Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुचाकीवरील तरुणाचा खून

$
0
0
हिंगणे खुर्द येथील कॅनाल रोडवर आनंदवन हेरिटेजजवळ दुचाकीवरून चाललेल्या तरुणावर चार-पाच हल्लेखोरांनी हत्यारांनी वार करत खून केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून खुनाचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखांना गंडा

$
0
0
हॉ​स्पिटलच्या बांधकामासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने पंढरपूर येथील एका व्यक्तीची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग बागल (वय ६९, रा. पंढरपूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

फरार अफगाण कॅप्टनला राजनैतिक व्हिसा

$
0
0
अफगाणिस्तानच्या लष्करातील कॅप्टन हादीम मोहंमद सादीक उर्फ आदिलशाह याच्यावर अफगाणिस्तानात गुन्हे दाखल असतानाही त्याला भारतात येण्यासाठी ‘डिप्लोमॅटिक व्हिसा’ देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासादरम्यान उघड झाला आहे.

‘रुपी’चा पेच मिटविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

$
0
0
रुपी बँकेचा पेच मिटवून ठेवीदार-खातेदारांना दिलासा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार लवकर पावले उचलेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले.

‘रायसोनी’ पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह पतसंस्थेच्या संचालकांवर ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रीडा स्पर्धांचा खर्च महापौरांमुळे कोटीने कमी

$
0
0
महापालिकेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी’ केल्या जाणाऱ्या खर्चाचा सविस्तर आढावा घेऊन त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतल्याने स्पर्धांवरील खर्च तब्बल १ कोटी ३ लाख रुपयांनी कमी झाला आहे.

नगर रोड BRT चा अडथळा दूर

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नगर रोड, संगमवाडी आळंदी हा बीआरटी मार्ग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) यंत्रणा बसविण्याचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला.

अल्पवयीन मुलाकडून तरुणाचा खून

$
0
0
व्याजाच्या पैशांतून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या दोघा मित्रांच्या मदतीने गंजपेठीतील २१ वर्षांच्या तरुणाचा कोयत्यांनी वार करत खून केला. ही घटना सोमवारी रात्री नदीपात्रात घडली.

‘शेतकऱ्यांसाठी हवामान माहिती सेवा’

$
0
0
ऊस शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याच्या बचतीवर भर देण्यास प्राधान्य देणार असल्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी सांगितले. शेतकऱ्यांना हवामानविषयक संदेश लवकरात लवकर देण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोथरूडमध्ये करा कचराप्रकल्प

$
0
0
शहरात निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी वारंवार मागणी करूनही जागा देण्यासाठी राज्य सरकारकडून केली जाणारी टाळाटाळ आणि गंभीर होत असलेला कचराप्रश्न सोडविण्यासाठी शहरातच कचरा जिरविण्याची मागणी होत आहे.

सासवडला कचरागाड्या रोखल्या

$
0
0
पुणे शहरातील कचरा प्रश्न चिघळला असताना आणि सासवडचा कचरा डेपो देखील वादात अडकला असताना आता गेले चार दिवस राजरोसपणे चार गाड्या कचरा पुण्यातून बापदेव कोंढवा घाटमार्गे सासवड येथे आणला जात आहे.

घनकचरा विभागाची चौकशी करण्याची मागणी

$
0
0
पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे गेल्या काही वर्षांत कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खत, वीज व गॅसनिर्मितीचे अनेक प्रकल्प उभे राहिले असले, तरी प्रत्यक्षात ते पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आमदार-खासदारांची झोप मोडणार

$
0
0
खासगी हॉस्पिटल आणि विमा कंपन्यांच्या वादातून कॅशलेस सेवा बंद झाली असून त्याबाबत तोडगा न काढल्यास शहरातील आठही आमदारांसह खासदारांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन झोप मोड आंदोलन करण्याचा इशारा मराठा युवा फाउंडेशनने दिला आहे.

संप लांबणीवर; बँका आज सुरू

$
0
0
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेला देशव्यापी संप पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सर्व बँकांमधील कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजचे राज्य निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली.

‘कॅशलेस’साठी ऑपरेशन पुढे

$
0
0
‘कॅशलेस’ बंद झाल्याने सुविधा कार्यान्वित होण्यासंदर्भात पेशंटच्या नातेवाइकांची हॉस्पिटलकडे चौकशीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सेवा सुरू झाल्यानंतरच ‘ऑपरेशन’ करण्याचे नियोजन करण्यात येत असून तोपर्यंत पुढे ढकलण्याची वेळ पेशंटसह नातेवाइकांवर आली आहे.

‘PMP’चा रू. १.८२ कोटींचा विक्रम

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना सोमवारी सर्वाधिक उत्पन्नामुळे अधिक बळ मिळाले.

गांडूळप्रकल्प नाही;पाणी नाही

$
0
0
तुमच्या सोसायटीतील गांडूळखत प्रकल्प सुरू आहे का, याची तपासणी त्वरेने करून घ्या... कारण, हा प्रकल्प बंद असल्यास पालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाईसह सोसायटीचे पाणीही तोडले जाण्याची शक्यता आहे.

बेशिस्त वाहतुकीवर तात्पुरती उपाययोजना

$
0
0
अपुरी (की अकार्यक्षम) वाहतूक नियंत्रण व्यवस्था रस्त्यांची दुरवस्था, बेशिस्त वाहनचालक आणि पादचऱ्यांची रस्ता पार करताना होणारी तारांबळ हा आता अगदी नित्याचा विषय झाला आहे. वाहतूक विभागाकडून रोज नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न होताना दिसत असला, ती तो तात्पुरत्या स्वरूपाचा व अल्पकाळ टिकणारा असल्याचे जाणवते.

दीर्घकालीन नियोजनाची गरज

$
0
0
कोणत्याही शहराचा विकास होत असताना, त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने बहुतांश शहरांमध्ये आधी विकास होतो आणि मग त्याचे नियोजन केले जाते. पुणेही त्याला अपवाद नाही.

राज्य बोर्डांसाठी आव्हान

$
0
0
परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वेळ वाचविण्याबरोबरच पारदर्शकता आणणे; तसेच इतर बोर्डांशी स्पर्धा करताना आपला स्तर उंचावणे, असे दुहेरी आव्हान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पेलावे लागणार असल्याचे मत बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images