतवादी, माथेफेरूंकडून देशातील मंदिरांना लक्ष्य केले जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images