Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

किरकोळ भांडणातील जखमी युवकाचा मृत्यू

0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात जखमी युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पित्यानेच केला मुलीवर अत्याचार

0
0
स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच सलग तीन महिने अत्याचारकेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. पीडित मुलीने या बाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तक्रार दिली असून, पंचेचाळीस वर्षीय बापाला ताब्यात घेतले आहे.

मतदान ११ जानेवारीला

0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या ११ जानेवारी २0१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला खडकी बोर्डाच्या शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) झालेल्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली.

सुखाच्या निवृत्तीसाठी...

0
0
‘पेन्शन योजना सर्वांसाठी’ या विषयावर आज, व्याख्यान व मार्गदर्शनपर सादरीकरण होणार आहे. टिळक रोडवरील मराठा चेंबरच्या सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त.

ज्येष्ठांसाठी मोफत समुपदेशन

0
0
ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘डिग्निटी फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या घरबसल्या सोडविण्यासाठी फाउंडेशनतर्फे मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

काळ्या पैशांविषयी आता लग्नपत्रिकेतून जागरूकता

0
0
विदेशात असलेल्या आणि देशात वाढत चाललेल्या काळ्या पैशाबाबत देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चलनामध्ये खोट्या नोटांचाही सुळसुळाट झाला आहे. काळा पैसा आणि मोठ्या नोटा यामुळे भ्रष्टाचार माजला असून, सर्वसामान्य जनतेची कोंडी झाली आहे.

कथायात्रा महोत्सवाचे आयोजन

0
0
प्रादेशिक भाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘भाषा’ संस्थेतर्फे २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत कथायात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा महोत्सव होत आहे.

अविकसित रस्त्यांचे मार्किंग करण्याचा प्रस्ताव

0
0
शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) दाखविण्यात आलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी अविकसित रस्त्यांचे मार्किंग पालिकेने करावे, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

मारणे टोळीचा साथीदार गजाआड

0
0
निलेश घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार असलेल्या संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे याच्या खून प्रकरणी पौड पोलिसांनी मारणे टोळीच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या आरोपीला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सव्वा दोन लाखांचे दागिने हिसकावले

0
0
शहरात गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याच्या चार घटना घडला असून, त्यात सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला आहे. या चारही घटना शहराच्या चार वेगवेगळ्या दिशेला घडल्या असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

दुर्मिळ तिकिटे पाहण्याची व खरेदीची संधी

0
0
विविध देशातील दुर्मिळ तिकिटे, शंभर वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक वारशाच्या प्रतिक असलेल्या वस्तू आणि नाणी बघण्याची तसेच त्यातील काही तिकिटे विकत घेण्याची संधी हौशी तिकिटप्रेमींना मिळणार आहे.

राजकीय पक्षांच्या चिन्हांवरच निवडणुका

0
0
देशभरातील कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांशिवाय घेण्याचा डाव उधळण्यात आला असून, भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राजकीय पक्षांच्या चिन्हांवरच निवडणुका घेण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या.

जिल्ह्यातील २६ गावे तंटामुक्त

0
0
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारांतर्गत २०१२-१३ या वर्षासाठी राज्यातील ४७ गावे पात्र ठरली आहेत. पुणे जिल्ह्यातून हवेली तालुक्यातील खेडशिवापूर या एकमेव गावाची त्यात निवड झाली आहे.

नवदाम्पत्याची आत्महत्या

0
0
उच्चशिक्षित नवदाम्पत्याने कासारवाडी येथे घरातील छताला असलेल्या हुकाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.अर्जुन प्रभाकर आंधळकर (वय २९), अश्विनी अर्जुन आंधळकर (वय २४, दोघे सध्या रा. गुरुनानक कॉलनी, कासारवाडी, मूळ रा. सोलापूर) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

विविध संस्थांकडून नेहरूंना अभिवादन

0
0
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांना विविध संस्था संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले.

नेहरूंनी देशात लोकशाही रुजविली

0
0
‘पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते. आधुनिक भारताचे स्वप्न त्यांनी साकारले. अशा परिस्थितीत तेदेखील हुकूमशहा बनू शकले असते; पण त्याऐवजी त्यांनी देशात लोकशाही रुजवली. लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित करण्यामध्ये नेहरूंव्यतिरिक्त एकही माणूस अग्रेसर नव्हता,’ असे मत मत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

मधुमेहाबाबत जनजागृती

0
0
जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध संस्था व संघटनांच्यावतीने शहरात पोस्टर्सद्वारे जनजागृती, उच्चरक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर आणि रॅली यांचे आयोजन करण्यात आले होते.

हेल्मेट सक्तीला SPTMचा पाठिंबा

0
0
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट नियमावलीच्या अंमलबजावणीला ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ने (एसपीटीएम) पाठिंबा दर्शविला आहे.

अल्पवयीन मुलावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

0
0
बुधवार पेठेतील सिद्धी कॉम्प्लेक्स येथे मारण्याची धमकी देऊन भर दुपारी एका अल्पवयीन मुलावर (वय १३) बलात्कार केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी बंटी उर्फ राजेश नारायण प्रभू (वय २७, रा पासलकर चाळ, अप्पर इंदिरा नगर) यास अटक करण्यात आली असून, १९ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

शहरात आठ टक्के नागरिकांना मधुमेह

0
0
शहरातील पाच हजार पेशंटच्या विविध ठिकाणी केलेल्या तपासणीतून आठ टक्के पेशंटना मधुमेह झाल्याचे नव्याने निदान करण्यात आले; तर पंधरा टक्के जणांना रक्तदाबाचा आजार असल्याचे आढळून आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images