Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कॅशलेस इन्शुरन्स’च्या प्रश्नात लक्ष घालणार

$
0
0
मेडिक्लेमचे पैसे भरूनही हॉस्पिटलमधून कॅशलेस सुविधा मिळत नसल्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी दिले. विमा कंपन्या आणि हॉस्पिटल यांच्यातील वादामध्ये मेडिक्लेम काढणाऱ्या पेशंट्सना पुण्यातील हॉस्पिटलमधील कॅशलेस सुविधा मिळणे बंद झाले आहे.

२.५ लाखांची चोरी; ६ जणांना कोठडी

$
0
0
वाकड येथील आर. पी. इंजिनीयर्स कंपनीतून दोन लाख ६६ हजार रुपयांचे तांबे व पितळी जॉब चोरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या सहा ६ भंगार व्यावसायिकांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नफ्यासाठीच बँकिंग हवे

$
0
0
सरकारी बँकांच्या थकित व बुडित कर्जांचे प्रमाण चिंताजनक आहे, या थकित व बुडित कर्जांचे वाढते प्रमाण सहन करण्यासारखे नाही.

सिलेंडरच्या स्फोटात ५ जण जखमी

$
0
0
डेक्कनच्या पुलाचीवाडी येथील प्रेमनगरमध्ये एका घरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये घरातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुलगी झाल्यास बिल माफ

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून मेडिकेअर हॉस्पिटलच्या वतीने गर्भवती मातेस मुलगी झाल्यास वैद्यकीय बिल माफ करणाऱ्या डॉ. गणेश राख यांच्या पुढाकाराने हडपसरच्या मानवी संस्थेने मुलीच्या भवितव्यासाठी १०,००० रुपयांची बँकेत एफडी करण्याचा उपक्रम सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रामटेकडी येथे घेतला.

बेकायदा जाहिरात... जाल तुरुंगात

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये बेकायदा जाहिरात लावल्यास त्याची थेट पोलिसांकडे तक्रार करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

चतुरस्र लेखिका पदकी कालवश

$
0
0
ज्येष्ठ साहित्यिका सरिता मंगेश पदकी (८६) यांचे अमेरिकेत निधन झाले. बालवाङ्मय, कथा, कविता, अनुवाद अशा स्वरूपाचे विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.

कुलूप तोडून साडेचार लाखांचे दागिने लांबवले

$
0
0
कर्वेनगर येथील मेरीगोल्ड सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे चार लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना शनिवारी दुपारी अवघ्या तासाभरात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

कांदा, बटाट्याच्या भावात घट

$
0
0
छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो व काकडी यांच्या भावात घट झली तर, लसूण, हिरवी मिरची व मटारच्या भावात वाढ झाली आहे. अन्य भाज्यांचे भाव स्थिर असून किरकोळ बाजारातही पालेभाज्यांचे दर उतरले आहेत.

घरफोड्यांचे गुन्हे उकलणार कधी?

$
0
0
वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाबरोबर येरवडा उपनगरात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या आणि चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या स्थानिक पोलिसांना मात्र, घरफोड्यांचे गुन्हे उकलण्यात यश आलेले नाही.

‘भीमाशंकर’मधील वन्यजीवांना धोका

$
0
0
वाढता मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, अनधिकृत बांधकामे, हॉटेल, रिसोर्ट्स, काही भागात झाडे तोडून करण्यात आलेले बेकायदेशीर रस्ते, थेट कोअर भागातूनच होणारी वाहनांची ये जा, ध्वनिप्रदूषण, इंधनामुळे होणारे वायप्रदूषण, अनधिकृत शिकार, प्रचंड प्रमाणात होत असलेला प्लास्टिकचा वापर, पडकईच्या माध्यमातून डोंगर फोडून निर्माण करण्यात आलेली जमीन, जंगल क्षेत्रात वाढलेला पाळीव प्राण्यांचा वावर अशा विविध कारणांमुळे वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनलेल्या भीमाशंकर अभयारण्याच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे.

दौंडमध्ये जादा बिलांचा वीज ग्राहकांना शॉक

$
0
0
दौंडच्या वीज वितरण केंद्राचा वीजबिलांचा सावळा गोंधळ सुरू आहे. जादा रकमेची बिले पाठवून ग्राहकांना शॉक देण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. सर्वसामान्यांना असे धक्के बसत असताना सत्ताधारी भाजपच्या शहर अध्यक्षांनाच जादा आकारणीच्या बिलाचा शॉक दौंडच्या वीज वितरण कंपनीने दिला आहे.

रेल्वेत दगड फेकल्याने काच फुटून महिला जखमी

$
0
0
मुंबईवरून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसवर अनोळखी व्यक्तीने दगड फेकल्याने खिडकीची काच फुटून प्रवासी महिला जखमी झाली. हा प्रकार नुकताच यवत ते केडगावदरम्यान घडला.

औंधमध्ये फुटपाथचे काम अपुरे

$
0
0
औंध येथील जगदीशशनगर सोसायटी येथील काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले फुटपाथचे काम अर्धवट अवस्थेतच बंद करण्यात आले आहे. कस्तुरबा वसाहत परिसरात काही दिवसांपूर्वी पादचारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते.

गंभीररीत्या भाजलेल्या खेडच्या मुलाचा मृत्यू

$
0
0
खेड तालुक्यातील कोरेगाव (खुर्द) येथे प्रातर्विधीसाठी गेलेल्या १३ वर्षांच्या शालेय मुलाला दोन अनोळखी व्यक्तींनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आकाश संदीप महाळूनकर असे त्याचे नाव आहे.

बालेवाडी-बाणेरमध्ये बसस्टॉप गंजले

$
0
0
बालेवाडी-बाणेर परिसरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले बसस्टॉप गंजून गेले असून, पीएमपीच्या प्रवाशांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. एकीकडे पीएमपीला आर्थिक तोटा होत असताना अशी उधळपट्टी करण्यास जबाबदार घटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

दादांच्या विरोधात रास्ता रोको

$
0
0
कृषी शिक्षण संस्थेची जमीन संपादन करताना बोगस कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप करुन या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कऱ्हाटीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

खडकीच्या प्रश्नांसाठी शिवसेना कटिबद्ध

$
0
0
नागरिकांना समान हक्क मिळालेच पाहिजेत, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना एक न्याय आणि खडकीच्या नागरिकांना दुसरा न्याय असे कसे काय चालणार, यापूर्वीच्या खासदार आणि आमदारांनी गेली साठ वर्षे काय केले?, असा प्रश्न उपस्थित करून खडकीचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

‘मनी लाँडरिंग’मागे बडी धेंडे?

$
0
0
खासगी अवैध सावकारी (मनी लाँडरिंग) प्रकरणी लोणावळा पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कचराकोंडी सोडवण्यासाठी मुदतवाढीची मागणी

$
0
0
पुण्यातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांची आठ जानेवारीला बैठक घेतली जाणार असून, त्यामध्ये आणखी सहा महिने वाढवून देण्यासाठी सूचना करणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images