Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनोम‌िलनाची नांदी नाही

0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो असताना तेथे उद्धव होता. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. या भेटीचा अर्थ शिवसेनेबरोबर मनोमीलन होईल असा नाही, असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

आत्महत्येमागे कर्जाचा बोजा?

0
0
कोथरूड येथील उजव्या भुसारी कॉलनीत जिमचा व्यवसाय करणाऱ्या एकाने त्याच्या आजारी पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला.

बिबवेवाडीतील व्यापारी संकुल बंद

0
0
रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बिबवेवाडी येथील राजीव गांधी व्यापारी संकुल पालिकेच्या धोरणामुळे बंद पडले आहे.

‘PMP’चे रडगाणेच सुरूच

0
0
बसखरेदीसह विद्यार्थी पास, कर्मचारी बोनस आणि इतर खर्चासाठी सातत्याने हात पसरणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पालिकेने स्थापनेपासून आजवर तब्बल ५०० कोटी रुपयांहून अधिक मदत केली आहे.

जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी

0
0
हजारो वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ या जयजयकाराने संपूर्ण अलंकापुरी मंगळवारी दुमदुमली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकी एकादशीला माउलींच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आळंदीला आले होते.

उघड्या चेंबरमध्ये पडून बाइकस्वार गंभीर

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील एका गावात ड्रेनेज चेंबरवर झाकण नसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. गणेश रावण तावरे (वय ३५, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

अश्लील वर्तन करणारा शिक्षक अटकेत

0
0
परीक्षेत कमी मार्क मिळाले तरी वाढविण्याचे आमिष दाखवून शाळेतील मुलींशी असभ्य, अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.

कामशेतजवळ एक मजूर ठार

0
0
कामशेत जवळील नायगाव येथे गृह प्रकल्पाच्या भिंतीचे बांधताना सुरू असताना मुरमाचा ढिगारा कोसळून ढिगाऱ्यायाखाली एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

सारथीमधील कॉल सेंटर सकाळी ७ ते रात्री ९

0
0
‘मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सारथी प्रणाली कार्यान्वित केली असली, तरी त्यामधील नागरिकांच्या शंका-समस्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सारथीमधील कॉल सेंटरची सेवा सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल,’ अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

ई-स्क्वेअर चौकात पुन्हा PMP चा स्टॉप उभारा

0
0
गणेशखिंड रोडवरील ई-स्क्वेअर चौकातील पी‌एमपीचा हलविण्यात आलेला बसस्टॉप पूर्ववत करावा, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. पीएमपीएमएलने हा बसस्टॉप मूळ जागेवर न आणल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

‘ग्रँड चॅलेंजेस इंडिया’ करणार मातांचे प्रबोधन

0
0
गर्भवती मातेला सकस आहार, नवजात बालकाला सुरुवातीला मातेचे दूध आणि वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत पोषक आहार मिळावा या उद्देशाने ‘ग्रँड चॅलेंजेस इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उघड्या चेंबरमध्ये पडून मोटारसायकलस्वार गंभीर

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील एका गावात ड्रेनेज चेंबरवर झाकण नसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. गणेश रावण तावरे (वय ३५, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

भाजपचे मिशन ‘व्हाइट वॉश’

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देत देशात एक हाती सत्ता मिळवली. त्याचप्रमाणे खडकी कँटोन्मेंट बोर्डातूनही सत्ताधारी काँग्रेसला हद्दपार करण्याचा विडा भाजपने उचलला आहे.

सोलापूर रोडवर डोक्याची मंडई

0
0
गेल्या काही वर्षांपूर्वी वाहतुकीत झालेल्या बदलानंतरही तसेच असलेले दिशादर्शक फलक, अरुंद रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षा आणि चारचाकीमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, रस्त्याच्या मध्यभागी असलेले जीवघेणे खड्डे, चौकांमध्ये असखल रस्ता, अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, पदपथावरील पथारी विक्रेत्यांमुळे रस्त्यावरून चालणारे नागरिक..... अशी परिस्थिती सोलापूर रोडवर पाहणी केल्यानंतर निदर्शनास आली.

जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक हवी

0
0
जिल्हा परिषदेच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणात परिषदेची बाजू मांडण्यात न आल्याने निर्णय विरोधात गेल्यास त्याबाबतची सविस्तर कारणे व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तपशील यापुढे सरकारला सादर करावा लागणार आहे.

‘फॅमिली क्लिनिक’ची पुण्यात वर्षभरात ५० केंद्रे

0
0
बेंगळुरूनंतर पुण्यात सुरू झालेल्या ‘फॅमिली डॉक्टर क्लिनिक’ या साखळीतील आणखी ५० क्लिनिक येत्या वर्षभरात पुण्यात सुरू होणार आहेत. एकाच ठिकाणी विविध विद्याशाखांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचारांची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

ऊसदरासाठी संघर्षयात्रा

0
0
उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवनेरी ते पुणे संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कळविली आहे.

‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना लागणार तपासणी ड्युटी

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होत असल्याने प्रशासकीय सुधारणा आणि कामकाजात अधिक शिस्त आणण्यासाठी, ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना तपासणी ड्युटी लावण्याचे आदेश प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत.

आफ्रिकेच्या चमूने केली आरोग्य केंद्राची पाहणी

0
0
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पाहणीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांचे शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून येथे तळ ठोकून आहे. आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे आदर्श ठरवल्यानंतर त्यांची पाहणी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

सुधारणेच्या हमीनंतरच ‘PMP’ला निधी द्या

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पालिकेने रसद पुरवली असली, तरी मार्गांवरील बस आणि प्रवासी संख्यावाढीची हमी घेऊनच, हा निधी सुपूर्त केला जावा, अशी मागणी केली जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images