Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘PMP’ चालकाला चौघांकडून मारहाण

$
0
0
गंगाधामजवळील आईमाता मंदिर ​परिसरात सोमवारी मध्यरात्री कारमधील चौघांनी किरकोळ वादातून ‘पीएमपी’ चालकाला मारहाण केली तसेच पीएमपी बसच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलतरण तलाव की नाला?

$
0
0
नागरिकांच्या कराच्या रूपाने आलेला कोट्यावधी रुपयांतून घोरपडी येथे महानगरपालिकेचा जलतरण तलाव व जिम्नॅशियम हॉल बनवला. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून उद् घाटनापासूनच या तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

नळ फिटिंग सामान चोरणारे ७ जण अटक

$
0
0
दुकानाचे शटर तोडून नळ फिटिंगचा माल चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला देहूरोड पोलिसांनी हिंजवडी येथून अटक केली असून त्यांच्याकडून ९ लाख ८० हजाराचा जप्त करण्यात आला.

नाकाबंदी : ६ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
नाकाबंदी दरम्यान एका टेम्पोमधून पोलिसांनी सहा लाखांचा गुठखा जप्त केला आहे. मंगळवारी (ता. ३०) रात्री सव्वादहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी परिसरातील संतनगर चौक येथे ही कारवाई करण्यात आली.

रेल्वेत विसरलेली बॅग मिळाली परत

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनवर चुकीच्या रेल्वेत बसल्याचा फटका सोलापूरला जाणाऱ्या महिलेला बसला. घाईघाईत रेल्वेतून उतरताना महिलेची विसरलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या मदतीमुळे काही तासांत परत मिळाली.

चौघांचे अर्ज अवैध, १० जण रिंगणात

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटल प्रभाग क्रमांक ४३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १४ जणांपैकी चार जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

वॉर्ड पाच, सहामध्ये कचेरी युद्ध

$
0
0
खडकी कटोँन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये वॉर्ड क्रमांक पाच आणि सहामध्ये सर्वच उमेदवारांनी त्यांची निवडणूक कचेरी फारच जवळजवळ टाकल्यामुळे याभागात कचेरींचे युद्ध सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाइल गायब झाल्याचा आरोप

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागांतर्गत असलेल्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाइलच गायब झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केला आहे.

पुनवडी ते पुण्यनगरी व्हाया टेंडर प्रक्रिया

$
0
0
शहराच्या इतिहासाची साक्ष सांगणारे विश्रामबागवाड्यातील ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हे प्रदर्शन आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याने बुधवारपासून बंद करण्यात आले.

सौर ऊर्जेने उजळणार रमणबाग प्रशाला

$
0
0
नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या आणि विद्यार्थिभिमुख उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलने संपूर्ण शाळेची विजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा, अंगणवाड्यांजवळ मोबाइल टॉवरला बंदी

$
0
0
जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांच्या हद्दीपासून ५० मीटर परिसरात असणाऱ्या मोबाइल टॉवरच्या कंपन्यांना नोटीस पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी बुधवारी दिले.

अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला खातेप्रमुखांचा ठेंगा

$
0
0
महापालिकेतील ठरावीक खात्यामध्ये वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा अहवाल सादर करण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला सर्वच खातेप्रमुखांनी ठेंगा दाखविल्याचे समोर आले आहे.

तंत्रशिक्षण संस्थांसाठी अनुदानाचा मार्ग मोकळा

$
0
0
तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठीच्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा (टीईक्यूआयपी) निधी मिळण्यासाठीचा राज्यातील चार संस्थांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ड्रायक्लिनिंगमध्ये फसवणूक

$
0
0
ड्रायक्लिनिंगला​ दिलेली साडी फाटक्या आणि रफू केलेल्या अवस्थेत परत दिली म्हणून तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून चार हजार रुपये आणि मानसिक, शारीरिक त्रासापोटी आणि तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

‘CME’कडूनही सुरू गायब कॅप्टनचा ‘शोध’

$
0
0
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात ‘सीएमई’मधून बेपत्ता झालेल्या अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याला तेथे प्रशिक्षण दिले जात होते. हा कॅप्टन दर्जाचा अधिकारी बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी पोलिसांकडे देण्यात आली आहे.

दस्तनोंदणी प्रणालीला ‘सर्व्हर बंद’चा फटका

$
0
0
रेडी रेकनरच्या दरातील संभाव्य वाढीमुळे पक्षकारांची गर्दी उसळली असतानाच ग्रास प्रणाली (गव्हर्न्मेंट रिसिट अकाउंटिंग सिस्टीम) रूसल्यामुळे वर्षाच्या अखेरच्या दिवशी राज्यभरातील दस्तनोंदणी ठप्प झाली.

पालकमंत्र्यांची बैठकही निष्फळ

$
0
0
शहरातील कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश बापट यांन‌ी बुधवारी मोठ्या उत्साहात बोलाविलेली बैठक निष्फळ ठरली. एक जानेवारीपासून शहराचा कचरा डंपिंग करण्यास उरळी, फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी विरोध केल्याने पुणे शहराचा कचराप्रश्न पुन्हा एकदा जोरदार पेटण्याची शक्यता आहे.

डॉ. सुभाष माने यांच्या मुदतवाढीवर फुली

$
0
0
मुंबई व पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक गैरव्यवहार उघड करणाऱ्या पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

अस्तित्वात नसणाऱ्या न्यायालयाचे वॉरंट

$
0
0
बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे शिवाजीनगर कोर्टातून आरोपीचे बनावट जामीनपत्र तयार करण्याचे प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार पिंपरीत घडला आहे.

पर्यटकांच्या गर्दीने सिंहगड फुलला

$
0
0
हॉटेलमध्ये वेटिंगच्या रांगेत थांबून जेवण्यापेक्षा, थंडीच्या आल्हाददायक वातावरणात गरमागरम कांदाभजी, पिठलं-भाकरी आणि दही अशा गावरान जेवणावर ताव मारण्याचा बेत आखल्यामुळे बुधवारी सिंहगडावर बुधवारी पर्यटकांची तोबा गर्दी झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images