Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणीपट्टीत वाढ करण्यापेक्षा थकित पाणीपट्टी वसूल करा

0
0
‘पाणीपट्टीत वाढ करून ७५ कोटी रुपये मिळविण्यापेक्षा ३०० कोटी रुपयांची थकित पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी मिळकतकराच्या धर्तीवरच लोकअदालत भरवावी,’ अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता?

0
0
शहरातील सर्व शाळांमध्ये, शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी पथक स्थापन करण्याचा आयुक्तांचा आदेश हवेत विरल्याचे उघड झाले आहे. आदेशाला सात दिवस उलटूनही पथकाची स्थापना न झाल्याने. पोषण आहाराची तपासणी होत नसल्याचे समोर आले आहे.

सागरी संग्रहालयाचा किताब पुण्याला

0
0
समुद्रापासून सुमारे दोनशे किलोमीटर दूर असले, तरीही पुण्याला लवकरच उत्कृष्ट भारतीय सागरी संग्रहालयाचा किताब मिळणार आहे. इंडियन मेरिटाइम फाउंडेशनने पुण्यात सागरी विश्वातील जीवसृष्टीपासून तेथील नौदल, सागरावर अवलंबून असलेली इंडस्ट्री, जलवाहतुकीचे सगळे पैलू उलगडणारे अनोखे संग्रहालय साकारले आहे.

‘आय-कार’ युनिट दुप्पट करा

0
0
गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये ‘फॉरेन्सिक’ पुरावा महत्वाचा मानला जातो. घटनास्थळांवर हा पुरावा गोळा करण्यासाठी पोलिस दलात आवश्यक ‘आय-कार’ युनिटची संख्या वाढवून ती दुप्पट करण्याची गरज असल्याचा प्रस्ताव राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) राज्य सरकारला पाठवला आहे.

मनसे-बसपच्या मतांवर अन्य पक्षांचा डोळा

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मनसे आणि बहुजन समाज पक्ष (बसप) या दोन प्रमुख पक्षांनी उमेदवार उभे केले नसल्याने, या पक्षांची पारंपरिक मते मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मनसेची मदत घेण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखण्यात येत असून, काँग्रेस ही बसपबरोबर हातमिळवणी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तंत्रज्ञानाला विरोध हा आत्मघातकीपणा

0
0
‘तंत्रज्ञान सध्या झपाट्याने बदलत असून, नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणे आत्मघातकीपणाचे आहे. तंत्रज्ञानाला विरोध केला, तर काळाच्या ओघात उखडले जाऊ शकतो. आता जी पत्रकारिता आहे, ती भविष्यात पूर्णपणे बदललेली असेल. नव्या पिढीने हे बदल समजावून घेऊन त्याला सामोरे जायला हवे,’ असे प्रतिपादन ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

खटले वाढले; न्यायाधीश अपुरेच

0
0
कोर्टात दाखल होणाऱ्या वाढत्या खटल्यांबरोबरच प्रलंबित खटल्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे खटल्यांच्या तुलनेत शिवाजीनगर कोर्टात न्यायाधीशांची संख्या कमी पडू लागली आहे, तर काहींसाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही.

लायसन्स परीक्षेसाठी ‘ओरियन’ सुरू करा

0
0
मोठ्या शहरांतील वाहन चालविण्याच्या लायसन्ससाठीचा ओघ पाहता लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन पद्धत कायम ठेवून परीक्षेसाठी ‘स्टॉल’ऐवजी ‘ओरियन’ प्रणाली सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दोनशे बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असूनही, अद्याप प्रशासन ढिम्मच आहे. त्यामुळे, अपुऱ्या बससंख्येअभावी प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागत असतानाच, बसमधील सुरक्षाही रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत आहे.

तब्बल साडेचारशे खटले निकाली

0
0
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील महालोकअदालतीमध्ये ८१६ खटल्यांपैकी ४३४ खटले निकाली काढण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या थकीत करापोटी २३ लाख २६ हजार ९६६ रुपयांची तर बँक थकीत वसुलीपोटी ६ लाख ४ हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली.

