Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पंडित नेहरूंमुळे काश्मीर प्रश्न चिघळला’

0
0
‘भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनात काश्मीर शेख अब्दुल्ला यांना द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी काश्मीरची सूत्रे घटनाबाह्य पद्धतीने अब्दुल्ला यांच्याकडे सोपवून तो प्रश्न चिघळत ठेवला,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख आणि जम्मू काश्मीर अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुणकुमार यांनी मांडले.

न्याय यंत्रणेत महिलांचा सहभाग वाढावा

0
0
महिलांवरील अत्याचाराच्या नव्या घटना समोर आल्या, की नवे कायदे केले जातात; परंतु अत्याचारग्रस्त महिलांना कोर्टापर्यंत नेणारी, त्यांना आधार देणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही.

तारखेच्या गोंधळाने परीक्षेमध्ये गडबड

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरच्या परीक्षांदरम्यान एस. पी. कॉलेजमध्ये सोमवारी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.

निलंबित प्राध्यापकाला पुन्हा मुलाखतीचा कॉल

0
0
विद्यार्थिनींशी असभ्यपणे वागण्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका माजी प्राध्यापकाला विद्यापीठात पुन्हा रुजू करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

बावधनजवळ कंटेनर उलटल्याने कोंडी

0
0
मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधनजवळ कंटेनर उलटल्याने सोमवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नसली, तरी वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले होते.

नवविवाहित दाम्पत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

0
0
औंधमधील कस्तुरबा वसाहतीतील नवविवाहित जोडप्याचा तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ रविवारी सायंकाळी सहाच्या सहाच्या सुमारास रेल्वेतून पडून मृत्यू झाला.

‘एल. डी. भावे’च्या सहा शाखा अचानक बंद

0
0
शहरातील सर्वांत जुने भारत गॅसचे वितरक असलेल्या एल. डी. भावे अँड सन्सच्या डेक्कन जिमखाना वगळता अन्य सहा शाखा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. अपरिहार्य कारणांमुळे या सहा शाखा बंद करीत असल्याचे एजन्सीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

अबुल कलाम स्मारकाची दुरवस्था अन् सुरक्षेचे तीनतेरा

0
0
पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्चून कोरेगाव पार्क येथे उभारलेल्या स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. येथील सर्व खोल्या उघड्याच ठेवण्यात आल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले.

भाजप आमदारांनी आवाज उठवावा

0
0
बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये किंवा काम सुरू असलेल्या साइटवर त्या प्रकल्पाच्या परवानगीची विविध कागदपत्रे दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक करण्याबाबत आणि अनधिकृत बांधकामांना चाप लावून नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिनवेशनात आवाज उठवावा, असे आवाहन शहरातील संघटनांनी केले आहे.

डेंगीबाबतच्या प्रस्तावामुळे आरोग्य विभाग ‘सलाइन’वर

0
0
महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत लाभ मिळू न शकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील पेशंटना शहरातील ठराविक हॉस्पिटलमध्ये मोफत डेंगीचे उपचार देण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

पालिकेच्या खर्चाने नवा अभ्यास दौरा?

0
0
महापालिकेचा कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून ‘टूर’वर जाण्याची माननीयांची महत्त्वाकांक्षा अद्यापही कमी होताना दिसत नाही. आता महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना आगामी महिन्यात तिरुवअनंतपुरम येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्याचे वेध लागले आहेत.

पुण्याच्या सर्व भागांत गुरुवारी पाणी बंद

0
0
पर्वती जलकेंद्रांसह शहरातील इतर सर्व जलकेंद्र व पंपिंग स्टेशनवरील स्थापत्य आणि विद्युतविषयक दुरुस्तीची आवश्यक कामे तातडीने करायची असल्याने येत्या गुरुवारी (१३ नोव्हेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नगर, आळंदीरोड बीआरटीला मार्चचा मुहूर्त

0
0
कोट्यवधी रुपये खर्च करुन पूर्ण झालेल्या नगररोड आणि आळंदीरोडचा बीआरटी मार्ग सुरु करण्यासाठी महापालिकेने मार्च महिन्याचा नवीन मुहूर्त शोधला आहे. ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) बसविण्याबरोबरच या मार्गावरील सर्व कामे २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

बँकांनो, ग्राहकविरोधी निर्णय मागे घ्या

0
0
एटीएम व्यवहारांवर नियंत्रण आणून शुल्क लादण्याचा बँकांचा निर्णय ग्राहकविरोधी आहे. त्याला विरोध करणे आवश्यक आहे. एटीएम व्यवहारांवर मर्यादा आणण्यापेक्षा किमान रकमेत वाढ केल्यास खातेदारांच्या व्यवहारांवर नियंत्रण येईल.

ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक भरती परीक्षेद्वारे?

0
0
ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांची नियुक्ती पात्रता परीक्षेद्वारे करण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्याच्या विचाराधीन आहे. शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी काही ठिकाणी होणारी आर्थिक देवाण-घेवाण आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

११.५ लाखांचे पनीर जप्त

0
0
स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून गंजलेल्या तेलासह प्लॅस्टिकच्या डब्यातून आणलेले ११ लाख ६७ हजार ६६० रुपयांचा पनीरचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने नुकताच जप्त केला. कर्नाटकातून ट्रकमधून आलेला साठा पुण्यातील ६० विक्रेत्यांना कमी दराने विकण्यात येणार होता.

मधुमेहाचे पेशंट वाढले

0
0
‘मधुमेहाच्या पेशंटमध्ये २० ते ३५ वयोगटातील पेशंटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. मधुमेहाच्या पेशंटांमध्ये युवकांचे प्रमाण ४० ते ६० टक्के आहे. देशाच्या शहरी भागात १४ टक्के, तर ग्रामीण भागात सहा ते सात टक्क्यांनी मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.

आता पडघम सहकारी बँकांमध्ये

0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता शहरात नागरी सहकारी बँकांच्या निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्हा बँकेसह शहरातील प्रमुख १३ बँका आणि ग्रामीण भागातील तीन अशा १६ बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे.

PMP च्या निधीचे ऑडिट कराच

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पालिकेचा कोट्यवधींचा निधी वापरल्यानंतरही तोटा वाढतच असल्याने आजवर पीएमपीला दिलेल्या निधीचे ऑडिट करण्याची मागणी आता पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

शेतीवर फिरणार ‘निवासी नांगर’

0
0
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुळशीतील मारुंजी व भूगावमधील ‘शेती ना विकास’ झोनमधील जमीन ‘रहिवासी’ झोनमध्ये बदलण्याबरोबरच शहराभोवतीच्या चार मोठ्या टाउनशिपच्या अधिसूचित क्षेत्रात बदल आणि लोकेशन क्लिअरन्सचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images