Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कँटोन्मेंटमध्ये मतदार घटले

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अंतिम मतदारयादीनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल सहा हजार ६७३ मतदार कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वॉर्ड क्रमांक सात हा सर्वाधिक मतदारसंख्या असलेला वॉर्ड, तर दोन क्रमांकाच्या वॉर्डात सर्वांत कमी मतदारांची नोंद झाली आहे.

मतदानाच्या दिवशीच निकाल देणार?

$
0
0
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच निकाल देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडून आयोगाने अभिप्राय मागविले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी तयारी दर्शविली आहे.

अपंग कल्याण धोरणाचेच ‘कल्याण’

$
0
0
अपंगांना समान हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या १९९५ च्या अधिनियमाचे काटेकोरपणे पालन केले जात नसताना, अपंग कल्याणाच्या धोरणासाठीही ताटकळत ठेवले जात आहे. त्यामुळे अपंग प्रवर्गाबाबत सर्व यंत्रणाच उदासीन असल्यची भावना अपंग संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

सक्षम अधिकारी नियुक्तीची मुख्यमंत्र्यांचीही घोषणा हवेत

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आठवड्याभरात पूर्णवेळ आयएएस दर्जाचा अधिकारी देण्याची नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा हवेत विरली आहे.

विकास प्रकल्पांच्या निधीसाठी ‌विविध मार्गांचा पर्याय

$
0
0
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी)..., बँका-वित्तसंस्थांची कर्जे... सुविधा वापरणाऱ्यांकडून आकार (यूजर चार्जेस)... आणि म्युनिसिपल बाँड्स... स्मार्ट सिटीजमध्ये उभ्या राहणाऱ्या विकास प्रकल्पांना निधी उभारणीसाठी केंद्र सरकारने प्राथमिक टप्प्यावर असे विविध मार्ग सूचविले आहेत.

‘ई-सेवां’त महाराष्ट्र पिछाडीवर

$
0
0
माहिती तंत्रज्ञानासाठी (आयटी) लागणारे कौशल्यप्राप्त मनुष्यबळ आणि उत्तम पायाभूत सुविधा महाराष्ट्रात असतानाही ऑनलाइन सेवा म्हणजे ई-व्यवहारांमध्ये महाराष्ट्र सरकार अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच मागे असल्याचे दिसते आहे.

...तरीही महाराष्ट्रच सर्वात पुढे!

$
0
0
‘ई-व्यवहारांचा टप्पा महाराष्ट्राने कधीच मागे टाकला आहे. आता किरकोळ ई-व्यवहारांपेक्षा सरकारी कामांतील अनावश्यक प्रक्रियांनाच कात्री लावणे (ई-इलिमिनेशन) महत्त्वाचे आहे. यामध्ये महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे.

मुंबईकर विद्यार्थ्यांची सरासरी कमी

$
0
0
हातच्याची गणिते सोडवणे, अपूर्णांक व अपूर्णाकांवरील क्रियांचा आढावा घेण्यात विद्यार्थी मागे पडत असल्याचेही सिद्ध झाले आहे. मराठी आणि गणितात मुंबईकर विद्यार्थ्यांचे ज्ञान हे सरासरीपेक्षाही कमी असून मुंबईपेक्षा ठाण्याचे विद्यार्थी हुशार असल्याचे समोर आले आहे.

श्याम पोंक्षे यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ अभिनेते श्याम पोंक्षे यांचे सोमवारी मध्यरात्री पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

पुण्याला विळखा २७ हजार बेकायदा इमारतींचा

$
0
0
शहर हद्दीलगतच्या गावांसह जिल्ह्यामधील ६१५ गावांतील इमारतींच्या तपासणीमध्ये तब्बल २७,४०७ इमारती सकृतदर्शनी अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मोदींची वाटचाल हिटलरप्रमाणे

$
0
0
‘हिटलप्रमाणेच लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या केंद्रातील मोदी सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे,’ अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंगळवारी टीकास्त्र सोडले.

‘बुलेट ट्रेन’लाही कात्रजचा घाट

$
0
0
शहरातील कारभाऱ्यांची उदासीनता, राज्य आणि केंद्र सरकारचे दुर्लक्ष यांमुळे मेट्रोला ब्रेक लागलेला असतानाच आता पुणेकरांच्या स्वप्नातील हायस्पीड ट्रेनही पुन्हा चुकली आहे. देशातील पहिल्यावाहिल्या बुलेट ट्रेनच्या पुणे-मुंबई-अहमदाबाद या मार्गाला कात्री लावून केंद्र सरकारने अहमदाबाद ते मुंबईपुरतीच थांबविली आहे.

प्रभात चित्रपटगृह पडद्याआड?

$
0
0
अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यापासून ते अतुल कुलकर्णी, अभिजित खांडकेकर या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या प्रभात चित्रपटगृहाला चित्रपटप्रेमी मुकण्याची शक्यता आहे.

पुण्यातच सर्वाधिक HIV संसर्ग

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली; तसेच कर्नाटकातून येणाऱ्या सेक्स वर्करनी पुण्यात विविध ठिकाणी व्यवसाय करण्यास सुरुवात केल्याने मुंबई वगळता राज्यात ‘एचआयव्ही’चा संसर्ग अधिक वाढत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने (एमसॅक्स) नोंदविले आहे.

पुणे मेट्रो पुन्हा यार्डातच

$
0
0
पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाच्या (पीआयबी) मान्यतेच्या स्टेशनपर्यंत पोहोचलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा चर्चेचा अडथळा उभा ठाकला आहे.

रंगणार झुंबा...

$
0
0
नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नसली, तरीही झोकात झुंबा डान्स करण्याची संधी नृत्यप्रेमींना मिळणार आहे. ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांसाठी ‘पिंक स्टुडिओ’तर्फे ६ आणि ८ डिसेंबरला खास झुंबा फिटनेस कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

बधे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

$
0
0
नवी पेठेत टोळी युद्धातून झालेल्या खून प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून काढण्यात आला असून, तो गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुण्यातील कायदा व सुव्यस्थेबद्दल टिप्पणी केल्यानंतर, पुणे पोलिसांनी ‘आळ‍स’ झटकून मारणे टोळीचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

नियमांत बदल हवेत

$
0
0
छोट्या आकाराच्या जागेत बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी मान्यता कशी द्यायची या कोणताही उल्लेख विकास नियमावलीत नाही; तसेच लहान भूखंडांची मोजणी करणे शक्य होत नाही. करायची झाल्यास मोठा खर्च येतो.

शनिवार पेठेत वृद्ध महिलेस लुटले

$
0
0
शनिवार पेठेतील औंदुबर गल्लीत असलेल्या एका बंगल्यात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने वयोवृद्ध महिलेला दांडक्याने धमकावत घरातील सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज मंगळवारी पहाटे लुटला.

एम. एस्सी. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये गोंधळ

$
0
0
चुकीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकेमुळे एम. एस्सी. केमिस्ट्रीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images