Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उमेदवारी अर्ज हेतुपुरस्सर बाद

$
0
0
कॉसमॉस बँकेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज अन्यायकारक पद्धतीने बाद करण्यात आला असून, आपण या संदर्भात निवडणूक याचिका करणार असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष शशिकांत बुगदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यभरात थंडी कायम

$
0
0
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील थंडीची तीव्रताही कायम आहे. विदर्भातील थंडीची लाट ओसरली असली, तरी किमान तापमानात घट झाल्याने राज्यभर थंडीने दुलई पांघरल्याचेच चित्र होते.

स्वारगेट चौकात जलवाहिनी फुटली

$
0
0
स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उडडापुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणी पुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून शहराच्या मध्यवर्ती भागातीला पाणी पुरवठा विस्कळित झाला.

‘स्थायी’ची उधळपट्टी सुरूच

$
0
0
महापालिकेच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात तूट येणार असल्याने विकासकामांना ५० टक्के कात्री लावण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र स्थायी समितीची उधळपट्टी सुरूच असल्याचे समोर आले आहे.

संजय दत्तची ‘फर्लो’ रजा मंजूर

$
0
0
शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तच्या ‘फर्लो’ रजेचा अर्ज जेल प्रशासनाने मंगळवारी मंजूर केला. संजय दत्तला १४ दिवसांची फर्लो रजा मंजूर झाली असून, पुढील दोन दिवसांत तो जेलबाहेर पडेल. त्याच्याकडून आणखी १४ दिवसांची रजा वाढवण्याचा अर्ज येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

परवाने रद्द; तरीही दुकाने सुरूच

$
0
0
परवाने रद्द करण्याचा आदेश बाजार समितीने दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी गुलटेकडी मार्केट यार्डात किरकोळ विक्रीची सर्वच्या सर्व ८३ दुकाने सुरूच असल्याचे दिसून आले.

सांगवीत साडेतीन लाख रुपयांची घरफोडी

$
0
0
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. सांगवी येथील संगमनगर येथे गुरुवारी (ता. १७) रात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पिंपळे निलख रस्ता होणार रुंद

$
0
0
पिंपळे-निलख येथील महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील सर्व्हे क्रमांक ६५ ते ६७ येथील रस्ता २४ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (२३ डिसेंबर) महापालिकेच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

खुल्या प्रभागातही महिलांचे वर्चस्व

$
0
0
महिलांसाठी आरक्षित असलेल्या वॉर्डांखेरीज खुल्या प्रभागांमधूनही महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खडकी कँटोन्मेंटमध्ये महिला विरुद्ध पुरुष उमेदवार असे चित्र पाहायला मिळत आहे. बोर्डाच्या आठपैकी सहा प्रभागातून महिला उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

अनधिकृत बांधकामांबाबत निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. अनधिकृत बांधकामांबाबत नेमलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य सरकारकडे सादर होणार आहे.

‘PMP’चा कारभार सुधारणार

$
0
0
नववर्षांत जानेवारी अखरेपर्यंत ८० टक्के बसेस मार्गावर आणण्यात येतील. तसेच बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी दैनंदिन उत्पन्नातील सहा टक्के हिस्सा बाजूला काढण्यात येईल अशी माहिती ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी (२४ डिसेंबर) पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेतील बैठकीच्या वेळी दिली.

कुटुंबे रंगली हुरडा पार्टीत

$
0
0
सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला की वेध लागतात ते हुरड्याचे..कोवळ्या ज्वारीची ताटवे खरपूस भाजून गरमागरम हुरडा अन् सोबतीला बाजरीच्या भाकऱ्या आणि थालपीठ असे बेत आता जागोजागी रंगू लागले आहेत.

एसटीच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू

$
0
0
एसटी बसच्या धडकेने रिद्धी मोहन जगताप (वय १३) या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे रुग्णालयात उपचारासमयी निधन झाले. दरम्यान, तिचे वडील मोहन हरिश्चंद्र जगताप यांनी सासवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

रात्रीच्या फिरण्यावर बंदी

$
0
0
मनोरुग्ण कर्मचारी वसाहतीमध्ये मंगळवारी पहाटे बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याचे वृत्त पसरल्यानंतर नागरिकांनी रात्रीच्या वेळेस बाहेर जाणे बंद केले आहे. एखादी अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही स्थानिक तरुणांनी रात्रभर गस्त घातली.

‘ते’ मृतदेह कामगारांच्या मुलांचे

$
0
0
पिंपळगाव (ता. दौंड) येथे वनविभागाच्या हद्दीत पुरलेले मृतदेह उसतोडणी कामगारांच्या मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांचा आजाराने मृत्यू झाल्याची माहिती यवत पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.

‘झेडपी’त जाताय? पार्किंग बाहेरच करा

$
0
0
पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात आता सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त इतरांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.

वारेमाप योजनांना निधीचा दुष्काळ

$
0
0
पालिकेच्या बजेटमधील तरतुदींपेक्षा इतर गोष्टींवरच वारेमाप खर्च केला जात असल्याने अखेर शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधींचे वर्गीकरण करण्याची वेळ स्थायी समितीवर आली आहे.

बंडोबांची तक्रार श्रेष्ठींकडे

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या ऐन निवडणुकीत बंडाचे निशाण फडकवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही​ पदाधिकाऱ्यांनी लेखी राजीनामे दिलेले नसून, संबंधितांची तक्रार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील बनकर यांनी बुधवारी जाहीर केले.

दीपक राऊत निलंबित

$
0
0
खुनाच्या प्रकरणातील आरोपींची बनावट जामिनाद्वारे येरवडा जेलमधून मुक्तता केल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक दीपक राऊतला निलंबित करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे आणि नियुक्ती प्राधिकारी यांनी जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपीक पदावरून राऊतला निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.

‘सीएमई’तर्फे नवे विभाग

$
0
0
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीएमई) दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आहेत. ईशान्य भारतातील राज्यांना डोळ्यासमोर ठेवून हायवे इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे दोन नवे विभाग ‘सीएमई’तर्फे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती ‘सीएमई’चे प्रभारी प्रमुख मेजर जनरल राजेश त्यागी यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images