Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

BJP ठोकणार महावितरणला टाळे

0
0
महावितरणने केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात शहर भाजपच्या वतीने उद्या, सोमवारी महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहर भाजपच्या वतीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार आहे.

'सीमोल्लंघना'साठी आजचा मुहूर्त

0
0
पुण्याच्या बरोबरीने विकसित होणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा इतरही जिल्ह्यांमध्ये घर घेण्याची तयारी करत असाल तर ‘मटा’ने तुमच्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. स्वारगेटजवळच्या गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी सुरू झालेल्या ‘सीमोल्लंघन’ या प्रॉपर्टी शो मध्ये तुम्ही यातील हव्या त्या शहराच्या पर्यायाची निवड करू शकता!

आपली जमीन कशी शोधाल ?

0
0
वर्षानुवर्षे नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्य केल्यानंतर मूळ गावाबद्दल ओढ वाढू लागते.., कूळकायद्यामुळे आपली जमीन गेली तर नसेल, अशी शंका आहे.., जुन्या दस्तऐवजांवरून सापडलेली जमीन शोधायची कशी.., यासारख्या तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी येत्या रविवारी (दोन सप्टेंबर) ‘आपली जमीन कशी शोधाल?’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सहप्रायोजकत्वाचा ‘थरारक’ खेळ थांबणार

0
0
पुणे महापालिकेने क्रीडा स्पर्धांसाठी सहप्रायोजकत्व स्वीकारल्यानंतर आयोजकांना खर्च परत मिळविण्यासाठी करावी लागणारी ‘रनिंग’ आणि खेळाडूंचा आर्थिक साह्य देताना केला जाणारा फुटबॉल... हा महापालिकेचा ‘खेळ’ आता पाहायला मिळणार नाही, याची दक्षता क्रीडा धोरणात घेण्यात आली आहे. या धोरणात विविध स्पर्धांसाठी जास्तीत जास्त दहा लाख, तर कमीत कमी ५० हजार रुपये महापालिकेने देण्याचे सुचविण्यात आले आहे.

पूर्ववैमनस्यातून जिवे मारण्याचा प्रयत्न

0
0
पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकू खुपसून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंढवा येथील लोणकर शाळेजवळ हा प्रकार घडला.

वाघाची कातडी केली नष्ट

0
0
देखभाल जमत नाही म्हणून एका आजींनी वन विभागाकडे स्वाधीन केलेली दोन्ही वाघाच्या कातडीची वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव अभ्यासकांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी विल्हेवाट लावली.

कस्टोडियनने उडविले ८० लाख

0
0
बँकेच्या लॉकरमधून ८७ लाखांचे दागिने चोरणा-या लॉकर कस्टोडियनने ऐशोरामासाठी सहा महिन्यांत ८० लाख रुपये उडविल्याचे उघड झाले आहे. कोथरूड येथील श्यामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरण्यात आले होते.

फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी

0
0
फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ३९ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना वडमुखवाडी येथे घडली. याप्रकरणी दत्तात्रय भिका बांगर (वय २९, रा. साईनिकेतन अपार्टमेंट, वडमुखवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप-एनसीपी नगरसेवकात राडा

0
0
भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सातजण जखमी झाले तर तीन वाहनांची मोडतोड झाली.

मूर्ती विटंबना, वारज्यात तणाव

0
0
वारजे माळवाडीमधील नवयुग मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर वारजे भागात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारजे भागातील दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवून या प्रकाराचा निषेध केला.

नवजात मुलीला नदीकाठी फेकले

0
0
मुलगी नको म्हणून पंधरा दिवसाच्या एक नवजात अर्भकाला थेरगाव येथील पवना नदीच्या काठी उघड्यावर टाकून दिल्याचा प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. चिंचवड पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेऊन पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

२७ बसस्थानकांवर सीसीटीव्ही

0
0
राज्यातील महत्त्वाच्या २७ एसटी बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याची योजना राज्य परिवहन महामंडळाने तयार केली आहे. ही योजना अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी दिली.

गुटखाबंदीसाठी परराज्यांनाही साकडे

0
0
गुटख्याचा बाहेरून ‘चोरीछुपे’ साठा येत असल्याने महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेशातही गुटखा बंदी लागू करावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या शेजारील राज्यांना विनंती केली आहे.

गुटख्यानंतर आता राज्यात मावाबंदी

0
0
राज्यात गुटखाबंदीसह सुपारीमिश्रित गुटखा, तंबाखूमिश्रित मावा यासारख्या अन्य घटक पदार्थांच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवातही गुटख्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली असून जाहिरात केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

पुण्यात हायप्रोफाइल पार्टीवर छापा

0
0
पुण्यातील वाघेलीतील एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ३०० जणांना ताब्यात घेतले आहे. हा पब पोलिसाच्याच मालकीचा असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणारी मंडळी पार्टीत होती, अशी माहिती समोर आली आहे.

भाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत

0
0
चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात एका गटातील आठ जणांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.

संपबंदीचा कायदा रद्द करा

0
0
प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतली होती. त्यामुळे राज्य शासनाचा संपबंदीचा कायदा म्हणजे डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने याबाबतचा कायदा संपूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी राज्यातील महापालिका-नगरपालिका कामगार संघटनांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आली.

एजंट सुरक्षित

0
0
खडकी भागातील व्यापा-यांमध्ये आग्रगण्य असेलली श्री आग्रसेन महाराज पतपेढीतील करोडो रुपयांचा घोटाळा करणा-य़ा एजंटच्या विरोधात एक महिना झाला तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यामु‍ळे पतसंसस्थेचे पदाधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा पतसंस्थेच्या काही पदाधिका-य़ांमध्ये आहे.

टीबी वॉर्डासाठी ‘एन-९५’ मास्क देणार

0
0
राज्यातील टीबीचे हॉस्पिटल, त्यातील वॉर्डातील पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका (नर्सेस) आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी एन- ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे वर्षभर पुरेल एवढा दोन लाख मास्कचा साठा उपलब्ध होणार आहे.

राजकीय व्यवस्थेचे शिक्षणाकडे दुर्लक्ष

0
0
राजकीय व्यवस्थेत शिक्षणाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कमी आहे, त्यामुळे चांगले विद्यार्थी निर्माण करण्याचे काम कठीण असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images