Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पेशंटला थेट औषध विक्री नको

0
0
रस्त्यावर औषध विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सावध झालेल्या केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने (सीएपीडी) घाऊक औषध विक्रेत्यांनी थेट पेशंटना कर्मचारी अथवा इतरांमार्फत औषध विक्री करू नये, अशी सूचना केली आहे.

गजा आणि रूपेश मारणेचा ताबा

0
0
कुख्यात गुंड गजा मारणे आणि रूपेश मारणे या दोघांना शनिवारी पुणे पोलिसांनी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात कोर्टाच्या परवानगीने ताब्यात घेतले.

उरले फक्त तीन दिवस

0
0
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेचे आता तीनच दिवस उरले असून आज (रविवारी) जिल्ह्यातील दोन हजार केंद्रांवर मतदारयादीत नावे नोंदविणे, नाव-पत्ता व फोटोत बदल अशी कामे करण्यात येणार आहेत.

बुवाबाजीला कायद्याचा लगाम

0
0
करणी घालवण्याच्या नावाने महिलांवर बलात्कार करणाऱ्या, पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलींची नग्नपूजा तसेच भूत उतरविण्याच्या बहाण्याने मांत्रिक शक्तीचा अलौकीक दावा करणाऱ्या तथाकथित ‘बुबा-महाराजांना’ जादूटोणा विरोधी कायद्याने चांगलाच लगाम लावला आहे.

पालिका कर्मचाऱ्यांसह ५ अटकेत

0
0
माथाडी कामगार नेता आणि सराईत गुन्हेगार प्रकाश चव्हाण यांच्या खूनप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांना शनिवारी (१३ डिसेंबर) अटक केली. प्रकाशला मारून भाई बनण्यासाठी हे कृत्य केल्याचे आरोपी पोलिसांना सांगत आहेत. अद्याप प्रकाशला का मारण्यात आले व यामागे नक्की कोणाचा हात आहे स्पष्ट झालेले नाही.

सचिन रमला पुण्यातील आठवणीत

0
0
‘पुण्यात मी फार सामने खेळलो नाही. मात्र, पुण्याच्या काही आठवणी माझ्या मनात कायमस्वरूपी स्थान करून आहेत. मी १२ वर्षांचा असताना पुण्यात पीवायसी हिंदू जिमखान्यावर सामना खेळायला आलो होतो. त्यात मी धावबाद झाल्यावर खूप रडलो होतो.

पावसाचा जोर ओसरला

0
0
ऐन पावसाळ्याप्रमाणे जोरदार बरसून पुण्यासह राज्याला तडाखा दिलेल्या पावसाचा जोर शनिवारी ओसरला. पुढील दोन दिवस राज्यातील हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून, कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वरसगावलाही सी प्लेन

0
0
मुंबईहून लोणावळ्यातील पवना धरण आणि नगरमधील मुळा धरणात सागरी विमान (सी प्लेन) प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर आता वरसगाव धरणात ही सेवा सुरू होणार आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाने त्यासाठी परवानगी दिली असून, या विमानसेवेची चाचणी सुरू झाली आहे.

योगोपचाराचा रौप्य महोत्सव

0
0
कबीर बाग मठ संस्थेतील संजीवन योगोपचार प्रकल्पाचा रौप्य महोत्सव यंदा साजरा होत आहे, त्यानिमित्त या प्रकल्पावर टाकलेला प्रकाश...

‘एक्स्प्रेस वे’ अपघातात एक ठार

0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर लोणावळ्याजवळील केवरेवसाहत येथील रेल्वे पुलावर कारच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला.

पगाराच्या वादातून चिंचवडला मेहुण्याचा खून

0
0
पगार कोणाला किती जास्त यावरून झालेल्या वादातून युवकाने मेहूण्याचा चाकूने वार करून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड येथील आनंदनगरमध्ये रविवारी (१४ डिसेंबर) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

‘परस्पर पावणे बारा’ ठरले सर्वोत्कृष्ट

0
0
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...टाळ्या, शिट्ट्यांचा कडकडाट आणि सोसायटीच्या नावाने ‘हिप हिप हुर्रे’चा गजर अशा उत्साही वातावरणात पहिल्या आशियाना करंडक आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. कोथरूड येथील बळवंतपुरम साम्राज्य सोसायटीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

बांधकाम विभाग उत्पन्न वाढीत ‘नापास’

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग उत्पन्न वाढविण्यात अपयशी ठरला आहे. चालू आर्थिक वर्षात ४१५ कोटींचे उद्दिष्ट असणाऱ्या या विभागाची वसुली गेल्या आठ महिन्यांत फक्त १५५ कोटी रुपयांची झाली आहे.

सागरी हवामान अंदाजांसाठी सेवा

0
0
सागरी हवामान अंदाज प्रत्यक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) लवकरच विशेष सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वेबपोर्टलसह किनारी भागांमध्ये इलेक्ट्रोनिक डिस्प्ले बोर्ड, जहाजांना थेट उपग्रहामार्फत हवामानाच्या चालू घडामोडींची माहिती पुरवण्यात येणार आहे.

पावसामुळे फळांचे दर घटले

0
0
राज्यात सर्वदूर भागात गारपीटांसह अवकाळी पावसाने द्राक्षांसह डाळिंब, पपई, स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मार्केट यार्डात फळांचे दर निम्म्याने घटल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत पडला आहे.

खटल्यात विद्यापीठ सहभागी व्हावे

0
0
‘आयुर्वेद, युनानीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनची औषधे वापरण्यास परवानगी देण्याविरोधात मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सहभागी व्हावे,’ अशी मागणी विद्यापीठाच्या थिंक टँकचे सदस्य डॉ. सुहास परचुरे यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

हरित लवादाच्या खटल्यांत पुणे मागे

0
0
पर्यावरणाचे संवर्धन की विकास या वादामध्ये वर्षानुवर्षे रखडणारे प्रकल्प आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या उपक्रमांना लगाम घालण्यासाठी सुरू झालेल्या हरित न्यायाधिकरणाकडे देशभरातील तब्बल अडीच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.

रिक्षाचालकांचा तक्रारींना ठेंगा

0
0
प्रवाशाने एखाद्या रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) बजावत असलेल्या नोटिशीला पुण्यातील रिक्षाचालक केराची टोपली दाखवित आहेत.

सांस्कृतिक वारसा धूळ खात पडून

0
0
कायमस्वरूपी कलादालनाच्या माध्यमातून पुण्याचा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा खुला करण्याची महापालिकेची घोषणा फोल ठरली आहे. घोले रोडच्या सांस्कृतिक केंद्रातील कलादालनात पुण्यातील पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती कुलूपबंद अवस्थेत आहेत.

‘राज्यात गदिमांची उपेक्षा’

0
0
मराठी चित्रपट, साहित्याच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या ग. दि. माडगूळकर यांच्यासाठी राज्य सरकारने काहीच केले नसल्याची खंत व्यक्त करून सरकारने गदिमांच्या नावाने स्मारक भव्य उभारून यथोचित सन्मान करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images