Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाडेकरूंना घरे द्यावीत

$
0
0
झोपडपट्टीधारकांना ५०० स्क्वेअर फूटाचे घर, भाडेकरू पुनर्वसन कायदा करावा, भाडेकरूंना घरे द्यावीत आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन संघर्ष दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पीएमपीच्या ८० टक्के बस मार्गावर आणणार

$
0
0
‘पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाधिक बस मार्गावर येणे आवश्यक आहे. स्पेअर पार्टअभावी बंद असलेल्या बसेससाठी दैनंदिन उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढण्यात येत आहे. येत्या जानेवारीअखेरीस पीएमपीच्या ताफ्यातील ८० टक्के बस मार्गावर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

समाजकल्याण स्कॉलरशिपसाठी राहिले शेवटचे दोन दिवस

$
0
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची मुदत संपण्यासाठी दोन दिवस राहिले असतानाही जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे अर्ज भरलेले नसल्याची धक्कादायक माहिती समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे.

बंडखोर, अपक्षांचा शक्तिप्रदर्शनावर भर

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्ड निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रचाराची रंगत वाढत आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी वेगवेगळ्या कल्पनांचा वापर केला जात आहे.

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

$
0
0
आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ असणारे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडीस आली. एटीएमजवळ नागरिकांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पळ काढल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.

युतीची शक्यता मावळली; आघाडीचीही शक्यता नाही

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटल प्रभाग क्रमांक ४३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचे बंधू सुनील चाबुकस्वार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीत युतीची शक्यता मावळली आहे.

उद्योगनगरीत पिस्तुलधारी वाढले

$
0
0
औद्योगिक नगरीत गेल्या वर्षभरात गन (पिस्तुल) आणि धारदार शस्त्रांचा गुन्हेगारांकरून वाढलेला वापर पाहता शहराचे ‘गन’धार’नगरीत रुपांतर झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

विद्यार्थी संघटनांचा ‘JSPM’ला दणका

$
0
0
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी फीच्या नावाखाली बेकायदेशीर पैसे उकळणाऱ्या ‘जेएसपीएम’ला विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांपुढे अखेर नमते घ्यावे लागले.

उमेदवारांसमोरच करणार ‘EVM’ मशीन सीलबंद

$
0
0
पुणे कॅटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) वापराबाबत काँग्रेसकडून साशंकता व्यक्त करण्यात आल्यामुळे मतदानासाठी लागणाऱ्या ५७ ‘ईव्हीएम’ उमेदवारांसमोरच सीलबंद करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरविले आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांना अडथळे

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदार यादीमध्ये दोन हजार २६२ लष्करी अधिकारी आणि कर्मचारी हे मतदार आहेत. मात्र, लष्करी परिसरात उमेदवारांना प्रचार करण्यास मनाई असल्यामुळे या निर्णायक मतदारांपर्यंत पोहोचता येणार नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

साहित्य संमेलनाच्या साइटचे आज उद्‍‍घाटन

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संमेलनाची आयोजक संस्थेने खास वेबसाइट तयार केली आहे.

पुराव्यांचा विचार करून योग्य कारवाई करू

$
0
0
एमआयटीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील रॅगिंगच्या प्रकाराविरोधात मिळालेल्या पुराव्यांचा विचार करून, कॉलेजने योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याचा खुलासा कॉलेजने सोमवारी केला. रॅगिंगच्या तक्रारीबाबत संदिग्धता असल्यानेच प्रकरण पोलिसांकडे सोपविल्याचेही कॉलेजने सोमवारी स्पष्ट केले.

प्रभात रोडवरील फ्लॅट फोडून चोरी

$
0
0
प्रभात रोडवरील फ्लॅट फोडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे चार लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुकुंद बाम (५६, रा. प्रभात रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

‘किरकोळ’ वरून ‘घाऊक’ वादंग

$
0
0
गुलटेकडी मार्केट यार्डातील किरकोळ विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी अजून झालेली नसतानाच या मुद्द्यावरून व्यापारी मंडळींमध्येच फुटीची लागण झाली आहे.

अल्पवयीन मुलीवर विनयभंग

$
0
0
‘पीएमसी’ कॉलनीत नाताळच्या सुट्टीमध्ये आजीआजोबांकडे राहण्यास आलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या प्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ठाणेदार’ पोलिसांमुळेच सुव्यवस्थेची लक्तरे

$
0
0
वर्षानुवर्षे पुण्यात ठाण मांडून बसलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमुळेच पुण्यात कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी केला.

कडक बंदोबस्ताचा सिंहगडाला वेढा

$
0
0
सिंहगडाचे पावित्र्य जपण्यासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गडाचे दरवाजे संध्याकाळी सहाच्या ठोक्याला बंद होणार आहेत. गडावर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

झिंगून ड्रायव्हिंगपेक्षा कॅब बुकिंगला प्राधान्य

$
0
0
हॉटेलमध्ये नववर्षाचा जल्लोष करायचा, त्यानंतर मद्याच्या नशेत मोटार चालवायची आणि पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यायचे..त्यापेक्षा एका रात्रीसाठी का होईना ड्रायव्हर ठेवायचा..नाहीतर चक्क कॅबनेच प्रवास करायचा..

महत्त्वाच्या रस्त्यांवरील कचराकुंड्या स्वच्छ करा

$
0
0
जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, चांदणी चौक आणि महात्मा गांधी रोडवरील कचराकुंड्या ३१ डिसेंबरच्या दिवशी सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दर एक तासाने स्वच्छ करण्यात याव्यात, अशी सूचना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) महापालिकेला केली आहे.

बेंगळुरू बॉम्बस्फोटाचे ‘फरासखान्या’शी साधर्म्य

$
0
0
बेंगळुरू येथील स्फोटाचे पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोटाशी साधर्म्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) दोन अधिकारी बेंगळुरू येथे गेले असून, त्यांनी स्थानिक पोलिसांबरोबर स्फोटाचा तपास सुरू केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images