Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मिळकतकर वाढ ‘जैसे थे’

$
0
0
नागरिकांना महापालिकेकडून अपुऱ्या सुविधा मिळत असताना करवाढ करणे चुकीचे असल्याचे मत नोंदवत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंगळवारी (ता. २३) झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्त राजीव जाधव यांनी मांडलेला मिळकत करवाढीचा प्रस्ताव सदस्यांनी ‘जैसे थे’ ठेवला.

विड्याच्या पानाची शेती संकटात

$
0
0
देवाची पूजा, समारंभ आणि कोणत्याही शुभकार्याची शोभा वाढविणारे विड्याचे पान मात्र सरकारकडून कायमच दुर्लक्षित राहिले आहे. त्यातच आता दुष्काळाची भर पडल्याने काहीही करून पानमळा वाचविण्याचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत.

जात पंचायत उठली जिवावर

$
0
0
राज्यात अंधश्रध्दा निर्मूलनासारखे कायदे अस्तित्त्वात असतानाही त्याची पुरेशा गांभीर्याने अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे अजूनही समाजातील मागासलेल्या वर्गात जात पंचायतीचा पगडा कायम असल्याचे उघड झाले आले आहे.

‘कृषी संजीवनी’ला मार्चपर्यंत मुदतवाढ

$
0
0
थकबाकीदार, कायमस्वरूपी वीजजोडणी खंडित झालेल्या तसेच नियमित देयके भरणाऱ्या चालू जोडणीच्या कृषिपंपधारकांसाठी महावितरणने राबवलेल्या कृषी संजीवनी योजनेला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी समिती

$
0
0
शहरातील सर्व पालिका शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा आणि कामाच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचा आदेश अखेर क्षेत्रीय कार्यालयांना प्राप्त झाला.

कॅबचालकाचा खून

$
0
0
बाहेरगावी जाण्याचा बहाणा करून कॉल सेंटरची गाडी भाड्याने घेणाऱ्या पाच जणांच्या टोळीने चालत्या गाडीतच चालकाचा दोरीने गळा आवळून, डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण करून खून केला. चालकाचा मृतदेह कोणालाही सापडू नये, याची दक्षता म्हणून आरोपींनी मृतदेह नदी पात्रात टाकला.

येरवड्यात आढळला बिबट्या?

$
0
0
येरवड्यातील मनोरुग्ण कर्मचारी वसाहतीच्या आवारात मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंटेनर चालकाला लुटले

$
0
0
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवीन बोगदा ओलांडल्यानंतर एका कंटेनर चालकाला तिघा आरोपींनी लुटल्याचा प्रकार घडला. या चालकावर धारधार हत्याराने वार करण्यात आले असून, त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मौल्यवान हार चोरणाऱ्या नोकराला अटक

$
0
0
पौड रोडवरील एका बड्या सराफी पेढीतून १८ लाख रुपयांचा हिरे व पाचूचा मौल्यवान हार चोरणाऱ्या नोकराला खडक पोलिसांनी अटक केली. या कर्मचाऱ्याने दोन महिन्यांपूर्वी चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला हार आणि कानातील दागिने जप्त केले आहेत.

सिगारेट मागितल्याच्या रागातून तरुणाचा खून

$
0
0
बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज परिसरात सिगारेट मागितल्याच्या रागातून एका ३० वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला. बॉक्सर असलेल्या आरोपीच्या एका ‘पंच’ने तरुणाच्या लिव्हरला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

चिनी कंपन्या पुरविणार पुण्यासाठी सिक्युरिटी क्लस्टर

$
0
0
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्यात उपलब्ध होऊ शकणाऱ्या संधींचा आढावा घेण्यासाठी चीनच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्याला भेट दिली. युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी कंपनीतर्फे आयोजित परिषदेत हे शिष्टमंडळ सहभागी झाले होते.

‘फी’च्या नावाखाली बेकायदा शुल्क वसुली

$
0
0
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जेएसपीएम) इंजिनीअरिंग कॉलेजांमधून स्टेशनरी फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची बेकायदा शुल्क वसुली सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) मंगळवारी केला.

गुलटेकडी मार्केट यार्डातील ८३ दुकानांचे परवाने रद्द

$
0
0
गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात असलेल्या ८३ किरकोळ विक्रीच्या दुकानांचे परवाने बाजार समितीने अखेर मंगळवारी रद्द केले आहेत. गेले अनेक दिवस या मुद्द्यावरून मोठे वादळ उभे राहिले होते.

आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वतःकडे पाहिले

$
0
0
चित्रपट नाट्यसृष्टीतील प्रवासासह स्वतःकडे माणूस म्हणून तटस्थपणे पाहण्याची संधी आत्मचरित्रामुळे मिळाल्याचे सांगत स्वतःतील चांगल्या आणि वाईट गोष्टी आत्मचरित्रात परखडपणे मांडल्याचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितले.

पालिकेच्या गोंधळाने उपमहापौरांचे वाढले ‘बीपी’

$
0
0
ढिसाळ नियोजन, समन्वयाचा अभाव आणि जमवलेली गर्दी... महानगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अशा ‘वैशिष्ट्यां’चा फटका मंगळवारी खुद्द उपमहापौर आबा बागुल यांना बसला.

हेमलकसात रंगणार ‘करुणोपनिषदे’

$
0
0
महारोग्यांसाठी आनंदवन आणि हेमलकसातील आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना करून ते सातत्याने कार्यरत ठेवणारे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यात दडलेल्या संवेदनशील साहित्यिकाचा वेध ‘करुणोपनिषदे’ हा संगीतमय कार्यक्रम घेणार आहे.

‘जागो ग्राहक’च्या सादेला ग्राहकांचा प्रतिसाद

$
0
0
ग्राहक न्यायालयाकडे दाद मागून आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्या जागरूक ग्राहकांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७०,९५५ केसेस दाखल करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील ५८,९०४ ग्राहकांनी राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागितली आहे.

सर्वसाधारण सभेच्या मान्यतेविना पदभरती नाही

$
0
0
‘महापालिकेच्या मुख्य सभेची कोणतीही मान्यता न घेता राज्य सरकारने परस्पर ११९ पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला सर्वसाधारण सभेत सभासदांनी विरोध केला.

महिला, यूथ महोत्सवाचा खर्च ३० लाखच

$
0
0
महापालिकेच्या वतीने ३ जानेवारी ते ८ मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या महिला आणि युथ महोत्सवाच्या खर्चाला मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कात्री लावण्यात आली. या महोत्सवासाठीचा ५० लाख रुपयांचा खर्च ३० लाख रुपयांवर आणण्यात आला आहे.

८१ शाळांमध्ये नववी-दहावीचे वर्ग

$
0
0
महापालिका शिक्षणमंडळाच्या शाळांची चांगली पटसंख्या असलेल्या ८१ शाळांमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images