Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्टेम सेल’साठीही प्रतीक्षा

0
0
अवयवदानाअभावी लिव्हर, किडनी प्रत्यारोपणात अडथळे येत असल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. आता ट्रान्सप्लांट करण्यासाठी मूळ पेशींचे दातेच मिळत नसल्याने पुण्यातील २८०० जण ‘स्टेम सेल’च्या प्रतीक्षेत आहेत.

८० टक्के बांधकामे संशयास्पद

0
0
जिल्हा प्रशासनाच्या तपासणी पथकांना इमारतींच्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे व परवानगीचा तपशील सादर न केल्याने जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के बांधकामे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. यापैकी अनेक बांधकामे अधिकृत असली, तरी संबंधित सोसायट्या किंवा बांधकाम व्यावसायिकांनी परवानगीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक ठरले आहे.

बीएड पुन्हा दोन वर्षांचे

0
0
सध्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये चालविण्यात येणारा बीएडचा अभ्यासक्रम या पुढे किमान दोन वर्षे कालावधीचा होणार आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) त्यासाठीचे सुधारित निकष जारी केले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कसे मिळवायचे दहावीच्या परीक्षेत यश?

0
0
दहावीच्या परीक्षेत यश कसे मिळवायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी येत्या रविवारी (२१ डिसेंबर) नितीन प्रकाशनातर्फे ‘मिशन दहावी सक्सेस कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.

सचिनचे आत्मचरित्र लवकरच मराठीत

0
0
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र लवकरच मराठीत प्रसिद्ध होणार आहे. सर्व प्रादेशिक भाषेतील प्रकाशन संस्था या पुस्तकाचा अनुवाद करण्यास इच्छुक असताना पहिला मान मराठी भाषेला मिळाला असून, मेहता पब्लिशिंग हाउस या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित करणार आहे, अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाउसचे अनिल मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बीआरटीला पुन्हा खो?

0
0
शहरात जलद बस वाहतुकीची (बीआरटी) योजना यशस्वी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या ‘इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ची (आयटीएमएस) उभारणी आता पथदर्शी बीआरटी मार्गावरही करावी, असा हट्ट सत्ताधाऱ्यांनीच धरला आहे.

'एक्स्प्रेस वे’वर ३ वाहने खाक

0
0
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर मंगळवारी खालापूर येथील माडप बोगद्यात कंटेनर आणि मर्सिडीस कारच्या अपघातात कंटेनरसह त्यामधील मोटारसायकली व मर्सिडीस; तर मावळातील ओझर्डे येथील लागलेल्या आगीत ट्रकसह साहित्य जळून खाक झाले.

पीएमपी दरवाढीवर आज निर्णय

0
0
पीएमपीच्या गैरव्यवस्थापनाचा बोजा दरवाढीच्या रुपाने ग्राहकांवर टाकू नका, अशा शब्दांमध्ये विविध ग्राहक प्रतिनिधींनी या प्रस्तावित दरवाढीला मंगळवारी एकमुखाने विरोध केला. दरम्यान, दरवाढीच्या या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत आज, बुधवारी निर्णय घेणार आहे.

अडीच कोटींची उधळपट्टी

0
0
महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत घटत असल्याने विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याची ओरड होत असतानाच महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट पालिकेतील माननीयांनी घातला आहे.

नियम धाब्यावर बसवून जागावाटप

0
0
पालिका मिळकतींच्या वाटपासाठीचे नियम आणि अटी धाब्यावर बसवून काही माननीयांसाठी अवघ्या एक रुपयात, तर काहींना चक्क मोफतच जागेचा ‘रमणा’ वाटपाचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला.

तक्रार समितीच नाही!

0
0
कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी कंपन्यांमध्ये ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ नेमणे बंधनकारक करून वर्ष उलटले तरी ७५ टक्के कंपन्यांमध्ये आजही समित्या स्थापन झालेल्या नाहीत.

