Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कॅशलेस’चा मुद्दा संसदेत

0
0
शहरातील लहान-मोठ्या हॉस्पिटलमधून वैयक्तिक विमा धारकांचे ‘कॅशलेस’ बंद करण्याच्या निर्णयामुळे हा प्रश्न चिघळला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी आता लहान हॉस्पिटलचालकांनी थेट पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्याकडे धाव घेऊन त्यांनाच हा प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले आहे.

बटाटा, पावटा, भेंडी, गवार स्वस्त

0
0
राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची रविवारी मार्केट यार्डात मोठी आवक झाली. त्यामुळे बटाटा, भेंडी, गवार, दोडका, दुधी भोपळा, वांगी, वाल, मटार, पावट्याचे दर उतरले आहेत.

‘इन्स्पेक्टर राज’ खालसास राजी

0
0
वीजपुरवठा क्षेत्रातील ‘इन्स्पेक्टर राज’ खालसा करणाऱ्या दुरूस्तीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वीजसंच मांडणीच्या तपासणीचे विद्युत निरीक्षकांवरील बंधन काढून टाकण्यात येणार आहे.

उद्यान... घाण किती दिसते!

0
0
लाखो रुपये खर्च करून अरण्येश्वर भागात उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था झाली आहे. हे उद्यान तोडून येथे तारांगण उभारण्याचा संकल्प काही महिन्यांपूर्वी महापालिकेने केला होता.

बॅनरबाजीवर उतारा मोबाइल अॅपचा

0
0
शहर विद्रूप करणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असले, तरी अजूनही बॅनरबाजी कमी झालेली नाही; परंतु आता मोबाइलच्या माध्यमातून नागरिकांना या ‘बॅनर्जीं’ना आवर घालता येणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून फ्लेक्सच्या जागा, आकारासह संपूर्ण माहिती नागरिक सरकारी यंत्रणांकडे पाठवू शकणार आहेत.

‘मलई’साठी बदलीला ठेंगा

0
0
महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या बांधकाम विभागातील ‘मलई’वर डोळा ठेवून अन्यत्र बदली होऊनही अनेक अधिकारी याच विभागात ठाण मांडून बसल्याचे समोर आले आहे.

मारणेला मदत, बिल्डरांचे काय?

0
0
गँगस्टर गजा मारणे टोळीवर ग्रामीण पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) गेल्या आठवड्यात कारवाई केली. मारणे खुनाचे गुन्हे करून गायब असताना त्याला दोन बिल्डरांनी आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

टोळी प्रमुख बनले लेबर कॉन्ट्रॅक्टर

0
0
अवैध मार्गाने शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याने हवाला रॅकेट, बेटिंग, स्मगलिंग, ड्रग्ज आदींची बाजारपेठ म्हणून पिंपरी-चिंचवडमधील कॅम्प परिसराकडे पाहिले जाते.

‘खलनिग्रहणाय’चा पोलिसांना विसर?

0
0
‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो.

भूसंपादनाची ‘मेट्रो’ सुसाऽऽऽट

0
0
संरक्षण आणि रेल्वेच्या जागा पुण्यातील निगडी ते स्वारगेट या मेट्रोमार्गात खडकी व परिसरात संरक्षण खात्याच्या काही जागा मेट्रो प्रकल्पासाठी मिळणे अपेक्षित आहे; तसेच रेल्वेच्याही काही जागाही मेट्रोच्या अलाइनमेंटमध्ये आहेत.

‘माननीयां’ची पिस्तुलगिरी

0
0
औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींमध्ये पिस्तूल बाळगण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली असून, त्यांपैकी सुमारे ४० जण ‘पिस्तुलधारी’ आहेत.

कुलकर्णींच्या पेंटिंग्जचं प्रदर्शन उद्यापासून

0
0
ऑइल पेंटपासून चारकोलपर्यंत आणि अॅक्रेलिकपासून जलरंगांपर्यंतच्या विविध माध्यमांतून आपली कला लीलया सादर करणारे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आता डिजिटल पेंटिंग्ज घेऊन रसिकांसमोर येत आहेत.

मंडई विद्यापीठाची माहिती

0
0
ऐतिहासिक वास्तू, पुण्यातला सर्वाधिक गजबजाटाचा भाग आणि जिथला वावर तुम्हाला काही ना काही शिकवून जातो, अशी महात्मा फुले मंडई आणि मंडईच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूची माहिती जिज्ञासूंनी रविवारी जाणून घेतली. निमित्त होतं हेरिटेज वॉकचं.

स्वरनक्षत्राची बरसात

0
0
ठाव घेणारी गायकी, शब्द-सुरांशी लीलया खेळत साकारलेली अवीट गोडीची गाणी, ठेवणीतले किस्से आणि आजच्या पिढीचंही बोट धरून स्वरप्रतिभेचं उत्तुंग दर्शन घडविणारा अवलिया पुणेकरांनी रविवारी अनुभवला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीनं रसिकमनावर जणू स्वरनक्षत्रांचीच बरसात केली.

वेश्या व्यवसायप्रकरणी कारवाई

0
0
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क परिसरात कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन एजटांना अटक केली. या वेळी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

महिलेला फसवून गर्भपात

0
0
फिरायला जाण्याच्या बहाण्याने नगर येथील एका दवाखान्यात नवविवाहितेचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत पोलिस पतीचाच सहभाग असल्याने त्याच्यासह इतरांविरुद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मरण १९७१ च्या कामगिरीचे

0
0
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे १९७१ चे युद्ध जगाचा नकाश बदलवणारे ठरले. या युद्धातील भारताच्या रोमहर्षक विजयाचे स्मरण करण्यासाठी दर वर्षी विजय दिवस साजरा करण्यात येतो.

एक्स्प्रेस वेवरील अपघातांत तीन ठार

0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. हे अपघात सोमवारी पहाटे व सकाळी झाले आहे.

एकवीरा गडावर हवा ‘रोप-वे’

0
0
मावळ तालुक्यातील कार्ला लेणी आणि एकवीरा गडाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा. तसेच भाविकांच्या सोयीसाठी रोप-वे बसविण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

प्रचार फक्त चहापाण्यावर

0
0
कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांसाठी प्रचार करण्यासाठी उमेदवारांना पूर्ण महिन्याचा कालावधी मिळाला असल्याने, एक महिनाभर कार्यकत्यांना कसे संाभाळायचे हा प्रस्थापितांसमोरचा डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images