Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खालापूरला ट्रॉमा केअर सेंटर होणार

0
0
मुंबईहून पुण्याकडे येताना ‘एक्स्प्रेस वे’वर वाहनाला अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी खालापूर येथे अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

सीएनजीचा भडका उडून तीन जण होरपळले

0
0
सीएनजीच्या टाकीची विल्हेवाट लावत असताना त्याचा भडका उडाल्याने दोन लहान मुलांसह एक वृद्ध होरपळल्याची दुर्घटना नाना पेठेतील चाचा हलवाई चौकाजवळ घडली. उमर फारूक शेख (वय ३), फरदीन असिम शेख (वय २) आणि मोहमंद हुसेन अब्दुल समद (वय ७०, तिघेही रा. नाना पेठ) अशी जखमींची नावे आहेत.

शहर परिसरात वीजपुरवठा खंडित

0
0
शहर व परिसरात शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शनिवार सायंकाळपासूनच शहर व आसपासच्या भागात सातत्याने पाऊस कोसळत होता. रविवारीही अनेक भागांत पाऊस झाला.

रुपी बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
0
रुपी बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे साडेआठशे तक्रारअर्ज पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे शनिवारी सादर करण्यात आले.

सराफी पेढीवरील दरोड्याचा गुन्हा उघड

0
0
रविवार पेठेतील गडकेसरी सराफी पेढीवर दरोडा टाकून २६ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटल्याचा गुन्हा गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून सर्व आरोपी हे नेपाळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एकाला मुंबई येते अटक करण्यात आली आहे.

‘सिटी इंटरनॅशनल’वर होणार कारवाई

0
0
वानवडीतील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सादर केलेला अहवाल गेल्या सहा महिन्यांपासून पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये धूळ खात पडला होता.

व्हॅनचालकाला कोठडी

0
0
वारजे येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर व्हॅनचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संदीप कुंभार (वय ३०, शिवणे) या व्हॅनचालकाला शनिवारी अटक झाली. कोर्टाने शनिवारी त्याला दोन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली.

आ. विजय काळेंचा हेल्मेटसक्तीला विरोध

0
0
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर करण्यात येणारी कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे शनिवारी केली आहे. या कारवाईला नागरिकांचा मोठा विरोध असल्याने लोकभावना समजून कारवाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मेट्रो, नदीसुधार, उड्डाणपुलाला प्राधान्य

0
0
आघाडीच्या काळात अपूर्ण राहिलेले शहरातील मेट्रो, कचरा, नदीसुधार आणि रेल्वे उड्डाणपूल हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पाठपुरावा करणार आहेत.

मतदान टाळल्याने संभ्रमावस्था

0
0
‘विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना राज्य सरकारने अधिक पारदर्शकता दाखवत मतदान घ्यायलाच हवे होते; पण त्यांनी ते टाळल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे’, असे स्पष्ट मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘PMP’ : सरासरी ३० टक्के बस बंद

0
0
‘पीएमपी’च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा एकत्रित ताफा लक्षात सुमारे दोन हजारांपर्यंत पोहोचला असला, तरी सरासरी ३० टक्क्यांहून अधिक बस ‘ऑफ द रोड’ असल्यानेच ‘पीएमपी’च्या तोट्यात दिवसागणिक वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बिबट्याचे गूढ कायम

0
0
सूसगावात बिबट्याचा वावर असल्याचा दावा शुक्रवारी स्थानिक नागरिकांनी केला असला तरी शनिवारी दिवसभरात या बिबट्याने कोणालाही पुन्हा दर्शन दिले नाही.

१० पक्ष्यांचा अधिवास होणार नष्ट?

0
0
नैसर्गिक अधिवासातील मानवाचा वाढता हस्तक्षेप आणि अनियंत्रित विकासकामांमुळे पक्ष्यांची वसतिस्थाने असलेल्या देशातील दहा महत्त्वपूर्ण जैवविविधतेच्या ‘साइट’ धोक्यात आल्या आहेत.

आधार कार्डाची सक्ती नाही

0
0
पुणेकरांच्या तीव्र असंतोषामुळे स्थगित केलेली गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना (डीबीटीएल) नव्या वर्षापासून (एक जानेवारी) पुन्हा सुरू होत आहे. मात्र, या नव्या योजनेत (मॉडिफाइड डीबीटीएल) सहभागी होण्यासाठी आधार कार्डाची सक्ती काढून टाकण्यात आली आहे.

‘IIM’: पुण्याचे कारभारी झोपलेलेच

0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही देशातील प्रतिष्ठित संस्था महाराष्ट्रात येणार हे नक्की असले, तरीही ही संस्था पुण्यामध्ये आणण्यासाठी पुण्याच्या कारभाऱ्यांकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

पुन्हा DBTL ; सिलिंडर महागणार

0
0
सर्व स्तरांमधील पुणेकरांच्या नाराजीमुळे पूर्वीच्या सरकारने स्थगित केलेली गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना (डीबीटीएल) येत्या एक जानेवारीपासून पुन्हा पुण्यात सुरू होत आहे.

थंडीचा महिना : सरींची घुसखोरी

0
0
दिवसभर ढगाळ हवा, अधूनमधून शिडकावा, मध्येच जोरदार सरींची हजेरी, रस्त्यांवर साठलेले पाणी आणि चिकचिकाट......असे जुलै-ऑगस्टमध्ये दिसणारे पावसाळी चित्र पुणेकरांना शनिवारी ऐन नोव्हेंबरच्या मध्यात अनुभवायला मिळाले.

मतदानच हवे होते

0
0
‘विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना राज्य सरकारने अधिक पारदर्शकता दाखवत मतदान घ्यायलाच हवे होते; पण त्यांनी ते टाळल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे’, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

केंद्र सरकार ‘मनरेगा’ गुंडाळण्याच्या प्रयत्नात

0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा)च्या कायद्याची अंमलबजावणी सर्व देशभर करण्याची तरतूद आहे; मात्र फक्त मागास क्षेत्रातच मनरेगाची कामे द्यावीत, असा बदल कायद्यात करण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मांडला आहे.

‘पक्षात संघटनात्मक बदल करणार’

0
0
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर बदल करणार आणि पक्षात ‘नवीन टीम’ आणणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images