Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणेश कला क्रीडाचे अंतरंग बदलणार?

0
0
बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यापाठोपाठ आता शहरातील सर्वांत मोठ्या गणेश कला क्रीडा मंचाचाही कायापालट होणार आहे. या प्रेक्षागृहात पाठीमागे बसणाऱ्या प्रेक्षकांना व्यासपीठावरील कार्यक्रम नीट दिसत नसल्याने आता येथे बाल्कनी उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सामूहिक ढोल ताशा वादनाची ‘लिम्का बुका’त

0
0
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या पुणे ढोल ताशा महासंघाच्या सामूहिक ढोल ताशा वादनाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ने दखल घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील ढोल पथकांना एकत्रित करणाऱ्या ढोल ताशा महासंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बांधकामांच्या ठिकाणी माहितीचा बोर्ड बंधनकारक

0
0
शहरालगतच्या सर्व गावांमधील प्रत्येक इमारत व सुरू असलेल्या प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम परवानगी आणि तपशीलाबाबत फलक लावणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामांना कर्जे नकोत

0
0
अनधिकृत बांधकामांना वित्तपुरवठा करणे बँका व पतसंस्थांनी थांबवावे, ही बांधकामे अधिकृत असल्याची खातरजमा केल्यानंतरच त्यांना वित्तपुरवठा करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सर्व बँका आणि सहकारी पतसंस्थांना पाठविले आहे. अशा बांधकामांना वित्तपुरवठा करणे, हा अप्रत्यक्षपणे त्या गुन्ह्यातील सहभागच आहे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

पुण्याच्या कलेक्टरना लाख रुपयांचा दंड

0
0
पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे ताशेरे ओढत हरित न्यायाधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘न्यायाधिकरणाच्या सुनावणीला कारकून दर्जाच्या व्यक्तीला पाठविणे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हलगर्जीपणाचे लक्षण आहे,’ अशी टिप्पणी न्यायाधिकरणाने केली.

चार एफएसआय आणि इलिव्हेटेड मेट्रोला विरोध

0
0
शहरात मेट्रो प्रकल्प राबविताना मेट्रो मार्गावर चार एफएसआय आणि जमिनीवरील (इलिव्हेटेड) मेट्रो यालाच नागरिकांनी आक्षेप नोंदविला.

पर्यायी स्रोतांकडील दुर्लक्ष अंगलट

0
0
जाहिरात उत्पन्न, इमारत भाडे यासारख्या उत्पन्नवाढीच्या इतर पर्यायी स्रोतांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याप्रमाणेच खर्चात कपात करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने पीएमपीचा तोटा अडीचशे कोटी रुपयांवर पोहोचल्याचा ठपका पालिकेने केलेल्या पीएमपीच्या लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

भाईचंदतर्फे पैसे देण्यास सुरुवात

0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेने (बीएचआर) ठेवीदारांसाठी ८० : २० अशी योजना लागू केली असून, त्यामधून चेकद्वारे रकमा देण्यास सुरुवात केली आहे. बीएचआर ठेवीदार समन्वय समितीचे अध्यक्ष कारभारी टिळेकर यांनी गुरुवारी ही माहिती कळविली आहे.

शहर काँग्रेसमध्ये फेरबदल हवाच

0
0
लोकसभेपाठापोठ विधानसभेतही दारूण पराभव झाल्यानंतर शहर काँग्रेसच्या नेतृत्वात फेरबदल करण्याची मागणी लोकसभेतील पराभूत उमेदवार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी केली.

चीनसोबत संयुक्त सराव

0
0
सीमेवरील तणाव कायम असला, तरी भारत आणि चीन या दोन्ही लष्करांचा संयुक्त सराव पुण्यात होणार आहे. दोन्ही लष्करांचा संयुक्त सराव येत्या रविवारपासून (१६ नोव्हेंबर) पुण्यात सुरू होत आहे.

