Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कारची कंटेनरला धडक; ३ ठार

$
0
0
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कात्रज परिसरात कारची कंटेनरला पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील तिघे ठार तर तिघे जखमी झाले आहेत. अपघातातग्रस्त तरुण-तरुणी हे पुणे आणि ठाणे येथील आहेत.

जिल्ह्याच्या हद्दीत कचरा नको

$
0
0
‘पुणे महापालिकेने त्यांच्या हद्दीत कोठेही कचरा डेपो करावा. पालिकेला जिल्ह्याच्या हद्दीत शहराचा कचरा टाकू दिला जाणार नाही,’ असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी करण्यात आला. नद्या प्रदूषित करून ग्रामीण भागाला मिळणारे पाणी पालिकेने खराब केले.

बधे खून तपासात अडथळे

$
0
0
कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील अमोल हरी बधे याच्या खुनाच्या तपासात अडथळा आणल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेतील दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे अडथळा आणला हे निष्पन्न होणार आहे.

पोलिस प्रशिक्षकांना सक्तमजुरी

$
0
0
प्रशिक्षणाला कंटाळून पळून गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल तरुणाने पुन्हा प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून त्याचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन प्रशिक्षकांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाला २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सुमित राजीव मलिक (वय २५, रा. मोदीनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पाच ठिकाणीच प्रचारसभांना परवानगी

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाल्यामुळे आता प्रचाराची राळ उठणार आहे. उमेदवारांना प्रचारसभा घेण्यासाठी बोर्डाच्या हद्दीतील फक्त पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

पुण्याच्या विकासाच्या विरोधात नाही

$
0
0
‘सध्या पुणे आणि नागपूरची तुलना केली जात आहे. मी काही पुण्याच्या विकासाच्या विरोधात नाही. पुण्याचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी येथील नेत्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.

ऑनलाइन पासपोर्ट अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

$
0
0
पासपोर्टचा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ज्ञ असलेल्या नागरिकांसाठी आता महा ई सेवा केंद्रांमध्ये पासपोर्टचे ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र यासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

बँकेचे थकबाकीदार नाही : दरोडे

$
0
0
आपण कॉसमॉस बँकेचे थकबाकीदार नाही, असे स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे यांनी शनिवारी केले आहे. तांत्रिक कारणांवरून बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मल्टिप्लेक्सकडून ६८ कोटींचा कर वसूल करा

$
0
0
करमाफी असताना प्रेक्षकांकडून बेकायदा करमणूक कर आकारणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्स चालकांकडून ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा कर व्याजासह वसूल करावा, अशी मागणी आमदार अनिल भोसले यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्यावरून केली.

फेरीवाल्यांना प्रमाणपत्र द्या

$
0
0
शहरात बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी केलेल्या पथारी व्यावसायिका आणि फेरीवाल्यांना येत्या दहा दिवसांत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना पालिकेने दिल्या असून, नव्या वर्षात प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

बेकायदेशीर किरकोळ दुकाने बंद करा

$
0
0
मार्केट यार्डातील भुसार विभागातील विनापरवाना सुरू असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची दुकाने तक्रार देऊनही अद्याप बंद करण्यात आली नाही. त्यामुळे ही दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी परवानाधारक पुणे किराणा भुसार मालाच्या किरकोळ विक्रेत्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

९२ कोटी रुपयांचाच महसूल प्राप्त

$
0
0
राज्यातील नव्या सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) पुढील आर्थिक वर्षापासून रद्द करण्याची भूमिका जाहीर केल्याने पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

दाभोलकर हत्येचा तपास थांबवू नये

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवून सहा महिने झाले, तरी अजून कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत. तपासाची दिशा, प्रगती याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही.

SEZ ची बैठक गुंडाळली

$
0
0
सभासद शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाकडून उत्तरे न मिळाल्यामुळे खेड डेव्हलपर्स लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी अवघ्या पंधरा मिनिटांतच गुंडाळण्यात आली.

विद्येच्या माहेरघरात पिछाडी

$
0
0
‘आरटीई’मध्ये नमूद असलेल्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबत राज्यात आघाडीवर असणाऱ्या पुणे विभागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या कामगिरीबाबत मात्र धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.

शेतकरी ‘आडत’मुक्त

$
0
0
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतीमालावर वसूल करण्यात येणाऱ्या आडतीच्या भुर्दंडातून राज्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मार्केट यार्डांमधून शेतीमालावरील आडत खरेदीदार-व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांनी शनिवारी दिला.

LBT चुकविणारे सुपात

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यात टाळाटाळ करणाऱ्या किंवा नोंदणी करूनही कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेने सुरू केलेली कारवाई गेल्या चार महिन्यांपासून पूर्ण थंडावली आहे.

भाजपचेही जोरदार नियोजन

$
0
0
पुणे आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डांतील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने प्रचाराचे नियोजन केले असून, केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. प्रचाराच्या जबाबदाऱ्या शहरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर सोपविल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बंडाचा झेंडा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने राजीनामे दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images