Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणी योजना अपूर्ण, रस्त्यांची दुरवस्था

$
0
0
शिवजन्मभूमीने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील अनेक नागरी समस्यांचे निवारण करण्याचे आव्हान आमदार शरद सोनवणे यांना पेलावे लागणार आहे. तालुक्यातील विविध गावातील पाणी योजनांच्या अडचणी दूर करण्यासाठी झटावे लागणार आहे.

बारामतीचा शेजार तहानलेला

$
0
0
गल्ली ते दिल्लीपर्यंतचे खासदार आदर्श गाव योजनेसाठी गावे शोधत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीजवळची काही गावे वर्षभर पाण्यासाठी वणवण करीत आहेत.

ठेवीदारांच्या मागण्या दुर्लक्षिल्यास आंदोलन

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) ठेवीदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच, सकारात्मक तोडगा न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांच्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आला.

जातपडताळणी जबाबदारी एकाच विभागाकडे द्यावी

$
0
0
जात पडताळणी समितीच्या चेंडूची सुरू असलेली फेकाफेक थांबवून समित्यांची पूर्णवेळ जबाबदारी एकाच विभागाकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेण्याची गरज आहे. त्यासाठी या कामाची जबाबदारी महसूल किंवा समाजकल्याण यांच्यापैकी एका विभागाकडे देण्याची गरज आहे.

विद्येचे माहेरघरच ठरेल ‘IIM’साठी पोषक

$
0
0
राज्यात मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील औपचारिक शिक्षणाची मुहुर्तमेढ पुण्यातच रोवली गेली होती. दर्जेदार मॅनेजमेंट शिक्षणासाठी पूरक ठरणारे दर्जेदार इंजिनीअरिंग शिक्षणही पुण्यात उपलब्ध आहे.

बालचित्रवाणी कर्मचाऱ्यांवर अस्थिरतेची टांगती तलवार

$
0
0
राज्यातील शिक्षण आयुक्तांच्या पदनिर्मितीच्या काळात शैक्षणिक वर्तुळामध्ये झालेल्या बदलांमुळे ‘बालचित्रवाणी’सारख्या संस्थेतील ४० कर्मचाऱ्यांवर अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे.

मराठीसाठी ‘आपणच’!

$
0
0
मराठी भाषेची दुरवस्था रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या पातळीपासूनच भाषासंवर्धनाचे उपाय योजण्याच्या उद्देशानं ‘आपणच’ या शैक्षणिक स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

सत्तांतराच्या गडबडीत शिक्षकांचे पगार थकले

$
0
0
राज्यातील सरकार बदलानंतरच्या पहिल्याच महिन्यात प्राध्यापकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच होणारा पगार अद्यापही न झाल्याने, प्राध्यापक कातावले आहेत.

कोर्टाच्या निर्णयामुळे भरतीमध्ये अडथळा

$
0
0
मुंबई हायकोर्टाने मराठा तसेच मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्याने महापालिकेत नव्याने केल्या जाणाऱ्या नोकरभरतीमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. या पदासाठी जुन्या पद्धतीने आरक्षण लागू करून भरती करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

नदीप्रदूषणाला बसणार चाप ‘इलेक्ट्रिक सेन्सर’चा

$
0
0
औद्योगिक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ होत आहे. एकूण पाणी प्रदूषणात त्याचे प्रमाण एक तृतीयांश आहे.

अवकाळी पावसाने घेतली रविवारी सुट्टी

$
0
0
ऐन हिवाळ्यात दोन दिवस बरसल्यानंतर रविवारी पावसाने ‘विश्रांती’ घेतली. अवेळी बरसलेल्या पावसाने सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेतल्याने पुणेकरांसह राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, सोमवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातून सांगण्यात आले.

नशिबी कागदपत्रांचीच जुळवणी

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेस (डीबीटीएल) पात्र ग्राहकांचे पुण्यातील प्रमाण सध्या जेमतेम तीस टक्के आहे. त्यामुळे आता आधार कार्ड (सक्ती नाही), बँक खाते आणि एलपीजी क्रमांक यांची जोडणी करण्याचे काम सुमारे १८ लाख पुणेकरांना हाती घ्यावे लागणार आहे.

साखर शाळेविषयी प्रशासन उदासीन

$
0
0
लहान मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. कायद्यानुसार जिल्हा परिषदेने साखरशाळांच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत.

चिरीमिरीवर होणार कारवाई

$
0
0
पोलिस ठाण्यांमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिरंगाई तसेच चिरीमीरी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. परकीय नोंदणी शाखेने थेट पासपोर्ट अर्जदारांकडूनच व्हेरिफिकेशन दरम्यानचे अनुभव ऐकण्यास सुरुवात केल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे.

सिंहगड अडकला ‘वीकेंड कोंडी’त

$
0
0
ऐन थंडीत पडलेल्या पावसाळी हवेचा आनंद लुटत गरमागरम भजी, पिठले-भाकरीवर ताव मारण्यासाठी हौशी पर्यटकांनी वीकेंडला स्वारी केली आणि सिंहगडचा घाट पुन्हा कोंडीत अडकला. गडावर गाडी घेऊन जाण्यासाठी शुल्क आकारणी केली जाऊनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गड सर केला.

नक्षलींचे ‘कोडवर्ड’ उलगडले

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच अटक केलेल्या संशयित नक्षलवाद्यांकडून संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठीचे ‘कोडवर्ड’ उकलले असून, त्याद्वारे पुण्यातून मोठ्या प्रमाणात कपडे, शूज, गोळ्या औषधांची रसद जंगलात पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

क्रिएटिव्ह अॅकॅडमीच्या संचालकास अटक

$
0
0
आकुर्डीतील क्रिएटिव्ह अॅकॅडमीमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून संस्थेचे संचालक नौशाद शेख (वय ५३, रा. आकुर्डी) याना देहू रोड पोलिसांनी अटक केली. शेख याचा अटकपूर्व जामीनअर्ज सोमवारी पुणे न्यायालयाने फेटाळला होता.

आठवले यांच्या दुर्लक्षामुळे पराभव

$
0
0
खासदार रामदास आठवले यांच्या दुर्लक्षामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख महेश कुलकर्णी यांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर) केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीचा पाचवा बळी

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा उपद्रव वाढत असून, रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री ६५ वर्षीय महिलेचा डेंगीने मृत्यू झाला. सुशिला मानकावे (वय ६५, रा. इंदीरानगर, चिंचवड) असे त्यांचे नाव असून, थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मतदारयादी वेबसाइटवर

$
0
0
खडकी कॅटोन्मेंट बोर्डाच्या जानेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठीची मतदार यादी बोर्डाने प्रसिद्ध केली असून, नागरिकांना त्यांची नावे www.cbkirkee.org.in या वेबसाईटवर इलेक्शन सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images