Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मातीच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न

$
0
0
वातवरणातील बदलांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिकांचे वेळापत्रकच बदलण्याचा निर्णय हैदराबादच्या ‘सेंटर फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अॅग्रीकल्चर’ (क्रिडा) आणि राज्यातील विविध कृषी संशोधन संस्थांनी घेतला आहे.

सिंहगडावरील ‘रोप-वे’साठी गुपचूप सर्व्हे

$
0
0
सिंहगडावरील प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाला दुर्गप्रेमींचा संभाव्य विरोध लक्षात घेत संबंधितांच्या गुपचूप हालचाली सुरू झाल्या आहेत. वनविभागाशी साटेलोटे ठेवत काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गडाच्या परिसरातील झाडांचा सर्व्हे गाजावाजा न करता झाल्याचे समोर आले आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थी ‘ना घर के, ना घाट के’

$
0
0
केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षण मंडळाचे अधिकार काढून घेतल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात पालिकेला अपयश आले असल्याने विद्यार्थ्यांची अवस्था मात्र ‘ना घर का, ना घाट का’, अशी झाली आहे.

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्याला अटक

$
0
0
परीक्षेत कमी मार्क मिळाले तरी वाढविण्याचे आमिष दाखवून शाळेतील मुलींशी असभ्य, अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. शाळेमधीलच एका उच्चशिक्षित पदावरील अधिकाऱ्याकडून असा घृणास्पद घडल्याने पालकांनी मुलांची सुरक्षेकरिता कोणाकडे पाहायचे, असा प्रश्नपडला असून स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुणे विद्यापीठाला हवा प्र-कुलगुरू

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासोबतच दीर्घ काळापासून रिक्त असणारे प्र-कुलगुरू पद भरण्यासाठीही राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी विद्यापीठाशी संबंधित प्रतिनिधींनी थेट राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली.

‘गाइड’विना रखडले शिक्षणाचे ‘संशोधन’

$
0
0
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतून (एससीईआरटी) पीएचडीची पदवी पुन्हा सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणशास्त्रामधून पीएचडी देण्यासाठी आवश्यक गाइड्स परिषदेकडे उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुपोषणाचा टक्का कमी करण्यालाच प्राधान्य

$
0
0
युनायटेड नेशन्श चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) आणि राज्य सरकारतर्फे राज्यातील बालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुपोषित बालकांसाठीचे ‘न्युट्रिशन मिशन’, शालेय पातळीवरील स्वच्छता जनजागृती उपक्रम याच उपक्रमांचा भाग आहेत.

मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

$
0
0
दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने व्यसनी मुलाने वडिलांना केलेल्या मारहाणीत त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती कळल्यानंतर नातेवाइकांनी आरोपीला बेदम मारहाण केली.

अवकाळी पावसामुळे भोरमध्ये भाताचे नुकसान

$
0
0
गेल्या आठवड्याच्या अखेरीला रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे भोर-वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले आहे. काढलेल्या भातातील तांदळाचे दाणे काळे पडणे, तुकडा, कूट होणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे.

नव्या चौकीसमोर अनेक आव्हाने

$
0
0
येरवडा हद्दीत नव्याने स्थापन होणाऱ्या चंदननगर पोलिस ठाण्याचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी होत आहे. वाट्याला आलेली मोठी हद्द, वाढणारे नागरीकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या, सतत घडणाऱ्या सोनसाखळीच्या चोऱ्या, वाहनचोऱ्या, दिवसा आणि रात्री होणाऱ्या घरफोड्या आणि खुनासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे कठीण आव्हान या पोलिसांसमोर असणार आहे.

पत्नीच्या मृत्यूमुळे पतीची आत्महत्या?

$
0
0
कोथरूड येथे आत्महत्या केलेल्या हेमंत मधुसुदन ताम्हणकर (वय ५८, रा. उजवी भुसारी कॉलनी) यांच्या पत्नीचा मृत्यू आजारपणामुळेच झाला असल्याची शक्यता प्राथमिक पोस्टमार्टेम अहवालात वर्तवण्यात आली आहे.

स्वच्छ पुण्यासाठी झटणाऱ्यांचे आरोग्य ‘धुळीत’

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविण्याचा संदेश दिला असला तरी, प्रत्यक्षात वर्षभर सार्वजनिक शौचालयांच्या सफाईपासून रस्तोरस्ती कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या शहरातील आठ हजार सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य दुर्लक्षित राहिल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

लैंगिक शोषणाच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह

$
0
0
वारजे येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतचा तपास संवेदनशीलपणे होतोय की नाही याची शंका उपस्थित आहे, असा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केला.

पेशंट-नातेवाइकांना केमिस्टांमुळे आर्थिक भुर्दंड

$
0
0
डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार केवळ दोन गोळ्यांची गरज असताना दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप गळ्यात मारली जाण्याचे प्रकार वाढत असून केमिस्टांकडून होणाऱ्या या पिळवणुकीच्या विरोधात पेशंट व त्यांचे नातेवाइक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

अधिकाऱ्यांमुळेच रखडला नदीपात्रातील रस्ता

$
0
0
वाहतूक कोंडीतून सुटका करणारा आणि पुणेकरांच्या हिताचा रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रे पूल रस्ता व्हावा, अशी अधिकाऱ्यांचीच इच्छा नसून, त्यासाठी गेल्या वर्षभरापासून टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

बेकायदा कनेक्शनच्या कारवाईला नगरसेवकांचीही मदत

$
0
0
बेकायदा वीज कनेक्शन शोधून ती हटविण्याच्या कार्यात आता माननीयांचाही हातभार लागणार आहे. शेतीपंपांच्या वीजपुरवठा यंत्रणेतून घेतलेल्या बेकायदा कनेक्शनवर कारवाई करताना लोकप्रतिनिधींचीही मदत घ्यावी, अशा सूचना महावितरणने राज्यभरात आपल्या यंत्रणेला दिल्या आहेत.

‘होय, आम्ही मागणी करतोय ‘IIM’ची’

$
0
0
पुण्यामध्ये ‘आयआयएम’ स्थापन करण्याबाबत शहर आणि परिसरातील उद्योजकांकडून सकारात्मक भूमिका मांडली जात असतानाच, आता शहरातील युवकांनीही त्यासाठी डिजिटल चळवळ सुरू केली आहे.

इनामदार हॉस्पिटलप्रकरणी दोषी अधिकारी ‘रडार’वर

$
0
0
‘वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलच्या बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष करून आर सेव्हनचे दोन मजले ताब्यात न घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे,’ असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.

बांधकाम प्रस्तावांचा जलद निपटारा

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दाखल करण्यात येणाऱ्या बांधकामांच्या प्रस्तावांना जलद गतीने मंजूरी देण्यासाठी महापालिकेने ‘फास्ट ट्रॅक सिस्टीम’ सुरू केली आहे. या नवीन पद्धतीमुळे २० हजार चौरसफूटापर्यंच्या बांधकामाला केवळ २४ तासांत मंजूरी दिली जाणार आहे.

‘PMP’ला सोसवेना मोफत पास योजनेचा भार

$
0
0
लोकानुनयी योजनांच्या घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या नादात वाढणाऱ्या आर्थिक भाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे पीएमपीच्या मोफत पास योजनेवरून स्पष्ट होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images