Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाजप आमदारांचा खो

0
0
शहरातील कचरा टाकण्यासाठी जागा शोधून तातडीने कचराप्रश्न सोडविला जाईल, अशी भूमिका राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या सरकारने घेतली आहे. कचरा टाकण्यासाठी तातडीने जागा शोधण्याचे आदेश राज्याचे मुख्यमं‌त्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

फर्निचरवर लाखोंची उधळपट्टी

0
0
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी तसा नवा विषय नाही. रोज नवे प्रकरण समोर येत असताना आता महापालिकेच्या मुख्य इमारतीतील ‘तिसऱ्या’ मजल्यावरच्या अलिशान दालनांमध्ये केवळ आरामदायी सोफे आणि खुर्च्यांसाठी वर्षभरात लाखोंचा चुराडा झाल्याचे दिसून आले आहे.

आता महिला रोखणार आत्महत्या

0
0
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत असताना, त्यांना आधार देण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘पर्याय’ या संस्थेच्या ५०० बचत गटांच्या माध्यमातून मानसिक धैर्य देण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

बार, रेस्तराँवर नजर

0
0
मुंबई, जळगाव, कोल्हापूर येथे दुधात भेसळ आढळल्यानंतर आता पुणे शहर व जिल्ह्यातील दूध, तसेच छोट्या हॉटेलपासून फाईव्ह स्टार हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि बाटलीतील पाण्याच्या भेसळीवरदेखील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष ठेवले आहे. तपासणीची ही धडक मोहीम हाती घेतली आहे.

आडत्यांचा संपाचा इशारा

0
0
शेतकऱ्यांकडून आडत कपात न करता, खरेदीदाराकडून त्याची आकारणी करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनने दिला आहे.

पुणे पालिकेत आर्थिक आणीबाणी?

0
0
केंद्र आणि राज्य सरकारकडे पुणे महापालिकेची तब्बल ५५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेचे उत्पन्न घटल्याने ही थकबाकी वेळेत मिळणे गरजेचे आहे. पालिकेची थकबाकी सरकारने मुदतीत न दिल्यास शहरातील अनेक विकासकामांना कात्री लावावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१० वर्षाच्या मुलाची आत्महत्या

0
0
जर्किनचा हट्ट न पुरवल्याने एका १० वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. घरात कुणीही नसताना या मुलाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

‘आधार’ ला ‘ईपीएफओ’चा आधार

0
0
केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आधार क्रमांक देण्याचे काम येत्या मार्च महिन्यांपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या विभागांनी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचा (ईपीएफओ) ‘आधार’ घेतला आहे.

स्वच्छता अभियानाचा कचरा रस्त्यावर

0
0
औंध परिसरात स्वच्छता अभियानानंतर तयार झालेले कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या बाजूला राहिला असून पालिक कर्मचारीही तीन दिवस न फिरकल्याने गोळा केलेला कचरा पुन्हा पसरला आहे. काही दिवसांपूर्वी औंध परिसरात भाजपाच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

अभयारण्यात पाच शिकाऱ्यांना पकडले

0
0
भीमाशंकर अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या पाच स्थानिक शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडल्याची माहिती अभयारण्य क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी दिली आहे.

बालसुधारगृहातील मनुष्यबळ वाढविणार

0
0
येरवडा येथील जवाहरलाल नेहरू निरीक्षण गृह केंद्रातून वारंवार मुले पळून जाण्याच्या घटनेची महिला व बाल विकास आयुक्तालयाने गंभीर दाखल घेत केंद्रावर अतिरिक्त मनुष्यबळ देणार असून कायमस्वरूपी पोलिस संरक्षण मिळण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याची माहिती आयुक्त राजेन्द्र चव्हाण दिली.

‘आधार’ला आता ‘EPFO’चा आधार

0
0
केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आधार क्रमांक देण्याचे काम येत्या मार्च महिन्यांपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या विभागांनी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनचा (ईपीएफओ) ‘आधार’ घेतला आहे.

अनधिकृत होर्डिंगविरोधात जनहितयाचिका

0
0
शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई करण्यात महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने त्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहितयाचिकेद्वारे दाद मागण्यात आली आहे.

बँक कर्मचारी ७ जानेवारीला संपावर

0
0
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीविषयीचा तिढा अजूनही सुटू न शकल्याने बँक कर्मचारी येत्या सात जानेवारी रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने हा संप पुकारला आहे.

सरकारी अनुदानाअभावी पगार रखडले

0
0
पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून अनुदान मिळू न शकल्याने पगार थकले आहेत.

कँटोन्मेंट निवडणुकीसाठी ८० ‘ईव्हीएम’ मशिन

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी ८० इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मंजूर झाले असून, पाच ​जानेवारीला कर्मचाऱ्यांना ‘ईव्हीएम’ मशिनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नवीन वर्षातही मेट्रो चर्चेच्या यार्डात

0
0
मेट्रोवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर नवीन वर्षातदेखील सुरूच राहणार आहे. केंद्रीय पर्यावरणंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्या संदर्भातील संकेत दिले.

‘डिफर्ड’मधून रस्ते कामाचे टेंडर स्थगित

0
0
डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून शहरातील २५ रस्ते विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेल्या टेंडर प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

प्रोजेक्ट पूर्ण न केल्याने संस्थेला दंड

0
0
कम्प्युटरवर प्रोजेक्ट करून देण्यासाठी विद्यार्थिनीने २० हजार रुपयांची फी देऊनही तिला प्रोजेक्ट पूर्ण करून न दिल्याप्रकरणी एका संस्थेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. या तक्रारदार विद्यार्थिनीने भरलेले वीस हजार रुपये आणि नुकसानभरपाईपोटी पंधरा हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला आहे.

भाजपला RPI चा प्रस्ताव

0
0
कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) आठवले गट यांच्यात महायुती झाली नसल्याने तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना ‘आरपीआय’ने भाजपपुढे मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images