Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेघरांना मिळाले ‘जॉन पॉल घरटे’

$
0
0
रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून सिग्नलला भीक मागणारे, अनाथ, बेघर मुलांसाठी येरवड्यात एक घरटे उभारण्यात आले आहे. ‘जॉन पॉल घरटे’ असे त्या संस्थेचे नाव आहे. या संस्थेत मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे रस्त्यावरील शेकडो मुलांचे बालपण सुसह्य झाले आहे.

बारामतीत स्टॅम्प पेपरचा साठेबाजार

$
0
0
पारदर्शक प्रशासनाचे ‘आदर्श मॉडेल’ म्हणून राज्यभर बारामतीचे नाव घेतले जाते; मात्र त्याला छेद देणारे प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास सुरू आहेत.

महापौरांच्या बैठकीला आमदार, खासदारांची दांडी

$
0
0
पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बोलविलेल्या बैठकीला शहरातील आमदार आणि खासदारांनी पाठ फिरविली.

संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव मोहिते

$
0
0
वारकरी साहित्य परिषदेतर्फे चौथ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत ज्ञानेश्वर समितीचे विश्वस्त व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते यांची निवड झाली.

विकासकामांच्या आढाव्याला सर्वपक्षीय नेत्यांची दांडी

$
0
0
उरळी देवाची येथील विकासासाठी गेल्या चार महिन्यात महापालिकेने कोणती विकास कामे केली, याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारली. यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच ही बैठक उरकण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली.

पुणे पालिका मंत्रालयापासून डिस्कनेक्ट

$
0
0
मंत्रालयातील बैठकीला जाण्या-येण्याचा वेळ आणि पैसे वाचावेत या उद्देशानेसरकारच्या आदेशानंतर सर्व जिल्हाधिकार्यालय आणि महापालिकेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) युनिट सुरू करण्यात आले. मात्र, खासगी ठेकेदाराचे नेटवर्क सेटिंग वापरायचे की सरकारी हा गोंधळ सुटत नसल्याचे दिसून येत आहे.

स्थलांतरीत होण्याची संख्या वाढली

$
0
0
लष्करी वसाहत आणि नागरी वस्ती एकत्र नांदत असलेला परिसर म्हणजे वॉर्ड क्रमांक सहा. लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळीच सुविधा पुरविण्यात येत असल्याने त्याचा फायदा या वॉर्डातील नागरिकांना होतो.

फुलेंचे नाव घेणारे कोठे गेले?

$
0
0
‘महात्मा फुलेंना जातीच्या बंधनात अडकवू नका, असा सल्ला देणारे आज फुलेंना वंदन करण्यास का आले नाहीत. आणि हेच महाभाग फुलेंचे नाव घेतल्यानंतर आमच्यावर जातीयवादी म्हणून शिक्का मारतात,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी भाजपचे नाव न घेता केली.

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट?

$
0
0
माग‌ील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत धरणातील पाणीसाठा दोन टीएमसीने कमी झाल्याने पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट येणार आहे. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पाणीटंचाईची समस्या ओढावणार आहे.

नेमाडेंना साहित्यविश्वातून प्रश्न

$
0
0
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर केलेल्या टीकेचे अपेक्षेनुसार पडसाद उमटले. त्यांच्यासारख्या विचारवंताच्या मताचा आदर असला, तरी ज्या भाषेत ते बोलत आहेत, ती शोभणारी नाही. त्याची खंत वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

निम्म्या पोलिसांना घर नाही!

$
0
0
कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना ‘कोणी घर देता का घर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील ८० टक्के पोलिसांना घरे पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असताना केवळ ४१.५९ टक्के पोलिसांना घरे मिळाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अहवालातून उघड झाले आहे.

जुन्या पुणे-मुंबई हायवेवर गॅसगळती

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई हायवेवर तळेगाव येथे चाकण फाट्यावरील वळणावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर उलटून गॅस गळती झाली. पहाटे पावणेतीनच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने जुन्या हायवेवरील वाहतूक एक्सप्रेसवेवर वळवली. यामुळे सकाळी एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती.

‘एक्स्प्रेस वे’वर लूटमार करणारे तिघे अटकेत

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लूटमार करणारी व दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात लोणावळा शहर पोलिसांना शनिवारी यश आले. या टोळीतील अद्याप सहा जण फरार आहेत. अटक करण्यात अलेल्या आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनाविण्यात आली आहे.

अत्याचारप्रकरणी प्राध्यापक गजाआड

$
0
0
पीएसआय होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करतो तसेच लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर रमेश लिपारे (वय ३२, रा. गंगानगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

घायवळ टोळीच्या गुंडांवर मारणे टोळीचा गोळीबार

$
0
0
वैकुंठ स्मशानभूमीमधून मित्राच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून बाहेर पडत असलेल्या कुख्यात निलेश घायवळ टोळीतील तीन सराईत गुंडांवर मारणे टोळीने शनिवारी भरदिवसा गोळीबार केला.

संमेलनाला नावे ठेवणे हाच रिकामटेकडेपणा

$
0
0
‘अखिल भारतीय साहित्य संमेलनाला नावे ठेवणे म्हणजे रिकामटेकडेपणाचा उद्योग आहे. इच्छा असेल त्यांनी संमेलनाला यावे आणि ज्यांना नको त्यांनी येऊ नये,’ असे स्पष्ट मत व्यक्त करून ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या टीकेला उत्तर दिले.

तयारीविनाच अभ्यासात व्यवसाय शिक्षण

$
0
0
अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता नसतानाही राज्य सरकारचे शिक्षण खाते आणि व्यवसाय शिक्षण संचालनालय येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील ५० शाळांमध्ये नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

४ वर्षांत १२९ पोलिसांनी संपवले जीवन

$
0
0
राज्यात गेल्या चार वर्षांत पोलिस दलातील तब्बल १२९ जणांनी आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिपायांपासून ते अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

‘IIM’ला पुण्यात जागा हवी? ही घ्या!

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही राष्ट्रीय महत्त्वाची व्यवस्थापन संस्था पुण्यात स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची (एचए) अडीचशे एकर जागा उपलब्ध होऊ शकते, असे पत्र आपण सरकारला लिहिल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी दिली.

काळ्या काचांविरोधात कारवाई

$
0
0
पुणे वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहनांवर तसेच लक्झरी बसेसवर लावण्यात येणाऱ्या काळया काचांच्या विरोधात एक डिसेंबर पासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्म तसेच आवरण काढून टाकण्यात येणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images