Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वर्षभरात ६ हजार व्यक्ती ‘मिसिंग’

$
0
0
मुंबई खालोखाल पुणे शहरातून गेल्यावर्षी (२०१३) सर्वात जास्त अशा सहा हजार व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यापैकी केवळ दोन हजार व्यक्ती सापडल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

विकासप्रकल्पांची डेडलाइन हुकणार

$
0
0
टेंडर प्रक्रियेतील विलंब, राजकीय-व्यक्तिगत स्वार्थापोटी नगरसेवकांना घातलेला खोडा, पुणे पालिकेतील अधिकाऱ्यांची चालढकल आणि ठेकेदारांकडून झालेली दिरंगाई अशा अनेकविध कारणांमुळे पुणे शहर व परिसरातील सर्वच विकास प्रकल्पांची ३१ डिसेंबरची डेडलाइन हुकणार आहे.

भेट पहिल्या ‘नाला पार्क’ला

$
0
0
देशातलं पहिलं नाला पार्क पुण्यात आहे हे अनेकांना प्रथमच कळलं...५० ट्रक माती आणि मोठाल्या बोल्डरनं सजलेलं, बेंगळुरू, कोलकता आणि बडोद्यातून आणलेल्या झाडांनी बहरलेलं, जिथं मूळचं प्रत्येक झाड जपलं गेलं..

कथक बॅलेतून साकारली मीरा

$
0
0
कृष्णाच्या भेटीचा ध्यास घेतलेली, त्याच्या विरहानं व्याकूळ झालेली, जळी-स्थळी त्यालाच पाहणारी, राजवैभव सोडून त्या श्यामनिळ्याच्या आणि अंतिम सत्याच्या शोधात निघालेली मीरा कथकच्या माध्यमातून व्यासपीठावर साकारली गेली.

‘रंगसंगीत’च्या विजेत्यांचा जल्लोष

$
0
0
रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत संगीत विभागात अनुभव, पुणे या संस्थेच्या ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ आणि गद्य विभागात गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘रूह हमारी’ या एकांकिका प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

धनकवडी उड्डाणपुलासाठी ‘तारीख पे तारीख’

$
0
0
सातारा रोडवर धनकवडी येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरीही डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ पुन्हा उलटून जाणार, हे निश्चित झाले आहे.

तीन महिलांचे हिंजवडीतून अपहरण

$
0
0
दवाखान्यातून घरी परतणाऱ्या तीन सुरक्षारक्षक महिला शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार हिंजवडी भागात उघडकीस आला आहे. या तिघींचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करत तंत्रज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

‘स्मार्ट’ निर्णयाची जबाबदारी राज्याची

$
0
0
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये शहरांची निवड करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारकडे सोपविण्यात आली आहे.

‘एनए’ची प्रक्रिया १५ डिसेंबरपासून पालिकेकडे

$
0
0
जमिनीच्या अकृषिक परवानगीची (एनए) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेमार्फत येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

शिक्षण मंडळाला अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारकडे

$
0
0
शिक्षण मंडळातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय पक्षनेत्यांनी पुन्हा राज्य सरकारकडे दिला आहे. शिक्षण मंडळाला आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देण्याबाबत राज्याच्या शिक्षण सचिव यांच्याकडून अभिप्राय घेण्याचा निर्णय सोमवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

अनधिकृत शाळांना एक लाख दंड

$
0
0
कोणत्याही परवानगीविना शाळा चालविणाऱ्या संस्थांना शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींनुसार एक लाख रुपये दंड करण्याचा इशारा राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सोमवारी दिला.

बिगरशेती परवानगीचा फलक नसल्यास बांधकाम थांबविणार

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या गावांतील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, बांधकामाच्या साइटवर बिल्डर व जमीन मालकाच्या नावासह बिगरशेती परवानगीचा उल्लेख असलेला फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पर्यावरण समस्यांवरील चर्चेकडे पाठ

$
0
0
वाढती वाहनसंख्या, नदी आणि हवा प्रदूषणाचा विळखा, कचरा निर्मूलन यासारख्या शहरातील पर्यावरणाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या अहवालावरील चर्चेकडे सोमवारी पालिकेतील सदस्यांनी अन् अधिकाऱ्यांनीही पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एमबीबीएसच्या ‘ईएनटी’ची शुक्रवारी फेरपरीक्षा

$
0
0
‘एमबीबीएस’च्या तृतीय वर्षाच्या कान नाक घसा (ईएनटी) या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याने अखेर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या विषयाची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या विषयाची परीक्षा येत्या शुक्रवारी (५ डिसेंबर) होणार आहे.

पणन संचालक माने यांचे निलंबन सरकारकडून रद्द

$
0
0
राज्य सरकारने दिलेले आव्हान फेटाळून लावत मुंबई हायकोर्टाने राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांचे निलंबन सोमवारी रद्द केले; तसेच याप्रकरणी सरकारला वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मुलींच्या होस्टेलचा निधी परत देण्याची नामुष्की

$
0
0
दुर्गम भागातील सावित्रीच्या लेकींसाठी होस्टेलची सुविधा उभारण्यासाठी केंद्राने पाठविलेला सुमारे २६ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे परत गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध; बाराशे मतदारांची भर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, सुमारे बाराशे मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ४६ हजार ३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

स्वरानंद प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

$
0
0
स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सुगम संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे मानकरी संगीतकार राहुल रानडे, ज्येष्ठ गायक उपेंद्र भट, बासरीवादक अमर ओक आणि गायक मंदार आपटे हे ठरले आहेत.

‘जीएं’ची अखेरची साहित्यकृती होणार प्रकाशित

$
0
0
‘काजळमाया’, ‘निळासावळा’, ‘रमलखूणा’ अशा कथासंग्रहातून आपल्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवणारे श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची अखेरची साहित्यकृती प्रकाशित होत आहे.

निम्मेच पेशंट घेतात उपचार

$
0
0
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे देशातील एड्स नियंत्रित करण्यात यश आले आहे. मात्र, भारतातील एड्सबाधितांमधील निम्मेच पेशंट उपचार घेत असून, निम्मे पेशंट स्वतःला एड्स झाला असल्यापासून अनभिज्ञ असल्याची माहिती पुढे आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images