Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टिंबर मार्केटबाबतच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

$
0
0
बिबवेवाडी येथील टिंबर मार्केटसाठी आरक्षित असलेली जमीन मूळ मालकांना परत देऊन ती निवासी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असतानाही, त्या जागेवरील बांधकाम परवानगी स्थगित ठेवण्याचा आदेश पालिका कशी काय देऊ शकते, अशी विचारणा केली जात आहे.

उरल्या फक्त प्रभातच्या आठवणी...

$
0
0
‘थरथराट’, ‘झपाटलेला’, ‘गंमत-जंमत’, ‘एक डाव भुताचा’... आई-बाबांचे बोट धरून पाहिलेले कितीतरी मराठी सिनेमे...गर्दीत अॅडव्हान्स बुकिंग करून पाहिलेला ‘माहेरची साडी’ सिनेमा, कॉलेजच्या ग्रुपसोबत ‘सातच्या आत घरात’ हा सिनेमा पाहताना अंगावर आलेला काटा, ‘तू तिथं मी’, ‘श्वास’, ‘रात्रआरंभ’ पासून अलिकडच्या ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’ या सिनेमांपर्यंत प्रभातशी असणारे नाते टिकून राहिले...

पालिकेच्या विनाकरार मिळकतींची माहिती मिळणार

$
0
0
महापालिकेच्या मिळकती विनामोबदला अथवा नाममात्र दराने काही माननीयांना उपलब्ध करून देण्याच्या स्थायीने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालिकेच्या मालकीच्या; पण शुल्क अथवा करार न करता दिलेल्या मिळकतींची माहिती मागविण्यात आली आहे.

पुण्याला मिळणार ब्रीद आणि चिन्ह

$
0
0
ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा ते आयटी सिटी, आणि विद्येच्या माहेरघरापासून ते ऑटो हबपर्यंत पुण्यनगरीची ओळख वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असली, तरी शहराच्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी पुण्याचे वर्णन करणारी ‘टॅगलाइन’ आणि ‘लोगो’ तयार करण्याचे आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले आहे.

RTI आता ऑनलाइन

$
0
0
माहिती अधिकार कार्यकर्त्यांची ऑनलाइन प्रक्रियेची दीर्घकालीन मागणी आता पूर्ण होणार आहे. नववर्षापासून माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत. एक जानेवारीपासून मंत्रालयातील, तर एक एप्रिलपासून राज्य सरकारच्या सर्व विभागांतील माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळवता येणार आहे.

‘BRT’चे भवितव्य तरी काय?

$
0
0
नागरिकांच्या रोषापाठोपाठ आता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या स्थायी समितीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सध्या अस्तित्वात असलेली ‘बीआरटी’देखील स्थगित ठेवण्याची शिफारस केली आहे.

मराठी व्याकरण सुटसुटीत होणार

$
0
0
गेली पाच दशके प्रलंबित असलेल्या मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचे सुलभ नियम करण्याचे काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

पुणे मेट्रोसाठी नवीन चर्चा नको

$
0
0
गेल्या काही काळात चर्चा-वादविवादांच्या गर्तेत सापडलेले मेट्रो प्रकल्पाचे गाडे पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यावहारिक भूमिका घेतली आहे. ‘मेट्रोबाबत पुन्हा पहिल्यापासून चर्चा सुरू केल्यास संपूर्ण प्रक्रिया होण्यास मोठा कालावधी लागेल आणि पुणे शहर दोन-तीन वर्षांनी मागे जाईल.

टेकड्या फोडून २००० बांधकामे

$
0
0
महापालिकेच्या हद्दविस्ताराच्या उंबरठ्यावर असलेल्या १४ गावांतील टेकड्या फोडून तब्बल सव्वा दोन हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली असून, ती करताना ऐंशीहून अधिक ठिकाणी विनापरवाना उत्खननही करण्यात आले आहे.

विड्याच्या पानांची शेती संकटात

$
0
0
देवाची पूजा, समारंभ आणि कोणत्याही शुभकार्याची शोभा वाढविणारे विड्याचे पान मात्र सरकारकडून कायमच दुर्लक्षित राहिले आहे. त्यातच आता दुष्काळाची भर पडल्याने काहीही करून पानमळा वाचविण्याचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत.