अर्धे उत्पन्न ठेकेदारांना

0
0
पीएमपी प्रवाशांसाठी नव्हे, तर ठेकेदारांच्या फायद्यासाठीच कार्यरत असल्याचे शुक्रवारी पुन्हा दिसले. ठेकेदारांच्या ७७० बस रस्त्यावर धावत असताना, पीएमपीच्या मालकीच्या केवळ पाचशे बसच सध्या प्रवाशांना सेवा देत आहेत.

आयुक्तांवर निषेधपत्रांचा पाऊस

0
0
विविध विषयांवर वादग्रस्त विधाने करणाऱ्या पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्यावर पुणेकरांनी कायदेशीर नोटिसा आणि निषेधाच्या पत्रांचा पाऊस पाडला आहे.

आमची मते आम्हाला परत द्या

0
0
‘ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा केली होती, त्यांनाच तुम्ही आलिंगन देऊन पूर्ण जनतेची थट्टा केली आहे. असे असेल तर जनतेला त्यांची मते परत द्या,’ ‘काका पुतण्याच्या तावडीतून महाराष्ट्राची सुटका होईल असे वाटले होते, पण पुन्हा महाराष्ट्र त्यांच्याच हातात गेलाय,’ अशा संतप्त शब्दांत नेटिझन्सनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

पवारांच्या हाती मोदींचा झाडू!

0
0
भाजपचा हात हातात घेऊन महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची सगळी गणिते उलटीपालटी करणाऱ्या शरद पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील ‘झाडूच’ हाती घेतला आहे. मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात शरद पवारही सहभागी झाले असून त्यांनी आज पुण्यात सहकुटुंब साफसफाई केली.

मोठ्यांच्या बालमुद्रा डीपीवर

0
0
सकाळी व्हॉट्स-अप चालू केलं आणि सगळेच कॉँटॅक्ट्स अनोळखी वाटू लागले. सगळ्यांचे डीपी थेट बालपणात जाऊन पोहोचले होते. मग लक्षात आलं, आज बालदिन आहे!

आज रंगणार ‘मनात माझ्या’

0
0
गायिका अनुराधा मराठे यांची कन्या आणि शिष्या अंजली मराठे पहिल्यांदाच गायनाचा स्वतंत्र कार्यक्रम करते आहे. गेल्या २५ वर्षांपासून संगीताच्या क्षेत्रात काम करताना विविध गाणी आपल्या मधुर; तरीही खणखणीत आवाजात सादर करणाऱ्या या गायिकेचा ‘मनात माझ्या’ हा कार्यक्रम आज (१५ नोव्हेंबर) रिअल माइंड्स मीडिया अँड पब्लिसिटीतर्फे आयोजिण्यात आला आहे.

एक वॉक दिग्गजांच्या वास्तूंविषयी

0
0
पुणे शहरात अनेक दिग्गजांनी वास्तव्य केले. त्यांच्या वावराच्या खुणा आणि आठवणी जपणाऱ्या वास्तू आज सिमेंटच्या जंगलातही त्या धुरीणांची महती सांगत आहेत. याच वास्तूंची माहिती घेण्याची संधी रविवारच्या (१६ नोव्हेंबर) हेरिटेज वॉकमध्ये मिळणार आहे.

टाकाऊपासून डिझायनर

0
0
टाकाऊ वस्तूंपासून ज्वेलरी, अॅक्सेसरीज, ग्रीटिंग, फाइल्स करण्याचं प्रमाण वाढत असतानाच इंटेरिअर डिझायनिंगमध्येही टाकाऊ चीजांचा वापर होतोय. दैनंदिन व्यवहारात टाकाऊ ठरणाऱ्या अनावश्यक वस्तूंचा इंटेरिअर डिझायनर कल्पकतेनं उपयोग करू लागले आहेत.

ससाणेनगर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

0
0
ससाणेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे या भागामध्ये सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसच नसल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.

राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

0
0
‘कलाकारांना अथक परिश्रमाची गरज आहे. त्यातूनच तो यशस्वी कलाकार उदयास येतो,’ असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवडचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images