Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चव्हाणांचा गोळ्या घालून खून

$
0
0
माथाडी कामागार नेता आणि विविध प्रकरणांतील गुन्हेगारीचा आरोपी प्रकाश चव्हाण याचा अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी गोळ्या झाडून खून केला. चिंचवड येथील पूर्णानगर येथे सायंकाळी (ता. १०) पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सवलतीचे बेड रिकामे ठेवा

$
0
0
महापालिकेने शिफारस केलेले पेशंट न आल्यास हॉस्पिटलने सवलतीचे बेड रिकामे ठेवावेत, असे आदेश स्थायी समितीने पालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत. महापालिकेडून जादा एफएसआय घेऊन हॉस्पिटलमधील काही खाटा पेशंटसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा करार शहरातील काही हॉस्पिटलने पालिकेबरोबर केलेला आहे. मात्र या मोफत उपचारांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भुर्दंड ५० लाख रुपयांचा

$
0
0
महापालिकेच्या वतीने ‘युवा आणि महिला महोत्सव’ घेण्याच्या पक्षनेत्यांच्या भूमिकेला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. हा महोत्सव आयोजित करण्यासाठी विविध विकास कामांच्या निधीतून वर्गीकरण करून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

अण्णा जोशी यांचे निधन

$
0
0
पुण्याचे माजी खासदार, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सोनोपंत तथा अण्णा जोशी (वय ७९) यांचे बुधवारी दुपारी खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेले पैसे…उरली उसनवारी

$
0
0
महागड्या गाड्या, उंची बंगला, बड्या हॉटेलमध्ये गाठीभेठी अशा रुबाबातील ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्याने युवकांना सरकारी नोकरीची हमी दिली. मंत्र्यांच्या कोट्यातून नोकरी मिळणार असल्याचे समजून तेही भुलले; पण नोकरी दूरच, हाती नियुक्तीपत्रांऐवजी कोरे कागद देत ‘त्या’ अधिकाऱ्याने पन्नास युवकांना लाखोंचा गंडा घातला.

न्यू इयरसाठी बुकिंग फुल्ल

$
0
0
ख्रिसमसच्या सुट्ट्या अवघ्या काही दिवसांवर आल्याने विमानांचे भाडे गगनाला भिडले असून रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे खासगी बस गाडयांचे भाडे दुपट्टीने वाढविण्यात आले आहेत.

डॉ. सदानंद मोरे संमेलनाध्यक्ष

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. ‘संत साहित्याचे अभ्यासक दि.पु. चित्रे व भा.पं. बहिरट यांना हे अध्यक्षपद अर्पण करत आहे,’ अशी भावना डॉ. मोरे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

संधी प्रीमियर पाहण्याची

$
0
0
‘प्रेमासाठी कमिंग सून’ हा सिनेमा आज (१२ डिसेंबर) प्रदर्शित होत आहे. जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, विजय पाटकर आणि रेशम टिपणीस या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

ग्राहकाला तक्रारीचा पूर्ण अधिकार

$
0
0
मागच्या वेळी जोशी काकूंपासून सुरू झालेला विषय मंचाच्या आर्थिक व भौगोलिक अधिकारक्षेत्रावर थांबला होता. मागील लेखात नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी आणि कुठे तक्रार करता येते हे आपण पाहिलं होतं. आज आपण तक्रार कोण करू शकतं म्हणजेच ‘ग्राहक’ म्हणजे कोण या बाबत माहिती घेऊया.

राजाश्रयामुळे गुन्हेगारी पोचली भरवस्तीत

$
0
0
राजाश्रयामुळे शहराच्या वेशीवर असणारी गुन्हेगारी आज भरवस्तीत येऊन ठेपली आहे. गेल्या वर्षभरात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व आणि अंतर्गत वैमनस्यातून गोळ्या घालून खून करण्याच्या तब्बल नऊ घटना घडल्या आहेत. पुणे पोलिसांना याचा बिमोड करणे मात्र, काही केल्या शक्य होताना दिसत नाही.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

$
0
0
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे क्रियाशील सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

बेनामी प्रॉपर्टी सरकारजमा

$
0
0
पुणे शहर व दौंड तालुक्यात आढळलेल्या बेनामी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करण्याचा हुकूमनामा होण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’च्या कस्टोडियनकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या संमतीनंतर या मालमत्तांवर सरकारचे नाव चढविण्यात येणार आहे.

निवडणुकीत ९१ उमेदवार रिंगणात

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी आठ वॉर्डांमध्ये ९१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान नगरसेवकांपैकी प्रसाद केदारी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून, नगरसेविका संगीता पवार यांना काँग्रेसने तिकीट नाकारले आहे.

तरुणाईचा संगीताकडे ओढा वाढतोय…!

$
0
0
गेल्या काही वर्षात तरुण पिढीमध्ये शास्त्रीय संगीताविषयचे कुतूहल वाढत आहे. संगीत नुसते ऐकण्यात नव्हे तर त्यातील बारकावे समजून घेण्यामध्येही त्यांना विशेष रस आहे.

थंडीवर पावसाचे ढग

$
0
0
अंशतः ढगाळ हवामानामुळे थंडीची तीव्रता कमी झालेली असतानाच शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने किमान तापमानातही वाढ होऊन ते १५.९ अंशांवर पोहोचले.

‘स्मार्टनेस’मुळे जास्त पगार नोकरी

$
0
0
मॉलमध्ये काम करताना आवश्यक तेवढे जुजबी इंग्रजी बोलणाऱ्या मुलींचे शिक्षण काही अपवाद वगळता बारावीपर्यंतच झाले असल्याचे ‘स्त्री मुक्ती संघटने’ने केलेल्या सर्व्हेत आढळले आहे.

सरकारच्या धोरणात दुरुस्तीची गरज

$
0
0
मेडिकल टुरिझमच्या नावाखाली परराज्यांसह परदेशांतील नागरिकांना सवलतीच्या पायघड्या घालणाऱ्या महाराष्ट्राच्या सरकारने अवयव प्रत्यारोपणासाठी चेन्नईला गेलेल्या पेशंटला मात्र आर्थिक मदत नाकारली आहे.

‘मराठीजनांच्या जबाबदारीबाबत चर्चा’

$
0
0
‘यापूर्वी तेराव्या शतकात आध्यात्मिक आणि अठराव्या शतकात राजकीय मार्गाने देशभर पोहोचल्यानंतर आता २१ व्या शतकात मराठीजनांची जबाबदारी काय आहे, याची चर्चा झाली पाहिजे. पण ते सोडून आपण इतर गोष्टींच्याच चर्चा करीत आहोत.

आता ‘बाउन्सर’चा घाट

$
0
0
पालिकेच्या बजेटमध्ये ‘युवा आणि महिला महोत्सवा’साठी कोणतीही तरतूद नसताना त्यासाठी विकासकामांचे ५० लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखविणाऱ्या स्थायी समितीने या महोत्सवाच्या सुरक्षिततेसाठी ‘बाउन्सर’ नेमण्याचा घाट घातला आहे.

हायकोर्टाकडून चौकशी व्हावी

$
0
0
जामीन मिळाल्याचा सत्र न्यायालयाचा बनावट आदेश मिळवून जेलमधून दोन आरोपीबाहेर पडल्याच्या प्रकारामुळे वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images