Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेकायदा बांधकामविरोधी धोरणाला मिळणार गती

0
0
नऱ्हेमधील सहा मजली इमारत कोसळून एक जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेनंतर बेकायदा व चटईक्षेत्राचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही बेकायदा बांधकामे कायद्याच्या चौकटीत बसवून नियमित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

‘पीएमपी’ ते उड्डाणपूल; स्थिती सुधारण्याची आशा

0
0
पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक वाहतुकीचे वाजलेले तीन तेरा झाले असून, गगनाला भिडलेले फ्लॅटचे दर, रखडलेला ‘बीआरटी‌’प्रकल्प, नियोजना अभावी निर्माण होणारी कचराकोंडी, स्वस्त दरात आरोग्य सोयीसुविधांवर ताण वाढत आहे.

कामचुकारांना घरचा रस्ता

0
0
तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांची विविध योजना पूर्ण करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावून पूर्ण ताकदीनिशी काम करा अशा सूचना देत अनेक विभागाच्या कामाचा आढावा घेतला आणि कामचुकार अधिकारी यांना फैलावर घेत घरचा रस्ता दाखवू असा सज्जड दम दिला.

कात्रज प्राणिसंग्रहालय अतिक्रमणांच्या पिंजऱ्यात

0
0
हातगाडीवाले, खेळणी विक्रेते, विविध पथारीवाल्यांच्या अतिक्रमणांनी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार गुदमरले आहे. हाकेच्या अंतरावर असलेले स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस व क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष सातारा रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा तर परिसर पर्यटकांसाठी अपघाती बनला आहे.

औंध भागातील नागरिक पाणीप्रश्नावरून आक्रमक

0
0
बाणेर बालेवाडी येथील सोसायट्यांमधील पाणीबाणीमुळे वैतागलेल्या झालेल्या नागरिकांच्या संतापानंतर अखेर पुणे महापालिकेच्या आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कृतिआराखडा आखण्याचे आश्वासन देण्यात आले.

बारामती तालुक्यात गुटखाबंदी धाब्यावर

0
0
शहरासह ग्रामीण भागामध्ये टपऱ्या व किराणामालाच्या दुकानांमध्ये गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. एकीकडे, जनतेला व्यसनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले आहे.

‘मार्केट’मधील किरकोळ दुकाने आठवडाभरात बंद

0
0
गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या आवारातील किरकोळ विक्रीची दुकाने येत्या आठ दिवसांत बंद करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन बाजार समितीने मंगळवारी दिले आहे.

पालिका पोटनिवडणुकीसाठी भाजप, सेना स्वतंत्र लढणार

0
0
महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्यात आणि केंद्रात एकत्रीत सत्ता भोगणाऱ्या भाजप, शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्याने या दोन्ही पक्षाची पालिकेतील युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

EVM मशिनचे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवर नेमलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगामार्फत पहिले प्रशिक्षण मंगळवारी देण्यात आले. कँटोन्मेंट बोर्डाच्या अकरा जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.

RPI कडून कदम; सेनेचे चाबुकस्वार यांचे अर्ज

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटल प्रभाग क्रमांक ४३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (३० डिसेंबर) १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

सव्वातीन लाखांची चिंचवडमध्ये घरफोडी

0
0
घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सव्वातीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी (२९ डिसेंबर) चिंचवडमधील इंदिरानगर येथे घडली. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

औद्योगिक ओळख कायम

0
0
शहराची औद्योगिक ओळख टिकवण्यासाठी प्रयत्न करत रखडलेले विकासप्रकल्प प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

बायोगॅस प्रकल्पाच्या आवारात चोरी

0
0
घोले रोडवर महापौर बंगल्यात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच कात्रज-कोंढवा रोडवरील नाना-नानी पार्कमधील बायोगॅस प्रकल्पाच्या आवारातून सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे.

माजी महापौर पांडुरंग तरवडे यांचे निधन

0
0
जुन्या पिढीतील समाजवादी नेते आणि पुण्याचे माजी महापौर पांडुरंग दगडोबा तरवडे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

६० गुन्हे दाखल, ८६ आरोपींना अटक

0
0
सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या वर्षभरात ‘पिटा’ कायद्यान्वये ६० गुन्हे दाखल करून ८६ आरोपींना अटक केली आहे, तर १२३ तरुणींची सुटका झाली आहे. यामध्ये ११ अल्पवयीन मुलींसह ११ परदेशी तरुणींचा समावेश आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

0
0
बेकायदेशीरपणे ३६ हजार ८०० रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयसिंग श्रीपती कोंडे (७२, श्रीरामनगर, खेडशिवापूर), हिरा काशिनाथ जव्हेरी (४८, रा. महात्मा फुले मंडई, तमिळनाडू) यांना अटक करण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांचे अनुदान १५ जानेवारीनंतर

0
0
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना देण्यात येणारे तीन हजार रुपयांचे थकित अनुदान १५ जानेवारीनंतर मिळणार आहे.

राज्यात तापमानात किंचित वाढ

0
0
राज्यातील तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूलगतच्या नैऋत्य आणि पश्चिम-मध्य भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

विद्यानिकेतन शाळा बंद होणार नाहीत

0
0
महापालिका शिक्षणमंडळाच्या विद्यानिकेतन शाळा बंद होणार नाहीत तर सुरूच राहणार असल्याचे शिक्षणमंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. शिक्षणमंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांनी याबाबत माहिती दिली.

वाढीव स्टॅम्पड्युटीला नववर्षात कात्री

0
0
महागड्या अॅमिनिटीज आणि त्यातून वाढणाऱ्या फ्लॅटच्या किमतींमुळे आसपासच्या परिसरातील साध्या इमारतींमधील लाखो सदनिका ग्राहकांवर वर्षानुवर्षे पडणारा वाढीव स्टॅम्प ड्यूटीचा बोजा नवीन वर्षापासून हटणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images