Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काळेपडळ-महंमदवाडीत येत्या रविवारी पोटनिवडणूक

0
0
हडपसरमधील काळेपडळ-महंमदवाडी येथे महापालिकेच्या एका जागेसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. आमदारपदी योगेश टिळेकर यांची निवड झाल्यानंतर महापालिकेची ही जागा रिक्त झालेली होती.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभागरचना, आरक्षण सोडत जाहीर

0
0
जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यांत रंगणार असून त्यासाठी प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

हे तर कॉर्पोरेट ऑफिस

0
0
दौंड शहरातील शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील विविध कार्यालयांच्या फर्निचरचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्व कार्यालयांचे स्थलांतर इथे होणे अपेक्षित आहे. सर्व कार्यालयांमध्ये तयार फर्निचर वापरण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी नऊ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अस्वच्छता करणाऱ्या ४२ जणांवर खटले

0
0
कचरा वर्गीकरणाबाबत सोसायट्यांसह झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये जाऊन केलेल्या जनजागृ‌तीमुळे सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतंर्गत येत असलेल्या प्रभागांमध्ये कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढले आहे.

बेकायदा प्रार्थनास्थळांच्या सर्वेक्षणाचे आदेश

0
0
शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या बेकायदा प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून येत्या काही दिवसात याचा सविस्तर अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतरच त्यावरील कारवाईबाबत प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

आदिवासी भागात डॉक्टरांची वानवा

0
0
आदिवासी व ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असून, आदिवासींना आरोग्य सेवा पुरविणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांपासून आदिवासी वंचित राहत आहेत, अशी खंत किनवट (जि. नांदेड) येथील डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली.

‘अंधश्रद्धेविरोधात संघर्ष हवा’

0
0
कुटुंब व्यवस्थेला अनेक विळखे पडले आहेत. त्यातील एक विळखा म्हणजे अंधश्रद्धा आहे. शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची वृत्ती समाजात रुजली, तर अंधश्रद्धा कमी होईल.

नाट्यगृह तारखांचा अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे

0
0
चौमाही वाटपामध्ये नाट्यसंस्थांना देण्यात आलेल्या तारखा शासकीय कार्यक्रमांशिवाय काढून घेतल्या जाणार नाहीत; तसेच या तारखा रद्द करण्याचे अधिकार महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे राखीव असतील, असा निर्णय नाट्य निर्मात्यांच्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यासह नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

विकासकामांना पैसा आणायचा कुठून?

0
0
महापालिकेला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील ३१ टक्के रक्कम ही महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो. त्यामुळे शहरातील विविध भागात विकासाची कामे करण्यासाठी आवश्यक असलेला निधी कसा आणि कुठून उभा करायचा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

बजेटचा फुगवलेला फुगा फुटला!

0
0
महापालिकेला वास्तवात मिळणारे उत्पन्न आणि विकासकामे व इतर सेवांवर केला जाणारा खर्च, याकडे साफ दुर्लक्ष करून फुगवल्या जाणाऱ्या बजेटमधील आकड्यांचा फुगा पुन्हा एकदा फुटला आहे.

बजेट आराखडा ३९९७ कोटींचा

0
0
बजेटमध्ये अपेक्षित धरलेले उत्पन्न मिळविताना महापालिकेची कसरत होत असतानाच, २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तीन हजार ९९७ कोटी रुपयांचा बजेट आराखडा बुधवारी स्थायी समितीला सादर केला.

पालिकेच्या सुविधा एका ‘क्लिक’वर

0
0
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून महापालिकेच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात महापालिकेच्या बहुसंख्य सेवा-सुविधा वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

जमावाच्या मारहाणीत खिसेकापूचा मृत्यू

0
0
राजगुरुनगर बसस्थानकामध्ये एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेची पर्स घेऊन पळणाऱ्या खिसेकापूला रंगेहाथ पकडल्यानंतर जमावाने लाथाबुक्क्या व काठीने केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

‘शालार्थ’च्या सक्षमतेसाठी होणार प्रयत्न

0
0
‘शालार्थ’मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण खात्याकडून व्यापक प्रयत्न केले जात असून, या पुढील टप्प्यात शिक्षकांचे पगार थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे बुधवारी शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले.

‘क्लिनिकल ट्रायल’मधील गैरकृत्यांना शिक्षा

0
0
देशभरातील औषध कंपन्यांकडून होत असलेल्या औषधांचे ‘क्लिनिकल ट्रायल’ करताना कायद्याचे उल्लंघन केल्यास कंपनीच्या संबंधितांना तीन वर्षांच्या कारावासाच्या अथवा पाच लाख रुपये दंडाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

पैसे न दिल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून

0
0
वडिलांनी जमीन विक्री केल्यानंतर स्वतःच्या पत्नीच्या नावावर ठेवलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून युवकाने पत्नीचा मंगळवारी गळा दाबून खून केला. या वेळी सुनेला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांनाही त्याने खोलीत कोंडून ठेवले होते.

‘दहशतवादाविरोधात लष्कर सुसज्ज’

0
0
भारतावर कोणत्याही प्रकारे होणाऱ्या हल्ल्याच्या बीमोड करण्यासाठी भारतीय लष्कर सुसज्ज आहे. देशहिताच्या संरक्षणासाठी भारतीय लष्करातील प्रत्येक जवान प्राणाची बाजी निश्चितपणे लावेल, असा विश्वास लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांनी व्यक्त केला.

‘त्या राजकारण्यांवर बहिष्कार घाला’

0
0
‘विधान परिषदेतील साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञांच्या जागांवर राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे. या विरोधात कोणीच आवाज उठवत नाही. या जागा बळकावणाऱ्या राजकारण्यांवर बहिष्कार घातला पाहिजे,’ अशा शब्दांत नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी राजकारण्यांवर तोफ डागली.

भूमी अधिग्रहण कायद्यातील फेरबदल चुकीचे

0
0
शेतकऱ्यांच्या हिताचा आणि फायद्याचा भूमी अधिग्रहण कायदा काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्यात चुकीच्या पद्धतीने बदल करून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने घेतला आहे.

सहकाराच्या स्वार्थाला चाप

0
0
राज्यातील दोन लाख ३५ हजार संस्थांपैकी कागदोपत्री असलेल्या ३० हजारांहून अधिक संस्थांमधील सहकाराच्या स्वार्थाला आता चाप बसणार असून सहकारसंस्थांच्या आगामी निवडणुकीच्या माध्यमातून हे ‘शुद्धिकरण’ करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images