पुण्यातील ‘प्रभात’वर अखेर पडदा

$
0
0
‘थरथराट’, ‘झपाटलेला’, ‘गंमत-जंमत’, ‘एक डाव भुताचा’... आई-बाबांचे बोट धरून पाहिलेले कितीतरी मराठी सिनेमे...गर्दीत अॅडव्हान्स बुकिंग करून पाहिलेला ‘माहेरची साडी’ सिनेमा, कॉलेजच्या ग्रुपसोबत ‘सातच्या आत घरात’ हा सिनेमा पाहताना अंगावर आलेला काटा, ‘तू तिथं मी’, ‘श्वास’, ‘रात्रआरंभ’ पासून अलिकडच्या ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’ या सिनेमांपर्यंत प्रभातशी असणारे नाते टिकून राहिले...

मराठी व्याकरण सुटसुटीत होणार

$
0
0
पाच दशकांपासून प्रलंबित असलेले मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचे सुलभ नियम करण्याचे काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मूळ प्राकृत असलेल्या मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव लक्षात घेता नवे नियम अधिक लवचिक व वापरण्यास सुलभ ठेवण्यात येणार असून, समास-संधींमध्ये अडकलेल्या व्याकरणातून मराठीची सुटका होण्याची शक्यता आहे.

शिवनेरीला २ बसची धडक, ३ जखमी

$
0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी एसटी महामंडळाच्या शिवनेरीवर दोन बस आदळून झालेल्या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. खंडाळा घाटात हा अपघात झाल्यानं मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे आता ही वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली.

सरपंचाचा मुलगा लाचप्रकरणी गजांआड

$
0
0
अॅम्बी व्हॅली परिसरात जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी दिग्दर्शकाकडून आंबवणे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाने आपल्या मुलाकरवी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. मुलाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्या आईविरुद्ध लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणूस समृद्ध करणारे साहित्य कुठे आहे?

$
0
0
‘आज वाचनात येत असलेले साहित्य समाजाला कुठे नेत आहे? माणसाला समृद्ध करणारे, घडविणारे साहित्य दिसतेय का,’ असा प्रश्न ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी उपस्थित करून मन समृद्ध करणाऱ्या साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, अशी इच्छा प्रकट केली.

नववा वसुंधरा चित्रपट महोत्सव जानेवारीत

$
0
0
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २३ जानेवारी २०१५ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. ‘शून्य कचरा : सुरुवात स्वतःपासून' हा या वर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे.

माजी महापौरांच्या मुलाला कोठडी

$
0
0
फसवणुकीच्या तक्रारीतील पैशाचा व्यवहार मिटवू देत नसल्याच्या रागातून पिस्तुलाचा धाक दाखवून ​जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या मुलासह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संवेदनशील ‘स्पर्शा’ने खुलविले हास्य

$
0
0
सांताक्लॉज, त्याची वाट पाहणे आणि मग त्याने दिलेल्या सरप्राइज गिफ्ट उघडून त्याबद्दलचा आनंद व्यक्त करणे या गोष्टी सुखवस्तू घरांमधील मुले नेहमीच अनुभवतात. पण हा आनंद वंचित मुलांना मिळतोच असे नाही.

हुरडा पार्टीचा फर्डा बेत

$
0
0
कडाक्याच्या थंडीमध्ये शेतात शेकोटी पेटवून जोडीला हुरडा, चटणी आणि मडक्यातल्या गोड दह्याची मेजवानी.. रात्रीच्या जेवणाला चुलीवरच्या गरम भाकऱ्या, वांग्याची भाजी अन् मिरचीचा ठेचा. .. असा फक्कड बेत कोणाला नाही आवडणार? गेल्या काही दिवसात थंडीने जोर धरल्यामुळे उत्साही पर्यटकांची पावले कृषी पर्यटन केंद्राकडे वळत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून हुरडा पार्ट्या रंगायला सुरुवात झाली आहे.

हवामान ढगाळ राहण्याची शक्यता

$
0
0
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील चोवीस तासांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान २८ आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images