कथकच्या विविध रचनांचा ‘नृत्यरंग’

0
0
रूपक नृत्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘नृत्यरंग’ हा कथक नृत्याचा कार्यक्रम नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजिण्यात आला होता. संस्थेच्या संचालिका मंजिरी कारुळकर यांनी जगदंबेच्या स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली.

अपक्षांना प्रतीक्षा प्रचार चिन्हांची

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच गाठीभेटी घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अपक्षांचा प्रचार चिन्हांचे वाटप झाले नसल्याने अडकला आहे.

इन्कम टॅक्स विभागाची प्रत्यक्ष भेट मोहीम

0
0
इन्कम टॅक्स विभागाने थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी संबंधितांच्या घरी किंवा कार्यालयांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यावर भर दिला आहे. या मोहिमेनुसार आतापर्यंत २५१ थकबाकीदारांकडून ९६ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या नशिबी गैरसोयीचे ‘धडे’

0
0
कात्रज- महापालिका शिक्षण मंडळाच्या धनकवडी विभागातील दहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात विद्यार्थी मात्र अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शहरात पटसंख्या वाढ अभियान राबवून विद्यार्थ्यांना महापालिका शाळेकडे आकर्षित करण्यासाठी खस्ता खाव्या लागत असताना धनकवडी, कात्रज आणि आंबेगाव परिसरातील महापालिका शाळांमध्ये पटसंख्या असूनही महापालिकेचे या शाळांकडे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

विश्वकोशाचे सर्व खंड सीडीवर उपलब्ध होणार

0
0
जगातील अ ते ज्ञ पर्यंतच्या महत्त्वाच्या संज्ञांची ओळख सामान्य माणसाला मराठीतून करून देणाऱ्या विश्वकोशाचे सर्व वीस खंड आता सीडीवर आणले जाणार आहेत. विश्वकोशा निर्मितीचा प्रकल्प परिपूर्तीचा टप्पा गाठत असताना विश्वकोश निर्मिती मंडळाने सर्व खंड सीडीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विश्वकोश पाहण्यासाठी इंटरनेटचीही गरज भासणार नाही.

उड्डाणपुलांचे काम अधांतरीच

0
0
शहरातील विविध भागांमध्ये उड्डाणपुलांची बांधकामे रखडली आहेत. पालिकेने ठरवून दिलेल्या डेडलाइन तर केव्हाच उलटून गेल्या आहेत. अर्धवट स्थितीतील रस्ता, त्यापायी होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांच्या मनस्तापात भरच पडते आहे.

प्लास्टिक पिशव्या वापरल्याने कारवाई

0
0
बंदी असताना देखील कमी मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृष्णानगर भाजी मंडई आणि साने चौक परिसरातील व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.

महिला गंभीर जखमी

0
0
स्टोव्हचा भडका उडाल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. महात्मा फुले नगर एमआयडीसी येथे बुधवारी (१७ डिसेंबर) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. रिया सागर शिंदे (वय २०, रा. एमआयडीसी) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहिताचे नाव आहे. या घटनेत रिया या ६० टक्के भाजली असून, तिच्यावर ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिंदे यांचे सासू, सासरे व पती सर्व जण नोकरी करत असल्याने बाहेर होते.

निवडणूक प्रचार कार्यालयाला कागदपत्रांचा अडसर

0
0
कँटोन्मेट बोर्डाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी वॉर्डामध्ये प्रचार कार्यालय टाकण्याचे नियोजन करत आहे. त्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.

सायन्स एक्स्प्रेस जोरात…

0
0
जैवविविधता आणि विज्ञान विषयाशी संबंधित असलेल्या वस्तूंचा आणि माहितीफलकांचा समावेश असलेल्या सायन्स एक्स्प्रेस खडकी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली आहे. पहिल्याच दिवशी सोळा शाळांमधील बाराशे विद्याथ्यांनी भेट दिली. त्याशिवाय पुणे आणि परिसरातील दोन हजार ५०० नागरिकांनी भेट दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images