Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुखावलेल्या पत्नीचे वळवले मन

0
0
पतीने आपल्याकडेही लक्ष द्यावे अशी तिची अपेक्षा होती..आईने सांगितलेली किरकोळ गोष्टही तो ऐकतो... आपल्या म्हणण्याला किंमतही देत नाही... संसारात आपल्याला महत्त्वच नाही म्हणून दुखावलेल्या पत्नीने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला...

‘कचऱ्यासंबंधातील प्रक्रियेत सुसूत्रता हवी’

0
0
कचऱ्याची समस्या गेल्या चार वर्षांपासून गंभीर झाली असताना आजही कचरा गोळा करण्यापासून त्याच्या विल्हेवाटीपर्यंतच्या प्रक्रियेत एकसूत्रता नाही. त्याबाबत कचरा वेचक कष्टकरी महिलांसदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्या पौर्णिमा चिकरमाने यांच्याशी चैत्राली चांदोरकर यांनी साधलेला संवाद.

गांडूळखत निर्मितीसाठी वैशिष्ट्यपूर्ण बॅग

0
0
कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका आणि प्रशासन त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेतच; पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून घरातील ओला कचरा घरीच जिरवू शकलो, तर नक्कीच खारीचा वाटा उचलू शकतो.

सोसायट्या ६३०; प्रकल्प फक्त १८८

0
0
शहरातील उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग अशी ओळख असलेल्या ढोले पाटीलरोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहा प्रभागांमधील ६३० सोसायट्यांपैकी केवळ १८८ सोसायट्यांमध्ये गांडूळखत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

कँटोन्मेंट उपाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आता उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पाचही नगरसेवक पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून, प्रत्येक नगरसेवकाला एक वर्षासाठी उपाध्यक्षपद देण्याचे धोरण भाजपकडून स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आडतीसंदर्भात १५ जानेवारीला बैठक

0
0
शेतमालावरील आडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून घेण्याच्या निर्णयावर राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या १५ जानेवीराला मुंबईतील साखर भवनामध्ये बैठक बोलावली आहे.

प्रतिष्ठेसाठी पैसे देऊन पुरस्कार वाढले

0
0
आज सर्वच गोष्टींचे बाजारीकरण झाले असून, पुरस्कारही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. प्रतिष्ठेसाठी पैसे देऊन पुरस्कार मिळविण्याचे प्रकार सध्या घडत आहेत आणि यातील संधी पाहून काही व्यक्तींनी पुरस्कार देणाऱ्या संस्थाही सुरू केल्या आहेत, अशी टीका सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी नुकतीच केली.

दशा बदलण्यासाठी नियोजन हवे

0
0
‘मराठी चित्रपटाचा प्रवास ‘श्वास’नंतरच्या दशकात योग्य वाटेवरून सुरू आहे. मात्र, नियोजनपूर्वक व परिश्रमपूर्वक काम केल्यास चित्रपटांची दशा बदलेल,’ असा सूर ‘मराठी चित्रपट : दशकाची दिशा आणि दशा’ या विषयावर झालेल्या परिसंवादात उमटला.

मटण, मासळीच्या ४७४ विक्रेत्यांना नोटिसा

0
0
पुणे विभागातील मटण मासळीची दुकाने तपासण्याची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हाती घेतलेल्या मोहिमेत विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या ४७४ विक्रेत्यांना नोटिसा पाठवून कारवाई करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेची सायकल योजना रखडली

0
0
गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेल्या जिल्हा परिषदेच्या सायकल खरेदी योजनेला या वर्षीदेखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुण्यातील दूरशिक्षणाची आज तपपूर्ती

0
0
नरेंद्र मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाची देशभरात चर्चा असताना पुण्यातील दूरशिक्षणाची आज, बुधवारी (१४ जानेवारी) तपपूर्ती होत आहे.

आता ‘SCERT’ मध्येही पीएचडी

0
0
पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमधील (एससीईआरटी) पीएचडीच्या संशोधन केंद्राच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

परदेश दौऱ्यांची माहिती नाकारली

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह विविध पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचा तपशील माहिती अधिकारातून नाकारल्याचा प्रकार उघड झाला आहे.

शहरातील शाळा बंद आंदोलन मर्यादितच

0
0
तील शैक्षणिक संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी दिलेल्या एकदिवसीय लाक्षणिक शाळा बंद आंदोलनाला मंगळवारी शहरात मर्यादित प्रतिसाद मिळाला.

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘लेखन वाचन’ प्रकल्प सुरू

0
0
शैक्षणिक उपक्रमांमध्ये मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये आता ‘लेखन वाचन’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

पगार ‘ऑफलाइन’च

0
0
शिक्षकांच्या पगारांसाठी राज्यात जवळपास गेल्या दीड वर्षांपासून ‘शालार्थ’ ही ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही शिक्षकांची पगार बिले काढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच कागदी लिखापढी अद्यापही सुरुच असल्याचे आता समोर येत आहे.

वाहतूक पोलिसांची वेबसाइट बंद

0
0
पुणे वाहतूक पोलिसांची वेबसाइट गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या वेबसाइटचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ न झाल्यामुळे ‘एनआयसी’कडून ती सुरू करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दारूच्या नशेत भावासह शेजाऱ्यावर वार

0
0
आपल्याच लहान मुलांनाच मारत असलेल्या मद्यपीला थांबवण्यासाठी गेलेल्या त्याच्या भावावर आणि आईवर, या ‘तळीरामा’नेच चाकुने हल्ला केल्याचा प्रकार आंबेगाव येथे घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रोजच्या उत्पन्नातील तुटीत ५० टक्के घट

0
0
‘पीएमपीएमएल’मधील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालून ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ‘पीएमपी’च्या ताफ्यातील ८० टक्के बस रस्त्यावर आणल्याने ‘पीएमपी’च्या दैनंदिन फेऱ्यांमधील तोटा ५० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

पुण्याच्या विकास आराखड्याला मुहूर्त

0
0
पुण्याच्या प्रलंबित विकास आराखड्याबाबत (डीपी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवहार्य आणि रोखठोक भूमिका घेतल्याने येत्या तीन ते चार महिन्यांत शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य सरकारपुढे सादर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images