Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त असल्यास करवाई

$
0
0
शहरातील मोठ्या सोसायट्यांनो सावधान, तुमच्या सोसायटीत आग प्रतिबंधक यंत्रणा नाही किंवा असलेली यंत्रणा नादुरुस्त किंवा कार्यान्वित नाही, असे निदर्शनास आल्यास फायर ब्रिगेडकडून तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

धूर दिसल्याने मालकांना उठवले

$
0
0
‘मरुडगनस्’ यांच्या बंगल्याच्या या सुरक्षारक्षक परमेश्वर खोसे यांच्या प्रसंगावधनामुळे बंगल्याचे मालक योग्य वेळत घराबाहेर येऊ शकले.

कोथरूडमधील आगीत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

$
0
0
महात्मा सोसायटीतील ‘मरुडगन्स’ या बंगल्याला सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत ७७ वर्षांच्या आजींचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुनेने भीतीपोटी तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर उडी मारली.

मित्राचा खून केल्याप्रकरणी दोन जणांना जन्मठेप

$
0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून मित्राचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

संवादाविना वाढते मुलांमध्ये नकारात्मकता

$
0
0
पालकांचा दबाव, लैंगिक शोषण, पालक आणि मुलांमध्ये कमी होत असलेला संवाद यामुळे मुलांमधील नकारात्मक भावना बळावते आहे, असे मत लहान मुलांच्या हक्कांसाठी करणाऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केले.

‘प्रभात’चा पडदा खाली

$
0
0
मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेल्या ‘प्रभात’ चित्रपटगृहात चित्रपटप्रेमींना २५ डिसेंबरपर्यंतच चित्रपट पाहता येणार आहेत.

महाराष्ट्राला हुडहुडी

$
0
0
उत्तरेकडील राज्य आणि विदर्भातील थंडीच्या लाटेमुळे अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नगर येथे (५ अंश सेल्सियस) झाली असून पुण्यातील पारा ८.३ अंशांपर्यंत खाली आला आहे.

‘उमेदवारीवरील आक्षेप अयोग्य’

$
0
0
कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तांत्रिक मुद्द्यांवरून आपल्या उमेदवारीवर घेण्यात आलेले आक्षेप अयोग्य व असमर्थनीय आहेत, अशी टीका या निवडणुकीतील एक उमेदवार लीना अनास्कर यांनी केली आहे.

बेकायदा बांधकामांत वाढ

$
0
0
ग्रामीण भागातील बेकायदा बांधकामांच्या पाहणीत हा आकडा वाढतच असून, ६२ हजार बांधकामांच्या पाहणीत तब्बल ५३ हजार बांधकामे अंशतः व पूर्णतः बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांची ‘बोलती बंद’

$
0
0
शिक्षणविश्वातील घडामोडींची माहिती देण्याचा आणि त्या संदर्भात भाष्य करण्याचा आयुक्तांसारख्या वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘हक्क’ राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढून घेतला आहे.

दंड म्हणून आता ३ पट कर नाही

$
0
0
महापालिकेकडून भोगवटापत्र, तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणाऱ्या नागरिकांकडून तीन पट कर रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला.

‘पीके’वर बंदीची मागणी

$
0
0
‘पीके’ या आमिर खान अभिनित चित्रपटात हिंदू देव-देवता, साधू, संत यांचे हेतूपुरस्सर विडंबन केलेले आहे. हिंदुत्वाला विनाकरण अपमानित करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी या चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन ‘हिंदु जनजागृती समिती’चे स्वसंरक्षक प्रशिक्षक आणि राष्ट्रीय संघटक अभिजित देशमुख यांनी केले आहे.

न्यू इयर पार्टीसाठी केवळ ३५ अर्ज

$
0
0
ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांच्या आयोजनाचा परवाना मागण्यासाठी शहर व परिसरातून केवळ ३५ संयोजकांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी चार अर्ज ग्रामीण भागातील आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते.

फेरीवाले धोरण ठरणार डोकेदुखी

$
0
0
महापालिकेच्या अंदाजापेक्षा शहरात प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांची संख्या सुमारे तीस टक्क्यांनी वाढली असून, कायद्याची अंमलबजावणी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात अद्याप विलंब झाला; तर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

येरवड्यात पथारी व्यावसायिकांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप

$
0
0
महापालिका सहायक आयुक्त येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून परिसरातील पथारी व्यावसायिकांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. प्रभाग क्रमांक १, २, १४, १५, १६ मधील नगरसेवकांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

रोपांची संख्या ५ वर्षांत निम्म्यावर

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, चिखली आणि नेहरूनगर येथील रोपवाटिकेत तयार करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या कमी होत चालली आहे. २००९ मध्ये ५८ हजार असणारी रोपांची संख्या २०१४ मध्ये निम्म्याने कमी होऊन अवघ्या ३० हजारांवर आली आहे.

मतदानाच्या दिवशीच लागणार निकाल

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार आणि उमेदवारांची संख्या कमी झाली असल्याने मतदानाच्या दिवशीच रात्री दहानंतर ​निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाचे आठ वॉर्ड असून, बोर्डाच्या मुख्यालयात मतमोजणी केली जाणार आहे.

शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

$
0
0
बोर्ड निवडणुकीच्या प्रचाराचे खऱ्या अर्थाने पडघम वाजू लागल्याचे चित्र मंगळवारी (ता. २३) पहायला मिळाले. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‍‍घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

PMP ला पैसे देण्याचा प्रस्ताव चर्चेविनाच तहकूब

$
0
0
पीएमपीएमएल सुधारण्याबाबत आणि विभाजानावरून नेहमीच तावा-तावाने चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी फरकापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाट्याचे १२० कोटी रुपये व संचलन तुटीपोटी १० कोटी रुपये पीएमपीला देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (ता. २३) झालेल्या सर्व साधारण सभेत चर्चेविनाच तहकूब ठेवला.

‘GST’विरोधात प्रस्ताव पाठवा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जीएसटी कर प्रणालीला कडाडून विरोध करण्यात आला. महापालिकेची आर्थिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी एलबीटीच योग्य असल्याचे सांगत प्रशासनाने जीएसटीच्या विरोधाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा अशी सूचना या वेळी सदस्यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images