शिक्षण वर्गात महाराष्ट्र ‘बॅकबेंचर’

0
0
शिक्षकहक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवरच असल्याचे आता केंद्र सरकारच्या आकडेवारीनेही अधोरेखित केले आहे.

‘स्पाइस’ जमिनीवर, प्रवासी हवेत!

0
0
विमान वाहतूक इंधनासाठीचे (एटीएफ) पैसे न भरल्याने ‘स्पाइस जेट’ची विमाने जमिनीवरच राहिली. परिणामी, पुण्यातून दिल्ली, गोवा, चेन्नईसह शारजाला जाणारी उड्डाणे रद्द करावी लागली वा विलंबाने सुटली.

पुणेविभाग शालेय पायाभूत सुविधेत आघाडीवर

0
0
राज्यात पुणे विभागवगळता राज्यातील इतर कोणत्याही विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात शाळा अपयशीच ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच की काय, पुणे विभागातील शाळांना केंद्राच्या रिपोर्ट कार्डमध्ये १० पैकी १० ग्रेड्स मिळविण्यात मोठ्या संख्येने यश मिळाले आहे. राज्यातील इतर विभाग त्या तुलनेत मागेच आहेत.

भेटली ‘एलिझाबेथ’!

0
0
‘सिनेमाच्या निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानावरचा खर्च कमी करून त्याऐवजी थिएटर्स उभारली, तर तो पैसा सत्कारणी लागेल आणि मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळतील,’ असं वक्तव्य लेखक- दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केलं. एसपी कॉलेजच्या वाङ्मय मंडळातर्फे आयोजित ‘अक्षरोत्सवा’त ते बोलत होते.

थेस्पोत पुण्याची आघाडी

0
0
देश-विदेशातील गुणवंत नाट्यकलाकारांच्या सहभागामुळे गाजणाऱ्या ‘थेस्पो’ नाट्य महोत्सवात यंदा पुण्याच्या तीन कलाकृतींनी बाजी मारली आहे. ‘कॅसल ऑफ ग्लास’ हे नाटक, ‘हॅपी एंडिंग’ ही नाटिका आणि मीरा शेणॉय यांच्या म्युझिक बँडचा यात समावेश आहे.

हिंदी डोमेन्सची चलती

0
0
काहीही माहिती हवी असेल तर सगळ्यात आधी नेटवर शोधाशोध केली जाते. इंटरनेटच्या विश्वाची व्याप्ती इतकी अवाढव्य आहे, की या मायाजालात आपलीच वेबसाइट कशी हिट ठरेल यावर सगळेच डेव्हलपर्स नेहमी काही ना काहीतरी शक्कल लढवत असतात.

नागरी, प्रभाव क्षेत्र मूल्यांकनाचे दर राहणार अधिक

0
0
सातबारा उताऱ्यावर पड, पोटखराब आणि डोंगरपड अशी नोंद असलेल्या जमिनीच्या मूल्यांकनामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुसूत्रता आणली आहे. नागरी, प्रभाव क्षेत्र या मूल्यांकनाचे दर अधिक तर ग्रामीण भागात हे दर कमी असणार आहेत.

आंदोलनाचा इशारा देताच ‘रायरेश्वर’वरील अंधार दूर

0
0
हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे घेतली त्या रायरेश्वर किल्ल्यावरील ग्रामस्थांनी निर्वाणीचा आंदोलनाचा इशारा देताच किल्ल्यावरील अंधार तत्काळ दूर झाला. गेल्या सहा महिन्यांपासून किल्ल्यावरील विजेचे रोहित्र जळाल्यामुळे अंधार होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची गैरसोय झाली होती. या रोहित्राची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

भोरमध्ये रस्तेदुरुस्ती रखडली

0
0
भोरमध्ये रामबाग ते महाड नाका मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम गेले दोन महिने अस्ते कदम सुरू आहे. अशातच, चौपाटी परिसरातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाइप लाइनची गळती सापडत नसल्यामुळे दुरुस्तीचे काम आणखीनच रखडले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images