Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फळभाज्या महागल्या

$
0
0
विविध भागांतून गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी येणारी आवक घटल्याने थेट मटार, पावटा, सिमला मिरची, पावटा, शेवगा, वांगी यासारख्या फळभाज्यांच्या किमतीत वाढ झाली.

‘स्थायी’ झाली डॉक्टरांवर उदार

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच पाठबळ दिले असून त्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये दिलेल्या ताकदीची आठवण ठेवून वैद्यकीय परवाना शुल्क रद्द करण्याचे आवाहन स्थायी समितीला डॉक्टर संघटनांनी केले होते.

‘रुपी‘ची भिस्त ठेवीदारांवरच

$
0
0
अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांच्या विलीनीकरणातील अडथळा दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नुकतीच एका नियमात सुधारणा केली आहे. तोट्याची जबाबदारी मोठ्या (एक लाख रुपयांहून अधिक) ठेवीदारांनी सोसली, तर एका बँकेला विलीन करून घेणाऱ्या व्यापारी बँकेला तोशीस न लागता विलीनीकरण होऊ शकते, असे या दुरुस्तीत म्हटले आहे.

अनुदानासाठी ‘पिफ’ अपात्र

$
0
0
राज्य सरकारच्या अधिकृततेची मोहोर उमटलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) चित्रपटांच्या अनुदानासाठी पात्र नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळणारच’

$
0
0
मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

खडकीकरांनाही आता द्यावा लागणार वाहन प्रवेशकर

$
0
0
खडकी काँटोन्मेंट बोर्डाने २००९ मध्ये लागू केलेल्या वाहन प्रवेश करातून खडकीकरांना वगळण्यात आले होते. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या नवीन करारामधून खडकीकरांना वगळण्यात आले आहे. आत्ता त्यांच्याकडूनही जबरदस्तीने कर वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

साखळीचोरी रोखण्यात पोलिस अपयशी

$
0
0
शहरातील गुन्हेगारीवर आळा बसविण्यात पोलिस अपयशी ठरल्याचे गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत असून, १८८ गुन्ह्यांपैकी केवळ ८९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. तर शंभरहून अधिक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही.

काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सतीश त्यागी भाजपमध्ये

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सतीश त्यागी यांनी काँग्रेसला राम राम करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

‘राष्ट्रवादी’त संघर्षाची चिन्हे

$
0
0
महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यामुळे या पक्षात संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. पक्षातीलच काहींनी पाठीत खंजीर खुपसल्याची खंत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली.

डेंगीवर उपाययोजना करा

$
0
0
उद्रेक होत असलेल्या डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप सोमवारी (दहा नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केला. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे यांनी डेंगीवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

विविध योजनांसह पायाभूत सुविधांचा हवा विकास

$
0
0
युती सरकारच्या कारकिर्दीत पुरंदर उपसा जलसिंचन ही चार दुष्काळी तालुक्यांना बारमाही पाणी देणारी योजना मंजूर झाली. मात्र, त्यानंतरच्या काळामध्ये ही योजना पूर्ण होण्यामध्ये झालेल्या राजकारणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कामगार मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल

$
0
0
बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी कोणतीही उपाययोजना नसताना एका कामगाराच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यातील ४ शाळांना मैदाने नाहीत

$
0
0
येरवडा परिसरातील पालिकेच्या २४ पैकी एकूण चार शाळांमध्ये मैदानेच नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानी खेळांपासून वंचित राहावे लागत आहे. मैदानांची सोय असलेल्या आजूबाजूच्या शाळा लांब अंतरावर असल्यामुळे पालकांना आपल्या मुलांना दुसरीकडे पाठविता येत नाही.

वारज्याजवळ चालकांची कसरत

$
0
0
डुक्कर खिंडीतील संथ कामांमुळे वैतागलेल्या वाहनचालकांना वारज्यातील कामांमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. वारज्यातून चांदणी चौकाकडे येताना चढ असल्यामुळे अवजड वाहनेही संथ गतीने पुढे सरकतात.

ऊस दर नियंत्रणासाठी सरकारकडून मंडळाची स्थापना

$
0
0
उसाचा दर ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ऊस दर नियंत्रण मंडळामध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विक्रमसिंह घाटगे, तसेच खासदार राजू शेट्टी व रघुनाथ पाटील यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली.

प्राथमिक केंद्रात डेंगीची चाचणी

$
0
0
राज्यभरात डेंगीचा पारा चढल्याने पुणे जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंगीची चाचणी करण्याचे ठरविले आहे. त्या चाचणीसाठी आवश्यक असेलेले किट येत्या दोन दिवसात सर्वत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

डेंगीचा डास आढळल्याने सोसायटीला दंड

$
0
0
महापालिकेने बजाविलेल्या नोटीशीकडे दुर्लक्ष करून डेंगी डासाच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्या बिबवेवाडी परिसरातील वर्धमानपुरा सोसायटीला महापालिकेने सोमवारी अकरा हजार रुपयांचा दंड केला. सोसायटीला पालिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

आचारसंहितेचा निर्णय आज जाहीर होणार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आता आचारसंहिता केव्हापासून लागू करायची आणि निवडणुकीचे वेळापत्रक याबाबतचे निर्णय मंगळवारी होणाऱ्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहेत.

‘राष्ट्रवादी’ची स्वबळाची चाचपणी

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आलेले अपयश ​धुवून काढण्यासाठी आणि पक्षाची ताकद दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक स्वबळावरच लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

समन्वयाने समस्या सोडवण्यास प्राधान्य

$
0
0
विविध वादांनी चर्चेत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांची निवड करण्यात आली. गेली तीसहून अधिक वर्षे या क्षेत्रात वावरत असलेल्या पाटकर यांना या क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांना भेडसावणाऱ्या समस्यांची कल्पना आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images