Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महिलांनी पुरुषार्थ गाजवावा; पुरुष होण्याचा प्रयत्न करू नये

$
0
0
‘मुलींना मुलासारखे वागवणे हे कुटुंबव्यवस्था ढासळण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. महिलांनी पुरुषार्थ गाजवावा. मात्र, पुरुष होण्याचा प्रयत्न करू नये. महिलांना आत्मसन्मान मिळवतानाच दुसऱ्यालाही सन्मान दिला पाहिजे,’ असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी मांडले.

स्वच्छतागृहांची माहिती ‘GPS’वर

$
0
0
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याच्या मदतीने पुण्यातील स्वच्छतागृहे आता ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’वर (जीपीएस) जोडली जाणार आहेत. ‘रोशनी’ ही स्वयंसेवी संस्था ‘राइट टू पी’ या उपक्रमांतर्गत ‘जीओ मॅपिंग’च्या मदतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देणार आहे.

मॉलमधील रव्यात जिवंत अळ्या

$
0
0
कोथरूड येथील एका मॉलमध्ये विक्रीसाठी असलेल्या रव्यामध्ये जिवंत अळ्या निघाल्याची घटना बुधवारी घडली. याबाबत त्या मॉलच्या कर्मचाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर त्यांनी ग्राहकाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

पालिकेत ३४ ऐवजी ३८ गावे

$
0
0
महापालिका हद्दीत समाविष्ट करण्या‌त येणाऱ्या गावांची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असताना नव्याने चार गावे समाविष्ट करण्यास बुधवारी विधी समित‌ीने मंजुरी दिली. यामुळे भविष्यात ३४ ऐवजी ३८ गावांचा समावेश पालिकेत होणार आहे.

बेकायदा बांधकाम : हातोडा पडणार

$
0
0
शहरालगतच्या परिसराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात हातोडा उचलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांमधील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले.

अजितदादांची चौकशी?

$
0
0
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, हर्षवर्धन पाटील, लक्ष्मण ढोबळे यांच्यासह आजी-माजी आमदार, बड्या अधिकाऱ्यांसह २६ जणांची भ्रष्टाचार प्रकरणी उघड चौकशी करण्याबाबत गृह मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवसेनेसाठी‍ मोदींना साकडे

$
0
0
राज्यातील सत्तेचा तिढा शिवसेनेची मदत घेऊन सोडविला जावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मं‌त्रिमंडळ विस्तारातील नावांच्या यादीला अंतिम मंजुरीही या वेळी घेतली जाणार आहे.

गदिमा पुरस्कार अरूण साधू यांना जाहीर

$
0
0
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधू यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच स्मिता परांजपे, संदीप खरे आणि उर्मिला धनगर यांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या बजेटसाठी ४५० नागरिकांच्या सूचना

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१५-१६ साठीच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी शहरातील ४५० नागरिकांनी सूचना पाठवल्या आहेत. या सर्व सूचना ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आल्या असून, यात शहरातील सामाजिक संस्थांचा पुढाकार जास्त आहे.

सिंहगड ‘रोप-वे’ला विरोध

$
0
0
सिंहगडावर रोप-वे शिवाय भरपूर कामे करण्यासारखी असताना; रोप-वे प्रकल्पाचा घाट घालण्यात आला आहे. गडाकडे दुर्लक्ष करून, हा प्रकल्प पुढे नेल्यास त्याला प्रखर विरोध केला जाईल.

नाट्य संमेलनात लोककलांची मेजवानी

$
0
0
बेळगावी येथे होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात नाट्यप्रेमींना लोककलांची मेजवानी मिळणार आहे. नाट्य संमेलनातील कार्यक्रमाचा आराखड्याचे नियोजन सुरू झाले असून, बेळगावी परिसरातील आणि सीमा भागातील अप्रसिद्ध लोककलांना संमेलनात व्यासपीठ देण्यात येणार आहे.

भामा-आसखेड प्रकल्प रखडण्याचा धोका

$
0
0
भामा आसखेड प्रकल्पातून पाणी घेताना महापालिकेने ‘सिंचन पुनर्स्थापना’ खर्चापोटी १०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेकडे केली आहे.

राडारोडा टाकून ओढा बुजवला

$
0
0
पाषाण येथील रतन पार्कलगतचा ओढा राडारोडा टाकून बुजवण्यात आला आहे. गायब झालेल्या ओढ्यांच्या यादीत त्यामुळे आणखी एका ओढ्याची भर पडली आहे. प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षाने असे प्रकार घडत आहेत.

मशीन बंद तरीही पेशंटवर उपचार सुरूच

$
0
0
महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमधील काही मशिन्स नादुरुस्त असली तरी त्याचा कोणताही परिणाम पेशंटवर होऊन त्यांची गैरसोय होत नाही, असा दावा पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

संत नामदेवांच्या जीवनकार्याला ग्रंथाद्वारे उजाळा

$
0
0
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांनी लिहीलेल्या ‘संत नामदेव-जीवन कार्य आणि मराठी हिंदी काव्य’ या द्विखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन येत्या सोमवारी (२४ नोव्हेंबर) होणार आहे.

आळंदीत वारकऱ्यांचा मेळा

$
0
0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी नगरीला संतांचे माहेरघर म्हणूनच ओळखले जाते. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाचे जणू वार्षिक स्नेहसंमेलनच असते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

$
0
0
पुणे जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींमधील साडेपाच हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एप्रिल ते ऑगस्ट २०१४ या कालावधीतील मासिक वेतनासाठी दोन कोटी ५४ लाख ११ हजार ९५० रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेने संबंधित पंचायत समितीकडे नुकतेच वर्ग केले असल्याची माहिती राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष देविलाल राजगुरू व सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांनी दिली.

विस्कळित पाणीपुरवठ्याचे प्रशासनावर खापर

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये पुरेसे पाणी असूनही पुरवठा विस्कळित होतो. याला प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांवर आगपाखड केली.

अनधिकृत बांधकामावरून दोन नगरसेवक अडचणीत

$
0
0
अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि विनया तापकीर अडचणीत आले आहेत. याबाबतच्या हाय कोर्टातील याचिकेवर कोर्टाचे मत मागविण्यात आले असून, त्यानंतर पात्र किंवा अपात्रतेबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.

महसूल खातेच सर्वात लाचखोर!

$
0
0
सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे करण्यासाठी लाच घेण्यात राज्यात यंदाच्या वर्षी देखील महसूल खाते प्रथम क्रमांकावर असून खाकी वर्दी घालणारे पोलिसांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. मागील काही महिन्यांपासून पुणे शहरासह राज्यात अनेक प्रशासन आणि पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images