Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माणिकडोहला बिबट्यांसाठी स्वच्छंदी विहार

$
0
0
माणिकडोहला बिबट्या निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या बिबट्यांसाठी स्वच्छंदी विहार करता येईल, असे झाडोरा असलेले पिंजरे बांधण्यात येत आहेत. नाविन्यपूर्ण उपाययोजनेअंतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीकडून उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे पिंजरे तयार करण्यात येत आहेत.

खेळाडूंना शहरी गरीब आरोग्य सहाय्य योजना

$
0
0
पुण्यातील खेळाडूंना बलदंड करण्यासाठी अभिनव योजना आखणाऱ्या पुणे महापालिकेने वैद्यकीय उपचारासाठी मात्र हात आखडते घेऊन खेळाडूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ घटकात टाकले आहे. वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या शहरातील नागरिकांसाठी महापालिकेची ‘शहरी गरीब आरोग्य सहाय्य योजना’असून, ही योजना खेळाडूंसाठी लागू करण्याचे महापालिकेच्या क्रीडा समितीने क्रीडा धोरणात सुचविले आहे.

फळ - पालेभाज्या पुन्हा स्वस्त

$
0
0
पावसाने उसंत दिल्याने बाजारात फळ आणि पालेभाज्या भरपूर उपलब्ध होऊ लागल्या असून, परिणामी, त्यांचे भावही घटले आहेत. कोबी, फ्लॉवर, घेवडा, शिमला मिरची आणि पाले भाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथी स्वस्त झाली आहे. कोथिंबिरीच्या जुडीचा भाव ४ ते ५ रुपये आहे. परंतु, पुरेसा माल येऊनही कांदा आणि बटाट्याचे भाव पुन्हा वाढले आहेत.

‘महा- ई- सेवा’ केंद्राला नागरिकांची पसंती

$
0
0
नागरिकांना घराजवळच रेशनकार्ड काढता यावे, यासाठी ‘महा-ई-सेवा’ केंद्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सुविधेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रेशनकार्ड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत गेल्या महिन्यात तब्बल पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत.

गणपतीत लाउडस्पीकर्सची वेळ वाढवा

$
0
0
गणेशोत्सवामध्ये अखेरच्या पाच दिवसांच्या काळामध्ये रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर्स लावण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी शासनाकडे केली आहे.

प्रतिष्ठापनेत २१ पत्रींऐवजी रोपे ठेवा

$
0
0
यंदा श्रींची प्रतिष्ठापना करताना २१ पत्री वाहण्याऐवजी या पत्रींची रोपे पूजेत ठेवून नंतर त्यांचे रोपण करावे, असे आवाहन स्वस्तिश्री हॉबीजतर्फे करण्यात आले आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेत संस्थेने या रोपांचे आयुर्वेदीय महत्त्व देखील अधोरेखित केले आहे.

आरक्षणांचे नाही रक्षण

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एक हजार १६१ हेक्टर आरक्षण क्षेत्रापैकी केवळ २९९ हेक्टर क्षेत्र ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले असून, आजपर्यंत ८६२ हेक्टर क्षेत्र ताब्यात नसल्याने त्याभोवती अतिक्रमणांचा विळखा तयार झाला आहे. विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर तब्बल सतरा वर्षानंतर महापालिका प्रशासनाने आरक्षणांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी वेबसाइटवर प्रसिद्ध केली असून, हा प्रकार उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

‘त्या’बिल्डरवर कारवाई करा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटींचा भंग करणार्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

बिल्डरने अटींची पूर्तता केली तरच व्हॅट भरा

$
0
0
फ्लॅट घेताना बिल्डर बरोबर केलेल्या करारनाम्यातील प्रत्येक अटीची पूर्तता बिल्डरने केल्यानंतरच ग्राहकांनी व्हॅट भरण्याची तयारी दाखवावी, असे स्पष्ट करतानाच व्हॅट विरोधात आवाज उठविण्यासाठी ग्राहकांनी संघटीत होऊन लढा द्यावा, असे आवाहन सजग नागरिक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आले.

विद्यापीठ विद्यार्थिभिमुखच

$
0
0
विद्यार्थ्यांना आता पुणे विद्यापीठातील समस्यांबाबत आंदोलने करण्याची वेळ येणार नाही, अशी आशा निर्माण झाली आहे. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ताबडतोड तोडगा निघावा, यासाठी नुकत्याच दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे हेच या समित्यांचे मुख्य ‘मँडेट’ असेल.

