Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रिक्षाचे बिल न दिल्याने शिक्षणमंडळाची शाळा बंद

$
0
0
विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रिक्षांचे बिल गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षणमंडळाने न दिल्याने रिक्षाचालकांनी दांडी मारली. परिणामी, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दत्तवाडी येथील क्रीडा निकेतनची शाळा संपूर्ण दिवस बंद राहिली.

नसबंदीच्या संख्येत १० वर्षांत झाली १० टक्के घट

$
0
0
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नसबंदी करून घेणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत दहा टक्क्यांहून अधिक घट झाल्याची माहिती अल्पसंख्याक शैक्षणिक चळवळीच्या सर्व्हेमधून पुढे आली आहे.

हजारो ‘कॅशलेस’ पुणेकर वेठीला

$
0
0
मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या आणि शहरातील खासगी हॉस्पिटल या दोघांच्या वादात हजारो पुणेकरांची कॅशलेस मेडिक्लेम सेवा गेले अनेक दिवस बंद झाली आहे. त्यामुळे हजारो पेशंट्सवरील उपचार रखडले असून शेकडो अत्यावश्यक ऑपरेशन्स केवळ पैशांअभावी लांबणीवर पडत आहेत.

‘सीबीआय’चे ‘आयआरबी’वर छापे

$
0
0
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्याशी निगडीत पुणे, मुंबई आणि लोणावळा परिसरातील २१ ठिकाणी सोमवारी छापे घातले.

मेडिकल CET ७ मे रोजी होणार

$
0
0
राज्यातील मेडिकल प्रवेशांसाठी होणारी एमएच-सीईटी यंदा ७ मे रोजी होणार आहे. परीक्षेचे स्वरूप गेल्या वर्षी झालेल्या सीईटीसारखेच असले, तरी त्यातील निगेटिव्ह मार्किंग काढून टाकण्यात आले आहे.

मराठा आरक्षणास टिकवून धरणार

$
0
0
‘मराठा आरक्षणाच्या मार्गात कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तरीही राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी उभे राहील आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकवून धरण्यात येईल,’ अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

‘चेहरा’ लावणार विद्यार्थ्यांची हजेरी!

$
0
0
केवळ बायोमेट्रिक हजेरीपुरते मर्यादीत न राहता, बिट्स पिलानी या शैक्षणिक संस्थेने आपल्या चारही कँपससाठी आता ई-अटेंडन्स सिस्टिम सुरू केली आहे. विद्यार्थीवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेल्या सेल्फीच्या संकल्पनेचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे.

लायसन्सच्या रांगेत ‘नो एन्ट्री’

$
0
0
परिवहन विभागाकडून कायमस्वरुपी वाहन परवाना घेण्यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याचे बंधनकारक केलेला नियम सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. शिकाऊ परवाना घेणाऱ्यांची संख्या ही कायमस्वरुपी वाहन परवाना घेणाऱ्यांच्या दुप्पट असल्याने परिवहन विभागाची यंत्रणाच कोलमडण्याच्या अवस्थेत आहे.

पद्माकर कुलकर्णी यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. पद्माकर कुलकर्णी (८२) यांचे मंगळवारी (सहा जानेवारी) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चिंचवड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. प्रकाश आमटे यांना अभिनव सामाजिक पुरस्कार

$
0
0
अभिनव सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘अभिनव सामाजिक पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे.

काँग्रेसचा गड हिसकावताना BJP, NCP ची दमछाक

$
0
0
लष्करी वसाहत आणि नागरी वस्ती मिळून तयार झालेला वॉर्ड क्रमांक सहा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तो काबीज करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.

संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्नांवर संरक्षणमंत्र्यांची बैठक

$
0
0
शहर व परिसरातील नागरिकांच्या संरक्षण खात्याशी संबंधित विविध प्रश्नांवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गुरुवारी (८ जानेवारी) पुण्यात बैठक घेणार आहेत. त्यामध्ये विमानतळ परिसरातील बांधकामे, रेड झोन, घोरपडी उड्डाणपूल आणि बोपखेलमधील रस्ता असे विविध प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

शिक्षण मंडळाच्या शाळांचा कारभार ‘एककल्ली’

$
0
0
शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून, सदस्यांना विश्वासात न घेता एककल्ली कारभार सुरू असल्याची टीका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ आणि उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी यांनी केली आहे.

मतदानासाठी निवासी पुराव्याची सक्ती हवी

$
0
0
णे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी बोर्डाच्या हद्दीतील निवासाचा पत्ता असलेला पुरावा असल्याशिवाय मतदारांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी केली आहे.

दापोडी-बोपखेल रस्त्याचे लवकरच रूंदीकरण

$
0
0
केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका यांच्यातील समन्वयामुळे दापोडी ते बोपखेल या संरक्षण विभागाच्या (सीएमई) हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.

११.५ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

$
0
0
गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनातील पानमसाला, गुटख्याचा ११ लाख ५२ हजारांचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी जप्त करण्याची कारवाई केली. यासंदर्भात वाहनचालकांसह मालकाविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘DBTL’साठी आधार नोंदणी लवकरच सुरू होणार

$
0
0
गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील ५५ टक्के ग्राहकांची बँक खाती आणि एलपीजी क्रमांकाची जोडणी (लिंकेज) झाली आहे.

साहसाविना आयुष्य मिळमिळीत

$
0
0
‘अलीकडे लोक श्रीमंती, एंजॉयमेंटकडे धावतात. मात्र, कालांतराने त्यालाही कंटाळतात. आयुष्यात काही तरी साहस असले पाहिजे. नाहीतर, आयुष्य मिळमिळीत होते. खोट्या आनंदावर जगत रहावे लागते,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडले.

मार्केट यार्ड आवारातील किरकोळ व्यापार थांबवा

$
0
0
बाजार समितीच्या आवारात बेकायदेशीरपणे किरकोळ व्यापार बंद करण्यात यावा, अशी मागणी शहरातील पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाने केली आहे. हा व्यापार बंद न झाल्यास शहरातील २५ हजारांहून अधिक किरकोळ व्यापारी बेमुदत बंद पुकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

स्कॉलरशिप अर्जाच्या मुदतवाढीवरून गोंधळ

$
0
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढविण्यात आल्याचे या खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केले. मात्र, विभागाच्या वेबसाइटवर फक्त १६ जानेवारीपर्यंतच मुदतवाढ दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images