आळ्यांच्या मेजवानीवर शिक्कामोर्तब

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्टरी’तील जेवणात आळी होती, हे सिद्ध झाले असले, तरी त्याचा नेमका स्रोत काय होता, याचा छडा लागलेला नाही. जेवणात आळी आढळली असली, तरी ‘रिफेक्टरी’मध्ये पुरेशी स्वच्छता असल्याचा अहवाल यासंदर्भात नेमलेल्या समितीने दिला आहे.

वाङ्मयप्रसारातून जपली साहित्याची पणती

$
0
0
‘सध्याच्या काळात चंगळवादी वृत्तीमुळे संस्कृती, मूल्ये, जाणिवा यांचा ऱ्हास होत असताना वाङ्मयप्रसाराच्या माध्यमातून साहित्य-संस्कृतीची पणती तेवत ठेवण्याचे काम सारडांनी निरपेक्ष भावनेने केले’, असे गौरवोद्गार माजी खासदार यशवंतराव गडाख-पाटील यांनी रविवारी काढले.

मनसेचा अभिनव उपक्रम

$
0
0
सात-बारा म्हणजे नक्की काय, फेरफार उतारा कशाला म्हणतात, तो कुठे मिळतो, प्रलंबित दावे किती वर्षे चालतात, प्रॉपर्टीवर नाव कसे नोंदवायचे, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते... यासारख्या वर्षोनुवर्षे मनात राहिलेल्या असंख्य प्रश्नांचा रविवारी वाचा फुटली. निमित्त होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली जमीन कशी शोधाल?’ या कार्यक्रमाचे.

एक पडदा चित्रपटगृहांवर पडणार आंदोलनाचा पडदा

$
0
0
एक पडदा चित्रपटगृहचालकांना असलेल्या अडचणींबाबत राज्य सरकारकडे अनेकदा पाठपुरावा करूनही त्याबाबतीत अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने १२ ऑक्टोबरपासून राज्यभरात एक पडदा चित्रपटगृहांच्या बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

बेकायदा बांधकामांवर हातोडा

$
0
0
कोथरूड, पौड रोड आणि कर्वेनगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेच्या वतीने केलेल्या कारवाईत सुमारे तीस हजार चौरस फूटांची बांधकामे पाडण्यात आली. यावेळी जमावाने महापालिकेच्या पथकास विरोध केला, मात्र पोलिसांच्या साह्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

आधार...‘नॉट इन सर्व्हिस’

$
0
0
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक नागरिकांनी आपली ओळख पटविणारे ‘आधार कार्ड’ काढावे, यासाठी जनजागृती करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र, आधारबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली हेल्पलाइन ‘नॉट इन सर्व्हिस’ असल्याने नागरिकांच्या मनस्तापात अधिकच भर पडत आहे.

हरित विकास आराखडाच पाहिजेः कलमाडी

$
0
0
पुण्याचा विकास आराखडा हा हरित विकास आराखडाच राहिला पाहिजे, असा नारा खासदार सुरेश कलमाडी यांनी दिला आहे. डोंगरमाथा आणि डोंगर उतारावरील यापूर्वी झालेली जुनी बांधकामे सोडून उरलेले सर्व क्षेत्र हा हरितपट्टाच राहिला पाहिजे, यासाठी आपण आग्रही राहू, असे त्यांनी रविवारी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

नव्या कारभाऱ्यांकडून जुने कारभारी धारेवर

$
0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या नव्या कारभाऱ्यांनी जुन्या कारभाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. कै. शारदाबाई पवार जन्मशताब्दीनिमित्त हाती घेतलेल्या ई- लर्निंग योजनेच्या साहित्य खरेदीप्रकरणी गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि शिक्षणप्रमुखांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुण्यातील पार्टीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

$
0
0
पुण्यातल्या बेकायदेशीर पार्टी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि उच्चस्तरीय समिती नेमून संबंधितांवर कारवाई करावी, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

मद्यधुंद ‘माया’ उधळली

$
0
0
मुंढव्यातील चिल्लर पार्टी राज्यभरात गाजत असतानाच शनिवारी रात्री वाघोली येथील ‘डर्टी पार्टी’ पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळली. मद्यधुंद अवस्थेतील ११४ तरुणी आणि १८९ तरुणांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. मात्र, किरकोळ कलमे लावून त्यांना सोडून देण्यात आले. या पार्टीत आयटी इंजिनीअर, विद्यार्थी, व्यावसायिकांचा भरणा असलेल्या होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images